प्रश्न

यंदा सोमवारी ०७ अॉगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आलेले आहे. या दिवशी सोमवारी ग्रहण असल्यामुळे संध्याकाळी सोमवारचा उपवास तसेच सोळा सोमवारचा उपवास कसा सोडावा?

तसेच रक्षाबंधन केव्हा करावे आणि पौर्णिमेचा कुळधर्म केव्हा करावा ?

उत्तर

श्रावणी सोमवारचा आणि सोळा सोमवारचा उपवास सोमवारी सूर्यास्तानंतर सोडायचा असतो.परंतु चंद्रग्रहणाचे वेध ०७ अॉगस्ट सोमवारी दुपारी १२.४० पासून सुरू होऊन मध्यरात्री ग्रहण संपेपर्यंत आहेत(लहान मुले, वृद्ध, आजारी, गर्भवती यांनी सायं.५.२८ पासून वेध पाळावा).ग्रहण वेधकाळात भोजन करून उपवास सोडता येत नाही.

*सूर्यास्तानंतर ‘तीर्थ घेऊन’ उपवास सोडावा असे काहीजण सांगत आहेत परंतु ते धर्मशास्त्र संमत नाही.*

कारण

*”सूर्यग्रहे तु नाश्नीयात् पूर्वं यामचतुष्टयम् । चन्द्रग्रहे तु यामास्त्रीन् बालवृद्धातुरैर्विना ।।” असे वृद्धगौतम ऋषिंचे वचन आहे.*

अर्थात , सूर्यग्रहणापूर्वी १२ तास व चंद्रग्रहणापूर्वी ९ तास काहीही सेवन करू नये. सदर वचनात अश्नीयात् हे पद ‘अश भोजने’ या संस्कृत धातुपासून तयार झालेले आहे. ‘अश भोजने’ या धातूचा अर्थ माधवीय धातुवृत्ती ग्रंथात *”अश्नीत पिबतेति यस्यां क्रियायां सातत्येनोच्यते सा”* असा सांगितलेला आहे. अर्थात खाणे व पिणे या दोन्ही क्रिया “अश्” धातूने व्यक्त होत असल्यामुळे *तीर्थप्राशन सुद्धा ग्रहण वेधात चालत नाही.* त्यामुळे सूर्यास्तानंतर *तीर्थ घेऊन उपवास सोडता येणार नाही.*

 

ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास असेल अशांनी दुपारी ग्रहणवेध सुरू होण्यापूर्वी म्हणजे दु.१२.४० पूर्वी अन्न(भात इत्यादी) शिजवून ठेऊन त्यावर तुळसीपत्र ठेवावे व सायंकाळी सूर्यास्तानंतर भात उजव्या हातात घेऊन “आघ्राणेनापि भोजनकार्यस्य सिद्धेः ” या वचनानुसार त्या अन्नाचा वास घेतल्यास भोजन केल्यासारखेच व पर्यायाने उपवास सोडल्यासारखेच आहे.सोळा सोमवारचे व्रत करणाऱ्यांनी दुपारी १२.४० पूर्वीच चूरमा करून ठेवावा व सूर्यास्तानंतर चूरमा हातात घेऊन फक्त वास घ्यावा, भक्षण करू नये.

याप्रमाणेच खडीसाखरेचे सोळा सोमवार करणाऱ्यांनी सुद्धा सूर्यास्तानंतर खडीसाखरेचा वास घेऊन उपवास सोडावा, भक्षण करू नये.
कुलाचारासाठी पौर्णिमा घेताना ती “त्रिमुहूर्त सायाण्हव्याप्ता” घ्यावी असे धर्मशास्त्र वचन आहे. त्यामुळे श्रावण पौर्णिमेस अर्थात सोमवार दिनांक ०७ अॉगस्ट २०१७ रोजी चंद्रग्रहणाचे दिवशी कुळधर्मांचे अंतर्गत करण्यात येणारे देवतेचे पूजन ग्रहण वेधात सुद्धा करता येईल. वेधात देव पूजनाचा निषेध नाही . फक्त *नैवेद्य, भोजन, तीर्थप्राशन यांचा निषेध आहे*.
ग्रहणाचे दिवशी वेधकाळात सुद्धा रक्षाबंधनाचा निषेध नाही त्यामुळे रक्षाबंधन सकाळी १०.१७ नंतर म्हणजे भद्रा संपल्यावर दिवसभर केव्हाही करता येईल

*चूडामणि  संज्ञक  खंडग्रास चंद्रग्रहण*
श्रावण शु.१५, सोमवार दि.०७ ऑगस्ट २०१७ रोजी होणारे
हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे.संपूर्ण आशिया खंड,यूरोपातील बहुतांश भाग,अफ्रिका,प्रशांत महासागर,अॉस्ट्रेलिया,अंटार्क्टिका येथून हे ग्रहण दृश्य होईल.

