गंगा दशहरा – २६ मे ते ७ जून २०१७ Mandar Sant May 25, 2017 दिनविशेष गंगावतरण झाल्यापासून सतत काही युगे साजरा होणारा गंगा दशहरा हा भारतामधील पुराणकालीन उत्सवांपैकी एक आहे . प्रतिपदेपासून रोज एक एक संख्येने वाढवत नेऊन दशमी च्या दिवशी गंगा स्तोत्राचे दहा पाठ करणे हे आपल्याला सहज शक्य आहे. दहाही दिवस रोज आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे . पापनाश हे याचे फळ आहे . आज आणि दशमीला निश्चितपणे आणि शक्य झाल्यास रोजच्या पूजेत आई गंगेची आरती दशमी पर्यंत दहा दिवस म्हणावी. . गंगा स्तोत्र व गंगेची मराठी व हिंदी मधील आरती खाली दिलेली आहे. गंगावतरणाची कथा रामाचा पूर्वज इक्ष्वाकू वंशीय सगराला साठ सहस्र पुत्र होते. सगराच्या अश्वमेध यज्ञाच्या अश्वाचे हरण इंद्राद्वारे केले जाते व इंद्र तो अश्व पाताळात तप करीत बसलेया कपिलमुनींशेजारी बांधून टाकतो. स्वतःच्या ताकदीने उन्मत्त झालेले सगरपुत्र यज्ञीय अश्वाचा शोध घेण्यासाठी पृथ्वी खणत खणत पाताळात जातात. पाताळात तप करीत बसलेल्या पुराणपुरुष कपिलमुनींची तपश्चर्या सगरपुत्रांच्या खणाखणीमुळे भंग होते. आपल्या अश्व ह्या कपिलमुनींनीच चोरलेला आहे ह्या गैरसमजुतीमुळे सगरपुत्र त्यांच्या अवमान करतात क्रोधदग्ध कपिलमुनी आपल्या दृष्टीक्षेपात सर्व सगरपुत्रांचे जाळून भस्म करतात. बरेच दिवस सगरपुत्रांचा पत्ता न लागल्याने सगर आपल्या नातवास अंशुमानास आपल्या साठ सहस्त्र पुत्रांचा शोध घेण्यास सांगतात. पाताळात शोध घेता घेता आपल्या भस्मीभूत झालेल्या चुलत्यांचा शोध अंशुमानास लागतो. तिथे जलाञ्जली देण्यासाठी त्याला कोठेही जलाशय दिसत नाही. तिथेच असलेला पक्षीराज गरूड केवळ गंगेच्या पवित्र जलानेच ह्या सगरपुत्रांना मुक्ती मिळेल असे अंशुमानास सांगतो आणि तिथे सुरु होतो गंगावतरणाचा अट्टाहास. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी सगरानंतर राज्यावर आलेला अंशुमान तप करतो व अंशुमानानंतर त्याचा पुत्र दिलीप तप करतो पण दोघांचे तप निष्फळ जाते. दिलीपानंतर त्याचा पुत्र भगीरथ राजगादीवर होतो. राज्यत्याग करून आपल्या पितरांना मुक्ती देण्यासाठी तो ब्रह्मदेवाचे आवाहन करण्यासाठी कठोर तप करतो. शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न होऊन गंगेला पृथ्वीवर अवतरीत होण्यासाठी सांगतात. मात्र गंगेचा स्वर्गातून येणारा प्रचंड ओघ थोपवण्यासाठी तिला मस्तकावर धारण करण्यासाठी भगवान शंकराशिवाय कोणीही समर्थ नाही असे सांगून त्यास शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सांगतात. मग भगीरथ परत शिवाचे कठोर तप करून त्यास प्रसन्न करून घेतो. शिव