अपरा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०६ जून २०२१ Mandar Sant June 5, 2021 दिनविशेष वैशाख कृष्णपक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. १] अपरा एकादशीची प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेली कथा … श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! आता तुला अपरा एकादशी व्रताचे माहात्म्य सांगतो ते चित्त देऊन एक. पूर्वी केरळ राज्यांत केरळाधिपराजा राज्य करीत होता. त्याला शंभर स्त्रिया होत्या त्यात सुवस्त्रा नांवाची एक आवडती बायको होती. तिच्या पोटी चंद्रहास्य नावाचा सुंदर मुलगा जन्माला आला तो एकवीस बोट्या होत्या. डाव्या पायाचे करंगळी शेजारी दुसरी एक करंगळी होती. डाव्या पायाला अशा दोन करंगळी असणे हे दुश्चिन्ह समजतात. पण राजाचे त्याकडे लक्ष नव्हते. चंद्रहास्य जन्मून एक वर्ष झाले नाही. तोच केरळधिपावर परचक्र आले. त्यात सैन्याचा, द्रव्याचा व ऐश्वर्याचा अत्यंत नाश होऊन अखेर त्याचा पराभव झाला व खुद्द तो स्वत:हि मरण पावला. पुढे शत्रूने त्याचे। सर्व राज्य घेतले त्याच्या सर्व स्त्रियांनी अग्नि प्रवेश केला. केरळाधिपाचा शत्रू पुढे मागे चंद्रहास्याचा नाश करील, म्हणून त्याला वाचविण्याकरिता त्याच्या एका सावत्र आईने त्याच्यासह नगरीतून गुप्त रुपाने पलायन केले. व भटकत भटकत ती दोघ कुतलेश्वराच्या राज्याती कुंतलपुरीत येऊन गुमरुपाने राहू लागली. तेथे ती भिक्षा मागून आपला आणि चंद्रहास्याचा उदरनिर्वाह करीत असे व त्याला प्राणापलिकडे जपन असे. अशा दुःखद स्थितीत तिने काही वर्षे घालविली. पण पुढे कर्मधर्मसंयोगाने ती मरण पावली. चंद्रहास्याचा शेवटचा आधार तुटला, ममतेचे माणूस गेले व शेवटी तो त्या कुंतलपुरीत भटकू लागला त्याला कोणीही आधार देईना. यामुळे त्याने दिवसभर उन्हात भटकावे, रात्री उघड्यावर पडावे व पोटाची आग शर्मविण्याकरिता मिळेल ते वाळलेले, ओले, कोरडे, विटलेले अन्न खाऊन राहावे. त्याच्या हीन-दीन स्थितीत त्याच्या बरोबरीची मुले मात्र बरोबर खेळत असत. एवढाच काय तो आनंद त्याला उपभोगावयास मिळत असे क्वचित एकादेवळी त्याच्या सवंगड्याच्या आईबापानी त्याला जेवावया बोलवावे अगर एखादे फाटके तुटके वस्त्र पांघरण्याला द्यावे. एके दिवशी तो मुलाबरोबर खेळत असताना त्याला एक नृसिंहमृति शाळिग्राम सांपडला आणि तोहि त्याला देव समजून रोज त्याची पूजा करीत असे. एके दिवशी तो आपल्या सवंगड्यांबरोबर नदी किनाऱ्यावर खेळत असताना त्याने नदीच्या काठावर स्नान संध्या करित असलेले गर्ग मुनी पाहिले त्यांना पाहताच तो खेळ सोडून त्यांच्याकडे गेला व साष्टांग नमस्कार घालून हात जोडून बसला. तेव्हा गर्ग मुनीने “तू कोणाचा मुलगा” अस विचारले. मुनीचा प्रश्न ऐकून तो म्हणाला की, “महाराज ! माझे आई बाप व आप्तेष्ट कोण, कोठे आहेत हे मला माहित नाही. किबहुना मला कोणीच नाही. परवाच माझी आई मृत्यू पावली. तेव्हापासून मी रात्रदिवस कष्ट भोगित आहे. मला कोणी विचारीत नाहीत. महाराज ! कोणत्या कारणामुळे मजवर हा दुःखद प्रसंग आला हे कृपा करुन सांगा त्याचप्रमाणे हे दुःख नष्ट होण्याला एकादा उपाय असला तर तेही सांगा.” गर्गमुनीने चंद्रहास्याचे ते भाषण ऐकून व गायत्रीचे ध्यान करुन तिच्या साह्याने सांगितले