उत्पत्ती एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ३० नोव्हेंबर २०२१ moderator November 29, 2021 दिनविशेष कार्तिक कृष्णपक्षातील एकादशीला उत्पत्ति एकादशी म्हणतात. एकादशीचे जन्मकथन ऐकल्यानंतर धर्मराजाने श्रीकृष्णाची प्रार्थना करुन विचारले. की, “हे भगवन् ! कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे हे इतिहासासहित सांगा.” धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की; “हे धर्मराजा ! पूर्वी कीटक नावाच्या देशाची कर्णिका ही राजधानी होती. तेथे कर्णसेन नांवाचा राजा धर्माला अनुसरुन राज्य करीत होता. तो न्यायाने वागत असें, प्रजेवर जुलूम करीत नसे. प्रजेला असह्य करांच्या चरकात घालून पिळून काढीत नसे. न्यायाने जेवढा कर वसूल करावयाचा तेवढाच करीत असे त्या कराचा विनियोग प्रजेच्या रक्षणार्थ करीत असे. प्रजेवर येणाऱ्या संकटाचा व दुःखाचा परिहार करण्याकरिता नेहमी जागृत असे. इतकेही करुन जर एकादेवेळी प्रजेवर संकट आले तर ते निवारण करण्याकरिता स्वतःच्या सुख दुःखाकडे काय पण प्राणाकडे सुद्धा न पाहता अंतःकरणपूर्वक झटत असे. एकंदरित प्रजेच्या सुखाकरिता व उत्कर्षाकरिता जे जे करावयाचे असते ते ते करण्याला तो नेहमी तयार असे. त्याचप्रमाणे त्याची प्रजाही धर्मालाच अनुसरुन वागत असे. बाह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या चारीवर्णांनी युक्त असलेली प्रजा एकमेकांशी आनंदाने धर्मानुसार व्यवहार करुन सुखात नांदत होती. आणि त्यांचा कृपाप्रसाद, देवावर भक्ति, संतसज्जनावर निष्ठा, व स्वकर्तव्याचे प्रेमयुक्त आचरण ही त्रयी त्या सुखाचा प्राण होती. एकंदरीत राजा व प्रजा धर्मानुसार वागत असल्यामुळे ती कर्णिका नगरीच नव्हे तर तो सर्व कीटक देश सुखी होता. पण त्या कर्णिका नगरीत सुदामा नांवाचा एक ब्राह्मण दारिद्र्यामुळे दुःखी होता. जरी तो अठरा विश्वे दारिद्र्याने गांजला होता तरी त्याच्या हातून धर्मबाह्य वर्तन बिलकूल होत नसे. त्याला सुव्रता नांवाची एक बायको होती. ती महान पतिव्रता होती. दारिद्र्यामुळे त्या नवराबायकोला खावयास पोटभरसुद्धा अन्न मिळत नसे, कधी कधी उपास काढावे लागत, नेसण्याला व पांधरण्याला धड वस्त्रे नसत, त्यांच्या अशा स्थितीत ती उभयता एकमेकांना कटु वचने तर बोलत नसतच, पण उलट एकमेकांवर प्रेम करुन आपापले कर्तव्य करीत काळ कंठीत असत. ज्यावेळी मनुष्ये धर्मावर श्रद्धा ठेवून स्वकर्तव्यानुसार वागतात त्यावेळीच त्यांच्यात ऐक्य नांदते. त्या ऐक्यामुळे ते सुखाच्या लतावृक्षांनी गजबजलेल्या शीतल अशा उत्कर्षाच्या मार्गाने परमेश्वराकडे जातात. एके दिवशी ती महासाध्वी आपल्या पतिची प्रार्थना करुन दीनवदनाने म्हणाली की, “महाराज ! आपल्या पूर्वजन्मीच्या पापामुळे आपण ही दारिद्र्यावस्था भोगित आहोत. महाराज ! दारिद्र्यानां सगे सोयरे जवळ करीत नाहीत, ओळखत नाहीत, चार लोकांत मानमान्यता मिळण्याला द्रव्याची मदत होते, मूर्ख मनुष्याजवळ द्रव्य असले तर लोक शहाणा ठरवितात. व शहाण्या मनुष्याजवळ द्रव्य नसले तर लोक त्याला मूर्ख ठरवितात. एकदरीत लोकांच्या दृष्टिने मनुष्याचा चांगलेपणा अगर वाईटपणा हा द्रव्यावर अवलंबून आहे. तेव्हा महाराज ! द्रव्य मिळविण्याचा काही तरी । उपाय करा. बरें, ही लौकिक दृष्टी त्याज्य म्हणून सोडून दिली तरी स्वहिताच्या दृष्टिनेसुद्धा द्रव्य मिळीवणे अवश्य आहे. द्रव्यामुळेच मनुष्याचा प्रपंच चालतो. त्या प्रपंचाच्या साह्याने मनुष्याला