आमलकी एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : २५ मार्च २०२१ Mandar Sant March 25, 2021 दिनविशेष फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात आमलकी एकादशी कथा १ धर्मराजाने श्रीकृष्णाच्या मुखातून सुरस व पावन अशा एकादशी माहात्माच्या २२ कथा ऐकल्यानंतर तो म्हणाला की, “हे श्रीकृष्णा ! आपण सांगितलेल्या या एकादशी व्रत माहात्म्याच्या कथा ऐकून माझ्या मनाला आनंद होत आहे. वरचेवर या कथामृता चे पान करावेसे वाटते. तेव्हा कृपाकरुन आणखी काही कथा मला कथन करा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! एकदा मांधाता राजा वशिष्ठांकडे गेला आणि त्याने त्यांची प्रार्थना करुन विचारले.” की, “हे ऋषीवर्य ! ज्याच्या योगने मला यश मिळेल असें एखादे व्रत सांगा.” तेव्हा वशिष्ठ म्हणाले की, “हे राजा ! आमलकी एकादशीचे व्रत पुण्यप्रद आहे. ते केले असताना मनुष्याल यश मिळते. याबद्दल एक इतिहास कथा तुला सांगतो ती चित्त देऊन ऐक. ” पूर्वी विदिशा नांवाची इंद्राच्या अमरावतीच्या तोडीची एक नगरी होती तिथे चित्ररथ नांवाचा सकलगुणसंपन्न धर्मशील व महापराक्रमी राजा राज्य करीत होता. तो प्रजेवर प्रेम करुन तिच्या कल्याणाविषयी नेहमी झटत असे त्याचप्रमाणे प्रजाही आनंदाने याच्यावर प्रेम करीत असे. अशा रितीने ते सुखाने नांदत असताना आमलकी एकादशीचा दिवस जवळ आला. राजाने व प्रजेने ते व्रत करण्याचे ठरविले. एकादशीचे दिवशी नदीत स्नान करुन ते विष्णुमंदिरात पूजा करण्याला गेले. तेथे त्यांनी एक सुवर्णकुंभ व आमलक (आवळा) वृक्ष स्थापन केला. विष्णु व त्या आमलक वृक्षाची यथाविधी पूजा केल्यानंतर अन्न पाणी ग्रहण न करिता ते हरिकथा श्रवण करण्यास बसले. सूर्यास्त झाल्यानंतर जिकडे तिकडे लखलखीत दिवे लावले गेले तेव्हा त्यांनी मोठ्याने हरिनामाचा गजर करुन हरिकीर्तनास सुरुवात केली. त्याचदिवशी मोठ्या पहाटे एक महादु ष्ट व दुराचारी व्याध वनांत प्राण्यांची हिसा करण्याकरिता गेला होता. त्याने दिवसभर श्रम केले पण एकही श्वापद त्याला सांपडले नाही. शेवटी अस्तमानी दमून त्या विदिशा नगरीजवळ दुःखी होऊन बसला. तोच त्याला त्या विष्णुमंदिरातील हरिनामाच्या गजराचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाच्या रोखाने त्याने त्या दिशेकडे पाहिले तो त्याला प्रकाश दिसू लागला. तेव्हा हा काय प्रकार आहे हे जाणण्याकरिता तो तेथून चटकान उठला आणि त्या विष्णुमंदिरात आला. तेथील अवर्णनीय शोभा व सर्व लोक हरिकीर्तनात रंगलेले आहेत हे पाहून त्यास एक प्रकारचे आश्चर्य वाटले. तेथेच तो सर्व रात्रभर हरिकीर्तन ऐकत बसला. प्रातः काल होताच सर्व आपापल्या घराकडे निघून गेले. त्याबरोबर तोही निघून गेला. अशा रितीने त्या एकादशीचे दिवशी त्याच्याकडून उपवास व जागरण घडले. आमलकी एकादशी व्रत नकळत घडले. पुढे काही दिवसांनी तो व्याध मृत्यू पावला व त्याच्याकडून न कळत घडलेल्या आमलकी एकादशीव्रताच्या पुण्याईमुळे तो राजकुळाच जन्मालाआला. जयंती नगरीमध्ये विदूरथ नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याला सुरथ नावाचा एक मुलगा झाला, हाच पूर्वजन्मीचा व्याध होय.