कामिका एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०४ ऑगस्ट २०२१ moderator August 3, 2021 दिनविशेष आषाढ कृष्णपक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! आता तुला कामिका एकादशी माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी अयोध्येत सूर्यवंशातील अंबरीष नांवाचा राजा राज्य करीत होता तो पराक्रमी असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व राजांवर आपली सत्ता चालवीत असे. त्याचप्रमाणे तो नीतिमान धार्मिक, न्यायी व विष्णुभक्त असल्यामुळे ते सर्व राजेही त्याला आपला सार्वभौम मानीत असत. त्याच्या सत्कीर्तीच्या यशोदुंदुभीचा गंभीर व मधुर आवाज पृथ्वीतलावरील कोनाकोपऱ्यात सुद्धा दुमदुमून गेला होता. एकदा नारदमुनी त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने त्यांची यथाविधी पूजा करुन व हात जोडून प्रार्थना केली की, “महाराज ! आज माझ जन्म सफल झाला. संताचे दर्शन व त्याचा कृपा प्रसाद ही मनुष्याच्या पापाचा नाश करितात. या जगात संतापेक्षा दुसरे कोणीही श्रेष्ठ नाही. अंबरीषांचे ते भाषण ऐकून नारदमुनी म्हणाले की हे राजा ! तूं खरोखर धान्य आहेस. तुझ्या ठिकाणी संताविषयी असलेला आदर पाहून मला आनदं वाटतो. कारण जेथे संताविषयी आदर आहे तेथे भक्ति, ज्ञान, आनंद, संत व जगन्नायक ही आपोआप चालून येतात. अशा प्रकारे बराच सौख्यसंवाद करुन नारदमुनि तेथून स्वस्थानाकडे जाण्याकरिता निघाले. वाटेत दुर्वास ऋषींची गांठ पडली. नारदांनी त्यांना नमस्कार केला. पण दु्वासानी मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही. दुर्वास ज्ञानी होते पण त्यांना गर्व होता शिवाय या गर्वात त्यांच्या तापट स्वभावाची भर पडली होती. यामुळेच त्यांनी नारदांना नमस्कार केला नाही हा सारा प्रकार जाणून नारदांनी त्यांचा गर्व परिहार करण्याचे ठरविले. आणि लीनता धारण करुन कुशल विचारले. पण दुर्वासांनी कुशलतेचे उत्तर न देता चढ्या सुरात आपण कोठे गेला होता असा नारदांना उलट प्रश्न केला. त्यांचा तो प्रश्न ऐकून नारद म्हणाले की, “मी विष्णुभक्त अंबरीष राजाच्या दर्शनाला गेलो होतो. तो महान विष्णुभक्त असल्यामुळे या जगात श्रेष्ठत्वाला पावला आहे. खरोखर विष्णुभक्तीचा महिमा अगाध आहे. शिवाय तो प्रत्येक एकादशीचे व्रत नियमाने करित असतो.” या वेळी दुर्वासाच्या कपाळावर आठ्या चढू लागल्या, चेहरा तिरस्कार युक्त दिसू लागला कारण दुर्वास शिवभक्त असल्यामुळे ते विष्णुभक्तांचा द्वेष करीत असत. हे पाहून नारदांनी विचार केला की ज्या अर्थी हे विष्णुभक्तताचा द्वेष करितात त्याअर्थी त्यांनां विष्णुभक्ताला शरण जावयास लावू आणि यांच्या गर्वाचा परिहास करु. असा विचार करुन नारदांनी पुनः आणखी विष्णुभक्त अंबरीष राजाचा महिमा वर्णन केला आणि ते तेथून निघून गेले. विष्णुभक्त अंबरीष राजाचा