वैशाखमास कृत्यम्

 

१) वैशाखात नित्य तुळस पूजन केल्यास मनुष्य नारायण स्वरूप होतो, तसेच वैशाखात रोज पिंपळाला पाणी घातल्यास दहा हजार पिढ्यांचा उद्धार होतो.

२) वैशाखात एकभुक्त व्रत केल्यास किर्ती व धन प्राप्त होते.

३) वैशाखात अनारसे दान केल्यास स्वर्गप्राप्ती होते.

४) वैशाख शु. तृतीयेस ७ मे रोजी (अक्षयतृतीयेस) दान केल्यास ते अक्षय होते, या दिवशी गंगास्नान केल्यास पापनाश होतो. या तृतीयेस पितरांच्या उद्देशाने तर्पण,श्राद्ध ,पाण्याने भरलेला कुंभ खालील संकल्प करून दान केल्यास पितर तृप्त होऊन श्राद्ध अक्षय होते. संकल्प :
‘ मम पितृणां शिवलोकमहीयमानत्व सिद्धीद्वारा अक्षय्यतृप्तिद्वारा पितृदेवताप्रीत्यर्थं अक्षय्यतृतीयायां ब्राह्मणाय उद्कुंभदानं करिष्ये।’

 

५) वैशाखात संपूर्ण महिनाभर पुढील संकल्प करून प्रत:काली स्नान करावे
‘ मम अनेक जन्मार्जित सकलपापक्षयपूर्वक श्रीमधुसूदनदेवताप्रीत्यर्थं अमुकतीर्थे स्नानमहं करिष्ये। ’
ते शक्य न झाल्यास वैशाख शुक्लपक्षातील त्रयोदशी, चतुर्दशी  व पौर्णिमेस वरील संकल्पासह प्रात:स्नान केल्यास वैशाखस्नानाचे फळ मिळून पापनाश होतो.

६) परशुराम जयंतीस ७ मे रोजी प्रदोषकाळी (रात्रीच्या प्रथम प्रहरी) परशुरामांची षोडशोपचार पूजा करून पुढील मंत्राने परशुरामांना अर्घ्य द्यावा. 

जमदग्निसुतो वीर क्षत्रियान्तकर प्रभो।
गृहाणार्घ्यं मयादत्तं कृपया परमेश्वर।।

७) वैशाखातील द्वादशीला विष्णूपूजन केल्यास अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळून चंद्रलोकाची प्राप्ति होते.

८) वैशाख शुक्लपक्षात चतुर्दशीस प्रदोष काळी स्तंभामधून नृसिंहभगवान प्रकट झाले. या दिवशी उपवासपूर्वक

 नृसिंहपूजन केल्यास पापक्षालन होते. सायंकाळी तांदुळाने भरलेले ताम्हण पाणी भरलेल्या कलशावर ठेऊन त्यावर नृसिंहलक्ष्मीच्या प्रतिमेची प्रतिष्ठा करावी व पूजन करावे, शक्य झाल्यास पवमान सूक्ताचा अभिषेक करावा. पूजना नंतर खालील मंत्राने नृसिंहलक्ष्मीस अर्घ्य द्यावेत.

परित्राणाय साधूनां जातो विष्णुरकेसरी विष्णुर्नृकेसरी।
गृहाणार्घ्यं मयादत्तं सलक्ष्मीनृहरे स्वयम।।

९)  वैशाखी पौर्णिमेस यमाच्या उद्देशाने पक्वान्न व उदककुंभाचे संकल्प पूर्वक दान केल्यास गोदानाचे फळ प्राप्त होते. सुवर्ण व तीळ मिश्रीत बारा उदककुंभाचे दान केल्यास ब्रम्हह्त्येच्या पापाचे क्षालन होते. या पौर्णिमेस तीळमिश्रीत पाण्याने स्नान , तीळाचा होम तीळाने भरलेल्या पात्राचे दान,तीळाच्या तेलाने प्रज्वलित केलेल्या दिव्याचे दान, तीळ मिश्रीत पाण्याने पितरांना तर्पण तसेच मधमिश्रीत तीळाचे दान केल्यास महान फळ प्राप्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published.