शिव मानसपूजा Mandar Sant December 12, 2020 स्तोत्र *चन्द्राननार्धदेहाय चन्द्रांशुसितमूर्तये ।* *चन्द्रार्कानलनेत्राय चन्द्रार्धशिरसे नमः ॥* *अर्थ : चंद्रमुखी पार्वती ही ज्याची अर्धांगिनी आहे, जो चंद्रकिरणांप्रमाणे शीतल आहे, ज्याचे तीन नेत्र चंद्र, सूर्य आणि अग्नीप्रमाणे आहेत, ज्याने आपल्या मस्तकावर अर्धचंद्र धारण केलेला आहे अशा भगवान श्रीशंकराला माझा नमस्कार असो.* ॐ कारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायंति योगिन:। कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नम:॥ नमंतिऋषयो देवा नमन्त्यप्सरसां गणा:। नरा नमन्तिदेवेशं नकाराय नमो नम:॥ महादेवं महात्मानं महाध्यानं परायणम्। महापापहरं देवं मकाराय नमो नम:॥ शिवं शांन्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकम्। शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नम:॥ वाहनं वृषभो यस्य वासुकि: कण्ठभूषणम्। वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नम:॥ यत्र यत्र स्थितो देव: सर्वव्यापी महेश्वर:। यो गुरुः सर्वदेवानां यकाराय नमो नम:॥ षडक्षरमिदं स्तोत्रं य: पठेच्छिवसंनिधौ। शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥ *संस्कृत स्तोत्र* रत्नै: कल्पितमासनं हिम-जलै: स्नानं च दिव्याम्बरं नाना-रत्न-विभूषितं मृगमदामोदांकितं चन्दनं । जाती-चम्पक-बिल्व-पत्र-रचितं पुष्पं च धूपं तथा, दीपं देव दयानिधे पशुपते हृत-कल्पितं गृह्यताम् ..||१|| सौवर्णे नव-रत्न-खंड-रचिते पात्रे घृतं पायसं, भक्ष्यं पञ्च-विधं पयो-दधि-युतं रम्भाफलं पानकं । शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूर- खंडोज्ज्वलं , ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु !..||२|| छत्रं चामरयो:युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं , वीणा-भेरि-मृदंग-काहलकला गीतं च नृत्यं तथा । साष्ट-अंगं प्रणति: स्तुति: बहुविधा ह्येतत्समस्तं मया, संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ! ..||३|| आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं , पूजा ते विषयोपभोग-रचना निद्रा समाधि-स्थिति: । संचार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्रानि सर्वागिरो , यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं ..||४|| कर-चरण-कृतं वाक्कायजं कर्मजं वा, श्रवण-नयनजं वा मानसं वापराधं । विहितमविहितं वा सर्वमेतत्-क्षमस्व , जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ! ..||५ || *इति श्रीमत् शंकराचार्य-विरचिता शिव-मानस-पूजा समाप्त* *शिव-मानस-पूजा स्तोत्र- (श्रीमत् शंकराचार्य-विरचित )- मराठी भावानुवाद* श्रीशंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित मानससिंहासनी मनोमनी स्नानार्थ आणले हिमगिरीचे सुखशीतल पाणी दिव्य वस्त्र मग वेढून घ्यावे संध्यारंगासम झळझळते कस्तुरीचंदन तुला लावतो सुगंधात त्या विश्व नाहते पापनाशनी धूप जाळुनी राशी रचली बिल्वदलांची कितीक सुंदर अर्धोन्मीलित फुले जाईची अन चाफ्याची स्वामी मंगलदीप लावतो दीपोत्सव होऊ दे अंतरी नमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी || सुवर्णपात्रही मनी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटी दह्यादुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुजसाठी रसाळ भाज्या मधूर पाणी गोड फळे स्वामी सेवावी भोजनोत्तरी विडा कर्पुरी भक्षुनिया मुखशुद्धी व्हावी मानसीच्या विश्रामगृही प्रभू आता तव होऊ दे आगमन मस्तकी धरतो छत्र सुलक्षण चवरीने तुज वारा घालीन स्फटिकासम चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरती स्वर वीणेचे ताल मृदंगी गीतनृत्य भुवनातून भरती पुन:पुन: तुज नमितो येथे स्तवनांनी लववितो वैखरी नमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी || तू आत्मा मम , बुद्धीरुपाने देवी उमा अंतरी विराजे प्राण तुझे सहचर शिवनाथा शरीर घर हे तुझेच साजे विषयभोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती ती निद्रा जी भरते नयनांतून सहजसुखाची समाधिस्थिती पायांना जी घडे भ्रमंती तुझी कृपाळा ती प्रदक्षिणा वाचेला स्फुरते जी भाषा तुझे स्तवन हे हे दयाघना या देहातून या मनामध्ये तुझीच लीला तुझीच सत्ता मी जे कर्म करावे ते ते तव आराधन हो प्रभुनाथा या हातांनी , या चरणांनी , या वाणीने , या कर्णांनी या कायेने अनुचित कर्मे जी आचरिली पूर्ण जीवनी हे करुणाकर ! महादेव हे ! अपराधांना प्रभू क्षमा करी नमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी *उपमा नाही रूपी निर्गूणगुण…* उपमा नाही रूपी निर्गूणगुणरहिता । कैलासाहुनि मानस धरिला भजकार्था ॥ काशी आदि करूनी गणनाच्या तीर्था । लिंगदेहे वससी भक्ती भावार्था ॥ १ ॥ जय देव जय देव अजिनांबरधारी । आरती तुज मंगेशा निर्गुण उपचारी ॥ धृ. ॥ गजचर्म परिधान शशि धरिला शिरी । भूधर जिंकुनी कंठी केली उत्तरी ॥ जटाजूटी बसे गंगा सुंदरी । वाहन नंदी तुझें अर्धागी गौरी ॥ २ ॥ मंगलदायक तुझें शिवनाम घेतां । तत्क्षण भस्म होंती तापत्रयव्यथा । अभिन्नभिन्न भाव दासाच्या चित्ता। चरणाविहित न करी मज गौरीकांता ॥ ३ ॥ ( श्री अजय जंगम यांच्या सौजन्याने प्राप्त ) Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website