तो आपल्या वडिलांच्या पश्चात राज्यावर बसला. राज्य करीत असताना त्याने पराक्रम केले व पुष्कळ दानधर्मही केले. एके दिवशी तो आपल्या सैन्यासह मृगया करण्याकरिता अरण्यात गेला. तेथे त्याने अनेक श्वापदांची शिकार केल्यानंतर दूरवर एक हरिण पाहिले. त्यावर त्याने आपला घोड़ा सोडला व बराचवेळ त्याचा पाठलाग केला पण तो सापडेना. अखेर ते हरीण त्याची नजर चुकवून पळून गेले. राजा त्या हरिणाचा पाठलाग करीत असताना त्याची व त्याच्या सैन्याची चुकामूक झाली. राजा भटकत एका पर्वताच्या दरीपाशी आला. तो दरीतून दुष्ट, दुराचारी म्लेच्छांची एक टोळी बाहेर आली. त्यानी राजाला गराडा घालून मारण्याचा निश्चय केला. तेव्हा राजा भगवान श्रीकृष्णाला शरण गेला. त्या म्लेच्छांनी राजावर वार करण्यास सुरुवात केली, पण चमत्कार असा झाला की, त्याला एकही वार लागेना. तेव्हा ते चकित होऊन गलित धैर्य झाले. पण पुन्हा धैर्य करुन सर्वांनी एकदम मारा करावयास सुरुवात केली. तो सर्वांचा मारा असह्य होऊन राजा मूर्छित झाला. पण राजाच्या पूर्व पुण्याईमुळे न कळत घडलेल्या आमलकी एकादशीव्रताच्या पूर्व पुण्याईमुळे त्याच्या शरीरापासून स्वरूपवान, उत्तम वस्त्रालंकार धारण केलेली, हाती शस्त्र धारण केलेली, उग्र अशी स्त्री उत्पन्न झाली. त्या म्लेच्छांना पाहून ती रागाने लाल बुंद झाली. तिच्या नेत्रातून आगीच्या ठिणग्या पडू लागल्या. अखेर तिने त्यांच्याशी युद्धा करुन त्यांना ठार केले. ते सर्व मृत्यू पावले असे पाहून ती तेथेच अंतर्धान पावली. * थोड्याच वेळात राजा सावध झाला तेव्हा त्याला ते सर्व म्लेच्छ मेलेले दिसले. हे दुष्ट दुराचारी म्लेच्छ कोणी व कसे मारिले याचे आश्चर्य करीत तो घरी परत गेला.” श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी आमलकी एकादशीचें व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) करतील व त्याचे माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतील जातील. ” आमलकी एकादशी कथा २ पूर्वी मांधाता राजाने वसिष्ठांना – स्वकल्याणार्थ उत्तम व्रत सांगावे अशी – विनंती केली असता त्यांनी आमलकी एकादशीची संपूर्ण माहिती कथन केली. ते म्हणाले, “नृपश्रेष्ठा ! या दिनी व्रताचरण केल्याने सर्व ब्रतांचे आणि एक हजार गायी दान केल्याचे पुण्य लाभते. हे व्रत पापांचा नाश करणारे व मोक्षदायक म्हणून प्रसिद्ध आहे. आता याचा पुरातन इतिहास सांगतो. वैदिश नगरात शशिबिंदू राजाचा पुत्र चैत्ररथ राज्य करीत होता. तो पुण्यवान, विष्णुभक्त व एकादशी व्रताचे निष्ठेने आचरण करणारा होता. त्याची प्रजाही हरिभक्त होती. एकादशीला कोणताही नागरिक जेवत नसे. त्यामुळे विष्णुकृपेने त्याच्या राज्यात सर्व प्रकारची समृद्धी नांदत होती. एकदा आमलकीच्या दिवशी त्याने नदीत स्नान केले. देवालयात पूर्ण कुंभाची स्थापना केली. त्यावर छत्र लावले. जवळ पादुका ठेवल्या. कुंभात पंचरत्ने घालून तो सुगंधी द्रव्यांनी विलेपित केला. त्याच्याभोवती दीपमाळा लावल्या. कुंभावर परशुरामाची स्थापना करून त्याची पूजा केली. मग आवळीचे पूजन केले. प्रजाजनांसह जागरण केले. योगायोगाने त्या समयी एका व्याधाचे तेथे आगमन झाले. तो तहानभुकेने व श्रमाने व्याकूळ झाला होता. त्याने उजळलेल्या दीपमाळा व जागर पाहिला. कलश, त्यावरील दामोदर आणि आवळीचा वृक्ष पाहिला. हरिकथा ऐकली आणि जागरणही केले. द्वादशीला सर्व लोक नगरात परतले तेव्हा त्यानेही घरी जाऊन भोजन केले. या व्रतपुण्याईमुळे अन्य जन्मात तो राजपुत्र झाला. त्याने जयंती नगराचा राजा विदूरथ याचा पुत्र वसुरथ म्हणून जन्म घेतला. तो धार्मिक, पराक्रमी, यज्ञकर्ता, दानशूर आणि विष्णुभक्त होता. एकदा मृगयेसाठी गेला असताना तो मार्ग चुकला. परिश्रमांनी थकल्यामुळे तो एका वृक्षाखाली झोपी गेला. तेवढ्यात त्याचे वैरी असलेले काही म्लेंच्छ तेथे आले. त्यांच्या दुर्दशेला कारण असलेल्या वसुरथाला पाहून त्यांचा संताप अनावर झाला. ते शस्त्रे उगारून धावले. पण त्यांचे कोणतेही प्रहार त्याचा घात करू शकले नाहीत. ते घाबरून पळू लागले. पण जागीच खिळून राहिले. तेव्हा राजपुत्राच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. तिने त्या सर्वांना जागीच ठार केले. तो जेव्हा जागा झाला तेव्हा भोवताली मरून पडलेल्या आपल्या शत्रूंना पाहून त्याला मोठे नवल वाटले. आपल्या रक्षणकर्त्या भगवंताचे आभार तो घरी परतला. त्याने धर्मबुद्धीने चिरकाल राज्य केले.आमलकी एकादशी दिवशी काय कराल? मोहिनी एकादशी दिवशी दिवसभर उपवास ठेवला जातो. या काळात फळं, दूध असा हलका आहार घेतला जातो. तसेच विष्णूसहस्त्र नामावलीचं पठण केलं जातं. मोहिनी एकादशीच्या व्रतामध्ये तीळ, तुळस आणि ऋतूमानाप्रमाणे उपलब्ध असणारे फळं याचा समावेश केला जातो. त्याचे दानही दिले जाते. आमलकी एकादशी माहात्म्य श्रीगणेशाय नमः ।। एकदा मांधाता राजा । वसिष्ठ गेले भेटण्यासी। तैं करुनी उत्तम स्वागतासी । नृपे तयांसी तोषविले ।।१ ।। मग अत्यंत नम्रतेने । क्षेमकुशल पुसिले त्याने । म्हणाला श्रेष्ठा आपुले येणे । हाच अनुग्रह मजवरी ।।२।। हे महाबाहो विधिसुता । हे क्रषिवर्या कृपावंता। एक आस माझिया चित्ता । कृपा करुनी पुरवावी ।।३।। मम कल्याणास्तव खचित । सांगा एखादे श्रेष्ठ व्रत । त्याचे रहस्य पूर्ववृत्त । तेही कळावे मजलागी ।