रमा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०१ नोव्हेंबर २०२१ moderator October 30, 2021 दिनविशेष आश्विन कृष्ण पक्षतील एकादशीला रमा एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, “आता तुला रमा एकादशीचे माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक पूर्वी या पृथ्वीवर मुचुकुंद नांवाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता. तो अत्यंत पराक्रमी व सकळगुणसंपन्न असा होता. तो देवांचे दैत्यापासून वेळोवेळी संरक्षण करीत असे. त्याला चंद्रभागा नांवाची एक सुंदर व सद्गुणी मुलगी होती. जेव्हा ती उपवर झाली. तेव्हा तिचा विवाह शोभन नांवाच्या राजपुत्राबरोबर केला. तो कुलशीलाने व सदगुणाने युक्त असून सुंदर होता. विवाह अत्यंत थाटाने झाला. या कार्यात स्वर्गाधिपती इंद्र मुचुकुंदाच्या बाजूने कारभारी होता. दानधर्माचा पूर लोटला होता. विवाह झाल्यानंतर दिवाळसणानिमित्त शोभन सासऱ्याचे घरी आला होता, पुढे बरेच दिवस मुंचुकुंदाने त्याला ठेवून घेतले होते. कार्तिक कृष्णपक्षात दशमीचे दिवशी नगरात नेहमीप्रमाणे मुचुकुंदाने सेवकाकडून उदईक रमा एकादशी आहे तरी कोणीही अन्न सेवन करु नये. अशी दवंडी पिटविली. मुचुकुदाची प्रजा धार्मिक होती. पण मनुष्याच्या मनाचा ओढा विषयाकडे असल्यामुळे तो सर्वांना सत्कर्म करण्याकरिता अगोदर सावध करीत असे, दुसरे दिवशी एकादशीचे दिवशी नगरातील सर्व लोक स्नानादि नित्य करुन व अन्न उदक वर्ज करुन विष्णू मंदिरात प्रेमाने हरिनामस्मरण करीत व भक्तिभावाने हरि कथा ऐकत बसले. पण मुचकुंदाचा जावई शोभन आपल्या बायकोच्या महालात तिच्याशी गुजगोष्टी करीत बसला. दोन प्रहरानंतर त्याला अत्यंत भूक लागून तो तिला म्हणाला की, “लाडको ! राजाच्या कालच्या दवंडीप्रमाणे आतापर्यंत मी उपवास करण्यात प्रयत्न केला आहे, पण आता मला हा उपवास सहन होईना, मला अत्यंत भूक लागली आहे, भुकेने माझा प्राण अत्यंत व्याकुळ होऊ लागला आहे. तरी मला काहीतरी खाण्याला दे. शोभनाचे ते भाषण ऐकल्यानंतर ती त्याची प्रार्थना करुन म्हणाली की, “महाराज ! आज रमा एकादशी आहे. आज जर अन्न सेवन केले तर महत्पाप लागेल, या नगरात आज कोणीही लहान थोरसुद्धा इतकेच नव्हे तर पशुपक्षीसुद्धा अन्न सेवन करीत नाहीत. तरी कृपा करुन आज आपण उपोषण करावे. तिचे ते भाषण ऐकून त्याने लोकलज्जेस्तव व तिच्याकरिता उपवास करण्याचे ठरविले, कसा बसा दिवस निभावून नेला. पण रात्री मात्र त्याच्याने दम धरवेना, त्याचा जीव कासावीस होऊ लागला. व अखेर द्वादशीचे दिवशी सूर्योदयी त्याचा प्राण निघून गेला. शोभनची प्राणज्योत त्याच्या देहातून निघून गेल्यावर चंद्रभागा त्याच्या प्रेताजवळ बसून अत्यंत शोक करु लागली. क्षणार्धात ही दुःखदायक बातमी