वैशाख शुक्ल तृतीयेला “अक्षयतृतीया ” असे नामाभिमान आहे, हा दिवस सर्व कार्यासाठी शुभ आणि पुण्यप्रद मानला जातो.यादिवशी केलेले दान अक्षय्य फल देणारे असते, अशी श्रद्धा पुरातन काळापासून आहे. अक्षय्य तृतीया हा काहींच्यामते कृतयुगाचा प्रारंभ दिन आहे; तर काहींच्या मते तो त्रेतायुगाचा प्रारंभ दिन आहे. ह्यासंबंधी असा मतभेद असला तरीही आपण त्रेतायुगाचा प्रारंभ दिन ह्या तिथीला झाला असं मानतो.

महाविष्णूंचे दहा अवतार प्रसिद्ध असले तरीही एकुणात २४ अवतार आहेत ज्यातील १० अवतार विशेष प्रसिद्ध आहेत. यापैकी

१] भगवान श्री हयग्रीव

Lord-Hayagriva-giving-Vedas-to-Brahma

२] साक्षात श्री नर-नारायण

OLYMPUS DIGITAL CAMERA

OLYMPUS DIGITAL CAMERA



३] भगवान श्री परशुराम

parasuram2

हे तीनही अवतार अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रकटले.

याशिवाय,

◆याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला.

Lord-Vyasa-Avtar-Of-Vishnu-Ji

◆याचदिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली‌.
f1b70b0973e65ab36e4d3d96f736f99d

◆अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे.

◆याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम – मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदामाला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली.

026b7cee407b73b8a998a56e4f380a9a

◆अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे.
dd1647366051feba886a2a96a33019ac

◆एका अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते,

◆तर एका अक्षय्यतृतीयेलाच द्रौपदीने श्रीकृष्णाला  रेशमी वस्त्र फाडून त्याच्या जखम झालेल्या बोटाला चिंधी बांधली होती. ज्याची परतफेड द्रौपदी वस्त्रहरणाच्या श्रीकृष्णाने तिला अक्षयवस्त्र पुरवून केली व तिची लाज राखली.

8780671af588359c367f60489cc6cc95

◆श्रीबद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात.

ecbfc215b06de72cd04e1a572c2086db

अक्षय्यतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप,तप,दान पुण्याचा क्षय होत नाही‌.त्यामुळे या दिवशी आपण नामस्मरण, भजन ,पूजन, अर्चन ही उपासना जितकी करू तितकी थोडीच आहे. यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही .

वैशाख शुक्ल तृतीयेला ‘अक्षय्य तृतीया’ असे का म्हणतात ?

ज्योतिषातील  गणित स्कंध ,सिंध्दांत स्कंध आणि होरा स्कंध यापैकी गणित स्कंध मात्र शुद्ध विज्ञान आहे. पंचांग म्हणजे तिथी ,वार,नक्षत्र ,योग आणि करण हि पाच अंगे . या पैकी फक्त तिथी आणि नक्षत्र हे वैज्ञानिक आहे. वार हे व्यावहारिक आहेत आणि योग -करण हे अवैज्ञानिक आहेत . फलज्योतिष चांद्र कालगणना ( Lunar calendar ) असून ते पृथ्वीकेंद्री सिंद्धान्तावर आधारलेले असले तरीही त्यातील गणित स्कांधामुळे ते अचूक आहे . 

