सरस्वती आवाहन-पूजन : २७ ते २९ सप्टेंबर २०१७ Mandar Sant September 27, 2017 दिनविशेष नवरात्रामध्ये मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर महासरस्वती मातेचे आवाहन केले जाते. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात बासर तसेच देशात अनेक ठिकाणी सरस्वती मातेची पुरातन मंदिरे आहेत. यावर्षी इ स २०१७ मधील नवरात्रात हा योग २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९:२६ वाजल्यापासून १६:०१ मिनिटापर्यंत आहे. मत सरस्वतीची स्तोत्रे म्हणून तसेच यथाशक्ती सप्तशती चे पाठ करून मत सरस्वतीची पूजा करावी. यावेळी आपण शिकत असलेल्या ग्रंथांची पूजा करणे अपेक्षित आहे. साधारणत: चार दिवस हे पूजन करायचे असते व त्यावेळी अध्ययन व अध्यापन बंद ठेवतात. [ याचा अर्थ परीक्षा तोंडावर आली असताना अभ्यास करायचा नाही असे नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनीच अध्यापन व अध्ययन बंद ठेवून सरस्वतीमाते ची आराधना करावी. याच दिवशी मध्यरात्री देवी भद्रकाली चा जन्मोत्सव करावा. त्यानिमित्ताने भद्रकाली स्तोत्र पठाण करावे . भद्रकालीस्तुतिः =========== ब्रह्मविष्णू ऊचतुः नमामि त्वां विश्वकर्त्रीं परेशीं । नित्यामाद्यां सत्यविज्ञानरुपाम् । वाचातीतां निर्गुणां चातिसूक्ष्मां ज्ञानातीतां शुद्धविज्ञानगम्याम् ॥ १ ॥ पूर्णां शुद्धां विश्वरुपां सुरुपां । देवीं वन्द्यां विश्ववन्द्यामपि त्वाम् । सर्वान्तःस्थामुत्तमस्थानसंस्था मीडे कालीं विश्वसम्पालयित्रीम् ॥ २ ॥ मायातीतां मायिनीं वापि मायां । भीमां श्यामां भीमनेत्रां सुरेशीम् । विद्यां सिद्धां सर्वभूताशयस्था मीडे कालीं विश्वसंहारकर्त्रींम् ॥३ ॥ नो ते रुपं वेत्ति शीलं न धाम नो वा ध्यानं नापि मन्त्रं महेशि । सत्तारुपे त्वां प्रपद्ये शरण्ये विश्वाराध्ये सर्वलोकैकहेतुम् ॥ ४ ॥ द्यौस्ते शीर्षं नाभिदेशो नभश्च चक्षूंषि ते चन्द्रसूर्यानलास्ते । उन्मेषास्ते सुप्रबोधो दिवा च रात्रिर्मातश्चक्षुषोस्ते निमेषम् ॥ ५ ॥ वाक्यं देवा भूमिरेषा नितम्बं पादौ गुल्फं जानुजङ्घस्त्वधस्ते । प्रीतिर्धर्मोऽधर्मकार्यं हि कोपः सृष्टिर्बोधः संहृतिस्ते तु निद्रा ॥ ६ ॥ अग्निर्जिह्वा ब्राह्मणास्ते मुखाब्जं संध्ये द्वे ते भ्रूयुगं विश्वमूर्तिः । श्वासो वायुर्बाहवो लोकपालाः क्रीडा सृष्टिः संस्थितिः संहृतिस्ते ॥ ७ ॥ एवंभूतां देवि विश्वात्मिकां त्वां कालीं वन्दे ब्रह्मविद्यास्वरुपाम् । मातः पूर्णे ब्रह्मविज्ञानगम्ये दुर्गेऽपारे साररुपे प्रसीद ॥ ८ ॥ ॥ इति श्रीमहाभागवते महापुराणे ब्रह्मविष्णुकृता भद्रकालीस्तुतिः सम्पूर्णा ॥ नवरात्रातील पशु बळी याच दिवशी दिला जातो आणि तो देवी च्या गणांसाठी दिला जातो. ज्यांच्याकडे मांसाहार वर्ज्य आहे त्यांच्याकडे कोहळ्याचा बळी दिला जातो. विशेषतः कोकणस्थ समाजामध्ये घागरी फुंकण्याचा कार्यक्रम व कुलाचार याच दिवशी केला जातो. पूर्वाषाढा नक्षत्रावर सरस्वती पूजन केले जाते. यावर्षी इ स २०१७ मधील नवरात्रात हा योग २८ सप्टेंबर रोजी सकाळी १२:०२ वाजल्यापासून आहे. कोहळा बळी दुपारी १२:३२ नंतर द्यावा. २९ तारखेला अष्टमीस पूजन व अर्चन यामध्ये च्या खिरी च्या उत्तम नैवेद्यासह सप्तशतीच्या मंत्रांनी होम करावा. यादिवशी ६ ते १० वर्षांच्या कुमारिकांचे पूजन करावे. खंडेनवमी व शत्स्त्रपूजन याच दिवशी करावे. शमीपूजन हि यादिवशीच करावयाचे आहे. ३० तारखेला विजया दशमी आहे. श्रवण नक्षत्राच्या प्रथम चरणावर सरस्वती विसर्जन करावे. पूजा केलेले ग्रंथ परत वापरात काढावेत. सायंकाळी ४:४७ ते रात्री ११:१५ या दरम्यान हा काळ येतो. शस्त्रे पूजन करून वापरात काढावयाची आहेत. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website