धनत्रयोदशी Mandar Sant November 7, 2018 दिनविशेष यावर्षी २८ ऑक्टोबर २०१६ ला धनत्रयोदशी आहे . हा उत्सव सायंकाळी करावयाचा असतो . अश्विन कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे? भगवान धनवंतरीची पूजा करा. घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करा. सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी. मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा. तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करा. कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावा. धनत्रयोदशी पूजेत काय करावे. अ)कुबेर पूजन आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवा. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाका. संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करा. कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा. ‘यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।’ नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करा. ब) यम दीपदान धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा. गंध, पुष्प आणि अक्षतांनी पूजा करा आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा. ‘मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह। त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।’ आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते. यमराज पूजन या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा. घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावा. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करा Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website