दिनांक १४ नोव्हेंबर २०१६ , सोमवार कार्तिकस्वामी दर्शन…. १] श्री कार्तिकस्वामी यांच्या दर्शनाचा योग यंदा दिनांक १४ नोव्हेंबर २०१६ रोजी (सोमवार ) दुपारी ४ वाजून २७ मिनिटांपासुन ते संध्याकाळी ७ वाजून २२ मिनीटांपर्यंत आहे. २] “कार्तिक पौर्णिमेंला सामन्यात: कृत्तिका नक्षत्र असते . त्याचा काल थोडा पुढे मागे होऊ शकतो . ३] कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल तेव्हा श्रीकार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो. ४] श्रीकार्तिकेय हे बल,बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे “धनसंपत्तीकारक” ही मानले गेले आहे. खास करून कर्जमुक्तीसाठी कार्तिक स्वामींची दर्शन व आराधना या काळात अवश्य करावी. ५] कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यानंतर व योग्य ती आराधना केल्यानंतर आगामी सबंध वर्ष कार्तिक स्वामींचे रोज स्मरण करावे . ६] आर्थिक अडचणीत, कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणीकाळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक अडचणीतून मुक्तता मिळते . ७] श्रध्दा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो. विशेष म्हणजे इतरवेळी कार्तिकेयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रीयांना वर्ज्य असले तरी या पर्वणीकाळात स्त्रीयादेखील कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात हे विशेष आहे. ८] सर्वात मोठी संपदा हि आरोग्यपूर्ण शरीर हीच मानली गेलेली आहे. हेमंत ऋतूच्या आगमनाबरोबर ज्या मंडळींना व्यायाम सुरु करायचा आहे त्यांनी देवांचे सेनापती असलेल्या शक्ती चे प्रतिक असणाऱ्या कार्तिक स्वामींना स्मरण करून बलोपासनेला प्रारंभ करावा . ९] कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाचे वेळी त्यांना दंड, पाण्याने भरलेला कमंडलु, २७ रुद्राक्षांची माळ, कमळाचे फुल (किंवा कोणतीही पांढरी फुले) आणि दर्भ व यथाशक्ती सुवर्ण अर्पण करतात . १० ] दर्शनाचे वेळी कार्तिकस्वामींच्या २८ नावांचा उल्लेख असलेले [ खाली दिलेले “प्रज्ञाविवर्धन स्तोत्रा”चे पाठ यथाशक्ती करावेत. ११] पर्वणी काळात मंदिरात गर्दी असल्याने दर्शन आधी किंवा उशिरा झाले अथवा आपल्या गावात कार्तिक स्वामींचे मंदिर नसले तरीही तरीही कार्तिक स्वामींचे स्मरण करून [ सोबत षडानन अश्या कार्तिक स्वामींचा फोटो दिलेला आहे ] प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अवश्य ११ / १८ / १०८ असे जमेल तेवढ्या वेळा म्हणावे. कार्तिक स्वामींची मंदिरे पुण्याला पर्वतीवर, व रास्ते पेठेत [ मुरुगन / सुब्रमण्य स्वामींचे म्हणजे कार्तिक स्वमिन्चेच ] मंदिर. कोल्हापुरला महालक्ष्मी मंदिराजवळ पालघर जिल्ह्यात (केळवे), वसई (निर्मळ) या परिसरात || प्रज्ञाविवर्धन स्तोत्र || अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य सनत्कुमारऋषि:। स्वामी कार्तिकेयो देवता। अनुष्टुप् छंद:। मम सकल विद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोग:। योगीश्वरो महासेन: कार्तिकेयोSग्निनन्दन:। स्कंद:कुमार: सेनानी: स्वामिशंकरसंभव: ।।१।। गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वज:। तारकारिरुमापुत्र: क्रौंचारिश्च षडानन: ।।२।। शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:सारस्वतो गुह:। सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रद: ।।३।। शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत। सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन: ।।४।। अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठेत्। प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।। महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम्। महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।। || इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम्। *** या दर्शनपर्वणीचा लाभ घ्या *** Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website