पुण्यमार्ग आक्रमण करता येतो. सत्कर्मे करिता येतात. दाने करिता येतात. याकरिता द्रव्य मिळविण्याचा काहीतरी आणि तोही न्यायाने लवकर उपाय योजा. द्रव्य मिळवून सुखैषाराम उपभोगावयास मिळावे म्हणून आपणाल मी ही विनंती मीत नाही. तर त्या मिळविलेल्या द्रव्यापासून सत्कर्मे-दाने करुन जन्माचे साफल्य करुन घ्यावे म्हणून. याप्रमाणे तिचे ते धर्मयुक्त व मधुर भाषण ऐकून तो बाह्मण तिला म्हणाला की, हे सुव्रते, तुझे हे भाषण सत्य आहे पण द्रव्य मिळविण्याकरिता मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या नशिबी जेवढे लिहिले असेल तेवढेच मिळते पूर्वजन्मीच्या सत्कर्माचा भाग्योदय झाल्याखेरीज या जन्मीच्या दारिद्रयाचा अंधार नाहीसा होणार नाही. अमावस्येच्या रात्री चंद्रदर्शन कसे होईल? ते होण्याला योग्य कालाची वाट पाहावी लागते. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे वेदशास्त्रांने संपन्न असलेला, सुविचाराने गजबजलेला, चातुर्याने नटलेला, धैर्याने ओथंबलेला व जपतप नेमधर्माला सर्वस्वी वाहिलेला मनुष्य पूर्वजन्मीच्या सत्कर्मावाचून द्रव्य मिळविण्याच्या बाबतीत लंगडा पडेल. पतीचे हे भाषण ऐकल्यानंतर तिने या बाबतीत तोंडातून एक चकार शब्द सुद्धा काढली नाही व पुढेही न काढण्याचा निश्चय केला, पण थोड्याच दिवसात त्यांच्या घरी देवर्षि नारंदांची स्वारी आली. नारदांना पाहताच त्या दोघांना गगनांत मावणार नाही इतका आनंद झाला. त्यांनी आपल्या सामर्थ्याप्रमाणे नारदांचा योग्य सत्कार करुन साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले की; “महाराज ! आपले पवित्र चरण आमच्या लागल्यामुळे आम्ही धन्य झालो, आमच्या जन्माचे साफल्य झाल. महाराज ! संताचे दर्शन झाल्याबरोबर त्रिताप नाहीसे होतात. आता आमच्यावर कृपा करा. आम्ही दारिद्र्याने अत्यंत पिडलो आहोत तेव्हा ते नाहीसे होण्याला आम्ही कोणता उपाय योजवा ते सांगा. त्या ब्राह्मणाचे ते दीनवाणे भाषण ऐकून नारद म्हणाले की, “हे ब्राह्मणा ! दारिद्र्य नाहीसे होण्याला तुला एक सोपा उपाय सांगतो तो ऐक जर तू उत्पत्ती एकादशीते व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) करशील तर तुझे दारिद्र्य नाहीसे होऊन तूं धनाढ्य होशील, सर्व पापपासून मुक्त होशील, व अंती सद्गतील जाशील. या प्रमाणे नारद त्या ब्राह्मणाला उपाय सांगून निघून गेले. पुढे त्या सुदामा ब्राह्मणाने व त्याच्या सुव्रता पत्नीने उत्पत्ति एकादशीचे व्रत यथाविधी केले. तेव्हा त्यांना अलोट संपत्ति मिळाली व त्या संपत्तीच्या साह्याने त्यांनी अनेक पुण्य कर्मे केली, दाने केली व अंती वैकुंठाला गेले. जे कोणी हे उत्पत्ति एकादशीचे व्रत करतील व माहात्म ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील.’ कार्तिक कृष्णपक्षातील एकादशीला उत्पत्ति एकादशी म्हणतात. उत्पत्ति एकादशी माहात्म्य प्राचीन काळी नैमिषारण्यात चाललेल्या यज्ञसत्रात मध्यांतरात रोमहर्षण सूत शौनकादी ऋषींना व श्रोत्यांना उद्बोधक कथा सांगत होते. त्या समयी सर्वांच्या विनंतीवरून त्यांनी एकादश्यांचे माहात्म्य कथन केले. ते म्हणाले, “विप्र हो! पूर्वी धर्मराजाने विचारणा केली असता भगवान श्रीकृष्णाने त्याला सर्व एकादश्यांची माहिती व महती सांगितली. त्याने सर्वप्रथम कार्तिक कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशीचा सर्व विधी व तिचे माहात्म्य स्पष्ट केले. मग तिचे आविर्भवन कसे झाले तो प्रसंगही