श्रावणमासकृत्यम अर्थात श्रावण महिन्यातील धर्म कार्ये Mandar Sant August 7, 2018 दिनविशेष १] संहितेतील वचनानुसार श्रावण मासातील प्रत्येक तिथीस त्या त्या देवतांना कापसाची वस्त्रे (पवित्रारोपण) अर्पण करतात, त्या देवता तिथीनुसार खालील प्रमाणे. प्रतिपदा-कुबेर, द्वितीया-लक्ष्मी, तृतीया-पार्वती, चतुर्थी-गणपती व त्रिपुरभैरवी, पंचमी-चंद्र, षष्ठी-कार्तिकेय, सप्तमी-सूर्यनारायण, अष्टमी-दुर्गा व सर्व देवता, नवमी-देवी व सर्व देवता, दशमी- धर्मराज (यम), एकादशी-ऋषि, द्वादशी-विष्णू, त्रयोदशी-कामदेव, चतुर्दशी-शंकर, पौर्णिमा / अमावास्या –पितर.========================================= २] श्रावणी सोमवार सोमवारव्रतं कार्यम् श्रावणे वै यथाविधी । शक्तेन उपोषणं कार्यं अथवा निशिभोजनं ।।सोमवारे विशेषेण प्रदोषादिगुणैर्युते । केवलं वाSपि ये कुर्यु: सोमवारे शिवार्चानम् ।।न तेषां विद्यते किंचिदिहामुत्र च दुर्लभं । उपोषित: शुचिर्भूत्वा विधिवत् पूजयेच्छिवम् ।।ब्रह्मचारी गृहस्थोवा कन्या वापि सभर्तृका । विभर्तृका वा संपूज्य लभते वरमीप्सितम् ।। श्रावणी सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा व दुसरे दिवशी सोडावा. शिवमंदिरात जाऊन पुढील संकल्प करावा – मम अवैधव्यपुत्रपौत्रादि ऐहिक सकल भोगैश्वर्यप्राप्तिपूर्वक शिवलोकप्राप्तिद्वारा श्रीशिवप्रीत्यर्थं (अमुक) धान्यसमर्पणं अहं करिष्ये ।। (धान्यांची संस्कृत नावे अमुक शब्दाच्या ठिकाणी योजावीत.- तांदूळ(तण्डुल), तीळ(तिल), गहू(गोधूम),मूग(मुद्ग), सातू(यव) व पुढील मंत्र म्हणून शंकरास शिवामूठ वहावी. ‘ नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने ।नंदिभृंगि महाकालगणयुक्ताय शंभवे ।।’ श्रावणी सोमवार करण्याचा अधिकार ब्रह्मचारी,गृहस्थाश्रमी, विवाहित-अविवाहित स्त्रिया, विधवा या सर्वांना आहे. श्रावणी सोमवारचे व्रत विधीवत केल्यास इच्छित मनोकामना पूर्ण होतात. ========================================= संदर्भ : सुर्यासिद्धांतीय देशपांडे पंचांग. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website