लहानपणापासून आपल्याला चांदोबाचे आकर्षण असतेच . चंद्राचे दर्शन करवून कितीतरी माता आपल्या बाळाचे रंजन करत असतात. परंतु चंद्राचे विशिष्ट दिवशी, सहकुटुंब दर्शन घ्यावे व ती एक पुण्यवर्धक घटना आहे हे किती जणांच्या माहितीत आहे ?
.
अमावास्येनंतर बाराही महिने चंद्रदर्शनचा विशेष मुहूर्त असतो. चंद्राला मनाचा कारक मानले जाते. राशिभविष्य हे सुद्धा साधारण “त्या त्या महिन्यातील चंद्रबळ किती ?” याच प्रश्नाचा मुख्य आधार घेऊन सांगितलेले असते. याचमुळे बुद्धी व ज्ञान कितीही असले तरी त्याच्या योग्य काळी व ठिकाणी वापराची उर्मी हि चंद्रच देतो.चंद्रदर्शन साधारण प्रतिपदा/द्वितीयेच्या दरम्यान असते. फाल्गुन महिन्यात चंद्रदर्शनाचा मुहूर्त फाल्गुन शुक्ल प्रतिपदेला म्हणजेच १४ मार्च २०२१ यादिवशी सूर्यास्तानंतर [ सायंकाळी ७:२४ नंतर ] लगेचच आहे. चंद्रदर्शन सूर्यास्तानंतर लगेचच घ्यावे. पुणे पुणे येथून चांद्रस्ताची वेळ सायंकाळी ८ पर्यंत असली तरी ७:४० पर्यंतच व्यवस्थित दर्शन होऊ शकेल.
.
कित्येक घरांमध्ये चंद्राला ओवाळण्याची प्रथा आहे. परंतु दर्शन घेणे आणि मनोभावे नमस्कार करणे हे सर्वांकडून मुख्य अभिप्रेत आहे . यात चंद्राचे दर्शन नुसत्या डोळ्याने घेणे अपेक्षित आहे , दुर्बिणीतून घेणे अभिप्रेत नाही. सामान्यपणे चंद्राचे दर्शन घेताना चांदीची एखादी वस्तू / नाणे हातात ठेवावे. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला नमस्कार करून लगेच त्या चांदीच्या वस्तूकडे पहावे.
.
.
.
चांद्रदर्शनाचा जास्त लाभ मिळण्याकरीता यथाशक्ती चंद्रदर्शन होईपर्यंत चंद्रदर्शनाच्या दिवशी उपवास करावा. तसेच यथाशक्ती पांढरे वस्त्र, धोतरजोडी, शुभ्र शाल, साखर, तांदूळ आदी सदाचारी व सत्पात्री ब्राह्मणास दान करावे.
.
- चंद्रकोर हि बहुतांश वेळेला तिरपी असते. यादिवशी चंद्राचे डावे शिंग वर असल्यास ते उत्तम वृष्टी होणार असल्याचे निदर्शक मानले जाते.
- स्त्रियांना सौभाग्य प्राप्ती ,
- पैसे / आवक सुधारणे ,
- चांद्र महिना चांगला जाणे ,
- चंद्रबल कमी असल्यास त्याचे काही प्रमाणात निवारण होणे. आपले मासिक / साप्ताहिक राशिभविष्य हे बहुतांश वेळा चांद्र्बळ किती आहे यावरून सांगितले जाते इतके याचे महत्त्व आहे.
- स्थिर व निर्णयक्षम राहाणे
….. अशी या दर्शनाची फळे सांगितलेली आहेत.
सर्वांनी पुण्यकारक व शीघ्र लाभदायी अश्या चान्द्रदर्शानाचा लाभ मनापासून व अवश्य घ्यावा.
|| शुभम भवतु ||
Leave a Reply