निवेदन केला. स तो म्हणाला, “धर्मा ! कृतयुगात बलाढ्य मुरुदैत्याने स्वर्गावर स्वारी करून इंद्रासह सर्व देवांना तेथून पळवून लावले. तेव्हा ! पराभूत व स्थानभ्रष्ट झालेले सर्व देव शंकरांच्या सांगण्यावरून भगवान विष्णूंना शरण गेले. त्यांना दैत्यराजाच्या सर्व अत्याचारांची ॐ कल्पना दिली व त्याचा बंदोबस्त करण्याची आर्त विनंती केली. तेव्हा संतप्त झालेल्या हृषीकेशांनी त्या सर्वांसह मुरुसेनेवर आक्रमण केले. त्या भीषण संगरात देवांची मोठी हानी झाली. ते दाही दिशांना पळून गेले. भगवानांनी हजारो दानवांचा निःपात केला पण अनेकानेक शस्त्रास्त्रांचा प्रहार करूनही दैत्यराज आटोक्यात येईना. तेव्हा त्यांनी त्याच्याशी एक हजार वर्षे केले. शेवटी बाहु युद्ध ते थकले आणि निद्रा घेण्यासाठी बदरिकाश्रम क्षेत्रातील हैमवरती नामक गुहेत प्रवेशले. ते गाढ झोपेत असताना मुरुदैत्य तेथे आला. तो त्यांच्या वधाचा विचार करू लागला. तेवढ्यात भगवानांच्या शरीरातून सर्व आयुधांनी युक्त असलेली एक तेजस्वी देवी प्रकट झाली. तिने त्याच्याशी युद्ध करून त्याचे मस्तक धडावेगळे केले आणि त्याच्या सैन्याचाही नाश करून ते पळवून लावले. विष्णूंना जाग आली तेव्हा दैत्यराजाचा वध झालेला पाहून त्यांना मोठा संतोष वाटला. त्या देवीने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. त्यामुळे ते अधिकच प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितला, तेव्हा ती म्हणाली, “प्रभो ! एकादशी ही माझी जन्मतिथी आहे. या दिनी जे भक्त भजन, पूजन, उपोषण व जागरण करतील त्यांचे तुम्ही सर्वार्थाने कल्याण करा. त्यांना सुख, संपत्ती, मोक्ष द्या. त्यांची विघ्ने दूर करा. त्यांची पातके नष्ट करा. ” धर्मा ! तेव्हा त्या देवीची लोकहिताची तळमळ लक्षात घेऊन भगवान विष्णूंनी तिला ‘तथाऽस्तु !’ म्हणून आशीर्वाद दिला आणि ते अंतर्धान पावले. श्रीगणेशाय नमः ।। पुरातनकाळी नैमिषारण्यात । चालले होते यज्ञसत्र । त्या प्रसंगी मध्यांतरात । नित्य सत्संग चालतसे ।।१ ।। उपस्थितांचे व्हावे रंजन । आणि मिळावे विस्तृत ज्ञान । शौनकादी ऋषींनी पाचारण । केले होते सूतांसी।।२। ॥ सूतमुनी विद्वान प्रख्यात । महाज्ञानी आणि बहुश्रुत । कथा पुराणे रसाळ वाणीत । वर्णन करुनी सांगती ।।३।। अशाच एका चर्चासत्रात । मंडळी म्हणाली सूतांप्रत । महाराज आपण साक्षात । कृपांकित वाग्देवीचे ।।४।। आपल्यासारखा वक्ता मिळाला । भाग्यरवी उदयास आला । मनोबोधासह लाभ झाला। ईश्वर चिंतनाचाही।।५।। आता कृपया आम्हांप्रत । सांगावे व्रतमाहात्म्य येथ। महीपृष्ठीं जे सर्वश्रेष्ठ । तारक पावक सकलांना ।॥६ ॥ तैं सूतांते आनंद झाला । म्हणाले प्रश्न बरवा केला । तरी ऋषीहो ! आता तुम्हांला । सांगतो काही त्याविषयी ।।७।। पूर्वी श्रीकृष्ण पांडवांप्रत । माहात्म्य-विधीसह जे व्रत । कथन केले तेच येथ । एकादशीचे सांगतो ।।८।। ही व्रतथोरवी आणि उत्पत्ती । श्रवण करील जी व्यक्ती । ती सर्व सुखे भोगून अंती। विष्णुलोकी जाईल।।९।। त्या महाव्रताचे कथानक । ऐका तुम्ही सर्व लोक । श्रीजनार्दनाप्रत प्रश्न एक। केला धर्मराजाने ।।१० ।। वदला देवा एकादशीदिनी। उपोषण नक्त वा एकभुक्त राहुनी। काय फलप्राप्ती सांग या क्षणी। विधानासह आम्हांला।। ११ ।। तधी माधव म्हणाला तयासी। राया ! पवित्र कार्तिक मासी । पुण्यदिनी कृष्ण एकादशीसी। करावे आदरे उपोषण ।।१२।। तत्पूर्वी दशमीच्या दिवशी । दंतधावन करुनी सूर्योदयासी। करावे नक्त भोजनासी। व्रतभाग हा एक असे ।।