मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला सफला एकादशी म्हणतात.

श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्म राजा ! आता तुला सफला एकादशीचे माहात्म्य सांगतो ते ऐक. पूर्वी चंपावती नगरीमध्ये माहिष्मंत नांवाचा एक राजा राज्य करीत होता. त्याला चार पुत्र होते. त्यात लुंपक नांवाचा सर्वात वडीत मुलगा अत्यंत दुराचारी कृतघ्न असा होता. तो संत सज्जनांची निंदा मुलगा करी. हरि कथेला तुच्छ लेखी. कर्मभ्रष्ट दुर्जनांच्या संगतीत काळ घालवी. स्वतःच्या हिताकरिता चांगल्या चांगल्या लोकाशी कलागती करी. आणि राजपुत्र या नात्याने त्यांना धाक दाखवून त्रास देई, जुगार खेळ, मद्यपान करुन धुंदा होई, कुलवान परस्त्रियाकडे पापी इच्छेने पाही व त्यांना जबरीने भ्रष्ट करी, बहुतेक काळ वेश्येच्या घरी घालवी. तिचे मन संतुष्ट ठेवण्याकरिता घरातील द्रव्य आणि तेही चोरुन तिला नेऊन देत असे. माहिष्मत राजाला आपल्या पुत्राच्या दुराचरणाबद्दल अत्यंत वाईट वाटत असे.

अशा रितीने त्याचा त्या चपावतीतील नागरिकानां अत्यंत त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांनी त्याच्या पित्याकडे माहिष्मंत राजाकडे त्याच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी नेल्या आणि सांगितले की, “हे राजा ! तुझा मुलगा अत्यंत दुर्वर्तनी झाला आहे, त्याच्या दुर्वर्तनापासून आम्हाला अत्यंत त्रास होतो, तेव्हा एक त्याच्या बंदोबस्त तरी कर नाही तर आम्हाला हीचंपावती नगरी सोडून जाण्याला सांग. नागरिकांचे हे भाषण ऐकून राजाने “मी त्याचा बंदोबस्त करते तुम्ही निर्भय असा. इतःपर त्याच्यापासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही” असे सांगून त्यांना निरोप दिला. नागरिक निघून गेल्यानंतर राजाने पुष्कळ विचार करुन शेवटी असे ठरविले की, प्रजेचे पालन करुन तिला सौख्य देणे हेच राजाचे मुख्य आणि पहिले कर्तव्य आहे. तेव्हा या दृष्टीने मला मझ्या मुलाच्या त्रासापासून प्रजेला होणाऱ्या दुःखाचे निवारण केले पाहिजे. या कामात मुलावर जरी कोणताही घोर प्रसंग आला तरीही माघार घेता उपयोगी नाही. असा निश्चय करुन राजाने आपल्या मुलाला नगराबाहेर हाकून दिले तेव्हा त्या नगरीतच काय पण त्या नगरीच्या आस पास सुद्धा त्याला कोणीही आश्रय दिला नाही. तेव्हा तो भटकत भटकत घोर अशा एका अरण्यात शिरला. एका अश्वत्थवृक्षाखाली एक मोडकी तोडकी झोपडी होती, तीत तो राहू लागला. खावयास धान्य मिळत नसल्यामुळे हिंसा करुन मांस भक्षण करु लागला. थोड्याच दिवसात त्याची सर्व वस्ने प्रावरणे फाटून गेली. सत्ताहीनतेची अशा रितीने बराच काल गेल्यानंतर त्याला जाणीव त्रास देऊ लागली, तेव्हा त्याने त्या चंपावती नगरीतील लोकांचा सूड घेण्याचा निश्चय करुन त्या अरण्यातील क्रूर दुष्ट अशा रानटी लोकांच्या साह्याने प्रयत्नाला सुरुवात केली पण त्या प्रयत्नाला यश मिळत नसे. चंपावतीतील नागरिकांना व स्त्रियांना लुटण्याची व त्याची घरेदारे दारिद्र्य व जाळून विध्वंस करण्याची त्याची दुष्ट आशा अपुरी राहिल्यामुळे खिन्नतेतच दिवस कंठ लागला. तोच सफला एकादशीचा दिवस जवळ आला. सफला एकादशी ही मार्गशीर्षमासात येते. मार्गशीर्षमास हा अत्यंत थंडीचा काळ असतो आणि त्यावेळी अत्यंत कडाक्याची थंडी पडली होती.

