भाद्रपद शुक्ल चतुर्थीस प्रातःकाली पांढरे तीळ अंगास लावून स्नान करावे.
गणेश प्राणप्रतिष्ठा सूर्योदयापासून [ सकाळी ६ : २८ ] पासून दुपारी १ : ५१ पर्यंत करता येईल.
प्राणप्रतिष्ठेकरीता लवकर पूजा केली तरीही भाद्रपद शुक्ल चतुर्थीस माध्यान्हकाळी करण्यात येणार्या पूजेला महत्त्व आहे.
हा माध्यान्हकाळ सकाळी ११:२१ पासून दुपारी १ : ५१ पर्यंत आहे. दुपारी १ : ५१ पर्यंत पूजा व
आरती संपली पाहिजे असे नियोजन करावे.
उजव्या हातात पाणी घेऊन पुढील संकल्प करून पाणी ताम्हणात सोडावे.
संकल्प –
ॐ विष्णुः विष्णुः विष्णुः
ॐ तत्सदद्य श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य
ब्रह्मणो द्वितीयेपरार्द्धे
श्रीश्वेतवाराहकल्पे
जम्बुद्वीपे भारतवर्षे भरतखंडे
आर्यावर्ते दंडकारण्ये पुण्यक्षेत्रे
कलियुगे कलिप्रथमचरणे
विलंबी नामसंवत्स
दक्षिणायने वर्षा ऋतौ
भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्यां तिथौ
गुरुवासरे स्वाती नक्षत्रे ऐन्द्रयोगे भद्रा करणे
कन्या राशीस्थितेचंद्रे
सिंह रा
कन्या राशीस्थिते देवगुरौ
शेषेषु ग्रहेषु यथायथं राशीस्थान स्थितेषु
अमुक [ आपले गोत्र ] गोत्रायाः अमुक [ आपले नाव ] मोSहं अहं मम
उत्पात दुरितक्षयपूर्वक मम सर्वकर्मनिर्विघ्नसिद्धि पुत्रपौत्र सौभाग्यादी सिध्यर्थं श्रीपार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन याथामीलित उपचारद्रव्यैः ध्यान- आवाहनादि षोडशोप चारे पूजनं करिष्ये।
भाद्रपदशुक्लचतुर्थ्यां मध्यान्हव्यापिन्यां प्रातःशुक्लतिलैः स्नात्वा मध्यान्ह्काले पार्थिवगणेशस्य प्राणप्रतिष्ठां कृत्वा षोडशोपचारेः अर्चयेत।
(बऱ्याच जणांकडे ज्येष्ठागौरी आवाहन/पूजनाचे दिवशी, गणेशचतुर्थीस प्राणप्रतिष्ठा केलेली गणेशमूर्ती गौरीच्या जवळ आणून ठेवण्याची प्रथा आहे. वास्तविक एकदा प्राणप्रतिष्ठा झाल्यावर गणेश विसर्जनापर्यंत गणेश मूर्ती हलविणे सर्वथा चुकीचे आहे. अन्यथा प्राणप्रतिष्ठेस अर्थच राहत नाही.)
चिंतामणीकल्पात सांगितल्याप्रमाणे गणेशचतुर्थीपासून अनंतचतुर्दशीपर्यंत गणपतीस प्रत्येक तिथीनुसार खालील प्रमाणे नैवेद्य दाखविल्यास इच्छित मनोकामना पूर्ण होतात.
गणेशचतुर्थीस- अनारसे,
पंचमीस- उडदाच्या डाळीचे वडे,
षष्ठीस- पुऱ्या,
सप्तमीस- घारगे,
अष्टमीस-पंचपक्वान्नासह संपूर्ण जेवण,
नवमीस- तांदळाची खीर (पायस),
दशमीस-दूध,
एकादशीस-पंचखाद्य,
द्वादशीस- केळी,
त्रयोदशीस-डाळिंब,
अनंतचतुर्दशीस- जांभूळ.
दिनेदिने तथा दूर्वावृद्धिः कार्या प्रयत्नतः।
एकविंशतिमूर्तीर्वा प्रत्यहं पूजायेन्नरः ।।
या वचनानुसार गणपतीस दूर्वा वाहतांना दूर्वांचे देठ कुंकवात बुडवून तिथीवृद्धीक्रमाने म्हणजे गणेशचतुर्थीस चार, पंचमीस पाच….. अनंत चतुर्दशीस चौदा किंवा रोज २१ अश्या वाहाव्यात.
धर्मशास्त्रात, गणेशचतुर्थीस चंद्रदर्शन वर्ज्य सांगितले आहे. या दिवशी चंद्र पाहिल्यास खोटे आळ येतात अथवा कलंक लागतो, परंतु अनवधानाने चंद्रदर्शन घडल्यास पुढील श्लोकाचा १०८ जप करावा.
सिंहः प्रसेनमवधीत्सिंहो जांबवता हतः।
सुकुमारकमारोदीस्तव ह्येष स्यमंतकः।।
I would appreciate if you kindly include my name in your post.
आपल्याला काय म्हणायचे आहे हे मला समजले नाही.