१३।। अष्टम भाग दिवसासी। भानुतेज मंद ज्या समयासी । नक्त म्हणती त्या भोजनासी । रात्र-भोजन नक्त नव्हे ।। १४।। एकादशीदिनी प्रभाती उठुनी। शौचादी देहविधी करुनी । मुखमार्जन बारा चुळा भरुनी। दंतधावन ते वर्ज्य असे।। १५।। मग संकल्प म्हणावा मनोमन । देवा ! तुझ्यावरील प्रेम म्हणून । आज भक्तीने उपोषण करून । पारणे करीन उदईक।। १६।। पुढती दोन प्रहरी सरितेत । तडाग अथवा कूप जलात । स्नान करावे यथास्थित। व्रताचरणी व्यक्तीने ।।१७।। स्नानात सरितास्नान श्रेष्ठ। तडागस्नान मध्यम खचित । कूपस्नान ते कनिष्ठ । महत्त्व असे यापरी ।।१८ ।। कूपजलाने स्नान केले। तरी मृत्तिकास्नान करावे पहिले । तत्पूर्वी अति आदरे भले । स्तवन करावे पृथ्वीचे ।।१९।। म्हणावे भूमाते तव पृष्ठीं। अश्व आणि रथ संचरती। वामनावतारी लक्ष्मीपती। आक्रमित तुजलागी ।।२०।। श्रीविष्णूंचे चरण लागले । तेणें सर्वांग पावन झाले । तुझिया मृत्तिकेते पहिले। धारण करितो मस्तकी ॥२१॥ तरी माते कृपावंते । नष्ट करी मम पातकांते। तव आशिषे मोक्षपदाते । सहजगत्या मी पावेन ।॥२२।। अशी भावप्रार्थना म्हणुनी। सर्वांगी मृत्तिका लावुनी। कूपजलाने स्नान करुनी । नित्यकर्म कि लागावे ।।२३|। एकादशी व्रत कत्त्याप्रत । काही नियम क्रमप्राप्त । पाखंडी पातकी चोर कुत्सित । भाषण तयांशी करू नये ।।२४।। – मद्यपी आणि ब्रह्महत्यारी। गुरुस्त्रीगामी व्यभिचारी । करितो स्वर्ण-द्रव्य चोरी । भाषण त्यांनी करू नये ।।२५॥। देवस्व-ब्रह्स्व करितो हरण। वंदितो देव – वेद-ब्राह्मण । अगम्य स्त्रियांशी जो रममाण । भाषण तयांशी करू नये ।। २६।। तैसेच अन्य दुराचारी। अशांचे दर्शन झाले जरी। करावे सूर्यावलोकन सत्त्वरी । तेणे दोष तो जाईल।।२७।। विधियुक्त होता स्नान । संध्यादी नित्यकर्मे अनुसरून । करावे षोडशोपचारे पूजन । गोविंदाचे आदरे ।।२८।। अखंड नंदादीप देवघरात । नको स्त्रीसंग निद्रा किंचित । भागवतकथा शास्त्रचर्चेत । घालवावी दिन-रजनी ती ।।२९।। गावे भक्तीने भगवद्गुण। रात्रसमयी जागरण-चिंतन । विप्रांते दान दक्षिणा देऊन । ‘क्षमस्व !’ म्हणुनी वंदावे ।।३०।। श्रीकृष्ण म्हणाला युधिष्ठिराप्रत । धर्मतत्पर मनुष्याने खचित । शुक्ल आणि कृष्ण एकादशीत भेट कदापि करू नये।।३१ । उभय तिथी श्रेष्ठ असती। आता ऐक पां फलश्रुती। विधियुत्क व्रत आचरिती। काय लाभ त्या नरां।।३२।। शंखोद्धार-तीर्थी कराने स्नान। गदाधर देवाचे घेतले दर्शन । पुण्यलाभ जरी महान । तरी अल्प तो तुलनेत ।।३३।। एकादशीचे महाव्रत । आचरिता पुण्य अगणित । त्याची बरोबरी पाहता येथ । षोडश भागही नसे प्राप्त । तेही तुलनेत अल्प असे ।।३६।। कारण समस्त पुण्य ते। एकादशी- उपोषणे प्राप्त नियमित । साठ सहस्र संवत्सर पर्यंत । लक्ष विप्र-भोजन चालत । गणती नच त्या पुण्यासी।।३८।। परी पुण्यलाभ तितुकाच । प्राप्त होतसे साच । सहज उपोषण करताच । हरिदिनी आदरे ।।३९।। वेदपारंगत विप्रांसी । सहस्त्र गोप्रदाने महापुण्यराशी । परी उपोषण करता एकादशीसी । पुण्य त्याचेनी दशगुणे ।।४०।। ज्याचिया सदनी रोज । जेवताती दश |द्विज। त्या पुण्याच्या दशपट सहज । एका ब्रह्मचारी भोजने मिळे ।।४१ ॥ त्याही भोजनाचेनी सहस्रपट । भूमि – कन्यादान पुण्य प्राप्त । विद्यादाने त्याहुनी दशपट । फल मिळे । ते ।।३४।। दान देता व्यतिपातीं। लक्षपट फलप्राप्ती । संक्रांती दानाची थोर महती। फल चतुर्थ लक्षपट ।।