नवरा बायको चे पटत नाही ? मग करा अशून्यशयन व्रत : ७ ऑक्टोबर २०१७ Mandar Sant September 6, 2017 दिनविशेष या व्रताबद्दल लिहिताना मी मुद्दाम थोड्या विषयाला धरून अवांतर गोष्टी लिहितो आहे. बरेच दिवस आपला ब्लॉग वाचून खूप प्रतिक्रिया यायला लागल्या. खास करून वाचकांनी ज्योतिष आणि तत्सम तोडगे आहेत का ? किंवा दिलेली व्रते आम्हाला योग्य आहेत का ? असे प्रश्न जास्त विचारले. त्यामुळे पहिल्यांदा हे स्पष्ट करू इच्छितो की आपल्या ब्लॉग वर कुठलेही तोडगे सांगितले जात नाहीत. जी व्रते पुराणांमध्ये दिलेली आहेत व सर्वांना उपकारक आहेत त्या बद्दलच येथे लिहिले जाते. अशून्यशयन व्रत या गोष्टीवर लिहिण्याचे मुख्य कारण असे की प्रतिक्रियेदाखल आलेल्या समस्यांपैकी 50 ते 75 % समस्या या प्रेम प्रकरणे, विवाह न टिकणे, पतीपत्नींची भांडणे या बाबत होत्या. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे आलेल्या विचारणांमध्ये बहुतांश संख्या ही वय वर्षे 30 च्या हुन खाली असलेल्या विवाहित वाचकांची होती. त्याचमुळे या व्रताबद्दल लिहिण्याचे ठरवले. एकुणात ही फार मोठी गंभीर समस्या होत चालली आहे हे सुद्धा लक्षात आले. इथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की “व्रत करायला सुरुवात केली की समस्याच आपोआप सुटते, काही प्रत्यक्ष प्रयत्न करायला लागत नाही” अशी आंधळी श्रद्धा बरेच जण बाळगतात. जे पूर्ण चुकीचे आहे. जर श्रद्धा डोळस असेल तरच समस्यापूर्ती लवकर होऊ शकते. उदाहरणार्थ समस्या लैंगिक असतील तर व्रत करण्याबरोबर वैद्यकीय उपचार घेतलेच पाहिजेत. “काम” या पुरुषार्थाचा अनुल्लेख अथवा दुर्लक्ष करून ही समस्या वाढेल पण सुटणार नाही हे कृपया पहिल्यांदा ध्यानात घ्यावे. व्रत वाचून व करून सर्वांना उत्तम सांसारिक आयुष्याचा लाभ व्हावा ही विष्णू लक्ष्मी चरणी प्रार्थना !! ================================================================== अशून्य शयन व्रत विधी : अशून्यशयन व्रत हे श्रावण ते मार्गशीर्ष या प्रत्येक महिन्याच्या वद्य द्वितीयेला केले जाते. श्रावण वद्य द्वितीयेला काही कारणाने जमले नाही तर पुढील जमेल त्या महिन्यापासून मार्गशीर्ष महिन्या पर्यंत च्या सर्व वद्य द्वितीयांना हे व्रत करावे. हे व्रत पुरुष तसेच स्त्रिया यांना दोघांनाही सांगितलेले आहे. अशून्यशयन याचा अर्थ विवाहित स्त्रीपुरुषांचे शयन एकमेकांवाचून पूर्ण होत नाही असा घ्यायचा आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे सहजीवन हे सतत असते तसे व्रती ला जास्तीत जास्त लाभावे असा भाव या व्रतामागे आहे. श्रावण कृष्ण अथवा पुढील वद्य द्वितीयेला पहाटे सुस्नात होवून विष्णू व लक्ष्मी च्या प्रतिमांची स्थापना एका शय्येवर करावी. सर्व सोळा उपचारांनी त्यांचे पूजन करावे. षोडशोपचारांमध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव असतो : आवाहन – अक्षता वाहून देवाला आवाहन केलं जातं. आसन – हा उपचार समर्पित करताना देवतेच्या बैठकीखाली अक्षता किंवा पाच फुलं ठेवतात. विष्णूच्या आसनाखाली तुळशीचीइ पानं ठेवतात. पाद्य – पाद्य उपचार मूर्तीच्या पायांवर फुलाने पाणी शिंपडून अर्पण केला जातो. अर्घ्य – गंधमिश्रीत पाणी फुलाने मूर्तीवर शिंपडतात. अर्घ्यासाठी पाण्यात दही, अक्षता, कुशग्रं, दूध, दूर्वा, मध, यव आणि पांढरी मोहरीही घालतात. आचमन – देवाला पिण्यासाठी आणि चूळ भरण्यासाठी पाणी देण्यालाच ‘आचमन’ म्हणतात. त्यासाठी पळीत पाणी घेऊन फुलाने चार वेळा मूर्तीवर शिंपडतात. या