प्रसन्न होऊन गंगेस आपल्या मस्तकी धारण करण्यासाठी तयार होतात व गंगेचे शिवाच्या मस्तकी अवतरण होते. आपली एक जटा हळूच सोडवून शिव गंगेस पृथ्वीवर सोडतात व ती परमपाविनी गंगा भगीरथाच्या पाठोपाठ पाताळात जाऊन आपल्या पवित्र प्रवाहाने भस्मीभूत झालेल्या सगरपुत्रांचा उद्धार करते. गंगा दशहरा दिनांक 26 मे 2017 पासून 4 जुन 2017 तक ( ज्येष्ठ मास, शुक्ल प्रतिपदा ते दशमी पर्यंत ) आहे. श्रीगंगामातेच्या उपासनेकरिता माता श्री गंगेची 108 नामावली येथे दिली आहे ज्याचे पठण दहाही दिवस करावे – 1) ॐ श्री गंगायै नमः 2) ॐ श्री त्रिपथगादेव्यै नमः 3) ॐ श्री शंभुमौलिविहारिण्यै नमः 4) ॐ श्री जान्हव्यै नमः 5) ॐ श्री पापहन्त्रै नमः 6) ॐ श्री महापातकनाशिन्यै नमः 7) ॐ श्री पतितोध्दारिण्यै नमः 8) ॐ श्री स्रोतस्वत्यै नमः 9) ॐ श्री परमवेगिन्यै नमः 10) ॐ श्री विष्णुपादाब्जसंभूतायै नमः 11) ॐ श्री विष्णुदेहकृतालयायै नमः 12) ॐ श्री स्वर्गाब्धिनिलयायै नमः 13) ॐ श्री साध्व्यै नमः 14) ॐ श्री स्वर्णद्यै नमः 15) ॐ श्री सुरनिम्नगायै नमः 16) ॐ श्री मंदाकिन्यै नमः 17) ॐ श्री महावेगायै नमः 18) ॐ श्री स्वर्णश्रृंगभेदिन्यै नमः 19) ॐ श्री देवपूज्यतमायै नमः 20) ॐ श्री दिव्यायै नमः 21) ॐ श्री दिव्यस्थाननिवासिन्यै नमः 22) ॐ श्री सुचारूनीररूचिरायै नमः 23) ॐ श्री महापर्वतभेदिन्यै नमः 24) ॐ श्री भागीरथ्यै नमः 25) ॐ श्री भगवत्यै नमः 26) ॐ श्री महामोक्षप्रदायिन्यै नमः 27) ॐ श्री सिंधुसंगगतायै नमः 28) ॐ श्री शुध्दायै नमः 29) ॐ श्री रसातलनिवासिन्यै नमः 30) ॐ श्री महाभोगायै नमः 31) ॐ श्री भोगवत्यै नमः 32) ॐ श्री सुभगानंददायिन्यै नमः 33) ॐ श्री महापापहरायै नमः34) ॐ श्री पुण्यायै नमः 35) ॐ श्री परमाल्हादायिन्यै नमः 36) ॐ श्री पार्वत्यै नमः 37) ॐ श्री शिवपत्न्यै नमः 38) ॐ श्री शिवशीर्षगतालयायै नमः 39) ॐ श्री शंभोर्जटामध्यगतायै नमः 40) ॐ श्री निर्मलायै नमः 41) ॐ श्री निर्मलाननायै नमः 42) ॐ श्री महाकलुषहन्त्रै नमः 43) ॐ श्री जन्हुपुत्र्यै नमः 44) ॐ श्री जगत्प्रियायै नमः 45) ॐ श्री त्रैलोक्यपावन्यै नमः 46) ॐ श्री पूर्णायै नमः 47) ॐ श्री पूर्णब्रह्मस्वरूपिण्यै नमः 48) ॐ श्री जगत्पूज्यतमायै नमः49) ॐ श्री चारूरूपिण्यै नमः 50) ॐ श्री जगदंबिकायै नमः51) ॐ श्री लोकानुग्रहकत्र्यै नमः 52) ॐ श्री सर्वलोकदयापरायै नमः 53) ॐ श्री याम्यभीतिहरायै नमः 54) ॐ श्री तारायै नमः 55) ॐ श्री पारायै नमः 56) ॐ श्री संसारतारिण्यै नमः 57) ॐ श्री ब्रह्माण्डभेदिन्यै नमः 58) ॐ श्री ब्रह्मकमण्डलुकृतालयायै नमः 59) ॐ श्री सौभाग्यदायिन्यै नमः 60) ॐ श्री