दशमीचे दिवशी रात्री त्या थंडीमुळे त्याला अत्यंत त्रास होऊ लागला. अगोदरच अरण्य, त्यातून ती मोडकी तोडकी झोपडी, फाटकी वस्त्रे, या त्याच्या स्थितीत त्याला त्या कडाक्याच्या थंडीपासून स्वचःचा बचाव
करिता येईना. झोपडीच्या बाहेर कुडकुडत पडला, दात वाजू लागले, तेव्हा विस्तव करुन थंडीचे निवारण करावे असे त्याच्या मनांत आले. पण विस्तव करण्याला जवळ साधने नव्हती ही साधने त्या अरण्यातील लोकापासून जमा करावी असा विचार करुन उठू लागला तो त्याला जागचे उठवेना तेव्हा दुःखाने “हे परमेश्वरा । मजवर हा कोण घोर प्रसंग आणिलास” असे म्हणून देवाला दोष देऊ लागला. मनुष्याने आपल्या दुःखद स्थितीबद्दल देवाला दोष देणे हे अत्यंत चुकीचे आहे. कारण ती दुःखद स्थिती आपल्या दुष्कार्मामुळेच उत्पन्न झालेली असते. जे पेरावे तेच उगवते. हा सृष्टिदेवतेचा न्याय आहे असो. पुढे त्या थंडीच्या कडाक्यामुळे त्याच्या जिव्हेची बोबडी वळली, हात पाय ताठले व शेवटी बेशुद्ध होऊन पडला. दशमीची रात्र संपून सफला एकादशीचा दिवस उगवला तरीही सावध होईना. सूर्य मध्यान्ही आला तेव्हा उन्हाचा तडाका बसून थोडासा सावध झाला, उठून बसला, क्षुधेने पीडीत झाला पण खावयास जवळ काहीही नव्हते तेव्हा हरिण, डुक्कर या सारख्या कोणत्यातरी प्राण्याचा वध करुन त्याचे मांस भक्षण करावे असा त्याने विचार केला व लगेच आपले धनुष्यबाण घेऊन चालू लागला. पण त्याला चालवेना. अशक्ततेमुळे पायात अडखळून क्षणाक्षणाला पडत असे. क्षुधेने व तृषेने व्याकुळ होऊन मटकन एका वृक्षाखाली बसला. त्या वृक्षावरील गळून खाली पडलेली फळे गोळा केली व त्यापैकी काही खाऊन क्षुधेचे थोडेसे शांतवन केले. व जी उरली ती दुःखभारात, त्रासाने “कृष्णार्पण” म्हणून तेथेच टाकिली व हळू हळू आपल्या झोपडीकडे परत गेला तो सूर्यास्त झाला. रात्री म्हणजे सफला एकादशीचे रात्री, आदले दिवसाचे रात्रीप्रमाणे त्याला थंडीचा त्रास झाला, रात्रभर झोप आली नाही. जागरण झाले जागेपणी त्याच्या मनात निरनिराळे विचार येऊ लागले. त्यात त्याच्या दुष्कर्माची आठवण होऊ लागली. तेव्हा त्याला पश्चाताप झाला. यापुढे त्याने सत्कर्मे करण्याचा निश्चय केला. श्रीकृष्ण म्हणतात हे धर्मराजा त्या दुराचारी लुंपकाला नकळत सफला एकादशीचे पुण्य घडले. त्यामुळे तो पुण्यवान झाला. मग भक्तिभावाने जे हे एकादशीचे व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे ) करतील व माहात्म्य ऐकतील ते खात्रीने पापातून मुक्त होतील, प पुण्यवान होतीलच होतील, पुढे त्याच्या पित्याला आपला मुलगा पुण्यवान झाला आहे असे आकाशवाणीकडून कळले, तेव्हा त्याला घरी आणून राज्यावर बसविले. व आपण तपश्चर्या करण्याकरिता अरण्यात निघून गेला. त्याचप्रमाणे लुंपकही बहुत काळ राज्य करुन सद्गतीला गेला.

मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला सफला एकादशी म्हणतात.

