रविपुष्यामृत योग – २५ जून २०१७ Mandar Sant June 20, 2017 दिनविशेष रविपुष्यामृत योगावर कोणती कार्ये कराल ? रवि पुष्य योग विवाह वगळता सर्व कार्यांसाठी शुभ आहे. विपरीत ग्रहस्थितीमध्ये हि रवीपुष्यामृत योगावर केलेली खरेदी व मंगल कार्ये लाभदायक होतात. सोने व वाहन खरेदीसाठी हा योग्य योग्य मानला जातो. नवीन व्यवसाय अथवा व्यापार सुरु करण्याकरिता रविपुष्यामृत योग्य लाभदायक ठरतो. मंत्र जप आणि औषधींच्या विविध प्रयोगांसाठी हा योग्य लाभदायक असतो. कोणतीही विशेष साधना यादिवशी अवश्य करावी. १. यादिवशी सुरुवात केलेल्या कार्याला सफलता मिळण्याचे प्रमाण खूप जास्त असते. 2. कामाची गुणवत्ता तसेच त्याचा प्रभाव वाढतो. 3. धनलाभ उत्तम होतो. 4. पूजेतील यंत्र सिद्ध करण्याकरिता उत्तम दिवस. 5. जन्मकुंडलीतील सूर्याचे स्थान चांगले होते. 6. सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळण्याकरिता या दिवशी लाल वस्त्रे वापरावीत. 7. आर्थिक भरभराट होते. रविपुष्यामृत योगावर खालील उपाय करावेत : ● गायीला गूळ खायला घातल्याने आर्थिक वृद्धी होईल. ● रविवारी देवळात दिवा लावल्याने कार्यसिद्धी होते. ● तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात दूध, लाल फुले तसेच रक्तचंदन मिसळून सूर्याला अर्घ्य दिल्याने शत्रू कमजोर होतात. Ref : AstroSage.com Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website