सर्व लोकांना समजली. तेव्हा ते सर्व तेथे जमले प्रत्येकाच्या नेत्रातून दुःखाश्रू पाहू लागले. चेहरे उदास झाले. त्यातून चंद्रभागेचा विलाप ऐकून सर्वांची अत करणे विदीर्ण झाली. ती आक्रोश करुन रडत असे, ऊर बडवून असे आणि हंबरडा फोडून म्हणाली की, “प्राणनाथ | उठा तुम्हाला भूक घेत लागली आहेना? किती वेळ झोप घेणार ? काल मी तुम्हाला खाण्याला अन्न दिले नाही म्हणून मजवर रागावलात काय? महाराज मी तुमची दासी मज गरिबावर रागावू नका. उठा, मजशी बोला. मी स्वयंपाक करिते माझ्या जिवितेश्वरा ! एकदा तरी माझ्याकडे कृपा दृष्टीने पहा हो. देवा ! मी अनाथ झाले. मजवर हे दुःखाचे आकाश कोसळले.” अशा प्रकारचा विलाप करीत ती जमिनीवर आपले कपाळ बडवून घेत असे तेव्हा तत्वज्ञानी लोक तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले की, “हे महाभागे ! तूं कोणाकरिता शोक करतेस ? शोभनच्या देहातील आत्माबद्दल शोक करीत असशील तर तो अविनाशी निरुपाधिक आहे. आणि या शोभनच्या देहाबद्दल शोक करीत असशील तर हा मुळातच नश्वर आहे. त्याबद्दल शोक करणे व्यर्थ आहे. समुद्रात लाटेमुळे एके ठिकाणी जमणारी काष्टे जशी लाटेमुळेच पुनः चोहोकडे विखरतात तसेच या संसारात दैवगती मुळे आईबाप, बहीण भाऊ, नवरा बायको या सदरा खाली एके ठिकाणी जमणारे आत्मे दैवगतीमुळे पुनः दूर होतात. तेव्हा व्यर्थ शोक करण्यात काय हशील आहे. अशा प्रकारे त्यांनी तिला नाना प्रकारचा उपदेश केला. तेव्हा तिने आपला शोक कमी केला. नंतर शोभनच्या प्रेताला स्मशानात नेऊन अग्नि दिला. शोभन मृत्यू पावल्यावर एकादशीव्रताचे पुण्यामुळे तो मंदराचली देव लोकाला गेला. तेथे त्याच्या सौख्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. जणू काय दुसरा इंद्रच दुसऱ्या अमरावतीत वास्तव्य करीत आहे. असो. एके दिवशी मुचुकुंदाच्या नगरीतील सोमशर्मा नांवाचा ब्राह्मण तीर्थ यात्रा करीत मंदराचल पर्वतावरील देवलोकी आला. तेथे शोभनची व त्याची गाठ पडली. तेव्हा शोभनने त्याला आपल्या आप्त इष्टांचे व पत्नीचे कुशल विचारले. तेव्हा त्या ब्राह्मणाने सर्वांचे कुशल सांगितले आणि वर त्याला तुला हे ऐश्वर्य कोणत्या उपायाने मिळाले. असे विचारले. ब्राह्मणाचा तो प्रश्न ऐकून शोभन म्हणाला की, “महाराज ! रमा एकादशी व्रताच्या पुण्याचे हे फल आहे. परंतु हे ऐश्वर्य चिरकाल टिकणारे । नाही. कारण माझ्या हातून त्या व्रताचे आचरण विधीयुक्त झाले नाही तर आता तुम्ही माझी प्रियपत्नी चंद्रभागा हिला माझा वृत्तांत कळवा म्हणजे ती माझे हे ऐश्वर्य चिरकाल टिकविण्याकरिता काही तरी उपाय करील . ” ते ऐकून तो ब्राह्मण तेथून निघाला व मुचुकुंदाच्या नगरीत येऊन चंद्रभागेला भेटला आणि आतापर्यंत मंदराचल पर्वतावरील देवलोकातील पाहिलेला व शोभनच्या तोंडून ऐकलेला सर्व प्रकार त्याने तिला सांगितला.’ ब्राह्मणाच्या तोंडची ती शुभवार्ता ऐकून तिला आनंद झाला आणि ती म्हणाली की, “महाराज माझ्या पतीचे आणि माझी भेट करवा. मला तेथे घेऊन चला. महाराज ! हा जळाबाहेर तडफडणारा मासा जळात टांका, दीन अनाथ उघड्याला वस्त्र द्या, क्षुधिताला अन्न घाला. महाराज ! मजवर एवढी कृपा करा. तिचे ते दीन भाषण ऐकून त्याच्या अंत :करणात दया उत्पन्न झाली व तिला तो मंदराचल पर्वतावरील देवलोकी घेऊन गेला. तेथे शोभनला पहाताच तिला अत्यानंद झाला. जवळ जाताच दोघांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. तेव्हा देवांनी पुष्पवृष्टी केली. आनंदभरात बराच वेळ दोघांना बोलवेना. पण अखेर ती म्हणाली की, महाराज घाबरु नका. मजजवळ एकादशी व्रताच्या पुण्याचा साठा पुष्कळ आहे त्या पुण्याईचे जोरावर आपण हे ऐश्वर्य असेच अखंड उपभोगू.’ श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी हे रमा एकादशीचे व्रत करतील व माहात्म्य ऐकतील ते पापातून मुक्त होऊन पुण्यावान होतील व अंती सद्गतील जातील. आश्विन कृष्ण पक्षतील एकादशीला रमा एकादशी म्हणतात. रमा एकादशी माहात्म्य युधिष्ठिराने श्रीकृष्णाला आश्विन कृष्ण एकादशीचे माहात्म्य विचारले असता तो म्हणाला, “धर्मा ! ही तिथी रमा नावाने विख्यात आहे. ही मंगलकारक, महापातकांचा नाश करणारी, कामधेनू वा कल्पवृक्षाप्रमाणे इष्ट इच्छा पूर्ण करणारी व कल्याणकर्ती आहे. हिचे माहात्म्य श्रवण-पठण केल्याने मनुष्य निष्पाप होतो. तो विष्णुलोकी पूजनीय होतो. आता हिची कथा सांगतो. मुचकुंद राजा विष्णुभक्त म्हणून विशेष प्रसिद्ध होता. तो स्वतः एकादशी व्रत करायचा व प्रजाजनांसह मूक प्राण्यांकडूनही करवून घ्यायचा. त्या दिवशी कोणीही भोजन करायचे नाही असा त्याचा दंडक होता. त्यामुळे हत्ती, घोडे, उंट यांनाही चारापाणी दिले जात नसे. चंद्रभागा ही त्याची कन्या. तिचा पती शोभमान. एकदा ती नवऱ्यासह माहेरी आली होती. योगायोगाने त्याच वेळी रमा एकादशी आली. त्या वेळी शोभमान फारच अशक्त झाला होता. पण नियमाचे उल्लंघन होऊ नये म्हणून त्यानेही एकादशीचे व्रत केले. तो तहानभुकेने व्याकूळ झाला. तडफडू लागला. ती रात्र त्याला फारच त्रासदायक ठरली. द्वादशीला सूर्योदयाच्या सुमारास त्याचे निधन झाले. त्याचे और्ध्वदेहिक झाल्यानंतर चंद्रभागा पितृगृहीच राहिली. रमा एकादशीच्या प्रभावाने शोभमान मंदर पर्वतावरील देवपुराचा राजा झाला. ते नगर अजिंक्य, मनोहर आणि स्वर्णरत्नयुक्त भव्य प्रासादांनी शोभायमान दिसत असे. एकदा मुचकुंदाच्या राज्यातील सोमशर्मा नामक ब्राह्मण तीर्थयात्रा करीत त्या नगरास गेला. त्याने शोभमानाला ओळखले. त्याची भेट घेऊन आपला परिचय दिला. त्याला मुचकुंदाचे व