सफला  एकादशी माहात्म्य 

 

युधिष्ठिराने श्रीकृष्णाला मार्गशीर्ष कृष्ण एकादशीची माहिती विचारली. तेव्हा तो म्हणाला, “धर्मा ! ही एकादशी सफला नावाने प्रख्यात आहे. या तिथीस पूर्वोक्त विधीनुसार व्रत, उपवास, भजन, कीर्तन, जागरण करावे नारायणाची पूजा करून त्यास श्रीफळ, आवळे, लिंबे, डाळिंबे, सुपाऱ्या, लवंगा, अन्य उत्तम फळे, विविध प्रकारची धान्ये अर्पण करावी. दीपदान करावे. या व्रताचरणाने यश, कीर्ती वाढते. मोक्ष मिळतो. आता हिचे कथानक सांगतो. ते श्रवण केल्याने राजसूय यज्ञाचे फल मिळते. स्वर्गप्राप्ती होते. चंपावती नगरीत महिष्मत नावाचा राजा होता. त्याला चार पुत्र होते. लुंपक हा त्याचा ज्येष्ठ पुत्र. तो अत्यंत दुर्गुणी होता.

तो परस्त्रीगमन, वेश्यागमन, द्यूतक्रीडा, देव-ब्राह्मण-वेद-वैष्णव यांची निंदा – अशी अनेक दुष्कर्मे करीत असे. शेवटी राजाने त्या पाप्याचा स्वतःच त्याग केला आणि त्याला राज्याबाहेर घालविले. तो दिवसा वनात राहायचा. प्राण्यांच्या हत्या करून त्यांचे मांस खायचा व रात्री नगरात घुसून चोऱ्या करायचा. राजसेवकांनी त्याला पकडले तरी राजाच्या भीतीने त्याला सोडून देत. त्या अरण्यामध्ये तो राजपुत्र एका जुनाट पिंपळाखाली राहत असे. असा बराच काळ लोटला. एकदा मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या रात्री अतिव थंडीमुळे त्याला झोप आली नाही. ती रात्र त्याने कशीबशी व्यतित केली. सफला एकादशीच्या दिवशी मध्यान्ह समयी त्याची ग्लानी उतरली. तो तहानभुकेने व्याकूळ झाला होता. त्याच्या शरीरात त्राण उरले नव्हते. त्याने शिकारीचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही. म्हणून खाली पडलेली फळे घेऊन तो मुक्कामी आला. तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. | त्याने ती फळे पिंपळाच्या मुळाशी ठेवली आणि ‘या फळांनी नारायण संतुष्ट होवोत!’ असे म्हणून प्राप्त स्थितीबद्दल विलाप करू लागला. त्या रात्रीही त्याला झोप आली नाही. अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत व्रताचरण घडले. भगवान वासुदेवाने त्याच्यावर पूर्ण कृपा केली. त्याची दुष्ट बुद्धी गेली. मन भक्तिभावाने भरले. तो दिव्य रूप झाला. त्याने पित्याची भेट घेतली. त्याचे बदललेले स्वरूप पाहून महिष्मताला अपार आनंद झाला. त्याने त्याला राज्याभिषेक केला. प्रदीर्घ काळ उत्तम राज्यभोग घेऊन आणि आपले आयुष्य सार्थकी लावून लुंपक विष्णुलोकी गेला.”