४।॥ वसिष्ठ म्हणाले नरश्रेष्ठा। एक महाव्रत सांगतो आता । तरी एकाग्र करुनी चित्ता। श्रवण करी आदरे।।५।। आमलकी एकादशी व्रत। महाफलदायी अतिप्रख्यात । सहस्र गोदानांचे या निश्चित । पुण्य लाभते आचरणे ।।६।। व्रत असे हे पापनाशक । तैसेच परम मोक्षदायक । त्याचा इतिहास, कथानक। ऐक सांगतो तुजलागी ।।७ ॥ सहजगत्या व्रत घडले । तेच पुण्य फळास आले । एका व्याधाचे दैव फिरले । अंती मिळाली मोक्षगती ॥८॥ कथा सुरम्य त्याविषयीची। प्रेरणा जाहली सांगण्याची । प्रजा ‘वैदिश’ नगरीची । होती सुखी आनंदित ।।९।। शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । निजकर्मांत रममाण । पुष्ट निरोगी अवघे जन नास्तिक ना कुणी पातकी ॥१० ॥। अशा त्या पुण्यनगरीचा । राजा सोमवंशी साचा । पुत्र शशबिंदूचा । नाम होते चैत्ररथ ।।११।। तो सुव्रती धर्मवान । बल सहस्र गजांसमान । शस्त्रविद्येत अति निपुण । शास्त्रार्थही जाणतसे ।।१२।। सत्यप्रतिज्ञ प्रजापालक। राज्यही ॐ होते निष्कंटक । दुष्काळ अथवा रोग भयानक । नच येती संकटे ।। १ ३ ।। आनंद उत्साह असे सतत। वेदघोष घुमती नगरीत । सौख्य सुकाळ वसे तेथ । नव्हती कृपणता दारिद्रय ।। १४।। पूर राजासवे पौर समस्त । विष्णुभक्तीत नित्य रत। पूजन अर्चन सदोदित । चालतसे राउळी ।। १५।। शुक्ल कृष्ण एकादशीस । प्रत्येकाचा असे उपवास । त्या दिनी त्यजुनी कट काम्यधर्मास । जो तो भक्तीच करीतसे।। १६ ।। अशी बरीच वर्षे गेली । पुढती एक घटना घडली। आमलकी एकादशी आली । फाल्गुन शुक्ल पक्षाची॥१७॥ तिथी महाफलदायी म. म्हणुनी। केले उपोषण सकलांनी। राजानेही त्या दिनी। सरितास्नान केले पां |॥१८। होउनिया शुचिर्भूत । गेला जनांसह राउळात । पूर्णकुंभ स्थापुनी लाविले छत्र । पादुकाही ठेविल्या ।। १९ ।। मग पंचरत्ने घालुनी। केले सुगंधित द्रव्यांनी। त्यावरी परशुराम मूर्ती ठेवुनी। दीपमाळाही लाविल्या ।।२०।। तदनंतर त्या महीपतीने । क्षिजनांसह आनंदाने । पूजा केली भक्तिभावाने । परशुरामासवे आवळीची ।।२१।। हात जोडुनी केली प्रार्थना । तोषविण्या तो करीत स्तवना । बोलला हे जमदग्निनंदना । वंदन माझे स्वीकारी।।२२।। हे रेणुकाआनंदवर्धना। हे भुक्तिमुक्तिप्रदायना। हे कृपाळू दयाघना । वंदन माझे स्वीकारी ।।२३।। आमलकीची शीतल छाया । तुझ्यावरी केली सदया । मनोभावे पडतो पाया। वंदन माझे स्वीकारी ।।२४।। मग आवळीते संबोधून । म्हणाला माते तुलाही वंदन । अर्घ्योदक जे करितो अर्पण । ते स्वीकारी प्रेमाने ।।२५।। विधीपासुनी तव उत्पत्ती । दर्शने महापापे जळती। सामर्थ्य वर्णिता मम मती । कुंठित होय सर्वथा ।।२६।। तू साक्षात ब्रह्मरूपिणी। श्रीराम धन्य तुजसी पूजुनी। प्रसन्न होउनी प्रदक्षिणांनी। नष्ट करी मम पातके ।।२७।। अशा प्रकारे त्या स्थानी । राजासमवेत सर्वांनी । पूजन अर्चन करुनी । केले जागरण भक्तीने ।।