II बुधकवचं II

II अथ श्रीबुधकवचं II

II श्री गणेशाय नमः II
अस्य श्रीबुधकवचस्तोत्रमंत्रस्य कश्यप ऋषिः I
अनुष्टुप् छंदःI बुधो देवता I
बुधपीडाशमनार्थं जपे विनियोगः II

बुधस्तु पुस्तकधरः कुंकुमस्य समद्दुतिः I
पितांबरधरः पातु पितमाल्यानुलेपनः II १ II

कटिं च पातु मे सौम्यः शिरोदेशं बुधस्तथा I
नेत्रे ज्ञानमयः पातु श्रोत्रे पातु निशाप्रियः II २ II

घ्राणं गंधप्रियः पातु जिह्वां विद्याप्रदो मम I
कंठं पातु विधोः पुत्रो भुजा पुस्तकभूषणः II ३ II

वक्षः पातु वरांगश्च हृदयं रोहिणीसुतः I
नाभिं पातु सुराराध्यो मध्यं पातु खगेश्वरः II ४ II

जानुनी रौहिणेयश्च पातु जंघेSखिलप्रदः I
पादौ मे बोधनः पातु पातु सौम्योSखिलं वपु II ५ II

एतद्धि कवचं दिव्यं सर्वपापप्रणाशनम् I
सर्व रोगप्रशमनं सर्व दुःखनिवारणम् II ६ II

आयुरारोग्यधनदं पुत्रपौत्रप्रवर्धनम् I
यः पठेत् श्रुणुयाद्वापि सर्वत्र विजयी भवेत् II ७ II

II इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे बुधकवचं संपूर्णं II

बुध कवचाचा मराठी अर्थः

या बुध कवचाचे कश्यप नांवाचे ऋषि आहेत.
या स्तोत्राचा अनुष्टुप हा छंद आहे. बुध ही या स्तोत्राची देवता आहे.
बुधापासुन होणार्या त्रासांतून मुक्तता होण्यासाठी हा जप करावयाचा आहे.
१) पुस्तक हातांत धरलेला, पितवस्त्र नेसलेला, कुंकुम लावलेला, समद्दुति, पिवळ्या फुलांच्या माळा घातलेला बुध माझे रक्षण करो. मी त्याला नमस्कार करतो.
२) सौम्याने माझ्या कटिचे, बुधाने माझ्या शिरोभागाचे, नेत्रांचे ज्ञानमयाने, तर निशाप्रियाने माझ्या कानांचे रक्षण करावे.
३) गंधप्रियाने माझ्या नाकाचे, विद्याप्रदाने माझ्या जिह्वेचे, विद्यापुत्राने माझ्या कंठाचे तर पुस्तक भूषणाने माझ्या भुजांचे रक्षण करावे.
४) वरांगाने माझ्या वक्षाचे, रोहिणी सुताने माझ्या हृदयाचे, सुरांनी पूजीलेल्याने माझ्या नाभी प्रदेशाचे, खगेश्वराने माझ्या मध्यांगाचे रक्षण करावे.
५) रोहिणेयाने (रोहिणीच्या पुत्राने) माझ्या गुडघ्यांचे, अखिलप्रदाने (सर्व सौख्य देणार्याने) माझ्या जंघेचे, बोधनाने माझ्या पायांचे तर सौम्याने माझ्या सर्वांगाचे रक्षण करावे.
६) हे एक अतिशय दिव्य, सर्व पापांचा नाश करणारे, सर्व रोगांचा परिहार करणारे व सर्व दुःखांचे निवारण करणारे असे कवच आहे.
७) दीर्घ आयुष्य, आरोग्य व धन देणारे, पुत्र-पौत्र प्राप्ती करून देणारे असे हे दिव्य कवच ऐकणारास अगर म्हणणारास सर्वत्र विजयी करते.
असे हे श्रीब्रह्मवैवर्तपुराणांतील बुध कवच संपूर्ण झाले.
जन्मपत्रिकेंत बुध वक्री-स्तंभी असेल, मंगल, हर्षल, राहू, केतू, शनी यांपैकी एका किवा अधिकांबरोबर असेल, त्यांनी दृष्ट असेल, मंगळाच्या राशीत असेल अगर अशुभ स्थानी असेल तर सर्व प्रकारचे ऐहिक सौख्य मनासारखे मिळण्याची शक्यता कमी असते. असे होऊ नये म्हणून हे कवच रोज श्रद्धेने, विश्वासाने आणि मनःपूर्वक म्हणावे.

Leave a Reply

Your email address will not be published.