  1. पृथ्वीला पूर्ण प्रदक्षिणा घालणे म्हणजे ३६० अंशातून फिरणे थोडक्यात गोलाकार प्रवास करणे.
  2. चंद्र पृथ्वीभवती ३० दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. 
  3. थोडक्यात चंद्र रोज १२ अंशात प्रवास करतो. 
  4. चंद्राला प्रथ्वीभोवती १२ अंश अंतर कापण्यास लागलेल्या कालावधीस तिथी म्हणतात . 
  5. या प्रकारे एक चांद्र महिन्यात ३० तिथी असतात. 
  6. चंद्राच्या परिवलनाचा आणि परिभ्रमणाचा कालावधी सारखाच असल्यामुळे त्याची एकच बाजू आपल्याला दिसते .
  7. मात्र प्रथ्वीभोती फिरत असताना ,पृथ्वीच्या जवळ चंद्र आला कि १२ अंश अंतर कापण्यास गुरुत्वाकर्षणा मुळे नेहेमी पेक्षा म्हणजे २४ तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
  8. थोडक्यात लागोपाठच्या दिवसात सूर्य उगवताना चंद्र पूर्ण अंश पुढे गेलेलाच नसतो. 
  9. त्यामुळे आदल्या दिवशीचीच तिथी असते. अश्या स्थितीला तिथी वृद्धी म्हणतात. 
  10. तेच अंतर पृथ्वीपासून चंद्र दूर असताना लवकर कापले जाते. नेहेमी पेक्षा म्हणजे २४ तासापेक्षा कमी वेळ लागतो.
  11. थोडक्यात २४ तासापेक्षा कमी वेळात चंद्र १२ अंशांपेक्षा जास्त अंतर पार करतो.
  12. त्यामुळे एखादी तिथी लुप्त होते. उदाहरणार्थ तिथी क्षय होवून पंचमी नंतर लगेच सप्तमी येते.
  13. अक्षय्य तृतीया हि अशी तिथी आहे कि कोणत्याही पर्वात, युगात , कालगणनेत या तिथी चा क्षय होत नाही. म्हणूनच तिला अक्षय्य हे नाव आहे. 

या संदर्भात बऱ्याच कथा प्राचीन ग्रंथांमधून आढळतात.

त्यातून प्रमुख अशा दो कथा पुढीलप्रमाणे

१> देवधर्म मानणारा आणि धर्माचरणाने वागणारा एक व्यापारी होता व्यापारातील चढ – उतारात त्याला आर्थिक फटका बसला आणि दारिद्र्य आले. वैशाख शुक्ल तृतीया बुधवारी आली असेल आणि त्यात रोहिणीनक्षत्रयुक्त असेल तर तर तो दिवस परमपावन असतो, हे त्याला माहित होते. त्याप्रमाणे योग असलेली अक्षय तृतीया आल्यावर त्याने ह्या व्राताचे सर्व विधी श्रद्धापूर्वक केले . त्यामुळे पुढल्याजन्मी तो कुशावर्ती नगरीचा राजा झाला. त्याने स्वःता आणि त्याच्या प्रजेचेने अनेक तऱ्हेचे सुख उपभोगले तरीही त्याचे पुण्य अक्षय राहिले.

२> धर्मराजाने अश्वमेध यज्ञ केला त्याचवेळी यज्ञ समाप्तीवेळी एक मुंगुस यज्ञमंडपात आले. त्याच्या शरीराचा अर्धा भाग सोन्याचा होता . यज्ञमंडपातील वेदीवर ते मुंगुस लोळू लागले. आपले उरलेले अर्धे शरीर यज्ञाच्या पवित्र स्थळामुळे सोन्याचे होईल असा त्याचा समाज होता. पण तसे झाले नाही. धर्मराजाने मुंगुसाला विचारले “तु असा का लोळतो आहेस ?” तेव्हा मुंगुस म्हणालं “धर्मराजा अक्षयतृतीयेच्या दिवशी दान केलेल्या गव्हाच्या दान्याइतकेहि पुण्य हा यज्ञ केल्याने तुला लाभले नाही आहे. माझे अर्धे शरीर जे सोन्याने झाले ते एका सत्यवादी ब्राह्मणाने केलेल्या पुण्यामुळे झाले, ” धर्मराजाने कुतूहलाने त्याला “ब्राह्मणाने कोणते पुण्य केले ?” असे विचारल्यावर मुंगुस म्हणाले “”तो ब्राह्मण उद्योग – व्यवसाय करून जेमतेम चरितार्थ चालवीत असे. एका अक्षयतृतीयेला मध्यान्ह च्या वेळी तो जेवायला बसणार इतक्यात प्रत्यक्ष भगवंत ब्राह्मणरूपाने प्रकट होऊन माधुकरी मागू लागले. घरात जे शिजवलेले होते ते सर्व अन्न त्या ब्राह्मणाने अतिथीरुपी भगवंताला मोठ्या प्रेमाने दिले. परिणामी त्या ब्राह्मणासह त्याच्या घरातील सगळेजण उपाशी राहीले. अतिथीरुपी देवाने जे अन्न भक्षण केले त्याची थोडीशी शिते जमिनीवर सांडली, ते मी खाल्ले आणि त्यामुळे माझे अर्धे शरीर सोन्याचे झाले. 
दुसरा अर्धा भाग हि सोन्याचा व्हावा म्हणून मी इथे आलो , यज्ञवेदी वर लोळण घेतली परंतु साधा एक केसही सोन्याचा झाला नाही. त्यामुळे या यज्ञातून मिळालेल्या पुण्याची तुलनाच अक्षयचे तृतीयेला केलेल्या दानाशी होऊ शकत नाही. ” अक्षय तृतीयेच्या व्रताचा महिमा हा असा आहे.

