वसुबारस …
[१] आज वसुबारस आहे. यालाच गोवत्स द्वादशी म्हंटले जाते.
[२] यामध्ये गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.
[३] गाय आपल्या पाडसाला पुरेल इतके दुध देवून अजूनही सात्विक दुध देवून मनुष्यावर उपकार करते.
[४] यासाठी आपण सवत्स धेनूची पूजा करतो.
[५] …
त्यात असे मागतो कि गाय म्हणजे जणू पृथ्वी जी विष्णुपत्नी आहे, ती जसे आपल्या पाडसाचे व जगाचे सात्विक अन्नाने भरण पोषण करते..तसे हे माते पृथ्वी, तुझ्यामुळे आम…्ही उपकृत आहोत.
[६] तसेच असे मानले गेले आहे कि मनुष्य जन्म हा अर्धे जनावर व अर्धे देव [ spirit ] यांनी बनलेला आहे. आपली पशुवृत्ती हि आईकडे स्तन्य मागणाऱ्या पाडसाप्रमाणे असावी..इतर पाशवी शक्तींचा शरीरात उतमात [ म्हणजे हल्लीच्या काळात माजलेले व नको त्या भावना चेकाळणारे सर्व फिल्मी छाप प्रोग्राम ] होणार नाही व होवून देणार नाही याची आपल्या मनाला जाणीव करून द्यायची असते.
[७] शहरी लोक आजकाल या विधीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. जे अतिशय अयोग्य आहे.
[८] काही कारणाने गाय वासराचे दर्शन होऊ शकले नाही तर मात्र सायंकाळी घरी पणती लावावी व जवळच्या देवळात जावून भगवंताची मातृस्वरुपात कल्पना करून नमस्कार करावा.
[९] याची तयारी आजच करून ठेवावी.
[१०] आकास्श कंदील लावण्याचे कारण तो पितरांना आश्वस्त करतो. आकाश कंदील उद्यापासूनच लावायचे आहेत. त्याचीही तयारी आज करून ठेवा.जवळच्या देवळात जावून भगवंताची मातृस्वरुपात कल्पना करून नमस्कार करावा.
[११] आकास्श कंदील लावण्याचे कारण तो पितरांना आश्वस्त करतो. आकाश कंदील उद्यापासूनच लावायचे आहेत. त्याचीही तयारी आज करून ठेवा.
धन्यवाद !!
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थित : |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यैनमो नम : ||
गोवत्स द्वादशी व्रत असे करावे
आश्विन व. द्वादशीला हे व्रत करतात. यासाठी प्रदोषव्यापिनी तिथी मानली जाते. जर दोन्ही दिवस प्रदोषव्यापिनी असेल अगर दोन्ही दिवस नसेल, तर
‘वत्सपूजा वटश्चैव कर्तव्ये प्रथमेऽदिने’
यानुसार व्रत पहिल्याच दिवशी करतात. संध्याकाळी गाई चरून आल्यानंतर तुल्य रंगाच्या गायवासरांची गंधादी उपचारांनी पूजा करून-
‘क्षीरोदार्णवसंभुते सुरासुर नमस्कृते ।
सर्वदेवमये मातर्गृहाणार्घ्यं नमोस्तु ते ।’
हा मंत्र म्हणून
देयि सर्वदेवैरलङ्कृते ।
मतर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनि ॥’
या दिवशी तेला-तुपात तळलेले पदार्थ खात नाहीत. गाईचे दूध, तूप, ताक खात नाहीत. गाईला उडदाचे वदे, भात, गोडधोड पदार्थ खाऊ घालतात.
धन्यवाद !!
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थित : |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यैनमो नम : ||
पुढील पायावर अर्घ्य द्यावे आणि
‘सर्वदेवमये देवि सर्वदेवैऽरलंकृते ।
मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनी ।’
अशी प्रार्थना करावी. महत्त्वाची एक गोष्ट आहे की, त्या दिवशीच्या जेवणात गाईचे दूध, दही, तूप, ताक, खीर, तसेच तेलात तळलेली भजी इ. पदार्थ असू नयेत.
या तिथीला ‘वसुबारस’ असेही म्हणतात. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून हे व्रत करतात.
===============================================
संदर्भ : देशपांडे सूर्यसिद्धांतिय पंचांग, दाते पंचांग, लाटकर पंचांग, खापरे , शर्मा सारिणी
Leave a Reply