३५।। अथवा चंद्र-सूर्य ग्रहणात । स्नान दाने कुरुक्षेत्रात जे पुण्य होय का होते। अश्वमेधाच्या शतपट मिळते । केवळ व्रत हे आचरिता ।।३७ ॥। ज्याचिया सदनी म्हणाला युधिष्ठिराप्रत । धर्मतत्पर मनुष्याने खचित । शुक्ल आणि कृष्ण एकादशीत भेट कदापि करू नये।।३१ । उभय तिथी श्रेष्ठ असती। आता ऐक पां फलश्रुती। विधियुत्क व्रत आचरिती। काय लाभ त्या नरां।।३२।। शंखोद्धार-तीर्थी कराने स्नान। गदाधर देवाचे घेतले दर्शन । पुण्यलाभ जरी महान । तरी अल्प तो तुलनेत ।।३३।। एकादशीचे महाव्रत । आचरिता पुण्य अगणित । त्याची बरोबरी पाहता येथ । षोडश भागही नसे प्राप्त । तेही तुलनेत अल्प असे ।।३६।। कारण समस्त पुण्य ते। एकादशी- उपोषणे प्राप्त नियमित । साठ सहस्र संवत्सर पर्यंत । लक्ष विप्र-भोजन चालत । गणती नच त्या पुण्यासी।।३८।। परी पुण्यलाभ तितुकाच । प्राप्त होतसे साच । सहज उपोषण करताच । हरिदिनी आदरे ।।३९।। वेदपारंगत विप्रांसी । सहस्त्र गोप्रदाने महापुण्यराशी । परी उपोषण करता एकादशीसी । पुण्य त्याचेनी दशगुणे ।।४०।। ज्याचिया सदनी रोज । जेवताती दश |द्विज। त्या पुण्याच्या दशपट सहज । एका ब्रह्मचारी भोजने मिळे ।।४१ ॥ त्याही भोजनाचेनी सहस्रपट । भूमि – कन्यादान पुण्य प्राप्त । विद्यादाने त्याहुनी दशपट । फल मिळे । दात्यासी ।।४२।। जेणे बुभुक्षित होतसे संतुष्ट । ते अन्नदान सर्वांत श्रेष्ठ । त्याची पुण्यफलप्राप्ती दशपट । विद्यादानाहुनी असे ।।४३ ।। अन्नदानाची थोर महती। न भूतो न भविष्यति । स्वर्गस्थ पितरही संतोषती। प्रभाव दुर्लभ देवादिकां ।।४४।। तैसेच असे हे एकादशीव्रत । त्याची पुण्यसंख्या अगणित । धर्मराजा, तू घे ध्यानात । वदला श्रीकृष्ण सद्भावे ।।४५।। देह जरी असमर्थ । तरी उपवास करावा नक्त । अर्धे पुण्य मिळे निश्चित । फळे हविष्य भक्षिता ।॥४६। एकभुत्त जरी राहिला । त्याचाही लाभ उपासकाला । नक्तपुण्याचा अर्धभाग त्याला। निःसंशय मिळतो पां ।।४७।। व्रत अवश्य करावे । परी – निज प्रकृतीते जाणावे । आपल्या आपण ठरवावे । एकभुक्त, नक्त वा उपवास ।।४८।। जोवरी एकादशी नाही प्राप्त । तोवरी इतरांचे श्रेष्ठत्व । यज्ञ दान तीर्थे समस्त । महिमा आपुलाच गर्जती ।।४९।। म्हणुनी जन्ममृत्युरूप संसार । यातें भितो जो नर । त्याने माहात्म्य जाणुनी सत्वर । करावे एकादशी उपोषण ।।५०।। कुंतीसुता तुवा प्रश्न केला । त्याचे उत्तर देतो तुजला । हरिदिनी करावे उपोषणाला । सुरण कोनफळ न खावे ।।५१ ।। नखे स्पर्शती असे जीवन । करू नये कदापि प्राशन । सहस्त्र यागही जेथे क्षीण । ते उत्तम ब्रत हे सांगितले ।।५२।। तैं पुनरपि पुसे अर्जुन । देवा एकादशीचे पुण्य महान । आता पवित्र ती सर्वांहून । कैसी जाहली सांग पां ।।५३।। श्रीकृष्ण म्हणाला ऐक पार्था । कृतयुगी मुरू दैत्य होता। महाक्रूर अद्भुत, त्याचा मोठा। धाक समस्त सुरवरां ।।१४। त्याने इंद्रासी परास्त केला । वायू अग्नीवरी विजय मिळविला। वसू आदित्यांसह विधिला। केले त्राहित्राहि पां ।।५५।। तधी इंद्राने सकल वृत्त । पंचाननासी करुनी विदित । म्हणाला आम्ही सुर समस्त । पदच्युत जाहलो।।५६।। दे देवा, स्वर्ग राहिला दूर। आता संचरतो महीतलावर । कृपया उपाय सांगा सत्त्वर । गती कोणती आम्हांते ।।५७।। तैं तयाचे सांत्वन करीत । शिव म्हणाले हे सुरश्रेष्ठ । जो गरुडध्वज म्हणुनी प्रख्यात । भेट त्याची घेई पां ।।५८।। हा जगत्स्वामी नारायण । निजभक्तांचे करितो रक्षण । शरणागतांचे आश्रयस्थान। घाली त्याला साकडे ।।५९।। ईश्वराचे वचन ऐकून । इंद्र आणि अमरगण । जेथ जनार्दन करीत शयन । गेले सत्वर त्या ठायी। ॥