२८।। साधारण त्याच अवधीत । एक पारधी आला तेथ। जीवहिंसा करुनी सतत । परिवाराते पोशितसे।|२९|| तेणे बहिष्कृत सर्वधर्मातूंन । असा व्याध तो अति दमून । मा क्षुधातृषेने व्याकूळ होऊन । विश्रांतीस्तव पातला ।।३०।। दीपमाळांचा चकचकाट । पाहुनी तयासी वाटली गंमत । मौज बघाया थांबला तेथ । होता क्षुधातुर जरी ।।३१।। जागरण करीत जनमेळा । पाहुनी अचंबित त्या समयाला। हा काय प्रकार चालला । विचार करी मानसी ।।३२।। सहजगत्या दूरवरून । एक कुंभ आला दिसून । त्यावरील दामोदरमूर्ती छान । ॐ तीही देखिली त्या वेळी ।।३३।। उत्सव-दर्शने रमून गेला। आवळीचाही वृक्ष पाहिला । विष्णुकथाही त्या समयाला । मनःपूर्वक ऐकली ।।३४।। भूक लागली कडकडून । तरी ऐकले एकादशी महिम्न । जनांसवे जागरण । केले रात्रसमयासी ।।३५|॥ प्रभातीसी अवघे जन । गेले आपुल्या स्थानी निघून । व्याधही मनी संतोषून । निजगृही परतला ।।३६ ।। आनंदाने भोजन केले। तेणे तयासी पुण्य मिळाले । त्याचे काय फळ लाभले । तेच आता सांगतो ।।३७ ॥Mआमलकी एकादशी दिनी। केले उपोषण जागरण म्हणुनी । त्या पुण्याने अन्य जीवनी। भाग्य उजळले तयाचे ।। ३८।। जयंती नामक नगरीत । नृप विदुरथ राज्य सं पू करीत । व्याध जाहला त्याचा सुत । वसुरथ नावाचा ।।३९।। जन्म राजघराण्यात । महाराज्य र्ण झाले प्राप्त । दश सहस्र संख्येत । गावे होती त्यामाजी ।॥४०।। धनधान्यसमृद्धीसहित । चतुरंग ए सेना बलवंत । निर्भय राज्य उपभोगीत । श्रीहरीच्या कृपेने ।।४१।। त्या राजाची देहाकृती। द पिळदार बलदंड होती। चंद्रासमान अंगकांती। तेजे आदित्य वाटतसे ।।४२।। तो धार्मिक थी सत्यवचनी । विष्णुभक्ती अंतःकरणी। महापराक्रमी तरीही मनी । क्षमाशीलता मा हा वसतसे ।।४३।। होता वेदज्ञ कर्मनिष्ठ । यज्ञ करितसे विधियुक्त। निरालस्य प्रजापालनात । – शत्रू हतबल त्यापुढती।।४४।। भूमी द्रव्यादी दाने देऊन । तुष्ट करितसे विप्रगण । जनहितास्तव नित्य कष्टून । सुखी ठेवी सकलांना ।।४५।। ऐसा नृप तो गुणवंत । एकदा मृगयेस गेला वनात । प्रारब्धवश चुकला वाट । श्वापदामागे पळताना ।।४६।। तयासी इतकी भूल पडली। की दिशाही कळेना त्या वेळी। राजा असुनी अतुर्बळी। वनांतरी भटकला।।४७।। त्या श्रमांनी थकून गेला। क्षुधातृषेने व्याकूळ झाला। विश्रांतीस्तव त्या समयाला । पहुडला वृक्षतळी ।।४८।। शत्रुंजय तो वसुरथ । घोर काननी निद्रिस्त । असता अचानक आले तेथ । म्लेंच्छ पहाडी क्रूरात्मे ।।४९।। याच यवनांसी पूर्वकाळी। युद्धप्रसंगी माती चारली। घोर शिक्षा करुनी त्या वेळी । होते पळविले नृपवरे ।।५० ।। तो महावैरी वसुरथ। आयताच सापडला तावडीत। तेणे म्लेंच्छ आनंदित । वेढा घातला त्यालागी।।५१ ।। तै एक म्हणाला या शत्रूला। धाडा तत्काळ यमसदनाला । यानेच निघ्घृण वध केला। आमच्या आप्त स्वजनांचा ।॥