की, “तुझ्या वडिलांनी आपल्या पत्नी बरोबर अवेळी सुरतक्रीडा केली व कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी गर्भ राहिला व त्याच गर्भापासून तूं जन्माला आला आहेस. मुला, याच दोषामुळे तुला दुःख भोगावे लागत आहे. आता जर तू अपरा एकादशीचे व्रत करशील तर देषामुळे उत्पन्न झालेल्या दुःखातून मुक्त होऊन तुला सौख्य मिळेल.” मुनीचा तो उपाय ऐकून चंद्रहास्य आपल्या संवंगड्याकडे जावयास निघाला. तो ती मुले आपापल्या घरी जावयास निघाली होती त्यांच्या बरोबर चालला. याच दिवशी कुंतलपुरीच्या प्रधानाचे घरी ब्राह्मण भोजन होते. जेवणाची वेळ झाली. ब्राह्मण पाटावर येऊन बसले पण प्रधान दुष्टबुद्धी याचा मुलगा त्यावेळी घरी नव्हता. त्याच्या वाचून जेवणाला बसण्याचा खोळंबा झाला. तेव्हा प्रधान दुष्टबुद्धी त्याला शोधावयास निघाला. तो समोर नदीहून येत असलेली मुले त्याला दिसली. त्यात त्याचा मुलगा होता. त्याला व त्याच्या बरोबर चंद्रहास्यालाही घेऊन तो घरी गेला. ते घरी आल्यावर सर्व जेवावयास बसले. त्यात प्रधानाच्या मुलाबरोबर चंद्रहास्यालाही थाटाने बसविले होते. जेवण झाल्यावर ब्राह्मण आशिर्वाद मंत्र देऊ लागले तेव्हा तेथे चंद्रहास्य आला. तो प्रधानाचा मुलगा आहे असे समजून ब्रह्मणांनी “हा मुलगा विजयी होवो, आपली संपत्ति वाढवून तिचे उत्तम रितीने संरक्षण करो, शिवाय राज्योपभोग घेवो” असा आशिर्वाद देऊन त्याच्या मस्तकावर मंत्राक्षता टाकिल्या. तेव्हा प्रधानाला राग येऊन त्याने ब्राह्मणांच्या दक्षिणा वरगैरे हिसकावून घेऊन त्यांना व त्यांचाबरोबर चंद्रहास्यालाही घराबाहेर टाकून दिले. नंतर तो अत्यंत चिंताक्रात होऊन विचार करु लागला की, ब्राह्मणानी दिलेला आशिर्वाद खोटा ठरणार नाही. माझे सर्व ऐश्वर्य त्या चंद्रहास्याला जाणार. तो आता माझा शत्रू झाला. मला त्याचा नायनाट केला पाहिजे. शेवटी त्याने त्याला ठार मारण्याचा निश्चय करुन चार पांच मांगाना बोलावून आणून सांगितले की, “चंद्रहास्याला रानात नेऊन ठार मारा याबद्दल मी तुम्हाला उत्तम बक्षिस देईन. हे कृत्य जर तुमच्या हातून घडलें नाही तर तुम्हाला प्राणाला मुकावे लागेल. जा ! तुम्ही आपल्या उद्योगाला लागा. व त्याला मारल्याची खूण म्हणून त्याच्या डाव्या पायाची करांगुली मला दाखवावयास आणा. इकडे चंद्रहास्य गर्गमुनीने सांगितल्याप्रमाणे अपरा एकादशीचे व्रत करण्याचा विचार करीत रस्ताने हिडत होता, तो त्या मांगानी येऊन त्याला गांठलें व कांही आमिष दाखवून रानात नेले तेथे आपली लपवून आणलेली शस्त्रे बाहेर काढली. हा सारा प्रकार पाहून चंद्रहास्य घाबरुन रडू लागला. त्याच्या जवळपास कोणीही नव्हते. या त्याच्या असहाय स्थितीत तो दीनवाणे परमेश्वराची त्या नृसिंहाची सांपडलेल्या शाळिग्रामाची करुणा भाकू लागला. तो म्हणाला की, “हे पतितपावना ! आजपर्यंत जसे अनेक प्रकारच्या आपत्तीतून तूं माझे संरक्षण केलेस तसेच या संकटातून मला सोडीव तुझ्यावांचून मला कोणाचाही आधार नाही. तूं सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, जगाच नियंता आहेस. अशा प्रकारे तो करुणा भाकत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा गळत होत्या. तो एकाएकी त्या ठिकाणी एक सिंह आला आणि जबडा पसरुन त्या मांगाकडे क्रूर दृष्टीने