अक्षयतृतीया हा वैशाख महिन्यात येतो. वैशाख महिना हा वनव्यासाठी प्रसिद्ध आहे. सूर्याच्या तेजाने सृष्टी तापून निघत असते. अश्यावेळी थंडगार पाण्यासाठी जीव व्याकुळ होत असतो. म्हणून पाथथ्याची तृष्णा भागविण्यासाठी ठिकठीकाणी पाणपोया सुरु केल्या जातात. तसेच वाटसरू रस्त्याने गर्द सावली असलेले झाड शोधत असतो. व त्याची पावले लगेच सावलीकडे वळतात. तेव्हाच त्याला विश्रांतीहि मिळते. आपल्या संस्कृतीत अन्नदाना इतकेच जलदानाला सुद्धा महत्व आहे. तेव्हा आपल्या पूर्वजांनी फार पूर्वी पासून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा व पाणपोया लावण्याचा हाच उद्देश असावा. त्यामुळे तृषीतांची तहान भागते. व तहान भागविणारा पुण्याचा धनी होतो. वैशाखांचे हेच महत्व आहे.

अक्षयतृतीयेला देवता आणि पितर यांच्या उद्देशाने उदककुंभाचे दान करावे. असा संस्कृतिचा सांगावा आहे. मातीचे दोन माठ घेऊन एकात तांदूळ व एकात तीळ घालून देवापुढे थोडे धान्य पसरवून त्यावर हे दोन घट ठेवावेत. त्यांना दोरा गुंडाळून त्यात वाळा घालावा. त्याची पूजा करून नंतर ब्राम्हणाला दान करावे त्या सोबत आंबे व दक्षिणाही द्यावी. वर्षारंभी चैत्र महिन्यात गौरी तृतीयेला चैत्र गौरी बसविली जाते त्याची सांगता याच अक्षय तृतीयेला करतात. महिला हळदीकुंकू चा कार्यक्रम करून गोड जेवण व त्यासोबत हरभरा किंवा डाळीचे वाण ओटीमध्ये देतात. यादिवसात आंब्याचे पन्हे प्यायला देतात.

या उत्सवाला दोलोत्सव असेही म्हटले जाते. कारण चैत्रगौरी पाळण्यातस्थानापन्न केली जाते तिला झोका दिला जातो. गौरी व्यतिरिक्त विष्णू किंवा ईतर देवांसाठी हा दोलोत्सव साजरा केला जातो. अक्षयतृतीयेला गंगा स्नानाचेही फार महत्व आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्री भक्त पवित्र स्नाना करीता गर्दी करतात. यवहोम,यवदान आणि यवभक्षण [ यवं म्हणजे तीळ ] याचेही महत्व आहे. या दिवशी भगवान श्री विष्णूला चंदनाची उटी लावूनपूजा करावी म्हणजे वैकुंठ प्राप्त होते असे म्हणतात. अक्षयतृतीया बुधवारी आली असता व त्या दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर म्हापुण्यकारक ठरते. अधिकस्य, अधिकम फलम अश्यावेळी पदरी पडते.

संदर्भ :
सूर्यसिद्धांतिय देशपांडे पंचांग , राजू कुलकर्णी ब्लॉग , धर्मबोध : ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर, डॉ. अपर्णा कल्याणी यांचा लेख

 

Leave a Reply

Your email address will not be published.