श्री नृसिंह स्तोत्रम्

भवनाशनैकसमुद्यमं करुणाकरं सगुणालयं I
निजभक्ततारणरक्षणाय हिरण्यकश्यपुघातिनम् II
भवमोहदारणकामनाशनदुख:वारणहेतुकं I
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम् II १ II

गुरु सार्वभौममघातकं मुनिसंस्तुतं सुरसेवितं I
अतिशांतिवारिघिमप्रमेयमनामयं श्रितरक्षणम् II
भवमोक्षदं बहुशोभनं मुखपंकजं निजशांतिदं I
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम् II २ II

निजरुपकं विततं शिवं सुविदर्शनायहितत्क्षणं I
अतिभक्तवत्सलरूपिणं किल दारूत: सुसमागतम् II
अविनाशिनं निजतेजसं शुभकारकं बलरूपिणं I
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम् II 3 II

अविकारिणं मधुभाषिणं भवतापहारणकोविदं I
सुजनै:सुकामितदायिनं निजभक्तहृत्सुविराजितम् II
अतिवीरधीरपराक्रमोत्कटरूपिणं परमेश्वरं I
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम् II ४ II

जगतोSस्य कारणमेव सच्चिदनंतसौख्यमखंडितं I
सुविधायिमंगलविग्रहं तमस:परं सुमहोज्वलम् II
निजरुपमित्यतिसुंदरं खलुसंविभाव्य हृदिस्थितं I
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम् II ५ II

पंचरत्नात्मकं स्तोत्रं श्रीनरसिंहस्य पावनम् I
ये पठंति मुदाभक्त्या जीवन्मुक्ता भवन्तिते II ६ II
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य सदगुरु भगवता श्रीधरस्वामिना विरचितं श्रीनरसिंहस्तोत्रं संपूर्णं II

श्री नरसिंह स्तोत्राचा मराठी अर्थ:

१) हे मानवा! आपले कल्याण व्हावे असे तुला वाटत असेल तर; संसाराचा नाश करून मुक्त करणे हाच ज्याचा उद्योग आहे, त्या करुणासागर, गुणश्रेष्ट, आपल्या भक्तांचे तारण व रक्षण यासाठी हिरण्यकश्यपु दैत्याचा नाश करणाऱ्या, प्रपंचमोह व काम नष्ट करणाऱ्या, दुख:निवारण हाच प्रधान हेतु असलेल्या पवित्र, सुखसागर, अद्वितीय अशा नारसिंहाची भक्ति कर.
२) तसेच सर्वश्रेष्ट तारक गुरु मुनींनी स्तविलेल्या, ज्याची सेवा देव करीत असतात,समुद्रप्रमाणे शांत असणाऱ्या, दुर्ज्ञेय, अनुमान दुख:रहित आश्रितांचे रक्षण करणाऱ्या, मुक्तिप्रद, अतिसुंदर मुख कमलयुक्त, शांतिप्रद, पवित्र, सुखसागर, आनंदस्वरूप नारसिंहाची भक्ति कर.
३) हे मानवा! विशालरूप, धारण करणाऱ्या, दर्शन होताक्षणीच कल्याणकारी, भक्तांविषयी दयार्द्रचित्त, दातृत्वयुक्त, अविनाशी, तेजस्वी, बलशाली, कल्याणप्रद , पवित्र, सुखसागर व सर्वश्रेष्ट नारसिंहाची भक्ति कर.
४) हे मानवा! अविकारी, मधुरभाषी, भवतापहारी कुशल, सज्जनांचे मनोप्सित पूर्ण करणाऱ्या, आपल्या भक्तांच्या हृदयांत विराजमान होणाऱ्या अतिवीर, धीर, पराक्रमी, उत्कट रूपधारी, परमेश्वर, पवित्र, सुखसागर अशा नारसिंहाची भक्ति कर.
५) हे मानवा! जगताचे कारण असणाऱ्या, अखंड, सत्य,ज्ञान, अनंत, सौख्यस्वरूप, मंगल समृद्धिरूप देह असलेल्या, देदीप्यमान, अतिउज्वल, सुंदर, समजण्याजोगे, हृदयांत वास करणारे असें रूप असलेल्या, पवित्र, सुखसागर, ब्रह्मस्वरूप अशा नारसिंहाची भक्ति कर.
६) श्री नारसिंहाचे पवित्र, पंचरत्नात्मकस्तोत्र जे भक्तीने, प्रेमाने पठण करतील ते जीवनमुक्त होतील.
अशा रीतीने श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामिनी रचिलेले श्री नरसिंह स्तोत्र संपूर्ण झाले.

www.gurujipune.com

About The Author

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.