II बृहस्पतिकवचम् II
अथ बृहस्पतिकवचम्
अस्य श्रीबृहस्पतिकवचस्तोत्रमंत्रस्य ईश्वरऋषिः I
अनुष्टुप् छंदः I गुरुर्देवता I गं बीजं श्रीशक्तिः I
क्लीं कीलकम् I गुरुपीडोपशमनार्थं जपे विनियोगः I

अभीष्टफलदं देवं सर्वज्ञम् सुर पूजितम् I
अक्षमालाधरं शांतं प्रणमामि बृहस्पतिम् II १ II 

बृहस्पतिः शिरः पातु ललाटं पातु मे गुरुः I
कर्णौ सुरगुरुः पातु नेत्रे मे अभीष्ठदायकः II २ II 

जिह्वां पातु सुराचार्यो नासां मे वेदपारगः I
मुखं मे पातु सर्वज्ञो कंठं मे देवतागुरुः II ३ II 

भुजावांगिरसः पातु करौ पातु शुभप्रदः I
स्तनौ मे पातु वागीशः कुक्षिं मे शुभलक्षणः II ४ II 

नाभिं केवगुरुः पातु मध्यं पातु सुखप्रदः I
कटिं पातु जगवंद्य ऊरू मे पातु वाक्पतिः II ५ II 

जानुजंघे सुराचार्यो पादौ विश्वात्मकस्तथा
अन्यानि यानि चांगानि रक्षेन्मे सर्वतो गुरुः II ६ II 

इत्येतत्कवचं दिव्यं त्रिसंध्यं यः पठेन्नरः I
सर्वान्कामानवाप्नोति सर्वत्र विजयी भवेत् II ७ II 

II इति श्रीब्र्ह्मयामलोक्तं बृहस्पतिकवचं संपूर्णम् II

बृहस्पतिकवच स्तोत्राचा मराठी अर्थः 

या बृहस्पतिकवच स्तोत्राचे ईश्वर नावाचे ऋषि आहेत. या स्तोत्राचा अनुष्टुप् हा छंद आहे गुरु ही या स्तोत्राची देवता आहे. गं हे बीज आहे. श्री ही शक्ति आहे. क्लीं हे कीलक आहे. गुरुपासून होणार्या त्रासांतून मुक्तता होण्यासाठी ह्याचा जप करावयाचा आहे.
१) अभीष्टफळ देणार्या, देवांनी, सर्वज्ञांनी व सुरांनी पुजिलेल्या अक्षमालाधर व शांत असणार्या बृहस्पतिला मी नमस्कार करतो.
२) बृहस्पति माझ्या शिराचे, गुरु माझ्या कपाळाचे, देवांचा गुरु माझ्या कानांचे, इच्छिलेले देणारा माझ्या डोळ्यांचे रक्षण करो.
३) देवांचा आचार्य माझ्या जीह्वेचे, वेदांमध्ये पारंगत असणारा माझ्या नाकाचे, सर्वज्ञ असलेला माझ्या मुखाचे, देवतांचा गुरु असणारा माझ्या कंठाचे रक्षण करो.
४) वांगिरस माझ्या भुजांचे, शुभप्रद माझ्या हातांचे, वागीश माझ्या स्तनांचे, शुभलक्षणी माझ्या कुक्षिचे रक्षण करो.
५) केवगुरू माझ्या नाभीचे, सुख प्रदान करणारा मध्यागांचे, जगद्वंद्य माझ्या कमरेचे, वाकपति माझ्या ऊराचे रक्षण करो.
६) सुरांचा आचार्य असलेला माझ्या गुडघ्यांचे, जंघेचे, विश्वात्मक माझ्या पायांचे, उरलेल्या सर्व अंगाचे श्री गुरु सर्वप्रकारे रक्षण करो.
७) असे हे दिव्य कवच दिवसांतून तीनवेळा म्हणणारास सर्व प्रकारचे सुख लाभते व तो सर्वत्र विजयी होतो.
असे हे ब्रह्मयामलांतले बृहस्पति कवच संपूर्ण झाले.
आपल्या जन्मपत्रिकेत गुरु अशुभ असेल तर या बृहस्पति कवचाचे नियमित पठण करावे. भक्तिभावाने पठण केले तर पीडा नाश पावते. सर्व प्रकारच्या सुखांचा लाभ होतो.

Leave a Reply

Your email address will not be published.