भाद्रपद महिन्यातील चंद्रदर्शन – शुद्ध द्वितीया – २३ ऑगस्ट २०१७ Mandar Sant August 23, 2017 दिनविशेष लहानपणापासून आपल्याला चांदोबाचे आकर्षण असतेच . चंद्राचे दर्शन करवून कितीतरी माता आपल्या बाळाचे रंजन करत असतात. परंतु चंद्राचे विशिष्ट दिवशी, सहकुटुंब दर्शन घ्यावे व ती एक पुण्यवर्धक घटना आहे हे किती जणांच्या माहितीत आहे ? अमावास्येनंतर बाराही महिने चन्द्रार्शनचा विशेष मुहूर्त असतो. चंद्राला मनाचा कारक मानले जाते. राशिभविष्य हे सुद्धा साधारण “त्या त्या महिन्यातील चंद्रबळ किती ?” याच प्रश्नाचा मुख्य आधार घेऊन सांगितलेले असते. याचमुळे बुद्धी व ज्ञान कितीही असले तरी त्याच्या योग्य काळी व ठिकाणी वापराची उर्मी हि चंद्रच देतो.चंद्रदर्शन साधारण प्रतिपदा/द्वितीयेच्या दरम्यान असते. भाद्रपद महिन्यात चंद्रदर्शनाचा मुहूर्त भाद्रपद शुक्ल द्वितीयेला म्हणजेच २३ ऑगस्ट २०१७ यादिवशी सूर्यास्तानंतर लगेचच आहे. दिवसात ढग सतत येत असल्याने शक्य तेवढ्या लवकर चंद्रदर्शनाचा लाभ घ्यावा. कित्येक घरांमध्ये चंद्राला ओवाळण्याची प्रथा आहे. परंतु दर्शन घेणे आणि मनोभावे नमस्कार करणे हे सर्वांकडून मुख्य अभिप्रेत आहे . यात चंद्राचे दर्शन नुसत्या डोळ्याने घेणे अपेक्षित आहे , दुर्बिणीतून घेणे अभिप्रेत नाही. सामान्यपणे चंद्राचे दर्शन घेताना चांदीची एखादी वस्तू / नाणे हातात ठेवावे. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला नमस्कार करून लगेच त्या चांदीच्या वस्तूकडे पहावे. स्त्रियांना सौभाग्य प्राप्ती , पैसे / आवक सुधारणे , चांद्र महिना चांगला जाणे , चंद्रबल कमी असल्यास त्याचे काही प्रमाणात निवारण होणे बुद्धी स्थिर व निर्णयक्षम राहाणे ….. अशी या दर्शनाची फळे सांगितलेली आहेत. चंद्रकोर हि बहुतांश वेळेला तिरपी असते. यादिवशी चंद्राचे डावे शिंग वर असल्यास ते उत्तम वृष्टी होणार असल्याचे निदर्शक मानले जाते. दोन दिवसानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीस चंद्रदर्शन होऊ देऊ नये. याबाबतची कथा खालील लिंक वर वाचा : गणेश चतुर्थीस चंद्रदर्शन न करण्याबाबतची श्रीकृष्णाची कथा Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website