५२ ।। पिते चुलते मामे भाचे । बंधू नातू मारिले साचे । माप याच्या पापांचे । घाला याच्याच पदरात ।।५३।। आमच्या कुळाचा निःपात केला। लाविले आम्हां देशोधडीला। आज बरा एकटा सापडला। करा शासन लवलाही ।।५४।। केले भाषण संतापून । तेणे द्वेष उफाळून । झणी शस्त्रे उगारून वसुरथावरी धावले ।।५५।। पाश पट्टीश तलवारी । बाण मारिले कितीतरी। तथापि नृप देहावरी । क्षतही ते नच उठले ।।५६। । त्यांनी जे-जे प्रयत्न केले। ते-ते सर्वही व्यर्थ गेले । त्या नवलाने म्लेंच्छ सगळे । झाले भयभीत अतिशय ।।५७ । ती अवस्था अतिबिकट । त्राणच नुरले गात्रांत। स्थानी उभे असमर्थ । निर्जीव चेतनाहीन ते ।।५८ । । वसुरथासी माराया आले। परी स्वतःच दीन झाले । जीव वाचविण्या भले । टाकवेना पाऊलही।।५९ ।। इतुक्यात नृपदेहातून । एक सुंदरी झाली उत्पन्न । म्लेंच्छ पाहती थक्क होऊन । परी उमजेना प्रकार तो ।।६०।। दिव्य वस्त्रालंकार भूषित। पुष्पमाळा तिच्या कंठात। तनू उत्तम सुगंधित । परी संताप मुखावरी ।।६१ ।। भ्रूकुटी वक्र अत्यंत । युद्धसज्ज चक्र हातात । लालबुंद डोळ्यांत । जणू अग्नीच प्रकटला ।।६२ ।। तिच्या दर्शने यवनांप्रत । वाटले पातली काळरात। मनी दाटले दुःख अत्यंत । आरंबळती प्राणभये ।।६३।। तेवढ्यात त्या महामायेने। केले आक्रमण वेगाने । चक्र सोडुनी त्वेषाने । ठार मारिले तयांते ।।६४ ।। यवन कलेवरे कोसळली। तोच नृपाते जाग आली । दृश्य पाहुनी त्या वेळी । हर्षमुग्ध जाहला ।।६५।। मनी म्हणे हे कृत्य अद्भुत। मेले यवन वैरी समस्त । कोण हितकतर्ता अप्रकट । रक्षायाते धावला ।।६६।। ण विस्मयचकित अंतःकरणी। सतत एकच प्रश्न मनी। या दुष्टांते येथ कोणी । मारियले नच ए कळे ।।६७।। तोच झाली आकाशवाणी । नृपा गोष्ट तू घे ध्यानी। एका केशवाशिवाय का कोणी। रक्षण ऐसे करील का ।।६८।। ते ऐकुनी भाव दाटले । आनंदाश्रू नयनी आले । कृतज्ञतेने हात जुळले । आदरे वंदन करीतसे ।।६९।। मग दुर्गम वनातुनी। सुखरूप गाठली राजधानी । पुढती धर्मबुद्धी ठेवुनी। राज्य केले पृथ्वीचे ।७०।। कथानकाच्या शेवटी । वसिष्ठ वदले मांधात्याप्रती। राजा तुवा घ्यावा चित्ती । तिथिमहिमा अलौकिक ।।७१। ॥। भूलोकी जे नरश्रेष्ठ। आचरती आमलकी व्रत । ते होउनी भाग्यवंत । जाती अंती वैकुंठी । ।७२।। ॥ इति श्रीब्रह्माण्डपुराणे फाल्गुनशुक्लैकादश्याः आमलकीनाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।। ।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।। शुभं भवतु ! आमलकी एकादशी दिवशी काय करू नये? मोहिनी एकादशी दिवशी व्रत करणार असाल तर राग,मत्सर यासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर रहा. मन शांत आणि स्थिर ठेवून उपवास करा.मोहिनी एकादशीच्या उपवासा दरम्यान भात वर्ज्य करावा असं सांगितले जाते. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website