चंद्रभागेचे कुशल वृत्त सांगितले. त्यामुळे त्याला खूपच आनंद झाला. ब्राह्मणाने त्याच्या नगराचे कौतुक केले. तेव्हा तो म्हणाला, “मी रमा-व्रताचे श्रद्धेने पालन केले नाही म्हणून हे नगर नश्वर आहे. हे शाश्वत होण्यासाठी माझ्या पत्नीला येथे घेऊन ये.” सोमशम्याने चंद्रभागेची भेट घेऊन तिचा पती कुशल असल्याचे सांगितले. त्यामुळे तिला फार आनंद झाला. पितृआज्ञा घेऊन ती वामदेवाच्या दर्शनास गेली. त्याने केलेल्या अभिषेकाने ती दिव्य देहाची होऊन पतिभेटीस गेली. तिच्या आगमनाने त्याला फार आनंद झाला. तिच्या व्रतपुण्याईने ते नगर अक्षय झाले. श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला जनार्दनास। पावलो धन्य झालो विशेष । परम भाग्याने तुझा सहवास। आम्हां पांडवां लाभला ।।१॥ अनुभवली तुझी कृपा करुणा । स्नेह भक्ती मधुसूदना । उत्कट इच्छा मम मना। तीही पुरवी प्रेमाने ।।२।। निजभक्तांचे जाणुनी मानस । तूच करिसी कौतुकास। आता पुढील तिथिमहतीस। विशद करुनी सांगावे ।।३॥ आश्विन कृष्ण एकादशीचे । कळू दे प्रथम नाव साचे । कथानक तिजविषयीचे । सांग त्वरित भगवंता ।।४।। श्रीकृष्ण म्हणाला धर्मास। करी दृढभावे श्रवणास। आश्विन कृष्ण एकादशीस। ‘रमा’ ऐसे म्हणतात ।।५।। ही तिथी मंगलकारक । नष्ट करिते महापातक । माहात्म्यही पुण्यवर्धक। सांगतो मी तुजलागी।।६॥ पूर्वी मुचकुंद नावाचा । राजा होऊन गेला साचा । थोर वैष्णव असा त्याचा। लौकिक होता सर्वत्र ।।७।। देवराज यम वरुण । कुबेर आणि बिभीषण । हेही त्याचे मित्र जाण । मान, देती त्यालागी ।।८।। ख्याती सत्यप्रतिज्ञ ऐसी। चालवी निष्कंटक राज्यासी । सदा सौख्य नगरासी। तेणे आनंदित पौरजन ।।९ ॥ पुढती सरिता कुळात। विशेष जी प्रख्यात । त्या चंद्रभागेने नृपगृहात । जन्म घेतला कन्येचा ।।१० | ती जेव्हा उपवर झाली। थाटात विवाह केला त्या वेळी । चंद्रसेन-सुताते दिधली । शोभमान नामक त्या ||११|| असाच एकदा सहजगत । शोभमान पत्नीसमवेत । आला श्वशुर सदनात। मुचकुंदाते भेटाया ।।१२ ।। योगायोगाने त्याच वेळी। रमा एकादशी आली । तेणे चंद्रभागेस लागली । चिंता आपूल्या पतीची ॥१३॥ ती स्वतःशी विचार करीत। म्हणाली मम नाथ अशक्त । तरी हरिदिनी तयाप्रत । करणे भाग उपोषण ||१४|| शोभमान असमर्थ त्यासी क्षुधा नच सहन होत। पिता कठोर याबाबतीत । काय होईल नच कळे ।।१५|॥ उपोषण नियमाचे उल्लंघन । घडता करितो दंड दारुण । यास्तव पूर्वसूचना म्हणून । दवंडी पिटतो राज्यात ।।१६।। म्हणतो उदईक हरिदिनी। निजगृही जेवू नये कुणी। तीन वेळा घोष करुनी। सावध करितो पौरांते।। १७।॥ तोच अवचित त्या स्थानी । दवंडी घोष पडला कानी। ती राजाज्ञा ऐकूनी। झाला साशंक जामात ।।१८।॥। तो पत्नीपाशी जाऊन । असमर्थता प्रकट करून । काही पर्याय निघावा म्हणून । काय वदला तेधवा ।।