II केतुकवचम् II Mandar Sant December 10, 2018 स्तोत्र 1 II केतुकवचम् II अथ केतुकवचम् अस्य श्रीकेतुकवचस्तोत्रमंत्रस्य त्र्यंबक ऋषिः I अनुष्टप् छन्दः I केतुर्देवता I कं बीजं I नमः शक्तिः I केतुरिति कीलकम् I केतुप्रीत्यर्थं जपे विनियोगः II केतु करालवदनं चित्रवर्णं किरीटिनम् I प्रणमामि सदा केतुं ध्वजाकारं ग्रहेश्वरम् II १ II चित्रवर्णः शिरः पातु भालं धूम्रसमद्युतिः I पातु नेत्रे पिंगलाक्षः श्रुती मे रक्तलोचनः II २ II घ्राणं पातु सुवर्णाभश्चिबुकं सिंहिकासुतः I पातु कंठं च मे केतुः स्कंधौ पातु ग्रहाधिपः II ३ II हस्तौ पातु श्रेष्ठः कुक्षिं पातु महाग्रहः I सिंहासनः कटिं पातु मध्यं पातु महासुरः II ४ II ऊरुं पातु महाशीर्षो जानुनी मेSतिकोपनः I पातु पादौ च मे क्रूरः सर्वाङ्गं नरपिंगलः II ५ II य इदं कवचं दिव्यं सर्वरोगविनाशनम् I सर्वशत्रुविनाशं च धारणाद्विजयि भवेत् II ६ II II इति श्रीब्रह्माण्डपुराणे केतुकवचं संपूर्णं II केतुकवचाचा मराठी अर्थ: या केतु कवचाचे त्र्यंबक नावाचे ऋषि आहेत. अनुष्टुप् हा छन्द आहे. या कवचाचि देवता केतु ही आहे. कं हे बीज व नमः ही शक्ति आहे. केतु हे किलक आहे. केतु पासून त्रास होऊ नये म्हणून मी हे स्तोत्र म्हणत आहे. १) कराल मुख असलेल्या केतुचा मुगुट चित्रवर्णी आहे. ध्वजाकार असलेल्या या ग्रहेश्वर केतुला मी नेहमी नमस्कार करतो. २) चित्रवर्ण असलेला केतू माझ्या डोक्याचे रक्षण करो. धूम्रासारखा असणारा माझ्या कपाळाचे रक्षण करो. माझ्या डोळ्यांचे पिंगलाक्ष रक्षण करो. माझ्या कानांचे रक्तलोचन रक्षण करो. ३) माझ्या नाकाचे सुवर्णाभ रक्षण करो. माझ्या चेहर्याचे सिंहिकासुत रक्षण करो. केतु माझ्या कंठाचे रक्षण करो. माझ्या खांद्यांचे ग्रहाधिप रक्षण करो. ४) माझ्या हातांचे रक्षण सुरश्रेष्ठ करो. महाग्रह माझ्या कुक्षिचे रक्षण करो. सिंहासनस्थ (केतु) माझ्या कंबरेचे आणि महासुर माझ्या मध्यंगाचे रक्षण करो. ५) महाशिर्ष माझ्या ऊराचे क्रूर असलेला माझ्या पायांचे आणि नरपिंगल माझ्या सर्वांगाचे रक्षण करो. ६) हे कवच अतिशय दिव्य असून जो हे धारण करेल तो सर्व रोगांतून मुक्त होईल. त्याच्या सर्व शत्रुंचा नाश होऊन विजयी होईल. अशारितीने ब्रह्मांड पुराणांतील केतु कवच पूर्ण झाले. केतु कुंडलीमध्ये अशुभ असेल तर या स्तोत्राचे पठण करावे. नियमित पठण केल्यामुळे सर्वप्रकारच्या बाधा नाहीशा होतात. धनधान्य पशु यांची वृद्धि होते. केतु हा चंद्राबरोबर असेल अगर शुक्राबरोबर असेल तर ग्रहण योगामुळे स्त्रियांच्या कुंडलींत संसार सुखांत बाधा आणतो. पुरुषांच्याही वैवाहिक सुखांत त्रास निर्माण होतात. केतु हा बुधाबरोबर असेल तर मज्जासंस्थेचे विकार निर्माण करू शकतो. केतु गुरुबरोबर असेल तर संतती सुखांत अडचणी आणू शकतो. केतुमुळे हा त्रास होऊ नये म्हणून हे केतु कवच रोज म्हणावे. One Response साप्ताहिक राशिभविष्य 09 ते 15 डिसेंबर 2019 - Blog | Mandar Sant December 10, 2019 […] केतू कवच स्तोत्र वाचावे. यासाठी कृपया येथे [ केतू […] Reply Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website
साप्ताहिक राशिभविष्य 09 ते 15 डिसेंबर 2019 - Blog | Mandar Sant December 10, 2019 […] केतू कवच स्तोत्र वाचावे. यासाठी कृपया येथे [ केतू […] Reply