श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिराने प्रश्न केला । भगवंता कृपया सांग मजला। मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला । काय असे नाव ते।। १ ।। व्रत तियेचे कसे करावे । कोणत्या देवाते पूजावे । माहात्म्य तेही सांगावे। विस्ताराने जनार्दना ॥२ ॥ तै श्रीकृष्ण वदला हसून । तव स्नेहास्तव करीन कथन । धर्मा, व्रत हे करता जाण । परम संतोष मजलागी।।३।। क विपुल दक्षिणायुक्त यज्ञानेही। मम तुष्टी होत नाही । ती सहजगत्या पाही । होय व्रताचरणे : या ।।४।। म्हणुनी सर्व यत्न करून । व्रत आचरावे अवश्य जाण । आता एकाग्र करुनी मन । ऐक विधी माहात्म्यही।।५। वर्षामाजी एकादशी तिथी । जरी संख्येत अनेक असती। त्याविषयी परी तुझिया चित्ती। ज्येष्ठ-कनिष्ठ भेद नको ॥६॥ मार्गशीर्ष कृष्ण एकादशी तिथी। ‘सफला’ नामे प्रख्यात ती। या दिनी देव नारायणाप्रती । भावे पूजावे विधियुक्त ।।७ । शेषनाग सर्पकुळात । गरुड पक्षि-परिवारात । भागीरथी सरिता-समूहात श्रेष्ठ असती निःसंशय ।।८।। सुरवरांत विष्णुभगवान । मनुष्यलोकी विप्रगण । तैसे समस्त व्रतांतून । एकादशी श्रेष्ठ असे ।।९।। हे धर्मराज भरतश्रेष्ठ । जे नर हे व्रत करतात। निश्चये सांगतो तुजप्रत । अतिप्रिय मजसी पूज्य ते ।। १ ।। आता सफला एकादशीचा । सांगतो पूजाविधी साचा । त्वा उपक्रम या व्रताचा । श्रवण करावा आदरे ।। ११ ।। या पुण्यपावन तिथीसी। उत्तम फळांनी पूजावे मजसी। उपलब्ध जी त्या समयासी । देशकाला अनुसार ।।१२ ।। द्यावे श्रीफल उत्तम आंबे । सुपारी आवळे आणिक लिंबे । लवंगा इतर फळे डाळिंबे। सहजप्राप्त ते अर्पावे ।।१३।। षोडशोपचारे करुनी पूजन । नारायणाचे वंदावे चरण। दीपदानाचे विशेष जाण । महत्त्व असे या दिनी।। १४।॥ या रात्रीच्या जागरणाचे । फल विशेष आहे साचे । त्या पुण्याच्या बरोबरीचे । नाही तीर्थ वा यज्ञ व्रत ।।१५।। पाच सहस्र संवत्सरपर्यंत । तप करुनी जे फल प्राप्त । तितुके जागरणे सहज मिळत। सफला एकादशी दिनी ।।१६।। आता हे धर्मा नृपश्रेष्ठा । करी श्रवण हिची कथा। महिष्मत नामक राजा होता। चंपावती नगरीसी ।।१७।। त्याते चार पुत्र जरी । ज्येष्ठ ‘लुंपक’ तो पापाचारी । तया आवडे द्यूत परनारी । राही वेश्यागृही सदा ।॥१८ । कुमार्गाते अवलंबित । घालविले पितृ-द्रव्य सतत । निंदा कुचेष्टा करी सदोदित । देव वेद) विप्रांची ।।१९।। शेवटी तयाते कंटाळून। नृपे घालविला राज्यामधून । राजभये बंधू परिवारजन । यांनीही तया उपेक्षिले ।।२०।। मार्गी चालता तो लुंपक । विचार करी मनात एक। जनमानसी पित्याचा धाक । काय करावे यापुढती ॥२१|॥ तोच पाप शिरले मनात । म्हणे घ्यावा सूड निश्चित । दिवसा राहनी अरण्यात । रात्री लुटावे नगराते ।।२२।। तो विचार चित्ती वसला। राज्य सोडुनी वनात गेला । तेथेही तो करू लागला। नृशंस हत्या प्राण्यांची॥२३|॥ पुढील काळात निरंतर । छापे घालुनी लुटले नगर । कुणी तयासी पकडले जर। नृपभये सोडुनी देती त्या ।।२४।। जन्मांतरीची पापे भोवली । राज्यभ्रष्ट होउनी त्या वेळी । फळे अभक्ष्य भक्षुनी केली । कालक्रमणा वनांतरी।।२५।। त्या काननी एक जुनाट । होता पिंपळ वृक्ष विस्तृत । थोर देवत्व त्याठायी विलसत । स्थान मान्य ते विष्णुसी।।२६।। याच अश्वत्थ तळवटी । लुंपकाची होती वस्ती । दुष्ट कर्मे • करुनी नित्य ती। येई परतुनी येथेच ।।