पाहू लागला. ते थराथरा कापू लागले व हळू हळू सरकू लागले. तशात एकाने मरण्याच्या भितीने त्या मुलाच्या डाव्या पायाची जादा करांगुली कापून घेतली. थोड्याच वेळात ते त्या सिंहापासून व चंद्रहास्यापासून दूर निघून गेले. व गांवात जाऊन प्रधानाला चंद्रहास्याला मारल्याची खूण म्हणून ती करांगुली दाखविली. इकडे तो सिंह आला तसाच निघून गेला. ऐनवेळी तेथे जो सिंह आला तो साक्षात परमेश्वर होता. पुढे चंद्रहास्य त्या वनांतच भटकू लागला. भटकताना त्याला अत्यंत होऊ लागला. दमल्यामुळे चालताना अडखळून पडत असे, पायाचे रक्त निघत असे, कधी कधी खाण्याला मिळत नसे, थंडी, वारा, ऊन या पासूनही त्रास होत असे. अशा रितीने काळ कंठीत असताना अपरा एकादशीचे दिवशी त्याला काही खावयास मिळाले नाही. सर्व दिवसभर उपाशी असल्यामुळे व इतर त्रासामुळे रात्रभर झोप आली नाही. दूसरे दिवशी दीन होऊन एका झाडाखाली बसला. जागचे हालवेना, तहानेने व क्षुधेने जीव व्याकुळ होऊ लागाला व अखेर बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या या स्थितीत समोरुन एक तेजस्वी पुरुष घोड्यावर बसून तेथे आला तो त्याला तेथे चंद्रहास्य बेशुद्ध पडलेला दिसला. त्याची मरणोन्मुख स्थिती पाहून त्याला दया आली. आणि ताबडतोब पाणी आणून त्याच्या मुखात घातले व त्याला सावध केले. तो तेजस्वी पुरुष चंदनावतीचा कुलिंद राजा होता. त्याला मूल होत नव्हते. एके दिवशी अकस्मात नारद मुनींची स्वारी त्याचे घरी आली. राजाने यथाविधी त्यांची पूजा करुन पुत्र संतान नसल्याचे सांगितले. तेव्हा नारदमुनींनी त्याला अपरा एकादशीचे व्रत करण्याला सांगितले. पुढे राजाने अपरा एकादशीचे व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) यथाविधी केले. व दुसरे दिवशी मृगयेकरिता अरण्यात गेला. तेथे वर सांगितल्याप्रमाणे चद्रहास्य बेशुद्ध स्थितीत दिसला असो. चंद्रहास्य सावध झाल्याबरोबर त्यांने राजाच्या गळ्याला मिठी मारली. तो आकाशवाणी झाली. “हे राजा ! हा पुत्र तुला दिला आहे त्याचा सांभाळ करा .” नंतर राजा त्याला घरी घेऊन गेला. त्याने त्याचे उत्तम प्रकारे लालनपालन केले. नानाप्रकारच्या विद्या शिकविल्या व अखेर दयात आल्यावर त्याच्या हातात राज्य कारभार दिला. चंद्रहास्यही धर्माला । अनुसरुन सुखाने व आनंदाने राज्यकारभार करु लागला. व ज्या एकादशीव्रताच्या पुण्यामुळे त्याला ते ऐश्वर्य मिळाले ते एकादशी व्रत प्रजेला करण्यास सांगितले व त्याप्रमाणे ती सर्व प्रजा प्रेमाने व आनंद एकादशीव्रत करु लागली. चंद्रहास्य राज्य करीत असताना एके दिवशी त्याचा बाप कुलिंद राजा त्याला म्हणाला की, “चंद्रहास्य ! आपण कुंतलेश्वराचे मांडलिक आहोत. मांडलिक राजाने सार्वभौम राजाला दरसाल करभार द्यावा लागतो. आपणाला या वर्षाचा करभार सार्वभौम कुंतलेश्वराला अद्याप पाठवून द्यावयचा आहे तरी तो लवकर पाठवून दे. बापाचे हे भाषण ऐकून चंद्रहास्य म्हणाला की, “बाबा ! आपण जर आज्ञा द्याल तर मी कुंतलेश्वराला येथे बांधून आणतो इतके माझे सामर्थ्य आहे. सामर्थ्य पदरी असताना निष्कारण मानहानी का करुन घ्यावी. चंद्रहास्याच्या या बोलण्यावर कुलिंद म्हणाला की, “चंद्रहास्य ! तूं कुंतलेश्वरास मुसक्या बांधून येथे आणशिल याबद्दल मला शंका नाही. तुझे सामर्थ्य अचाट आहे. पण