गुरुद्वादशी (अश्विन वद्य द्वादशी) Mandar Sant October 27, 2016 दिनविशेष २७ ऑक्टोबर २०१६ रोजी अश्विन वद्य द्वादशी अर्थात गुरुद्वादशी आहे . शिष्य या दिवशी गुरूंचे पूजन करतात; म्हणून या तिथीला गुरुद्वादशी असेही म्हटले जाते. गुरुद्वादशीच्या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्त्व १०० पटीने प्रक्षेपित होणे प्रत्येक साधक व शिष्य यांच्यासाठी `गुरुद्वादशी’ हा दिवस दीपावलीतील इतर दिवसांपेक्षा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. १. या दिवशी शिष्याने त्याच्या गुरूंना तळमळीने हाक मारल्यास ती गुरूंपर्यंत पोहोचते; कारण या दिवशी वातावरण गुरुतत्त्वमय झालेले असते. २. शिष्यपदाच्या जवळ पोहोचलेल्या प्रत्येक साधकाला या दिवशी गुरु शिष्यत्व प्रदान करतात. 3. दत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची ही पुण्यतिथी होय. आश्विन वद्य द्वादशीस । नक्षत्र मृगराज परियेसी । श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥ दत्तात्रेयावतार श्री नृसिंहसरस्वती स्वामिमहाराजांनी आजच्याच दिवशी श्रीक्षेत्रा नृसिंहवाडी इथे ‘मनोहरपादुकां’ची स्थापना केली. औदुंबर : कल्पवृक्ष : कामधेनुश्च संगम: | चिंतामणीर्गुरोर्पादो दुर्लभ भुवनत्रये || अर्थ : कल्पवृक्षरूप असलेला औदुंबर , कामधेनुरूपी कृष्णा-पंचगंगा संगम , आणि चिंतामणीरुपी श्रीगुरूचरण अश्या तिन्ही पुण्यप्रद व प्रासादिक गोष्टी एकाच ठिकाणी असणे हे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीनही भुवनात मिळणे दुर्लभ आहे. जे नृसिंहवाडी येथे आहे. या दिवशी दत्तक्षेत्रामध्ये विशेषत: नरसोबाच्या वाडीस दीपोत्सव, गुरुचरित्राची पारायणे; संतर्पणे वगैरे कार्यक्रम होतात.”. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website