पाण्यात लवंग, वेलदोडा, वाळा, कंकोळही घालतात. स्नान – यासाठी पळीत पाणी घेऊन दुर्वांनी किंवा फुलांनी ते मूर्तीच्या अंगावर शिंपडतात. तेल, उटण इत्यादींनी अभ्यंग घालून उष्णोदकाने स्नान घालतात्. पंचामृत स्नानासाठी दूध, दही, तूप मध आणि साखर यांचा वापर करतात. वस्त्र – कापसाचं वस्त्र देवाला अर्पण करतात. यज्ञोपवीत – पुरुष देवतांना यज्ञोपवीत (जानवं) अर्पण करतात. गंध – देवाला चंदन, कस्तुरी, कापूर, कुंकू आणि जायफळ लेप लावतात. पुष्प – गणपतीला लाल पुष्प प्रिय आह्e. विष्णूला चंपक, मलती, कुंद व जाईची फुलं आवडतात. शंकराला रुई, करवीर, द्रोण, कुश, धोतरा, नीलकमल प्रिय आहे . धूप – सुगंधी व मन प्रसन्न करणारा असावा. धूपासाठी चंदन, गुग्गुळ, राळ, जटामांसी इत्यादी सुवासिक पदार्थ वापरतात. दीप – तुपाचा व तिळाच्या तेलाचा दिवा प्रशस्त आहे . निरांजनात तूप आणि फुलवात घलून ते प्रज्वलित करून ओवाळतात. नैवेद्य – आपण जे अन्न खातो ते देवाला नैवेद्यासाठी चलतं. नैवेद्य दाखवताना खाली चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवतात. ‘प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा’ असे म्हणून ‘मध्ये पानीय’ म्हणून नंतर प्राणाय स्वाहा इत्यादी मंत्र म्हणतात. नमस्कार – देवापुढे नम्र होऊन साष्टांग नमस्कार घालतात. प्रदक्षिणा – देवाभोवती प्रदक्षिणा घालतात. शक्य नसेल तर स्वत:भोवती फिरवून प्रदक्षिणा घालतात. मंत्रपुष्प – मंत्रपुष्प अर्पण करतात.फूल न मिळाल्यास फळ, ते न मिळाल्यास पानं, तीही न मिळाल्यास पाणी, तेही न मिळाल्यास शुभ्र म्हणजे धुतलेल्या तांदळांनी म्हणजेच अक्षतांनी देवांची पूजा करावी. भविष्य पुराणात दिल्याप्रमाणे : श्रीवत्सधारिन् श्रीकान्त श्रीवत्स श्रीपतेsव्यय | गार्हस्व्यं मा प्रणाशं में यातु धर्मार्थकामदम् || गावश्च मा प्रणश्यन्तु मा प्रणश्यन्तु में जना: || जामयो मा प्रणश्यन्तु मत्तो दाम्पत्यभेदत: || लक्ष्म्या वियुज्येsहं देव न कदाचिध्यवा भवान् || तथा कलत्रसम्बन्धो देव मा में विपुज्यताम् || लक्ष्म्या न शून्यं वरद यथा ते शयनं सदा || शय्या ममाप्यशुन्यास्तु तथा तू मधुसुदन | (ब्रह्मपर्व- २०/७-११) या पौराणिक मंत्राने विष्णूची प्रार्थना करावी. अर्थात हे श्री विष्णो, धर्मार्थकाममोक्ष आदी पुरुषार्थ प्रप्त्रीसाठी , आम्ही प्रार्थना करतो कि आमचा कधीही वियोग न होवो. जशी आपली शय्या श्रीलक्ष्मीशिवाय कधीही नसते तशीच मलाही प्राप्त होवो. यानंतर दिवसभर मौन ठेवावे व उपवास करावा. चंद्रोदय झाल्यानंतर, स्नान करून, गगनाङ्गणसंदीप क्षीराब्धिमथनोद्भव। भाभासितादिगाभोग रामानुज नमोऽस्तु ते।। या, मंत्राने श्रीविष्णू भगवानांना अर्घ्य द्यावे. चंद्रदेवांचे दर्शन घ्यावे. त्यानंतर उपवास सोडावा. येला याप्रमाणे व्रत करून मार्गशीर्ष वद्य द्वितीयेला एका सदाचारी ब्राह्मणाला आंबट नसलेली अशी पक्व गोड फळे यथाशक्ती दक्षिणेसह द्यावीत. व्रत सतत करणारया स्त्रीपुरुषांचा वियोग होत नाही. त्यांना दूर राहावे लागणार असेल तो काळ कमी होतो. वैधव्य तसेच विधुर योग नष्ट होतो. वियोग झालेला असेल तर तो दूर होऊ लागतो. भांडणे कमी होऊ लागतात. तुम्ही हे व्रत किती मनापासून करता व किती वेळ सातत्याने करता त्यावर याचे फळ अवलंबून आहे. वियोग शारीरिक कारणाने असेल तर त्यासाठी खालील लिंक वरील लेख उपयुक्त आहेत https://gharoghariaayurvedblog.wordpress.com/category/विवाहपूर्व-समुपदेशन/ Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website