*ग्रहण स्पर्श :- रात्रौ १०:५२ .मि.वा.*
*मध्य :- रात्रौ ११:५० मि.वा.*
*मोक्ष :- रात्रौ १२:४८ मि.वा.*
*पर्वकाळ:- ०१:५६ मि.*

*या ग्रहणाचे वेध  सोमवार दि. ०७ अॉगस्ट २०१७ रोजी दु. १२:४० मि.पासून सुरू होत आहेत.अशक्त,बाल,वृद्ध,रोगी व गर्भवती स्त्रियांनी सायं. ०५:२८ मि.पासून वेध
पाळावेत.वेध काळात भोजन व जलपान करु नये. ग्रहण पर्वकाळात(रात्री १०.५२ ते रात्री १२.४८) अभ्यंगस्नान,भोजन,जलपान,झोप,संभोग,मल-मूत्र विसर्जन करू नयेत. स्नान,देवपूजा,दान,होम,तर्पण,जपजाप्य,श्राद्ध,मंत्रपुरश्चरण इ. कर्मे करता येतील.

ग्रहण स्पर्श व मोक्ष होताच थंडपाण्याने स्नान करावे.ग्रहणाचे दिवशी श्राद्ध करणे झाल्यास ते प्रत्यक्ष भोजनाने न करता फक्त आमान्न(शिधा देऊन) किंवा हिरण्याने करावे.
चंद्र ग्रहणात गोदावरी व गंगा स्नान महापुण्यकारक सांगितले आहे.

ग्रहणापूर्वी पाणी इ.वर तीळ,दर्भ,तुळस टाकून ठेवल्यास त्याला दोष येत नाहीत.
*भौगोलिक प्रभाव:-* या ग्रहणाचा पर्वस्वामी ‘वरुण’ ही देवता असल्यामुळे धान्यवृद्धी व पीकपाणी उत्तम होईल.
सदर चंद्रग्रहणाचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने विचार केल्यास काश्मीर, मध्यप्रदेश, कुरुक्षेत्र तसेच चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्रांमध्ये उत्पात संभवतात.
हे ग्रहण मकर राशीत श्रवण नक्षत्रावर होत आहे.
*जन्मराशिपरत्वे  ग्रहणफळे -*
१) मेष:- सुख
२) वृषभ :- अपमान
३) मिथुन:- तीव्रकष्ट
४) कर्क:- स्त्री पीडा
५) सिंह :- सौख्य
६) कन्या:- चिंता
७) तुळ :- व्यथा
८) वृश्चिक:- धनप्राप्ती
९) धनु :- हानी
१०) मकर :- घात
११) कुंभ :- हानी
१२) मीन :- लाभ

हे ग्रहण श्रवण नक्षत्रावर होत असल्यामुळे ज्यांचे जन्म नक्षत्र हस्त, श्रवण, रोहिणी, रेवती असेल तसेच ज्या राशीस प्रतिकूल फळ वर सांगितलेले आहे अशा व्यक्तींनी हे ग्रहण पाहू नये.तसेच हस्त, श्रवण, रोहिणी नक्षत्र व मकर रास असणाऱ्या व्यक्तींनी अरिष्टनिवारणासाठी ग्रहणकाळात चांदीचे चंद्रबिंब व सोन्याचा नाग करून गाईच्या तुपाने भरलेल्या काशाच्या पात्रात ठेवून दक्षिणेसह आचारसंपन्न ब्राह्मणाला संकल्पपूर्वक दान करावा.
—————————————————

प्रकाशक व निर्णयकर्ते :

*पंचांगकर्ते*:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.पं.गौरवशास्त्री देशपांडे-०९८२३९१६२९७*

–————————————————-

इतर संकलित माहिती

 

*…….↓तुम्ही वाचले असेल↓……..*

खंडग्रास चंद्रग्रहण माहिती आणि ग्रहण म्हणजे काय व ग्रहण नियम या बद्दल माहिती

या राखी पौर्णिमेला श्रावण शुद्ध पौर्णिमा, सोमवारी दिनांक ०७ ऑगस्ट २०१७,
ला चंद्र ग्रहण आहे हे ग्रहण पुर्ण भारतात दिसणार आहे.

सम्पूर्ण आशिया खंड, यूरोप,आफ्रिका,रशियाचा दक्षिण भाग, आस्टेलिया येथे हे ग्रहण दिसेल.

ग्रहण काळ माहिती

ग्रहणस्पर्श आरंभ:- रात्री १०:५२मी

मध्य :- रात्री ११:५१ मी.

मोक्ष :- रात्री १२:४९ मी.समाप्ती

पर्वकाल:- ०१:५७ मी.

वेध प्रारंभ माहिती :- या ग्रहनाचे वेध सोमवारी दु. ०१:३० वा. पासून सुरू होतात. बाल,वृद्ध व रोगी यांनी सायंकाळी ०५:३० वा. पासून वेध
पाळावेत.वेध काळात भोजन करू नये, आंघोळ, देवपूजा, नित्यकर्म,जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. गर्भवती महिलांनी सायंकाळी ०५:०० पासून ग्रहाणाचे वेध पाळावेत.