जरी आपल्या अंगात पुष्कळ सामर्थ्य असले तरी जे कर्तव्य आपल्याला न्यायाने प्राप्त झाले आहे ते केलेच पाहिजे. आपण मांडलिक असल्यामुळे स्वामिद्रोह न करता, कर्तव्य म्हणून त्यास करभार दिला पाहिजे. अशा प्रकारे कुलिंदाने त्यास चार समजुतीच्या गोष्टी सांगून त्याच्याच संमतीने सेवकाजबळ करभार देऊन त्यांना कुंतलेश्वराकडे रवाना केले. चंदनवतीहून निघालेले सेवक कुंतलापुरील पोहचल्यावर त्यांनी दुष्टबुद्धि प्रधानापुढे करभार ठेवला. त्याने तो करभार भांडार खान्यात पाठवून सेवकांना जेवून जाण्यास सांगितले, परंतु ते दिवशी एकादशी असल्याकारणाने त्यांनी जेवण्याचे नाकारले. ते तसेच उठले आणि चंदनवतीला जावयास निघाले. तेव्हा प्रधानाला आज्ञाभंगाचा राग येऊन त्यांना नाना प्रकारे राकून बोलला व मनांत त्या सेवकांच्या हट्टीपणाबद्दल कुलिंदाची खोड मोडण्याचा निश्चय करुन राजाकडे निरोला. राजाची भेट झाल्यानंतर त्याने राजाला सांगितले की, कुलिदाने उन्मत्त होऊन फार थोडा करभार पाठवून दिला आहे, तेव्हा त्याचा समाचार घेण्याकरता आज्ञा द्या . राजाने त्याला तत्काळ मला आज्ञा दिली व आपल्या चंपक-मालती या मुलीला वर शोधण्याचे दुसरेही काम सांगितले, राजाची आज्ञा घेऊन तो घरी आला व शास्त्रास्त्राने सज्ज होऊन परातून बाहेर पडणार तो त्याची विषया नांवाची मुलगी त्याच्या जवळ आली आणि आपल्या विवाहाबद्दलची गोष्ट त्याच्यापाशी काढली. मुलीच्या इच्छेला मान देऊन व”तुलाही उत्तम वर पाहून येतो” असे सांगून तो घराच्या बाहेर आला. बाहेर सर्व सैन्य तयार होते. त्यासह तो चंदनवतीवर चालून गेला. दुष्टबुद्धी प्रधान चंदनवतीवर ससैन्य चालून येत आहे हे वर्तमान कृलिंदास समजताचे तो त्याला सामोरा गेला. दोघांची गाठ पडली. पुढे कुलिंदाने त्याला राजवाङ्यात आणिले व तेथे चंद्रहास्याकडून त्याचे उत्तम प्रकारे आदरातिथ्य केले. चंद्रहास्य त्याचे आदरतिथ्य करित असताना त्याला त्याच्या डाव्या पायाची करांगुली कापलेली दिसली. ती पाहून तो मनांत दचकला व “हा कसा वाचला” असे आश्चर्य करु लागला व त्याचप्रमाणे त्याला मारण्याचा विचारही करु लागला. शेवटी त्याने ठरविले की, आता याच्याशी युद्ध करुन याला उघड न मारता कपटाने मारिले पाहिजे. आदरातिथ्य झाल्यानंतर तो कुलिंदाला म्हणाला की, “हे राजा तुझ्या पुत्राची-चंद्रहास्याची कीर्ति ऐकून कुंतलेश्वराला अत्यंत आनंद झाला आहे. तेव्हा त्याला आताचे आता कुंतलेश्वराकडे भेटण्यास पाठवून दे. त्याच्या जवळ मी एक पत्र माझ्या मुलाला मदनाला लिहून देतो. म्हणजे तो चंद्रहास्याची उत्तम प्रकारे व्यवस्था ठेवून राजानी भेट करवील.” असे बोलून त्याने एक पत्र आपल्या मुलाला लिहून चंद्रहास्याजवळ दिले. त्यात त्याने असे लिहिले होते की, “चंद्रहास्याला तुजकडे पाठविले आहे. तरी त्याची उत्तम प्रकारे व्यवस्था ठेवून मान सन्मान करुन सुदिर कुदिन मनात न आणता एकदम विष देऊन कार्य साधावे. चंद्रहास्य एकटाच चंदनवतीहून जो निघाला तो ताबडतोब कुंतलेश्वर नगरीच्या बाहेर असलेल्या एका बगिच्याजवळ आला. तो बगिच्या सुंदर आहे असे पाहून थोडा वेळ विश्रांति घेण्याकरिता आंत गेला व एका झाडाला आपला घोडा बांधून दुसऱ्या झाडाखाली बैठक टाकली तीवर बसला. कपडे काढले आणि समोरच असलेल्या तलावाकडे स्नानाला गेला. स्नान