अधिक मासाची आरती
जय जय अधिकमास । पुरूषोत्तम नाम ।
सदभावे व्रत करिता ।लाभतसे पुण्य ।जयदेवजयदेव।धृ।
दीन म्हणोनी कृष्णे । उद्धार केला ।
निजनामे ‘पुरूषोत्तम ‘ । धन्य तुला केला ।
दाने त्यागे स्नाने । पूजा जप माला ।
व्रताचरणे फलदायी । निश्चय ठरविला ।
निःस्वार्थे परमार्थे । हरिसी तू दैन्य ।
सदभावे व्रत करीता । लाभतसे पुण्य ।
जय अधिकमास ।पुरूषोत्तम नाम ।
सदभावे ।व्रत करिता |लाभतसे |पुण्य जयदेव जयदेव ।१।
पुरूषोत्तम महिमा । तो दुर्वासे कथिला ।
मेधावी कन्येला ।तो नच आवडला।
परि शिवपूजा ।करण्या सांगुनिया तिजला ।
पांडवपत्नी म्हणूनी ।जन्म धन्य केला ।
जय जय अधिकमास ।पुरूषोत्तम नाम ।
सदभावेव्रतकरिता ।लाभतसेपुण्य ।जयदेव जयदेव ।२।
अधिक मासामाजी । दाने जे देती ।
दीप निरंतर । देवापुढती लाविती ।
राधाकृष्णांची ही पूजा । जे कोणी करिती ।
अथवा उपवासा । मासभरी धरिती ।
अनारसे तेहत्तीस ।जामाता दान ।
सदभावे व्रत करतां ।लाभतसे पुण्य ।
जयजय अधिकमास ।पुरूषोत्ततम नाम ।
सदभावे व्रतकरतां ।लाभतसेपुण्य।जयदेवजयदेव ।३।
धृढधन्वा याला ।पोपट करितो उपदेश ।
गतजन्मीची सांगे ।पुण्याई त्यास ।
अधिकमासी घडतां । स्नाने उपवास
पुनरूज्जीवन लाभे । मृत तत् पुत्रास ।
सुदेव विप्रासी । फल प्राप्त पूर्ण ।
सदभावे व्रत करिता । लाभतसे पुण्य ।
जयजय अधिकमास ।पुरूषोत्तम नाम ।
सदभावेव्रत करिता लाभतसेपुण्य ।जयदेव जयदेव ।४।
राजामणीग्रीवाते ।उग्रदेव बोले।
पुरूषोत्तम मासाचे । व्रत त्या सांगितले ।
त्याला पुढच्याजन्मी ।सुखप्राप्त झाले ।
चित्रबाहु म्हणुनिया त्याने । वैभव भोगियले ।
सहज जरी ।व्रत घडले ।तरि होई धन्य ।

जयजयअधिकमास ।पुरूषोत्तम नाम।सदभावे व्रत करता लाभतसे पुण्य ।जयदेवजयदेव ।५।
कदर्यु अख्यान ।नारायण कथिती ।
दुर्गति होऊनियाहि प्राप्त । पुण्य घडे अंती ।
वानर जन्म मीळूनिहि । होय स्वर्गाची प्राप्ती
मासभरे उपवासे हि ।तयास होय प्राप्ती ।
कथा पुराणामधल्या ।कित्येक अन्य ।
जयजयअधिकमास ।पुरूषोत्तमनाम ।
सदभावे व्रत करिता ।लाभतसे पुण्य ।जयदेवजयदेव।६।
धर्म सत्य मर्यादा ।नीती आचरणी ।
कैसे पुण्य करावे । दंपती जीवनी ।
अनेक ऋषीवचने ।ऐकावी श्रवणी ।
महात्म्य पोथी वाचन ।करणे सर्वांनी ।
निःस्वार्थे वागावे । हाच धर्म मान्य ।
जयजय अधिकमास।पुरूषोत्तमनाम।
सदभावे व्रत करिता।लाभतसेपुण्य।जयदेवजयदेव।७।

Leave a Reply

Your email address will not be published.