सूर्यनारायण प्रार्थना अष्टक – प. पू. वरदानंद भारती ( श्री अनंतराव आठवले गुरुजी ) Mandar Sant February 18, 2021 स्तोत्र आज पौष महीन्यातील पहिला रविवार पौष महिन्यात सुर्याराधना करावी अस शास्त्रा चे मत. त्यात सौर सुक्त महर्षी वसष्ठि यांनी केलेले आदित्य ह्रदय स्तोत्रम तसेच विविध सुर्यस्तोत्राचे पाठ करावे हे सर्व रोज या महिन्यात म्हणावे. पण हे संस्कृतात.सामान्य भाविकास संस्कृत येत नाही त्या साठी पू.अप्पांनी हे सुर्यनारायण अष्टक रचले. हे रोज अथवा पौष महिन्यात रोज किमान पौषतल्या रविवारी म्हणावे. खुप छान अष्टक आहे. ।। श्री शंकर ।। ।। वरदवाणी ।। *श्री सूर्यनारायण प्रार्थना अष्टक* || श्लोक || (वसंततिलका) नारायणा सकल लोकपते गभस्ति | भावे प्रणाम करितों तुजला प्रभाती || अज्ञान मोह ह्रदयांतील दूर सारी| बुध्दी प्रकाशीत करी अमुची तमारि ||१|| सत्यास मोह धन वैभव मत्तता ही | झांकूनि मानवमना फसवित राही || ती झाकणे निजकरे झणि दूर सारी | बुध्दी प्रकाशित करी अमुची तमारि ||२|| मंदेह दैत्य करितात मनी निवास | ते उन्नति प्रगति आडविती विकास || उत्साह धैर्य वितरून तयास मारी | बुध्दी प्रकाशित करी अमुची तमारि ||३|| जे ब्रह्म सर्व असण्या दिसण्यांत वस्तू | सर्वाद्य सर्वगत मूर्तपणेच ते तूं || चैतन्य तूच सकलात्मक सर्वकारी | बुध्दी प्रकाशित करी अमुची तमारि ||४|| तूं सूर्य तूंच शिव तूंच गणेश विष्णु | तूं शक्ति तूंच नभ तूं पृथ्वी सहिष्णु || एकात्मतेंत, रूचि-कर्मच भेदकारी | बुध्दी प्रकाशित करी अमुची तमारि ||५|| माणिक्य कोकनद राजगिरातुऱ्यांत | प्रेमात शूरनयनीं नवपल्लवात || आरक्तता तव विभो रूधिरींहि सारी | बुध्दी प्रकाशित करी अमुची तमारि ||६|| आल्हाददायक तुझी भगवन सकाळ | तो तूं प्रदोषसमयीं सुख शांतशील || कर्तव्य ते प्रखर तू कथिशीं दुपारीं | बुध्दी प्रकाशित करी अमुची तमारि ||७|| देवा समृद्ध विजयी करि भारतास | सन्मार्ग दाखिव विभो सगळ्या जनास || मोहामधून नित नम्र अनंत तारी | बुध्दी प्रकाशित करि अमुची तमारि ||८|| ।। प.पू.स्वामी वरदानंद भारती ।। ।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।। ????????? Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website