श्रीसूर्यकवचस्तोत्र Mandar Sant February 18, 2021 स्तोत्र II अथ श्रीसूर्यकवचस्तोत्रम् II श्री गणेशाय नमः याज्ञवल्क्य उवाच श्रुणुष्व मुनिशार्दूल सूर्यस्य कवचं शुभम् I शरीरारोग्यदं दिव्यं सर्व सौभाग्यदायकम् II १ II दैदिप्यमानं मुकुटं स्फ़ुरन्मकरकुण्डलम् I ध्यात्वा सहस्रकिरणं स्तोत्रमेतदुदीरयेत् II २ II शिरो मे भास्करः पातु ललाटे मेSमितद्दुतिः I नेत्रे दिनमणिः पातु श्रवणे वासरेश्वरः II ३ II घ्राणं धर्म धृणिः पातु वदनं वेदवाहनः I जिह्वां मे मानदः पातु कंठं मे सुरवंदितः II ४ II स्कंधौ प्रभाकरं पातु वक्षः पातु जनप्रियः I पातु पादौ द्वादशात्मा सर्वागं सकलेश्वरः II ५ II सूर्यरक्षात्मकं स्तोत्रं लिखित्वा भूर्जपत्रके I दधाति यः करे तस्य वशगाः सर्वसिद्धयः II ६ II सुस्नातो यो जपेत्सम्यक् योSधीते स्वस्थ मानसः I स रोगमुक्तो दीर्घायुः सुखं पुष्टिं च विंदति II ७ II II इति श्री माद्याज्ञवल्क्यमुनिविरचितं सूर्यकवचस्तोत्रं संपूर्णं II श्रीसूर्यकवचस्तोत्रंचा मराठी अर्थ: श्रीगणेशाला नमस्कार करून याज्ञवल्क्य म्हणाले: १) हे मुनिश्रेष्ठ शरीराला आरोग्यदायक, अत्यंत दिव्य, आणि सर्व प्रकारचे सौभाग्यदायक असे हे सूर्याचे शुभकवच ऐकावे. २) दैदिप्यमान मुगुट घातलेल्या आणि कानांत मकरकुंडल असलेल्या सूर्याचे स्मरण करून हे स्तोत्र मी लिहीत आहे. ३) भास्कर माझ्या डोक्याचे, तर अमितद्युति माझ्या कपाळाचे, दिनमणी माझ्या डोळ्यांचे आणि वासरेश्वर माझ्या कानांचे रक्षण करो. ४) धर्मधृणि म्हणजे घामाचे निर्मुलन करणारा माझ्या नाकाचे, वेदवाहन माझ्या तोंडाचे, मानद माझ्या जिभेचे तर देवही ज्याची पूजा करतात असा तो सूर्य माझ्या कंठाचे रक्षण करो. ५) प्रभाकर माझ्या खांद्यांचे, जनप्रिय माझ्या छातीचे, द्वादशात्मा माझ्या पायांचे आणि सकलेश्वर माझ्या सर्वागाचे रक्षण करो. ६) हे सूर्यरक्षात्मक स्तोत्र भूर्ज पत्रावर लिहून त्याला जो अर्पण करेल तो सर्वसिद्धि प्राप्त करतो. ७) स्नान करून अत्यंत शांतपणे ह्या स्तोत्राचा जप करणारा रोगमुक्त होतो व दीर्घायुषी होतो. त्याला सुख व समृद्धि लाभते. अशारीतीने श्री याज्ञवल्क्य ऋषिनिं लिहिलेले हे सूर्यकवच पूर्ण झाले. जन्मपत्रिकेंत रवी (सूर्य) जर शनी, राहू, केतू, हर्शल यांच्या बरोबर असेल अगर यांनी दृष्ट असेल तर, शनीच्या राशींत, अशुभ स्थानी असेल तर या कवचाचा रोज जप करावा. रविमुळे (अशुभ) झाल्यामुळे आरोग्य बिघडणे, घरांतील वडिलधार्याना त्रास होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असणे, हृदय, पाठ, डोळे, हाडे कमजोर असणे, वडिलार्जित संपतीमध्ये अडचणी वगैरे कमी होतात. ।। शुभम भवतु ।। Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website