स्त्री मुक्ती वाल्या काही खुळ्या लोकांची एक दरवर्षी पडणारी पोस्ट असते. ते लक्षात घेवून आधीच ही पोस्ट लिहितो आहे .

वट पौर्णिमेला स्त्रियांनी “सात जन्म हाच नवरा मिळून दे ” असा वर मागायचा असतो
आणि वडाच्या झाडाची पूजा करायची असते . यावर
१] “नवरे” अशी पूजा कधी करणार ? आणि वर मागणार ?
२] हिंदू संस्कृतीत स्त्रियांवर अन्याय केला जातो
३] हिंदू संस्कृती पुरुष प्रधान आहे

अशी खुळचट तर्कटे उधळली जातात . आजकाल ज्ञानी लोक यांना उत्तरे द्यायच्या भानगडीत पडत नाहीत . आणि जे लोक संस्कृतीचा आदर करतात पण याचे उत्तर आचार हीन पणा मुळे विसरलेले असतात ते हात चोळत बसतात .

प्रथम स्पष्ट करू इच्छितो कि हे “उद्यापन करून ज्याचा लोप करता येतो” असे व्रत आहे. त्यामुळे ते केलेच पाहिजे अशी काही जोर जबरदस्ती धर्म कुणावर करत नाही. वास्तविक आजकाल मालिका, चित्रपट यातून चाळवा-चाळवी करून जे खोट्या प्रेमाचे डोस दिले जातात त्याउलट धर्म हा शुद्ध एकनिष्ठ आणि सात्विक प्रेमाचा पुरस्कार करतो. धर्माला प्रेम कळत नाही अशी समजूत काही लोकांनी सोयीस्कर रित्या करून घेतलेली आहे.

हिंदू संस्कृती असे मानते कि लग्न म्हणजे एकमेका समवेत जगताना एकमेकांना ईश्वर बनण्याकडे प्रवृत्त करणे . ज्यायोगे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही प्राप्त होतात . यात पहिली गोष्ट अशी असते कि लग्न होवून येताना प्रत्येक विवाहिता
आपल्या बरोबर अन्नपूर्णा आणते जिची स्थापना सासरच्या देव्हार्यात करतात . नवर्याने रोज पूजा करताना अन्नपूर्णा स्वरूप पत्नीच्या व तिच्या माहेरच्या सर्व कुल स्त्रियांचे प्रतिक असलेल्या त्या मूर्तीचे कृतज्ञता पूर्वक पूजन करायचे असते. घरात इतर कुणी पूजा केली तर देवाला हात जोडताना कृतज्ञता पूर्वक स्मरण करून मोक्ष मिळे पर्यंत याच पत्नीची जन्मोजन्मी साथ मिळो आणि दोघांचेही कल्याण होवो अशी मनोमन प्रार्थना करायची असते . तिच्या मातुल कुळाला कृतज्ञता पूर्वक नमस्कार
करायचा असतो [ सासूबाईंचे स्मरण करून   ].

आता आपण सगळे आचार भ्रष्ट झालो आहोत त्यामुळे हे विसरलो . आपण हि चूक सुधारूयात आणि परत हि प्रथा आचरणात आणूयात. वास्तविक जे स्त्रियांना वर्षातून एकदा सांगितले आहे ते पुरुषांना रोज करायला सांगितले आहे . 

मुले जास्त करून आईने केलेले संस्कार कधीही विसरत नाहीत. त्यामुळे  हिंदू वैदिक धर्मावर आरोप करण्याआधी स्त्री मुक्ती वाल्यांनी हिंदू वैदिक धर्मातील हि उत्तम प्रथा आचरणात आणायचे  हे संस्कार आपल्या मुलांवर करावेत. धर्मातल्या रीती अभ्यासपूर्ण रीतीने पाळाव्यात. कळत नसतील तर मुमुक्षु पणे ज्ञानी व्यक्तींना विचारावे. त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत.

वटसावित्री व्रतामधून आपल्या मनाची पतीबद्दल ची प्रेमाची धारणा अजून अजून घट्ट करणे, व सावित्री सारख्या पातिव्रतेने जी उच्चतम प्रेमाची उंची गाठली त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून तिकडे वाटचाल करायची हेच धर्माला अपेक्षित आहे.

Image31-love

भिन्न रक्ताच्या नात्यामधील प्रेम हे “केले” जाते ते “आपोआप” होत नाही. बऱ्याचदा असे दिसते कि कुणीतरी आवडला किंवा आवडली आणि आपण त्याच्याबरोबर बागडू लागलं कि त्याला “प्रेम” म्हंटले जाते जे प्रेम या अत्युच्च अनुभवाचे प्रचंड अवमूल्यन आहे, ज्यात आपण आपल्या वासना शमवायला हे सर्व करत असतो. प्रेम हि समजून उमजून करायची समर्पणाची भावना आहे, आणि त्याची उच्चतम पातळी म्हणजे सात जन्म साथ न सोडणे. आणि हेच फक्त मनापासून करणे धर्माला अपेक्षित आहे. जे आपल्या धर्मात सर्वमान्य होते. आजकाल मात्र काही “Love Marriage” करणारे स्त्री पुरुष जेव्हा वट-सावित्रीच्या व्रताची खिल्ली उडवतात तेव्हा त्यांच्या ज्ञानाची कीव येते.

वटसावित्री व्रत यासंबंधातील माहिती, दिनविशेष या सदरात, वेगळ्या पोस्ट मध्ये दिली आहे.

 

Image26-wat pournima

8 Responses

  1. प्रसाद प्रभाकर जोशी

    नेहमीचा खणखणीत मंदार संत हिसका जरा सौम्य वाटतोय तरीपण मस्त ?

    Reply
    • Mandar Sant

      आपल्या मोकळ्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद !! प्रसाद

      Reply
  2. समीर गायकवाड

    मी पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉगला भेट देतोय…ब्लॉग छान आहे…तुमचे लेखन चुरचुरीत असते… आपल्यात वैचारिक मतभेद जरूर असतील पण तुमच्या पोस्टमधले नाविन्य आणि मांडण्याची पद्धत मला आवडते. हा ब्लॉग मस्त जमलाय, अगदी फटकेबाज !

    Reply
  3. योगिनी गुप्ते शिर्के

    काही गोष्टी खरंच आपल्याला माहित नसतात. त्या मंदार संत यांच्या ब्लॉग्जमधून नेहमीच कळण्यास मदत होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे अन्नपूर्णेचं पूजन का व कश्यासाठी करतात हे माहित नसेल, जे आता नक्की कळलं असेल.

    Reply
  4. Prakash Patwardhan

    फारच सुंदर व समर्पक समीक्षा ! Keep it up.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.