महिमा ऐकून दुर्वासाना अत्यंत वाईट वाटले आणि मनांत अंबरीष राजाची अपकीर्ति करण्याचा विचार करुन त्याच्याकडे ते जावयास निघाले. विष्णुभक्त अंबरीष राजा आदले दिवशी कामिका एकादशी व्रत करुन दुसरे दिवशी साधन द्वादशीचे पारणे सोडण्याच्या तयारीत होता. तोच शिष्यांसह दुर्वासाची स्वारी तेथे आली राजाने त्यांची यथाविधी पूजा करुन साधन द्वादशीचे पारणे आपल्या येथे सोडून भोजनाच्या पंक्तीचा लाभ देण्याची विनंती केली. राजाच्या विनंतीप्रमाणे दुर्वासांनी तेथे भोजन कबूल केले व ते गंगास्नानास निघून गेले. करुन पारणे सोडण्याचे ते दिवशी द्वादशी थोडा वेळ होती. ही संधी साधून द्वादशीच्या व्रताचा भंग करण्याकरिता ते गंगेवर स्नानसंध्या करीत जास्त वेळ बसले. इकडे राजा ऋषींची वाट पाहत बसला. बराच वेळ झाला. पण दुर्ास येईनात द्वादशी संपून त्रयोदशी लागण्याची वेळ आली. तेव्हा राजाला मोटी पंचाईत पडली. कारण ऋषीवांचून भोजन करुन पारणे सोडावे तर त्यांना राग येऊन ते शाप देतील व पारणे न सोडावे तर व्रतभंग होतो. या अडचणीमुळे तो चिंताक्रात झाला. त्याचे मुख म्लान झाले ते पाहून जवळच्या पंडितांनी त्याला असे सांगितले की, “हे राजा! विष्णूस नैवेद्य समर्पण करुन तीर्थतुलसीदल भक्षण केले म्हणजे भोजन न करिता पारणे सोडल्याचे फल मिळते. यात भोजनकरिता ऋषीची वाट पाहण्याचा व पारणे सोडल्याचा हे दोन्हीही हेतु साध्य होतात.” पंडिताच्या या सल्ल्याप्रमाणे राजाने विष्णूस नैवेद्य समर्पण कल तीर्थ तुलसीदल भक्षण केले व भोजनाकरिता ऋषीची वाट पहात बसला. या कृत्यामुळे त्याच्या मनाला समाधान वाटले. त्याच्या मुखावर टवटवी आली. त्रयोदशी लागल्यावर दुर्वास स्नानसंध्या करून आले. तो त्यांना राजाचे मुख टवटवीत दिसले ते पाहून दुवास म्हणाले की, “राजा ! ज्याअर्थी तुझ्या मुखावर टवटवी दिसत आहे त्याअर्थी तूं मजवाचून भोजन करुन पारणे सोडलेले दिसते. राजाने फक्त तीर्थ तुलसीदल भक्षण करुन, पारणे वेळ साधून भोजनाकरिता वाट पाहत बसल्याचा खरा प्रकार सांगितला. पण दुर्वासाना ते खरे वाटेना. त्यांना राग आला आणि त्या रागाच्या भरात तू दहागर्भवासाचे कष्ट भोगशील असा शाप दिला. राजाला अपराधावाचून दुर्वासांनी शाप दिला हे पाहून आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता विष्णूंनी आपले सुदर्शनचक्र त्यांच्या सोडले. ते तेजोमय चक्र जेव्हा दुर्वासाचा वध करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेले तेव्हा ते भयभीत होऊन दशदिशा पळू लागले. अखेर स्वर्ग, पातळ, कैलास, वैकुंठ वगैरे ठिकाणी जाऊन आश्रयार्थ याचना केली पण कोणीही त्यांना आश्रय दिला नाही. त्यात कैलासी शिव त्यांचा तिरस्कार करुन म्हणाले की, “दुर्वासा ! शिव आणि विष्णु हे एकच आहेत. जो विष्णूचा द्वेष करितो तो माझा द्वेष करितो. आणि जो माझा द्वेष करितो तो विष्णूचा द्वेष करितो यास्तव तुला माझ्याकडून आश्रय मिळणार नाही.” अशा रितीने भयभीत होऊन पृथ्वीवर आश्रयार्थ हिंडत असताना नारदाची गांठ पडली. नारदाला साष्टांग नमस्कार करुन कृतकर्माची क्षमा मागितली आणि रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा नारदांनी सांगितले की, आपण विष्णुभक्त अंबरीष राजालाच शरण जाल तर या संकटातून आपले रक्षण होईल.’ पुढे दुर्वास अबंरीषराजाला शरण गेले. रांजाने दुर्वासांचे रक्षण करण्याकरिता विष्णुची प्रार्थना केली. विष्णुनी त्याच्या कामिका एकादशी व्रताच्या पुण्याईवर त्याची प्रार्थना मान्य करुन दुर्वासाचे रक्षण केले. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी हे कामिका एकादशीचे व्रत करतील व माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील.” आषाढ कृष्णपक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. कामिका एकादशी माहात्म्य युधिष्ठिराने श्रीकृष्णाला आषाढ कृष्ण एकादशीचे माहात्म्य विचारले असता तो म्हणाला, “धर्मा ! याविषयी ब्रह्मदेवाने नारदाला जे सांगितले होते तेच तुला कथन करतो. या तिथीला कामिका म्हणतात. हिचे माहात्म्य श्रवण-पठण केल्याने वाजपेय यज्ञाचे फल मिळते. या दिवशी भगवान विष्णूंचे भजन, पूजन, ध्यान करावे. काशी-पुष्कर-नैमिषादी क्षेत्रांची यात्रा केल्याने, गंगेत-केदारतीर्थात-सूर्यग्रहणात कुरुक्षेत्रात-सिंहस्थपर्वात गोदावरीत- किंवा गंडक-व्यतिपात योगावर पुण्यतीर्थांमध्ये स्नान केल्याने जे पुण्य मिळते; त्याहून कितीतरी अधिक पुण्य या तिथीस माधवाचे पूजन केल्याने प्राप्त होते. त्या भाविकाला देव * गंधर्व-नाग-पन्नग या सर्वांच्या पूजेचे, तसेच पृथ्वी आणि गोदानाचे पुण्य मिळते. मनुष्यांच्या उद्धारासाठी या एकादशीसारखे व्रत नाही. म्हणून जे संसाररूपी सागरात बुडालेले आहेत, पापरूपी चिखलात रुतलेले आहेत; त्यांनी या पवित्र तिथीचा आदरपूर्वक अवलंब करावा. भगवान श्रीधरला तुळस परम प्रिय आहे. तुळशीच्या दर्शनाने पातक नाहीसे होते. तिला स्पर्श केल्याने शरीर पवित्र होते. तिला वंदन केल्याने रोगांचे निरसन होते. तिला पाणी घातल्याने यमाचे भय नाहीसे होते आणि अंगणात तिची स्थापना केल्याने भगवान श्रीहरी आपल्या घरीच निवास करतो. भगवंताला तुलसीदले अर्पण करणारा पापांपासून अलिप्त राहतो, मोक्षाचा अधिकारी होतो आणि तुलसी-मंजिरी अर्पण करणाऱ्याचे जन्मभराचे पातक श्रीहरी निजकृपेने स्वतःच धुवून टाकतो. तुळशीचे माहात्म्य असे अगाध आहे. म्हणून या दिवशी त्या परम प्रभूची तुलसीपत्रांनी पूजा करावी. जो मनुष्य या तिथीस देवघरात वा मंदिरात अखंड दीप लावतो, त्याचे पुण्य चित्रगुप्तालाही मोजता येत नाही. त्याचे पितर स्वर्गलोकी जातात व अमृत प्राशन करतात आणि तो उपासकही कोटी दिव्यांच्या प्रकाशात सूर्यलोकी जातो. ‘ही एकादशी ब्रह्महत्या व भ्रूणहत्येचे पातकही