झाल्यानंतर थोडासा फलाहार करुन श्रमहरणार्थ पडला. तो थोड्याच वेळात त्याला झोप लागली. याच वेळेला प्रधान दुष्टबुद्धी याची कन्या दासींसह जलक्रीडा करण्याकरिता त्या बागेत आली होती. जलक्रीडा केल्यानंतर ती एकटीच बागेची शोभा पहात हिंडू लागली. तेव्हा एका झाडाखाली झोपी गेलेला चंद्रहास्य तिने पाहिला त्याचे स्वरुप पाहून ती मोहित झाली व “मला हा पती मिळेल तर माझा भाग्योदय होईल.” अशा प्रकारचा विचार करीत त्याच्या जवळ गेली. तो त्याच्या उशाशी एक थैली पाहिली. ती उचलून घेतली आणि उघडून पाहिली, त्यात तिच्या भावाच्या नांवाने पत्र होते. ते ती उघडून वाचू लागली, त्यात तिला तिच्या लग्नाविषयीचा मजकूर दिसू लागला पण “विष देऊन कार्य साधावे या वाक्याचा मात्र तिला उलगडा होईना. शेवटी तिने अशी कल्पना केली की, वडिलांकडून लिहिण्याच्या गडबडीत हस्तदोषाने “विषया” च्या ऐवजी “विष” असे असावे. चुकून पडले ती वरील कल्पना खरी मानून तिने आपल्या डोळ्यातील काजळाने तेथील “विष” शब्दापुढे “या” हे अक्षर लिहून “विष” तेथे “विषया” हा शब्द तयार केला नंतर ते पत्र जसेच्या तसे थैलीत घातले आणि ती थैली चंद्रहास्याच्या उशाशी ठेवून ती घराकडे आनंदाने निघून गेली. शब्दाच्या ऐवजी थोड्याच वेळात चंद्रहास्य जागा होऊन प्रधानाच्या घरी गेला. मदनाला आणलेले पत्र दिले. त्याने ते वाचून पाहून त्यातील मजकूर आपल्या आईला सांगितला. वडिलांच्या पत्रा प्रमाणे आईच्या सल्ल्याने तात्काळ विषयाचा चंद्र हास्याशी शुभ मुहूर्तावर विवाह लाविला. विवाह झाल्यानंतर त्याकरिता आलेली ब्राह्मण वगैरे मंडळी आपापल्या घराकडे जावयास । निघाली. इकडे चंदनावतीहून चंद्रहास्य निघून गेल्यावर दुष्टीबुद्धी प्रधानाने कलिंदाला कैद करुन ती नगरी लुटली व तो कुंतलपुरीस यावयास निघाला. थोड्याच वेळात कुंतलपुरीजवळ आला तो समोरुन ब्राह्मण वगैरे मंडळी आनंदाने येत असलेली दिसली. त्यांची गांठ पडल्यावर त्यांच्याकडून त्याला विषयाचा चंद्रहास्याशी झालेल्या विवाहाची बातमी समजली. ती बातमी ऐकून त्याला अत्यंत वाईट वाटले व रागही आला. रागाच्या भरात घरी जाऊन विषयाचा चन्दहास्याशी विवाह केल्याबद्दल आपल्या मुलाला नानाप्रकारे टाकून बोलला. तेव्हा मुलाने “आपल्या आज्ञेबाहेर काही एक न करता, आपल्या पत्राप्रमाणे केले आहे” असे बोलून ते पत्र त्याला दाखविले, त्या पत्रात “विष” शब्दाच्या ऐवजी “विषया” च शब्द लिहिलेला दिसला. तेव्हा त्याला विषाद वाटू लागला. आणि मनात म्हणू लागला की, मला लिहिताना अशी कशी भुरळ पडली. पुढे तो मुलाची मनधरणी करण्याकरिता त्याला म्हणाला की, तूं विषयाचा चंद्रहास्याशी विवाह केल्याबद्दलचा मला राग आला नाही. विवाह करण्याबद्दल मी लिहिले होते. पण राजाला न कळविता विवाह केला याबद्दल मला वाईट वाटून राग आला. तेव्हा आता राजाकडे जाऊन त्याला ही गोष्ट न कळविल्याबद्दलची क्षमा माग. बापाच्या आज्ञेप्रमाणे मदन राजाकडे गेला. विषयाच्या चंद्रहास्याशी केलेल्या विवाहाबद्दल क्षमा मागितली. ती बातमी ऐकून राजाला राग आला व जवळ बसलेल्या सेवकांना म्हणाला की, “मी प्रधानाला राजकन्येला वर पाहण्याचे काम असताना त्याने प्रथम आपल्याच मुलीला वर पाहन तिचे लग्न कले, साधला व माझ्याशी कपट केले. सांगितले राजाचे ते भाषण ऐकून