२७।। पुढती मार्गशीर्ष कृष्ण दशमीसी। अश्वत्थासन्निध रात्रसमयासी । वस्त्रहीन त्या लुंपकासी। होऊ लागली शीतपीडा।।२८।। गेला थंडीने गारठून । निद्रासौख्य ना पडे चैन । त्या दुःखाने हरपले भान । पडला निश्चेष्ट भूमीसी ।।२९!! गीतवाताने कुडकुडत । दातांवरती दाबुनी दात। कशीबशी काढली रात । अती जर्जर जाहला ।। ३० ।। अन्य दिनी सफला एकादशी । सूर्य आक्रमित अंबरासी। तरी देहभान नच तयासी। आली जागृती मध्यान्ही ।।३१।। सावध होउनी 4 दोन घटकांनी। समस्त शक्ती एकवटुनी। दुष्ट लुंपक तो स्थान सोडुनी। वनांतरी भटकला।।३२।। देहदुःखाने दुर्बळता । श्षुधातृषेने व्याकुळता। महत्प्रयासे मार्गी चालता ।: पंगूपरी अडखळे ॥३३॥ अशक्तता अंगी फार। तेणे करवेना काही शिकार । फळे सापडली जी भूमीवर । गोळा करुनी परतला ।। ३४।। तोवरी अस्तमान झाला। करी पक्चात्ताप त्या वेळा । व्यथित होउनी विलाप केला। काय गती मम तात हो । ॥३५|॥ तदनंतर जी फळे आणिली। अश्वत्थ तळवटी ठेविली। भगवंताते अर्पुनी केली। प्रार्थना ती तोषविण्या ।॥३६ ॥ थंडी म्हणुनी त्या रात्रीसी। निद्रा नच आली तयासी। तेणे आनंद मधुसूदनासी। मानिले जागरण फलार्चन।।३७ ॥ ऐसे सफला एकादशीचे । व्रत सहजचि घडले साचे । तेणे भाग्य लुंपकाचे । उजळले मिळाले राज्यही ।।३८।। ती उत्तम फलश्रुती। श्रीकृष्ण वदला धर्माप्रती। व्रतप्रभावे पुण्यप्राप्ती । दुर्दैव सरले पाप्याचे ।।३९।। अन्य दिनी प्रातःकाळी। एक दिव्य अश्व त्याच्याजवळी। प्रकटला तोच कानी पडली । आकाशवाणी अवचित ।॥४०।। तिच्यायोगे आदेश जाहला। त्वा केले सफला एकादशीला। ते व्रत पावले वासुदेवाला। धन्य एक तू जीवनी ॥४१ |॥ आता निजगृही परतावे । आपुल्या पित्यासी भेटावे । विष्णुप्रसादे भोगावे । निष्कंटक राज्याते ।।४२।। त नभोवाणी ऐकून। लुंपके तुकविली मान । तें त्याचेही स्वरूप पालटून। काया दिव्य जाहली ।।४३।। सरली पूर्वीची दुष्ट मती। विष्णुचरणी जडली भक्ती। दिव्य अश्वारूढ होउनी अंती। पित्यापाशी पातला ।।४४।। नमन करुनी उभा राहिला । तधी पाहनी त्या नवलाला। महिष्मतासी आनंद झाला । परिवारही संतुष्ट ।।४५।। आपला पुत्र सन्मार्गी लागला। हरिभक्त आणि सुबुद्ध झाला। नृपे सकलहितार्थ केला। राज्याभिषेक त्या लुंपका ।।४६।। निष्कंटक वैभव जरी प्राप्त । तरी व्रत आचरी नियमित । हरिचरणी अखंडित । नम्र आसक्त राहिला ।।४७।। विष्णुकृपा लाभली म्हणून । झाले उज्वल समस्त जीवन । भार्यापुत्रही भक्तिमान । अनुकूल सर्व कार्यात ।।४८।। पुढती तयासी वृद्धत्व आले । तैं पुत्रासी राज्य दिधले । निवृत्त होउनी गमन केले । तपाकारणे वनांतरी ।।४९ ।। तेथ एकाग्र चित्ते भली । विष्णुआराधनाच केली। धन्य तयाते अंती मिळाली। वैकुंठगती अप्राप्य।।९०।। श्रीकृष्ण म्हणाला धर्माप्रत । आचरिता सफला एकादशी व्रत । इहलोकी सुख यश निश्चित । अंतीम गती वैकुंठी ।।५१।। जे सद्भावे व्रत करिती। ते जीवनी कृतार्थ होती । जन्मांतरीच्या सुटुनी गाठी। मोक्ष पावती आपैसे ।।५२।। सफला एकादशी महिम्न। आदराने करिता श्रवण। राजसूय यागाचे फल मिळून । जातो नर तो स्वर्गासी ।।५३।।

।। इति मार्गशीर्ष कृष्णैकादश्याः सफलानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।।

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

शुभं भवतु


Leave a Reply

Your email address will not be published.