६० । तेथ जगन्नाथ भगवान । क्षीरसागरी निद्रिस्त पाहून । सुरेंद्राने हात जोडून । स्तुती केली आदरे।।६१।। म्हणाला देवा दैत्यमर्दना । कमलनेत्रा मधुसूदना । तू वंदनीय सुरगणांना । रक्षावे गा आम्हांते ।।६२ । हे विश्वचालका कृपावंता । माझ्यासवे सर्व देवता | दैत्यभये शरण ताता। रक्षावे गा आम्हांते ।।६३।। तूच कर्ता आणि करविता । लोकमाता तू जगत्पिता । उत्पत्ति-रक्षण- संहारकर्ता । तूच अससी श्रीहरी ।।६४।। तूच देवांचा साहाय्यक । तूच सांत्वनकर्ता एक। तूच उपकारी विश्वरक्षक । तूच वसुंधरा गगन हे।।६५।। तूच विष्णू त्रैलोक्यपालक। तूच| हर विधी रवी शशांक । तूच अग्नी सर्व पावक । अनंतरूपे नटलासी ।।६६।। तूच हव्य ४ि होम हवन । तूच जपमंत्र तंत्र पावन । तूच ऋत्विज यजमान । यज्ञ आणि फलभोक्ता ।।६७।। त्रैलाक्यासह चराचरात । नसे काही तुझ्या विरहित । शरणागतवत्सल तू भगवंत । देवाधिपती शोभसी।।६८।। प्रभो ! दैत्यांनी बहु नाडले । जिंकून स्वर्गच्युत केले। स्थानभ्रष्ट ट सुर सगळे। आता संचरती महीवर ।।६९।। म्हणुनी हे नारायणा । आलो धावत तुझिया ते चरणा। भयभीत आम्ही करी रक्षणा। वारुनिया संकट हे ।॥७०।। तें इंद्राचे भाषण ऐकून। काय बोलले भगवान । हतवीर्य ज्यापुढे सुर बलवान । तो कोण मायावी दैत्य हा।।७१ ।। तरी देवराजा होई निर्भय । सांग तयाचे नाव गाव काय । त्याते कोणाचा आहे आश्रय । कळू दे त्याचे सामर्थ्य ।।७२।। इंद्र म्हणाला भगवंता । हे भक्तानुग्रही महादैवता। पूर्वकाळी एक दैत्य होता। नाडीजंघ नावाचा ।।७३।। ब्रह्मवंशात त्याची उत्पत्ती । परी क्रूर उग्र अति । देवसंहारक दुष्ट मती । महाभयंकर विनाशक ।।७४।। त्याचा पुत्रही विख्यात जगती । त्या महादैत्याते मुरू म्हणती । त्याची नगरी चंद्रवती। तीही अति प्रचंड असे।।७५।। मुरूने समस्त जग जिंकले । देव आपुल्या अधीन केले। त्या दुष्टाचे तीत भले । असते नित्य वास्तव्य ।।७६।। इंद्र अग्नी यम वायू ईश्वर। चंद्र निर्कती वरुण हे इतर । या अष्टदिक्पाल-स्थानांवर । तोच आरूढ एकटा ।।७७। तो सूर्य होउनी प्रकाशतो । तो पर्जन्य होउनी वर्षतो । झालासे अति अजिंक्य तो । सुरवर हतबल त्यापुढती।।७८ ।। तरी हे विष्णू चक्रधारी। दाव आपुली लीला सत्वरी । मुरू दैत्याते जिंकून संगरी। करी 1. जयवंत देवांते ।।७९।। ऐकून इंद्रमुखीचा वृत्तान्त । झाला जनार्दन कोपाविष्ट। आवेशयुक्त गर्जना करीत। बोलला मारीन शत्रू हा ।।८०।। देव हो! तुम्ही प्रतापवंत । धरा धैर्य, युद्ध हेतू मनात। करा स्वारी माझ्या समेत । चला दैत्य नगरी ।।८१।। आज्ञा होता पू. भगवंताची । स्फूर्ती विलक्षण चढली साची । सेना समस्त देवांची। निघाली चंद्रवतीकडे ।।८२ । त्यांनी जाउनी पाहिले तेथ। लक्ष दैत्य मुरूसमेत । दिव्य आयुधांनी युक्त। घुमविती अंबर गर्जने ।।८३।। तोच युद्धास तोंड लागले । दैत्य महाबली वरचढ झाले। त्या माराने देव पळाले। परास्त होउनी दशदिशी ।।८४।। तेणे संतप्त भगवान । स्वये युद्धास ठाकले पाहून । दैत्य परम चवताळून । शस्त्रे घेउनी धावले ।।८५।। असुरसेना आली पाहुनी। भगवान श्रीहरि विष्णूंनी। तीव्र विषारी बाण सोडुनी। देह भेदिले वैन्यांचे ।।८६।। त्या माराने हतवीर्य झाले । असंख्य असुर मरून पडले । परी मुरू दैत्य त्या वेळे। युद्ध करीत राहिला ।।॥८७। हषीकेशे जी आयुधे टाकली। ती दैत्यतेजें निष्प्रभ झाली। पुष्पवत हलकी होउनी पडली। अंगावरी तयाच्या ।॥८८।