जवळ बसलेले सेवक त्याला म्हणाले की महाराज ! ज्याअर्थी प्रधानाने आपण सांगितले असताना राजकन्येला वर न पाहता आपल्या कन्येला वर पाहून तिचे घाईने लग्न केले त्याअर्थी तो वर पाहून तोच चांगला असला पाहिजे. तेव्हा त्याच्याशी आपल्या मुलीचा विवाह करावा म्हणजे यात प्रधानालाही आपल्या आज्ञाभंगाची शिक्षा केल्यासारखे होईल. सेवकांचा हा सल्ला राजाला पसंत पडून त्याने चंद्रहास्याला बोलावून आणण्याकरिता मदनाला सांगितले. राजाज्ञेप्रमाणे मदन तेथून निघाला. इक्डे मदनाच्या बापाला दुष्टबुद्धी प्रधानाला विषयाचा चंद्रहास्याशी विवाह झाल्याबद्दल अत्यंत वाईट वाटू लागले. शेवटी त्याने त्याला मारण्याचा निश्चय करुन ४/५ मांगाना बोलावून आणिले आणि सांगितले की शस्त्रास्त्रे सज्ज करून अंबिकेच्या देवळात बसा. तेथे पहिल्याने जो कोणी येईल त्याला ठार करा. हे काम तुमच्याकडून झाले तर तुम्हाला भरपूर द्रव्य देईन आणि न झाले तर तुम्हालाच प्राणास मुकावे लागेल. प्रधानाची ती आज्ञा ऐकून ते मांग देवीच्या देवळांत जाऊन बसले, ते मांग गेल्यानंतर दुष्टीबुद्धी प्रधानाने चंद्रहास्याला बोलावून सांगितले की, “विवाह झाल्यानंतर जावयाने देवीची पूजा करावी. असा आमच्या घरात परिपाठ आहे. तर तुम्ही देवीची पूजा करुन या. “ प्रधानाचे आज्ञेप्रमाणे पूजासाहित्य घेऊन चंद्रहास्य एकटाच देवीच्या पूजेला निघाला. थोड्याच वेळात देवीच्या देवळाजवळ आला आणि आता शिरणार तो राजाज्ञेप्रमाणे त्याला बोलावण्याकरिता निघालेला मदन तेथे आला. मदनान त्याला “तुला यावेळी राजाला भेटलेच पाहिजे” असे सांगून राजाकडे लावून दिले व आपण त्याच्याजवळील पूजासाहित्य घेऊन देवळाच्या पायऱ्या लागला. आणि त्याने देवळात पाऊल ठेवले तोच तेथे दडून बसलेल्या मांगानी त्याला ठार केले. इकडे चंद्रहास्य राजाकडे पोचला. राजाने आपल्या मुलीचा त्याच्याशी विवाह लाविला आणि आपल्या राजवाड्यात बसविले. चंद्रहास्याचा विवाहाची व मदनाच्या मृत्यूची बातमी प्रधानाला समजताच तो ताबडतोब देवीच्या देवळाकडे गेला. तेथे मृत्यू पावलेला मदन पाहून अत्यंत दुःख करु लागला आणि शेवटी त्या दुःखाने तो तेथे मृत्यू पावला. दुसरे दिवशी जेव्हा गुरव देवीची पुजा करण्याकरिता आला तेव्हा त्याला तेथे ते दोघे मरुन पडलेले दिसले. त्याने सर्व गावांत त्यांच्या मृत्यूचा बोभाटा केला. लोक नवा राजा- चंद्रहास्य राज्यावर बसला म्हणून हा अपशकून झाला व चंद्रहास्य अपेशी आहे असे म्हणू पावला. लोकांनी चंद्रहास्याला अपेशीपणांचे दिलेले दूषण ऐकून त्याला वाईट वाटले, म्हणून तो तडक देवीच्या देवळात गेला. तेथे देवीची प्रार्थना करुन तिला प्रसन्न करुन घेतले व मदनाला आणि दुष्ट प्रधानाला जिवंत करविले. यावेळी दुष्टबुद्धी प्रधानाची सर्व दुष्ट कृत्ये तिने त्याला सांगितली त्यात आपल्या बापाला कैद केल्याची बातमी ऐकून त्याला अत्यंत वाईट वाटले व ताबडतोब लवाजमा पाठवून त्याची सुटका करविली. पुढे चंद्रहास्याने आपल्या आईबापाला चंदनावतीहून कुंतलेश्वराला आणिले व दुष्टबुद्धीस प्रधानपदावरुन दूर करुन त्याजागी मदनाला नेमले आणि सुखाने व आनंदाने राज्य कारभार करु लागला.” श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी हे पापमोचनी एकादशीचे) व्रत करतील व माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातीला. अपरा एकादशी माहात्म्य युधिष्ठिराने श्रीकृष्णाला वैशाख कृष्ण एकादशीचे माहात्म्य विचारले असता तो म्हणाला, “धर्मा ! या तिथीला अपरा एकादशी म्हणतात. ही अगाध पुण्य देणारी असून महापातक यांचा विनाश करणारी आहे. ब्रह्महत्यारा, गर्भहत्यारा, गोत्रघातकी, वृथारोप करणारा, परस्त्रीगामी, खोटी साक्ष देणारा, व्यापारात खोटी वजने-खोटा तराजू वापरून फर्सविणारा, लबाडीने वेदाध्ययन करणारा, खोटे गणित करणारा ज्योतिषी, खोटी चिकित्सा करणारा वैद्य, युद्धातून पळ काढणारा क्षत्रिय, ज्या गुरूकडून विद्यार्जन केले त्याचीच निंदा करणारा शिष्य; हे सर्व महापातकी होत. त्यांना दारुण नरकवासच प्राप्त होतो. पण त्यांनी पश्चात्तापपूर्वक ण अपरा एकादशी व्रत केले, तर त्यांची त्या-त्या पापांतून मुक्तता होते आणि सद्रती लाभते. हिच्या पुण्यप्रभावाने सज्जनांची जगात मोठी कीर्ती होते. कार्तिक मासात तीन प्रकारच्या पुष्कर तीर्थामध्ये स्नान केल्याने, माघ मासात मकर संक्रांतीस प्रयाग क्षेत्रात स्नान केल्याने, काशी क्षेत्रात शिवरात्रीचा उपवास केल्याने, गुरू सिंह राशीत असताना गोदावरीत स्नान केल्याने, कुंभ संक्रांतीला बद्रिकेदाराचे दर्शन घेतल्याने आणि विपुल स्वर्णदान केल्याने जे पुण्य लाभते; ती सर्व पुण्याई या एकाच अपरा एकादशी व्रताने मिळते. सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री स्नान केल्याने, अश्वगजादी दानाने, यज्ञात सुवर्णदान दिल्याने, सवत्स धेनू तसेच पृथ्वी दान दिल्याने मिळणारे पुण्यफळ अपरा-व्रताने सहज प्राप्त होते. हे व्रत म्हणजे पापरूपी वृक्षाचा छेद करणारी कुन्हाड आहे, पापरूपी राने जाळणारा वणवा आहे, पापरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहे आणि पापरूपी मृगाला भक्षण करणारा सिंह आहे. म्हणून ज्याला पापाची भीती वाटते, त्याने या एकादशीचे व्रत करावे. या दिनी उपोषण करून जो त्रिविक्रम देवाचे पूजन करतो तो पापमुक्त . होऊन विष्णुलोकी जातो. जो हिचे माहात्म्य श्रवण-पठण करतो तोही पापमुक्त होतो.’ श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा । सर्वसाक्षी दयाघना । पुरविण्या मम मनःकामना। तूच सिद्ध सर्वार्थ ।।१ ।। जनकल्याण हेतू मानसी। म्हणुनी विनवितो पां तुजसी। तरी कृपा करून मजसी। विशेष माहिती सांगावी ।।२।। वैशाख कृष्ण एकादशी तिथी। तिजविषयीची जिज्ञासा मोठी। आहे कधीची मम चित्ती । तरी माहात्म्य सांगावे ।।३।। श्रीकृष्ण वदला धर्माप्रत । जगत्प्रेम ज्यांच्या हृदयात । सद्भावना आचरणात । ते नरश्रेष्ठ जाणावे ।।४।। आज येथे तू विशेष । उत्तम विचारणा केलीस । म्हणुनी समग्र माहितीस। करितो विदित ऐक पां ।।५।। वैशाख कृष्ण एकादशीप्रत । अपरा’ ऐसे म्हणतात । हिचे आदरे करिता व्रत । होतो प्रसिद्ध मनुष्य तो ।।६ ।। तिथी अपार फलदायिनी । महापातकविमोचनी। हिच्या कृपेने निष्पाप होउनी। नर पावती धन्यता ।।७।। गोत्रघातकी ब्रह्महत्यारा। परस्त्रीगामी भ्रूणहत्यारा । खोटे आरोप करणारा । होतो निश्चये निष्पाप ।८।। जे देती साक्ष खोटी। जे वजनात लुबाडती। ऐसे नीच या जगती। महाघातकी अत्यंत ।।९।। जे फसवून वेद शिकती। खोटा शास्त्रार्थ सांगती। कुटील ज्योतिषी वैद्य गणिती । महादोषी तेही पां ।।