१९।। म्हणाला सुभगे प्रिय कांते । सुचव काही उपायाते । अन्यथा मम जीवनाते । मोठा अपाय होईल ।।२०।| तें चंद्रभागा सुंदरी। म्हणाली निरुपाय सर्वतोपरी । हरिदिनी मम पित्याघरी । कोणी न सेविती अन्नाते ।॥ २१ || हाच दंडक आहे येथ । पशू अश्व गज उंट । यांनाही नच कोणी देत । तृण अथवा उदकाते ।।२२।। मूक प्राण्यांची ही कथा । इतरांचे काय सांगू नाथा। तरी तुम्हीही करा आता । एकादशी उपोषण ॥२३।। ते जरी अशक्यप्राय । तरी आहे एक उपाय । भोजनास्तव करू या काय। सोडून जाऊ सदनाते ।।२४।। निजहेतूचा विचार करून । सुदृढ करावे आपुले मन । मूल्यवान तुमचे प्राण। मम दृष्टीने जाणावे ।।२५।। तधी क्षात्र तो काय म्हणाला । परी हे शोभत नाही मजला । क्षुधेस्तव सोडून सदनाला । जाणे अनुचित केव्हाही ।।२६।। प्रिये आज तू मजला। सत्य वृत्तान्त सांगितला। तरी निश्चये उपोषणाला । करीन एकादशीस या ।।२७।। मग माझ्या प्रारब्धात । जे असेल ते होऊ देत । दृढ निर्धार करुनी व्यक्त । उपोषित राहिला ।।२८।। मग रमा एकादशी दिनी। क्षुधातृषेने व्याकूळ होउनी। अंती उपवास केला म्हणुनी । अति दुःखित जाहला ।।२९।। सायंकाळच्या सुमारास । सूर्य गेला अस्ताचलास । आणि अलगद सावकाश। रजनी प्रवेश जाहला।। ३० ।। या रात्री हरिपूजनी तत्पर । आणि जागरण प्रिय फार। अशा वैष्णवांते थोर। अत्यानंद वाटतो ।३१ ।॥ परी दिवसभर उपोषण । तेणे शोभमान म्लानवदन । तयासी ती रात्र पावन । ठरली अति दुःसह ।।३२।। अशा प्रकारे तो उपवास । सहन नच झाला त्यास । प्रभातसमयी द्वादशीस। आले मरण त्यालागी ।।३३।। ती भयाण दुःखद वार्ता ।कर्णोपकर्णी पसरता । राजप्रासादी शोकाकुलता । आली अवकळा नगरासी।I३४।|। तधी = मुचकुंद राजाने । विधीनुसार योग्य रितीने । जावयाचे सन्मानाने । केले दहन कर्म ते ।।३५।। त्या समयी चंद्रभागा सुता । सती जाण्याचा हेतू बोलता । तिज समजावूनी तो पिता। परतला निजप्रासादी ॥३६ ॥ पुढती औध्धदेहिक होता। टुःखी-कष्टी ती सुता। पितृआश्रयास आता। येउनिया राहिली । ।३७|। इकडे व्रत प्रभावामुळे। मृत शोभमानास त्या वेळे । रम्य देवपूर प्राप्त झाले । मंदराचली स्थित जे ।३८।| अर्जिक्य असे ते नगर। होते अनुपम आणि सुंदर । त्यासमान अन्य खरोखर । नव्हते समस्त ब्रह्मांडी ।।३९।। त्यामाजी असंख्यात। दिव्य प्रासाद शोभिवंत । सुवर्णाचे स्तंभ तयांत । मणिरत्नांनी मढलेले।।४०।। तेथ सर्वत्र दीप्तिमान । स्फटिक वैदूयांची पखरण । तेणे नगर ते परिपूर्ण अति शोभून दिसतसे ।1४१ | ब्रतप्रभावे शोभमानाप्रत । त्या रमणीय पुरात। राजपद झाले प्राप्त । सिंहासनी आरूढला ।।४२।। दिव्य छत्र मस्तकावरती। श्वेत चामरे भोवती झुलती। किरीट कुंडले अंगावरती । रुळती अनुपम पुष्पहार ।।४३ ॥ गंधर्व त्याची स्तुती करीत । अप्सरा नित्य सेवारत । देवराजासम शोभिवंत । विभूषित जाहला ।।४४|| अशा प्रकारे त्या नगरीत। कालक्रमणा असता करीत। पुढती काय घडले तेथ। लक्षपूर्वक ऐकावे ।॥४५॥| एकदा मुचकुंद नगरीतून। सोमशर्मा नामक ब्राह्मण । यात्राप्रसंगी करीत भ्रमण। देवपुरीसी पातला ।।४६ । तेथ पाहुनी शोभमानाते । अर्थात राजजामाताते । ओळख त्वरित पटली त्याते । झाला आनंदित मनोमन ।।४७। मोठे आश्चर्य तयाप्रत । पातला त्वरेने त्याच्यानिकट । तैं नृपे आदर दावीत । केले स्वागत सद्भावे ।।४८।। आसन सोडुनी सन्मुख गेला । विनयाने चरणी लोटला । अगत्याने समवेत नेला । प्रासादातील कक्षात ।।४९ ।। तेथ श्रेष्ठ आसनी बैसवून । अत्यादरे केले पूजन । आणि उत्तम आतिथ्य करून। पुसिले क्षेमकुशलाते।।५० । । बोलण्याच्या ओघात। जाणले तयाचे इतिवृत्त । विप्राचे नाव गाव समस्त । कळता अति आनंदला ।।५१।। मनी उत्सुकता दाटली। मुचकुंदाची चौकशी केली। पत्नीचीही त्या वेळी । केली प्रेमे विचारणा ।।५२।। देश काल राज्यस्थिती। पुसली सर्व ती माहिती । प्रजेविषयी आदर चित्ती। जाणून घेतली हकिकत ॥५३॥ तधी तयाते शांत करीत । सोमशर्मा तयाप्रत । वदला नृपवरा हो निश्चित। असती खुशाल सर्वही ॥५४। परी आता मजप्रत । करी कथन तुझे वृत्त । त्याविषयी माझ्या मनात । मोठी जिज्ञासा आहे पां ।।५५।। हे राजा तुझे नगर । आहे निरुपम नितांत सुंदर । कैसे प्राप्त झाले खरोखर । सांग मजसी लवलाही ।।५६।। तधी शोभमान काय म्हणाला । ते सर्वही सांगतो तुजला । रमा एकादशीस उपवास केला । म्हणुनी प्राप्त झाले हे ।।५७।। पूर मनोहर विलक्षण । यात दुमत नाही जाण । परी ते नश्वर आहे म्हणून । लुप्त होईल कधीतरी।।५८ । यास्तव माझी विनंती तुजसी। करी काही उपायासी। हे स्थान व्हावे अविनाशी । ऐसे वाटते मजलागी ।।५९।। तधी वदला तो ब्राह्मण । हे अशाश्वत कशावरून । आणि तूच सांग कृपा करून । शाश्वत कैसे होईल हे।॥६० । । मजला त्याचे कळता कारण । निश्चये तैसा करीन प्रयत्न । तुझ्यास्तव त्यात जाण। कसूर नाही करणार ।।६ १ ।। तैं नृपती तो वदला । रमा एकादशी तिथीला । श्रद्धाविरहित केले व्रताला । म्हणुनी शाश्वत नाही हे । ॥६२।। आता सांगतो तुजप्रत । अक्षय कशाने होईल निश्चित । मम पत्नीस हा वृत्तान्त । सांगता कार्य साधेल ।॥६३ ।। = शोभमानाचा शब्द राखून । सोमशर्मे गाठले सदन । चंद्रभागेची भेट घेऊन । वर्तमान ते सांगितले ।।६४।। द्विजोत्तमाचे वचन ऐकून । विस्फारले तिचे नयन । म्हणे श्रेष्ठा आश्चर्य महान । सत्य आहे की स्वप्न हे ।॥६५।। तेव्हा धीर देत तिजला । ब्राह्मण तो काय म्हणाला। मुली महावनी प्रत्यक्ष पाहिला। तुझा पती मी निश्चये ।।६६।। देवादिकांच्या नगरासमान । आहे तयाचे वसतिस्थान । अजिंक्य सुंदर रमणीय छान । तरी अजून ते अध्रुव ।।