नाहीसे करणारी आहे व हिच्यासारखी पापांचा नाश करणारी अन्य तिथी नाही’ – हे मला स्वतः भगवंतानेच सांगितले आहे. पूर्वीच्या योग्यांनी कामिका व्रतानेच उत्तम सिद्धींसह ब्रह्मप्राप्ती केलेली आहे, म्हणून जाणत्या माणसाने प्रयत्नपूर्वक हे व्रत करावे. श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला हे गोविंदा। कमलनयना नित्यानंदा। सर्वेश्वरा परमसिद्धा। नमस्कार तुजलागी ।। १ । देवा आताच आम्हांप्रत । सांगितले शयनी एकादशी व्रत । त्या निरुपणे सुखावले चित्त । श्रवणेच्छा वाढली ।।२।। म्हणुनी आता पुन्हा विनंती। आषाढ कृष्ण एकादशी तिथी । तिचे वैशिष्ट्य आणि माहिती। कथन : करावी मजलागी ।।३।। तैं श्रीकृष्ण उत्तर देत । म्हणाला हे नृपश्रेष्ठ । पूर्वी नारदे विधीप्रत ।। पुसिले होते याविषयी ।।४।। तधी तयाने निजसुतासी । जे सांगितले त्या समयासी । तेच विदित करितो तुजसी। श्रवण करी आदरे ।।५।। त्याविषयीची हकिकत । असे मधुर अत्यंत । एकदा भेटुनी पित्याप्रत । केली नारदे विचारणा ।।६।। म्हणाला सांगा मजसी तात। आषाढ कृष्ण एकादशीप्रत । काय असे नाव निश्चित । कोण तियेची देवता ।।७।। ही मम जिज्ञासा मोठी। कळू द्या व्रतविधी फलप्राप्ती। कारण सदरहू विनंती। केली जनहितास्तव ।।८।। विधी म्हणाला या तिथीचे । ‘कामिका’ ऐसे नाव साचे । फल वाजपेय यागाचे । माहात्म्य श्रवणे मिळते या ॥९।॥ आता सांगतो महती विशेष । या दिनी पूजावे श्रीधरास। त्या शंखचक्रगदाधारीस । मधुसूदन म्हणतात ।।१०।। या दिनी भगवान विष्णूचे । ध्यान भजन करिता साचे । पुण्यफल त्या साधनेचे । असे अपार जाणावे ।। ११ । ते फल इतके श्रेष्ठ । की त्याच्यासमान खचित । गंगा पुष्कर वा काशीत । नच लाभते नैमिषी ।।१२।। या तिथीस विष्णुपूजन । त्याचे फल विलक्षण । नच प्राप्त त्यासमान । पुण्य केदार दर्शने ।। १३।। कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात । स्नान-दाने जे फल प्राप्त । 8 तेही किंचित जाण येथ । पुण्यपर्वता पुढती या।।१४।। सिंहस्थात गोदावरी ठायी। वा व्यतिपात गंडक योगावरही। स्नाने पुण्य लाभत नाही । हरिपूजना समान या ।।१५।। दान देता समस्त महीला । व्रत करिता या तिथीचे । फल समसमान साचे । महिमा असे यापरी।।१६ ।। धेनू देता वत्सासहित । पुण्य मिळते अगणित । परी तितकेच सहजप्राप्त कामिका व्रत केल्याने ।।१७।। आषाढ कृष्ण एकादशीस । ज्याने पूजिले श्रीधरास । फल मिळते त्या नरास। सकल देवता पूजनाचे ।। १८।। महिमा ऐसा श्रेष्ठ म्हणुनी। समस्त पापभीरू जनांनी। प्रयत्नपूर्वक या दिनी। पूजावे त्या परमेशा ।।१९।। जे भवसागरी बुडाले । पापकंदर्पी रुतून बैसले । त्यांच्या उद्धारा हेच भले । एक पावन व्रत असे ।।२०।। कारण तिथी ही पुण्यवर्धिनी। कल्याणमयी पापहारिणी। हिच्यासम अन्य कुणी । नाही महिपृष्ठी या ।।२१ ।॥ हे माझे वचन आज । तू पूर्ण खातरीचे समज । कारण पूर्वी गुह्य हे मज। स्वये भगवंते सांगितले ।।२२ ।। कुणी मनुष्य अध्यात्मविद्येत । मग्न असता जे फल प्राप्त । त्याहून अधिक लाभते निश्चित । उत्तम व्रताचरणे या ।।२३ |। या दिनी रात्रसमयी। जो भजन जागरण करितो पाही। तो अंतकाळी पाहत नाही। यमदूत ते भयंकर ।।२४।। कुर्योनी वा घोर दुर्गती। याची तयाला न होय प्राप्ती । पूर्वी योग्यांसी मिळाली मुक्ती । याच कामिका व्रताने ।।२५।| म्हणुनी जो मनुष्य जाण । ठेवितो स्वाधीन अंतःकरण । त्याने करावे आचरण । सद्भावे या व्रताचे । २६।। जो कोणी या दिवशी । भगवंताते वाहतो तुलसी । पापभावना त्या नरासी । नच स्पर्शते केव्हाही ।।२७।। पुढती त्याचे आचरण । होते कमलपत्रासमान । असंगपणाचा हा गुण । येतो अर्पणभावे त्या।।२८।। एक भार सुवर्ण वाहून । अथवा चौपट चांदी अर्पून । श्रीविष्णूचे करिता पूजन । होय अपार फलप्राप्ती ।।२९।। परी तितकेच फल निश्चित । प्राप्त होते सहजगत – तुलसी अर्पिता भगवंताप्रत । महिमा असे यापरी ।।३० ।। या पूजने जगन्नाथ । होतो जितका संतुष्ट । तितका कदापि नाही होत । हिरे माणके वाहता ।। ३१ ।। तुलसी-मंजिरी घेउनी। भावे अर्पिता केशवचरणीं । समस्त पातके नष्ट होउनी । मिळते मुक्ती भाविका ।।३२।। म्हणुनी जिचे घडता दर्शन । होते पाप निवारण । त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे।।३३ |॥ जिला नमिता रोगनिरसन । जिला स्पर्शिता काया पावन त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे ।।३४।। जिला उदक करिता अर्पण । भय यमाचे जाते निघून । त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे ।।३५।। जिच्या संगतीत क्षणोक्षण । स्वये श्रीकृष्ण भगवान । त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे।।३६।। हरिचरणीं करिता अर्पण । जी देते मोक्ष पावन । त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे ।।३७।। जो मनुष्य या तिथीस । देवगृही वा राउळास। दीप लावितो अह्निश । ते पुण्य अगम्य चित्रगुप्ता ।।३८।। त्या नराचे पितर समस्त । सुखे राहती स्वर्गात । अमृतप्राशने होउनी तृप्त । पावती सकल सौख्याते ।।३९|| या दीपार्पणे निश्चित । तो नरही भाग्यवंत । सहस्रदीपांच्या प्रकाशात। जातो सूर्यलोकासी ।।४०।। श्रीकृष्ण म्हणाला धर्मासी। कथन केले माहात्म्यासी। म्हणुनी कामिका एकादशी। आचरावी निर्धारित ।।४१ ।। या तिथीची अपार महती। ब्रह्म-भ्रूणहत्या पातके जाती। त्या नरासी महत्फलप्राप्ती। जातो स्वर्गलोकी तो ।।४२।। कथाप्रभावही तैसाच । श्रद्धेने श्रवण घडताच । नर निष्पाप होउनी साच । जातो विष्णुधामासी ।॥४३।। ।। इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे आषाढकृष्णैकादश्याः कामिकानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।। शुभं भवतु ! Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website