१०।। निंद्यकृत्ये जे करिती । असे पापी मूढ मती। कर्मफलास्तव पुढती। नरक भोगती भयंकर ।।११ ।। जो क्षत्रिय निजधर्म सोडून । पळून जातो संगरातून । तोही कर्तव्यभ्रष्ट जाण । भोगतो अनंत यातना ।।१२|| सं परी हे धर्मा नृपश्रेष्ठा । आचरिता अपरा एकादशी व्रता । पुण्यप्रभावे दोष मुक्तता । जातो , नर तो स्वर्गासी।। १३।। विद्या शिकुनी गुरूपाशी । जो शिष्य निंदितो त्यासी। त्या – अघोरी पातक्यासी । नरकयातना दारुण ।।१४।। परी असाही कोणी दुष्ट । पश्चात्ताप पावन करी हे व्रत। तोही जातो सद्गतीप्रत । या एकादशी सेवने ।। १५ ।। अधिक श्रेष्ठता या व्रताची । तीही सांगतो येथ साची । श्रवणे प्राप्ती पुण्याची। सहज भावे होतसे ।। १६।। कार्तिकमासी त्रिविध पुष्करतीर्थांत । माघसंक्रातीस प्रयाग क्षेत्रात । स्नान-दान-कर्म अगणित। पुण्य मिळते त्या नरा ।। १७।। काशीक्षेत्री शिवरात्री उपोषण । तैसेच गंगेतील पिंडदान । याचे महत्त्व असाधारण । पुण्य मिळते त्या नरा।। १८।। बृहस्पती असता सिंह राशीत । स्नान घडता गोदावरीत । फलप्राप्तीही अद्भुत । पुण्य मिळते त्या नरा ।। १९ ।। कुंभ संक्रांतीस साचे । दर्शन बरदरिकेदाराचे । माहात्म्य तीर्थसेवनाचे । पुण्य मिळते त्या नरा ।। २०।। सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री । देती सुवर्ण अश्व हत्ती। यज्ञप्रसंगी सर्वस्व अर्पिती । पुण्य मिळते त्या नरा ।।२१ ॥ उपरोक्त सर्वही पुण्यफले ती। अपरा एकादशी व्रताने मिळती। अल्पायासे महत्फलप्राप्ती। महिमा अगाध जाणावा ।।२२ ।। दान अर्धप्रसूता गाईचे । अथवा भूमी सुवर्णाचे । पुण्यफल त्यासमान में साचे । मिळते अपरा आचरणे ।।२३।। हे श्रेष्ठ एकादशी व्रत । कुठारासम असे निश्चित । पापवृक्षाचा क्षणार्धात । छेद समूळ करिते पां ।।२४।। अपरा सूर्य तेजोमय । घालवी ए अंधार पापमय। अपरा अनल भयावह । जाळितो काष्ठ दोषांचे ।।२५।। अपरा पापसारंगकेसरी । अपरा परम हितकारी। अपरा श्रेष्ठ भूमीवरी । काय वानू महतीते ।।२६।। हे राजन् ज्या नरास । पापभय वाटते खास । तयाने अपरा एकादशीस । आचरावे श्रद्धेने ।॥२७ ॥ हेच निजकर्तव्य जाणून। प्रयत्ने करावे व्रताचरण । सार्थक आपुले आपण । साधावे या जीवनी ।।२८।। अन्यथा बुडबुड्यासमान। हे आयुष्य असे जाण । आला क्षण जातो निघून । नच येतो परतुनी ।॥२९ | जे कोणी अंध मूढमती । हे व्रत नच आचरिती। ते केवळ मरण्यासाठी । जन्मास येती जाणावे ।।३०।। जो मनुष्य अपरा एकादशी । आचरितो करितो उपवास । आणि त्रिविक्रम देवास । पूजितो भक्तिभावाने ।।३१ । तो समस्त पातकांतून । हरिकृपेने मुक्त होऊन। आनंदाने करितो गमन। जातो विष्णुलोकासी ।।३२|। जनहितास्तव ही विशेषता। तुज सांगितली नृपश्रेष्ठा। आदरे श्रवण पठण घडता । पापमुक्ती होतसे ।।३३।। । इति श्रीब्रह्माण्डपुराणे वैशाखकृष्णैकादश्याः अपरानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।। ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु |। शुभं भवतु ! मित्रांनो एकादशीचा जन्म रात्रीचा आहे त्यामुळे एकादशीच्या रात्री भगवद्भक्ती चे कोणतेही साधन अंगीकारून भगवंतांच्या चिंतनात काल घालवणे अतिपुण्यदायक असते. एकादशीच्या व्रताचे पारणे द्वादशीस दिवसा करावे. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website