| शस्त्रास्त्रांन युद्ध करूनही। दैत्यास अपाय होत नाही । क्रोधीत श्रीहरी त्या समयी। सिद्ध बाहुयुद्धासी ।।८९।। परिघासमान हात पसरले। तयावरी धावून गेले । ते भयंकर युद्ध चालले । सहस्त्र वर्षे देवांची ।॥१०।। त्या लढतीचे श्रम पडले । भगवान पुरते थकून गेले । विश्रांतीस्तव गमन केले। बदरिकाश्रमी तत्काळ ।।९१।। तेथ हैमवती नामक मोठी । शोभिवंत एकांत गुहा होती। शयनार्थ महायोगी जगत्पती । प्रवेशले तियेत ।।९२ ।। कृष्ण म्हणाला धनंजय । त्या गुहेविषयी सांगू काय । एका द्वाराची महाकाय । विस्तार बारा योजने ।।९३ ।। दीर्घ युद्धाने बहु दमलो । निःसंशय मीही घाबरलो । दैत्यभयाने जाउनी निजलो । शांत एकांत स्थानी त्या ॥९४।। तैं माझा माग काढीत। मुरूही आला त्या गुहेत । मजलागी पाहुनी निद्रिस्त । दुष्ट विचार करीतसे।।९५।। म्हणे हरी हा काळ ठरला। दानवांचा नाश केला। उत्तम संधी या समयाला। मारून टाकू यालागी।।९६।। तधी तयाचा हेतू जाणुनी। एक कन्यका त्या स्थानी। प्रकटली मम देहातुनी। विनाविलंब तत्काळ ।।९७।। ती देवी महातेजस्विनी। हाती दिव्य आयुधे घेऊनी। संग्रामास्तव सज्ज पाहुनी। मुरू दैत्यही अचंबित ।।९८।। मग आव्हान देता तियेने । युद्ध आरंभिले. दैत्यपतीने । पाहूनी तिचे उग्र लढणे । थक्क मरू तो बलशाली।९९ । मनी म्हणे ही भयंकर । वज्रायुधे करिते प्रहार । नकळे निर्माता कोण खरोखर । तरीही युद्ध करीतसे ।। १००।। समरप्रसंगी त्या वेळी । दैत्य-आयुधे नष्ट केली। महादेवीने लीला दाविली। रथ मोडला तयाचा ।।१०१।। तधी तयाने बाहुयुद्धास्तव । वेगे देवीवर घेतली धाव। तोच तियेने एकच घाव । केला हृदयी तयाच्या ॥१०२|| त्या प्रहारे गेला जोर। मुरू पडला महीवर। तरी पुनरपि उठुनी सत्वर । धावतसे त्वेषाने ।।१०३|| पाहुनी ती विपरीत करणी। देवी क्रोधित झाली मनी। निकट येता मस्तक तोडुनी। यमसदनाते धाडला।। १०४।। आपुला स्वामी पडला पाहून । उर्वरित दैत्य झाले दीन । हाहाकार करीत गेले पळून । देवद्वेष्टे ते पाताळीं ।।१०५।। पुढती जागृती भगवंतासी । येता, देखिले मृत दैत्यासी। एक कन्याही त्या समयासी। हात जोडुनी निकट उभी ।।१०६ ।। ते पाहुनी जगत्पती । झाले आनंदित अति । नेत्र विस्फारुनी नवल म्हणती । कुणी मारिले मुरूते ।।१०७।। ज्याने आपुल्या बाहुबळे । देव गंधर्व सहज जिंकिले। नाग मरुद्गण दिक्पाल केले । लीलया आपुल्या अंकित ।। १०८।। त्याच्या पुढती निरुपाय । मजही वाटले त्याचे भय । म्हणुनी काढता घेउनी पाय । केली निद्रा गुहेत या।।१०९।। ज्याने युद्धात मलाही जिंकले । असे असूनही कोण धावले । दैत्यापासून रक्षण केले । करुणाप्रेरित होउनी।।११० ।। तधी कन्यका म्हणाली ती। तुमच्याच अंशाने मम उत्पत्ती । प्रभुजी ! हा असुरपती। मीच वधिला जाणावे ॥१११ ।। येथ तुम्हांस निद्रिस्त पाहून । याच्या मनी विचार दारुण। तुमच्या वधाचा मनोमन । विचार करू लागला ।।११२।। तधी जाणुनी याचे मानस । मी प्रकट केले स्वतःस । आणि मारुनी या दुष्टास। केले निर्भय – अमरांते ।। ११३।। देवा ! शत्रुमनी जिची भीती। ती मी आपुलीच महाशक्ती । त्रैलोक्य रक्षाया वधिली आपत्ती । यात कोणते आश्चर्य ।।११४।। ज्याने लोकांना अति पीडले । त्याचे फलित त्यास मिळाले। ते ऐकून भगवान म्हणाले । धन्य ! धन्य ! तू कल्याणी ।।११५।। तुवा दैत्यपती मुरू मारिला । तेणे मज संतोष वाटला। सर्व देवही या समयाला। झाले पुष्ट हर्षाने ।।