६७।। तरी अनुपम असे ते स्थळ । ज्यायोगे ध्रुव होईल । असे कर्तृत्व सबळ । दाखवी तू कन्यके ।।६८।। चंद्रभागा म्हणाली विप्रश्रेष्ठा। मनी पतिभेटीची उत्सुकता। तरी घेऊन चला आता । मजलागी त्या नगरासी ।।६९।। मी व्रताच्या पुण्याईवर। करीन अक्षय देवकी । काय करू झाले अधिर । चला सत्वरी कृपा करा ।।७० ।। वियोगी पतिपत्नीचा। संयोग केला असता साचा । थोर वाटा पुण्याईचा । प्राप्त होतो त्या नरा ।।७१ ।। चंद्रभागेची अवस्था जाणून । सोमशम्याचे द्रवले मन । मुचकुंदाची अनुज्ञा घेऊन । निघाला त्या समयासी ।।७२।। फिरत आले मंदराचलावर । तेथ आश्रम पाहिला सुंदर । वामदेव ऋषी थोर । त्यांचे दर्शन घेतले ।।७३ ।। आदराने चरण वंदून । सर्व वृत्तान्त केला कथन । तो सद्भावे श्रवण करून । वामदेवही कळवळले। ।७४। त्यांनी व्रताचरणी चंद्रभागेला । वेदमंत्रांनी अभिषेक केला। तेणे देह दिव्य झाला । पावली श्रेष्ठ गतीस ती।।७५।। तधी मनी हर्षित होऊन । नयनी उत्कंठा एकवटून । अर्धागिनी ती तत्क्षण । पतिभेटीस पातली।।७६। प्रिय कांता आली पाहून। आनंदला शोभमान । तिजसी निकट बोलावून। वाम अंगी बैसविले । ।७७। । दोन जीवांची भेट जाहली। हृदयीची = विरह व्यथा संपली । चंद्रभागा करू लागली । मधुर भाषण त्या समयी ।।७८।। वदली नाथा परमेश्वरा । काय सांगते ऐका जरा। होता पुण्यठेवा खरा। म्हणुनी पाहिले तुम्हांसी।।७९।। मी आठव्या वर्षापासून । केले विधीने श्रद्धा धरून । रमा एकादशी व्रताचरण । पितृसदनी असताना ।।८०।। त्याच प्रभावे खचित । हे देवपूर प्रलयापर्यंत । टिकेल आणि येथ समस्त । पूर्ण होतील कामना ।।८१।। श्रीकृष्ण म्हणाला हे नृपश्रेष्ठा । । याप्रमाणे ती कांता। पतीसह वर्तत असता । झाली सुखी सर्वार्थि ।॥८२ || रमा एकादशी – ब्रताचे । सामर्थ्य यापरी श्रेष्ठ साचे । चंद्रभागा शोभमान दोघांचे । धन्य झाले जीवनही ।।८३।। मंदराचल पर्वत परिसरात। त्या अनुपम नगरात। कालक्रमणा आनंदात । करू लागली उभयता ।।८४।। धर्मा! तिथी ही पुण्यपावन । आहे चिंतामणीसमान । समस्त व्यथा चिंता हारून । पुरविते इच्छित मनोरथ ।।८५।। कामधेनू ही दुसरी। हिचा प्रभाव असे भारी । व्रताचरणे कामना सारी। पूर्ण करिते लवलाही ।।८६।। जो रमा एकादशीचे । व्रत श्रद्धेने करील त्याचे । ब्रह्महत्यादी पातकाचे । होईल निरसन निश्चये ।।८७।। जो माहात्म्य श्रवण करील। तोही पापमुक्त होईल । त्याते पूज्यता मान मिळेल। श्रीहरीच्या भुवनी ।।८८।। ॥ इति श्रीब्रह्मपुराणे आश्विनकृष्णैकादश्याः समानाम्न्याः माहात्म्य संपूर्णम् ।। । श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु! च्या चिंतनात काल घालवणे अतिपुण्यदायक असते. एकादशीच्या व्रताचे पारणे द्वादशीस दिवसा करावे. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website