अघोरकष्टोध्दरण स्तोत्रम् Mandar Sant May 14, 2020 स्तोत्र *अघोरकष्टोध्दरण स्तोत्रम्* ची जन्म कथा श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा २१वा चातुर्मास शके १८३३ (इ.स. १९११) कुरुगड्डी (कुरवपूर) येथे संपन्न झाला. कोल्हापूरचे श्री. शेषो कारदगेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्रीास्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती. “आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाही तर दुसर्या कोणाजवळ सांगावयाची?”, असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामीमहाराजांच्या कानावर घातल्या. स्वामीमहाराजांनी श्री. शेषो कारदगेकर यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल व कर्ज फिटेल असा आशिर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली व कर्जही फिटले. शेषो कारदगेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना वेंकटरमणचे पद करून दिले होते. या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी रहावेत आणी सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री. शेषो कारदगेकर यांनी श्री स्वामीमहाराजांना अशी प्रार्थना केली की, “माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपादश्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावे.” शेषो कारदगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांनी “घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्र” रचून त्यांना दिले. श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हंटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे. काहीजण तर याचा १०८ वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्यांचे ऐहलौकिक व पारलौकिक कल्याण झाले आहे. खरोखर श्री शेषो कारदगेकरांचे आपणा सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र प्राप्त झाले आहे. ??????? !! नमो गुरवे वासुदेवाय !! ( आज श्री घोरकष्टोद्धारणस्तोत्र हे मराठी आणि इंगरजी भावार्थ पाठवत आहोत ह्या मंगलमय स्तोत्राचे त्रिकाल पठण केल्याने अतिशय भयंकर सकंटा मधून सुटका होते ) || घोरकष्टोद्धारणस्तोत्र || श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ॥ भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ १॥ अर्थ- हे श्रीपाद श्री वल्लभा, हे श्री दत्ता, हे देवाधिदेवा हे कीर्तिमान आमचे भाव ओळखून आमचे क्लेश (त्रास) हरण करुन तू आमचे नेहमी रक्षण कर, भयंकर त्रासापासून तू आमची सुटका कर, आमचा उद्धार कर, तुला आमचा नमस्कार असो. Meaning-।। 1 || Lord of Lords, Shri Datta ! Shripada Shrivallabha ! One who only likes Bhakti, and who has good fame – you always protect us. Save us (deliver us, rescue us, extricate us) from awful, (hurtful, painful) difficulties. We bow down unto you. त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ॥ त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ २॥ अर्थ- तू आमची माता आहेस, पिता आहेस, तू आमचा नातेवाईक आहेस तू आमचे रक्षण करणारा आहेस तूच आमचा योगक्षेम करतोस ( न मिळालेले देणारा आणि मिळालेल्या वस्तुंचे रक्षण करणारा) तू सद्गुरु आहेस हे नाना तरहेचे रूप धारण करणाऱ्या परमेश्वरा तू आमचे सर्वस्व आहेस आणि म्हणून भयंकर त्रासापासून तू आमची सुटका कर तुला आमचा नमस्कार असो Meaning- ।। २॥ Prabho ! (one who has no God above, one who is God himself, highest authority). One who is Vishvamurti (entire universe is whose form), you are our mother, father, owner, relatives and Sadguru. You only sustain us and look after our daily activities and well being (YogakShema). You are everything for us, hence save us (deliver us, rescue us, extricate us) from awful, (hurtful, painful) difficulties. We bow down unto you. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यम् । भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यम् ॥ त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ३॥ अर्थ- तू त्वरेने आमचे पाप ताप रोग मानसिक व्यथा दारिद्र्य भीति व क्लेश नाहीसे कर तुझ्या खेरीज आमचे रक्षण करणारा कुणी दिसत नाही तेव्हा सर्व सत्ता चालविणाऱ्या हे परमेश्वरा भयंकर त्रासापासून तू आमची सुटका आमचा तुला नमस्कार असो Meaning-।।३॥ Hey Ishwara , you immediately deliver us from Papa (sin), Tapa (misery/ agony/ torment) bodily illnesses, mental agonies, poverty, fears and sufferings. Hey Lord , who saves us from difficulties, we cannot see, locate any other saviour other than you hence ..Save us (deliver us, rescue us, extricate us) from awful, (hurtful, painful) difficulties. We bow down unto you. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥ कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ४॥ अर्थ- हे देवा, आम्हास तुझ्यावाचुन कुणी रक्षण कर्ता नाही तुझ्या वाचून कुणी दाता नाही, स्वामी नाही, पालन पोषण करणारा नाही, तुझ्या खेरीज शरण आलेल्या भक्तांवर कृपा करणारा नाही. हे आत्रेया आमच्यावर अनुग्रह कर, हे पूर्णकामा या भयंकर त्रासापासून आमची सुटका कर आमचा तुला नमस्कार असो. Meaning-।। ४॥ Hey God, we have no other Trata (protector) other than you, no other Data (giver) nor Bharta (Lord / Chief/ husband / master). You protect the ones, who surrender unto you and you get rid of their sorrows. Hey Atreya (son of Atri Rishi – Dattatreya) oblige us (Do Krupa on us) Oh Purnarate (One who has no desires / desireless) and Save us (deliver us, rescue us, extricate us) from awful, (hurtful, painful) difficulties. We bow down unto you. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् । भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५॥ अर्थ- हे सर्व आनंदाची मूर्ति असलेल्या श्री दत्ता, तू आमच्या बाबतीत धर्माच्या ठिकाणी प्रेम, चांगली बुद्धि, देवाच्या ठिकाणी भक्ति, चांगल्या लोकांची संगती, भुक्ति व मुक्ति आणि भावनापूर्ण प्रेम दे भयंकर त्रासापासून आमची सुटका कर. आमचा तुला नमस्कार असो. Meaning- ॥ ५॥ Hey Akhilanandmurte Deva, (one whose very nature is of complete joy) grant us , love towards Dharma, Bhakti, and good Buddhi (good thought process / power of descrimination). Grant us Satsang (company of good people) , Bhukti ( Fulfill our material needs ) and also grant us Mukti (liberation) and give us deep attachment towards Pure Bhakti. Fulfill all our desires. Save us (deliver us, rescue us, extricate us) from awful, (hurtful, painful) difficulties. We bow down unto you. श्लोकपञ्चकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीघोरकष्टोद्धारणस्तोत्र सम्पूर्णम् ॥ अर्थ- सर्वांचे कल्याण करणारे हे पाच श्लोक नियमपूर्वक नित्यशः भक्ति भावाने जो पठण करेल तो मनुष्य दत्त महाराजांना अत्यंत प्रिय होईल आणि श्री दत्त महाराज ही त्या भक्ताला प्रिय होतील. अशा रीतीने प.पु. वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेले घोर कष्ट उद्धरण स्तोत्र संपूर्ण. Meaning- ॥ ६॥ All these five shokas (couplets) one who recites or chants regularly with devotion, it will bring about (increase) Mangalam (auspiciousness and good fortune) among people in the world and he / she who chants it will be very dear to the Lord Datta. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website