पुंसांनिर्वाणपददायिन्यै नमः 61) ॐ श्री अचिंत्यचरितायै नमः 62) ॐ श्री चारूरूचिरातिमनोहरायै नमः 63) ॐ श्री मर्त्यस्थायै नमः 64) ॐ श्री मृत्युभयहायै नमः 65) ॐ श्री स्वर्गमोक्षप्रदायिन्यै नमः 66) ॐ श्री पापापहारिण्यै नमः 67) ॐ श्री दूरचारिण्यै नमः 68) ॐ श्री वीचिधारिण्यै नमः 69) ॐ श्री कारूण्यपूर्णायै नमः 70) ॐ श्री करूणामय्यै नमः 71) ॐ श्री दुरितनाशिनयै नमः 72) ॐ श्री गिरिराजसुतायै नमः 73) ॐ श्री गौरीभगिन्यै नमः 74) ॐ श्री गिरिशप्रियायै नमः 75) ॐ श्री मेनकागर्भसंभूतायै नमः 76) ॐ श्री मैनाकभगिनीप्रियायै नमः 77)ॐ श्रि आद्यायै नमः 78) ॐ श्री त्रिलोकजनन्यै नमः 79) ॐ श्री त्रैलोक्यपरिपालिन्यै नमः 80) ॐ श्री तीर्थश्रेष्ठतमायै नमः 81) ॐ श्री श्रेष्ठायै नमः 82) ॐ श्री सर्वतीर्थमय्यै नमः 83) ॐ श्री शुभायै नमः 84) ॐ श्री चतुर्वेदमय्यै नमः 85) ॐ श्री सर्वायै नमः 86) ॐ श्री पितृसन्तृप्तिदायिन्यै नमः 87) ॐ श्री शिवदायिन्यै नमः 88) ॐ श्री शिवसायुज्यदायिन्यै नमः 89) ॐ श्री शिववल्लभायै नमः 90) ॐ श्री तेजस्विन्यै नमः 91) ॐ श्री त्रिनयनायै नमः 92) ॐ श्री त्रिलोचनमनोरमायै नमः 93) सप्तधारायै नमः 94) ॐ श्री शतमुख्यै नमः 95) ॐ श्री सगरान्वयतारिण्यै नमः 96) ॐ श्री मुनिसेव्यायै नमः 97) ॐ श्री मुनिसुतायै नमः 98) ॐ श्री जन्हुजानुप्रभेदिन्यै नमः 99) ॐ श्री मकरास्थायै नमः 100) ॐ श्री सर्वगतायै नमः 101) ॐ श्री सर्वाशुभनिवारिण्यै नमः 102) ॐ श्री सुदृश्यायै नमः 103) ॐ श्री चाक्षुषीतृप्तिदायिन्यै नमः 104) ॐ श्री मकरालयायै नमः 105) ॐ श्री सदानंदमय्यै नमः 106) ॐ श्री नित्यानंददायै नमः 107) ॐ श्री नगपूजितायै नमः 108)ॐ श्री सर्वदेवाधिदेवैपरिपूज्यपदांबुजायै नमः ।ॐ इति श्री महाभागवते महापुराणे श्रीगंगाअष्टोत्तरशतनामावलिः पूर्णः। भगवान श्रीकृष्णार्पणमस्तु । || गंगास्तोत्र || देवि! सुरेश्वरि! भगवति! गंगे त्रिभुवनतारिणि तरलतरंगे । शंकरमौलिविहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले ॥ १ ॥ भागीरथिसुखदायिनि मातस्तव जलमहिमा निगमे ख्यातः । नाहं जाने तव महिमानं पाहि कृपामयि मामज्ञानम् ॥ २ ॥ हरिपदपाद्यतरंगिणि गंगे हिमविधुमुक्ताधवलतरंगे । दूरीकुरु मम दुष्कृतिभारं कुरु कृपया भवसागरपारम् ॥ ३ ॥ तव जलममलं येन निपीतं परमपदं खलु तेन गृहीतम् । मातर्गंगे त्वयि यो भक्तः किल तं द्रष्टुं न यमः शक्तः ॥ ४ ॥ पतितोद्धारिणि जाह्नवि गंगे खंडित गिरिवरमंडित भंगे । भीष्मजननि हे मुनिवरकन्ये पतितनिवारिणि त्रिभुवन धन्ये ॥ ५ ॥ कल्पलतामिव फलदां लोके प्रणमति यस्त्वां न पतति शोके । पारावारविहारिणि गंगे विमुखयुवति कृततरलापांगे ॥ ६ ॥ तव चेन्मातः स्रोतः स्नातः पुनरपि जठरे सोपि न जातः । नरकनिवारिणि जाह्नवि गंगे कलुषविनाशिनि महिमोत्तुंगे ॥ ७ ॥ पुनरसदंगे पुण्यतरंगे जय जय जाह्नवि करुणापांगे । इंद्रमुकुटमणिराजितचरणे सुखदे शुभदे भृत्यशरण्ये ॥ ८ ॥ रोगं शोकं तापं पापं हर मे भगवति कुमतिकलापम् । त्रिभुवनसारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे ॥ ९ ॥ अलकानंदे परमानंदे कुरु करुणामयि कातरवंद्ये । तव तटनिकटे यस्य निवासः खलु वैकुंठे तस्य निवासः ॥ १० ॥ वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः । अथवाश्वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ॥ ११ ॥ भो भुवनेश्वरि पुण्ये धन्ये देवि द्रवमयि मुनिवरकन्ये । गंगास्तवमिमममलं नित्यं पठति नरो यः स जयति सत्यम् ॥ १२ ॥ येषां हृदये गंगा भक्तिस्तेषां भवति सदा सुखमुक्तिः । मधुराकंता पंझटिकाभिः परमानंदकलितललिताभिः ॥ १३ ॥ गंगास्तोत्रमिदं भवसारं वांछितफलदं विमलं सारम् । शंकरसेवक शंकर रचितं पठति सुखीः तव इति च समाप्तः ॥ १४ ॥ ========================================================== आई श्री गंगेची आरती माते दर्शन मात्रे प्राणी उद्धरसी हरसि पातक अवघें जग पावन करिसी | दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी हरहर आतां स्मरतो गती होईल कैसी || जय देवी जयदेवी जय गंगा माई पावन करिं मज सत्वर विश्वाचे आई ||धृ|| पडलें प्रसंग तैसी कर्मे आचरलो विषयांच्या मोहाने त्यां तची रत झालो | त्यांचे योगें दुष्कृतसिंधुत बुडालो त्यां तुनि मजला तारिसी या हेतूनें आलों ||१|| निर्दय यमदूत नेती त्या समयी राखीं क्षाळी यम धर्माच्या खात्यांतील बांकी | मत्संगती जन एवढे तारियले त्वां कीं उरलों पाहें एकची मी पतितां पैकी ||२|| अधहरणे जय करुणे विनवतसे भावें नोपेक्षी मज आतां त्वत्पात्री घ्यावें| केला पदर पुढें मी मज इतुके द्यावें जीवें त्या विष्णूच्या परमात्मनी व्हावें ||३|| आरती श्री गंगा जी की ॐ जय गंगे माता, श्री जय गंगे माता जो नर तुमको ध्याता, मनवांछित फ़ल पाता. ॐ जय … चन्द्र-सी ज्योति तुम्हारी, जल निर्मल आता शरण पड़े जो तेरी, सो नर तर जाता. ॐ जय … पुत्र सगर के तारे, सब जग को ज्ञाता कृपा दृष्टि हो तुम्हारी, त्रिभुवन सुखदाता. ॐ जय… एक बार जो प्राणी, शरण तेरी आता यम की त्रास मिटाकर, परमगति पाता. ॐ जय… आरती मातु तुम्हारी, जो नर नित गाता सेवक वही सहज में, मुक्ति को पाता. ॐ जय.. उमाशंकर बडुनी यांची हिंदीमधील सुंदर कविता “गंगावतरण” वाचा या ब्लॉग वर : https://goo.gl/W33Zpo Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website