११६।। तव सत्कर्मे विश्व सुरक्षित । आनंदे व्यापिले त्रैलोक्यास । तुझा सन्मान या समयास । केला पाहिजे शुभानने ।। ११७।। तरी निःसंशय सांगतो येथ । वर माग जो तुझ्या मनात। देईन तो मी तुजप्रत । देव दुर्लभ जरी असे।। ११८।। तै म्हणाली काय कन्यका । तुम्ही मजवर संतुष्ट जर का। हे भगवंता सांगते ऐका। वर हवा जो मजलागी ।।११९।। जो नर मम जन्मदिवशी । उपवास करील धरून भक्तीसी। महापातकापासून त्यासी। तारावे त्वा निश्चये ।। १२०।। उपवासे जे पुण्यफल प्राप्त । नक्तभोजने त्याच्या अर्धपट । मिळावे नक्ताच्या अर्ध निश्चित । एकभुक्त जरी असे।।१२१ ।। कोणी जितेंद्रिय सद्भक्त। या दिनी करील हे व्रत । तो शतकोटी कल्पपर्यंत। विष्णुलोकी राहावा ।।१२२।। तुमचिया प्रसादे तयाप्रत । विविध सुखभोग व्हावे प्राप्त । राहील उपवासी नक्त एकभुक्त । लाभो धमार्थ मोक्ष तया ॥१२३।। तधी भगवान काय म्हणाले । हे कल्याणी तू जे म्हटले । भविष्यात ते होईल सगळे । हे वचन माझे तुजलागी।।१२४|। यापुढे जैसे माझे भक्त । तैसेच सर्वही तुझे भक्त । प्रसिद्ध होउनी त्रैलोक्यात । मम सन्निध येतील ।।१२५ ।। असशी जरी तू मम शक्ती । तरी एकादशीस तव उत्पती । म्हणुनी ‘एकादशी’ नामे जगती। प्रसिद्ध होशील कन्यके ।।१२६।। या तिथीस करील उपोषण । त्याची पातके भस्म करीन । आणि निजकृपे त्याते देईन । नित्य अविनाशी वैकुंठ ।। १२७।। तृतीया अष्टमी नवमी चतुर्दशी । आणि विशेष करुनी एकादशी। या सर्वही तिथी मजसी । प्रिय असती अत्यंत ।।१२८।। या तिरथींची व्रते आचरिती । त्या नरांते अधिक फलप्राप्ती । त्यांच्या पुण्याची नसे गणपती । सत्यवचन हे सांगतो ।।१२९।। त्यांते समस्त तीर्थाहून । त्यांते समस्त दानांहून । पुण्यफल समस्त व्रतांहून। अधिक मिळते जाणावे ।१३० ।। वरदान देउनी भगवान । तिथेच पावले अंतर्धान । तेणे एकादशी मनोमन । अति संतुष्ट जाहली।।१३१।॥ श्रीकृष्ण म्हणाला अर्जुनाप्रत । जो आचरील एकादशीव्रत । मी मारून त्याचे शत्रू समस्त । देईन परमगती तया।।१३२ ।। अन्य कोणी जरी व्रत आचरिती। घालवीन त्यांची विघ्ने सर्व ती । होईल सकल सिद्धींची प्राप्ती । मत्कृपे तया नरा ।। १३३।। एकादशीची उत्पत्तिकथा । तुज सांगितली पृथासुता । ही नित्य केली असता । करिते क्षय पापांचा ।।१३४।। अशी समस्त पापनाशक । एकादशी ही एकच एक। तिथी परम सिद्धिदायक। उदय पावली जनांस्तव ।।१३५।। म्हणुनी शुक्ल उत्तम कृष्ण कनिष्ठ । असा भेदच नको मनात । दोन्ही तिथींसी करावे व्रत । कृष्ण एकादशी त्यजू नये ।।१३६ ।। धेनू कृष्ण असो वा धवल । दुग्ध एकसमान केवळ । उभय तिथींचे समान फल । नसे उणे वा अधिक ते।| १३७।। जे भेदबुद्धी टाकून । करितात हे व्रत पावन । त्यांसी मिळते परमस्थान । गरुडध्वजाचे = वैकुंठ।। १३८।। धन्य नर जे विष्णुभक्त । नित्य एकादशी माहात्म्य पठतात । अश्वमेधाचे पुण्य समस्त । प्राप्त होते तयांसी।।१३९।। अशी सुमंगल एकादशी कथा । सद्भावाने श्रवण करिता । कोटिकुळासह तो श्रोता । वैकुंठलोकी राहतो ।।१४०।। आणि जो कोणी हे महिम्न । करील श्रवण जरी एक चरण । त्याची ब्रह्महत्यादी पापे दारुण । भस्म होतील निःसंशय ।।१४१।। तरी अर्जुना सांगतो तुजला । विष्णुधर्मासमान भला । धर्म नसे तो अन्य कुठला। तोषविण्या त्या केशवा ।।१४२।। आणि गीतार्थासम शास्त्रार्थ । एकादशीसम महाव्रत । महीपृष्ठी या नाही निश्चित । तोषविण्या त्या भगवंता ।। १४३।। ।। इति श्रीकृष्णार्जुनसंवादे कार्तिककृष्णैकादश्याः उत्पत्तिनाम्न्याः माहात्मं संपूर्णम् ।। ।। श्रीकृष्णार्पणमस्तु।। शुभं भवतु ! Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website