हे ग्रहण मकर राशीत श्रवण नक्षत्रावर होत असल्याने धनु,मकर व कुंभ राशीच्या व्यक्तींना उत्तराषाढ़ा,श्रवण,धनिष्ठा या जन्मनक्षत्राच्या व्याक्तिना त्रासदायक आहे. तसेच समाजात चोरांची व अग्निपासुन अपघाताची भीती राहील. देशविदेशात युध्द जन्य परिस्थिती राहील.

काश्मीर, चीन, मुस्लिम राष्ट्र, येथील जनतेला हे ग्रहण त्रासदायक आहे.इतर भागात मात्र धान्यची उपज चांगली व जनतेला सौख्यदायक आहे.परंतु औषध तयार करणारे,शस्त्रे तयार करणारे तसेच समाजविघातक वाईट कृत्ये करणारे यांना पिडक आहे.

लहान मुले, वृद्ध व गर्भवतीस्त्रियांनी ते पासून पाळावेत ही विनंती का आहे गर्भवती महिलानी ग्रहण पाहू नये.

वेधातील नियम काय आहे?

भोजन करू नये, ग्रहण स्पर्श ते मोक्ष काळात मल- मूत्र विसर्जन,
भोजन, अभ्यंगस्नान,झोप, काम
विषयक सेवन शक्यतो टाळावे.
नदीत स्नान शुभ मानले जाते. यथा
शक्ती स्नान कुठच्याही नदीत गंगा
समजून करावी.मोक्षा नंतर च स्नान करावे.

ग्रहण कालावधीत काय करावे?

स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुनश्चरण करावे, ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच दर्भ व तुलसीपत्र वापरले तर अन्नाला दोष लागणार नाहीत.

ग्रहणाबाबतीत बरेच गैरसमजुती आहेत.ग्रहण लागताच वेध लागते.त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो.

१) ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.

२)ग्रहण काळात झोपू नये

३)घराची साफ सफाई करू नये.

४) गर्भवती स्त्रियांनी देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.

५) ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे.

६)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा,गप्प बसा

७) ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.

८) ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये,घरात दरिद्रता येते.सावध रहा.

९) ग्रहणकाळात जो शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.

१०) ग्रहणकाळात संभोग करु नये.नाहीतर डुक्कराच्या योनीत जन्म येतो.

११) ग्रहणकाळात चोरी, फसवणे,करु नका नाहीतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागेल.

१२) ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची हत्या करु नका.नाहीतर अनेक योनींत भटकावे लागेल.

१३) ग्रहणकाळात भोजन,माॅलीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.

१४) ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे फल लाख पटीने आहे.

१५) ग्रहणकाळात सर्व कामे सोडून मौन व जप करा हे फार महत्त्वाचे आहे.

१६)सत्य ग्रहणशक्ती अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल असे घेऊ नये.

१७) नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वैयपाक करु नये.धुने धुवू नये.पाणी भरु नये,

१८) भगवान ग्रहणकाळात भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे.मुले बुद्धिमान होतात.

ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती मी दिली आहे.ही लक्षात ठेवा.हे सर्व शास्त्र परिहार आहे.यातून कोणतीही सूट नाही.

ग्रहण होते म्हणजे नेमके काय होते?

सूर्य या तार्‍याभोवती फिरणार्‍या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो. या सर्वाच्या भ्रमण पातळ्या वेगवेगळ्या आहेत. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्या सारखे दिसते. ते सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रास चंद्रग्रहण आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले तर ते खंडग्रास चंद्रग्रहण होय. अशी स्थिती येणे फक्त अमावास्येलाच शक्य असते. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर तिची सावली चंद्रावर पडते व चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ते खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीछाया पडली तर ते खंडग्रास चंद्रग्रहण असते. असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो. णाचे अचूक अंदाज सर्वप्रथम कोणी वर्तविले?

राहू व केतू म्हणजे काय?

पृथ्वीकक्षेचे प्रतल ( पातळी ) व चंद्रकक्षेचे प्रतल हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत. त्या प्रतलांच्या छेदन बिंदूंना राहू व केतू म्हणतात. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी उत्तरेकडे जाते तो पातबिंदू राहू होय. याउलट चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. ज्या अमावास्येला-पौर्णिमेला चंद्र राहू अथवा केतू बिंदूजवळ असेल तेव्हाच ग्रहण घडू शकते. राहू व केतू हे पातबिंदू एकमेकांच्या बरोबर विरुद्ध अंगाला म्हणजे एकमेकांपासून १८० अंशावर असतात.

दर अमावस्या-पौर्णिमेला सूर्य-चंद्र ग्रहण का होत नाहीत?

अमावास्येला पृथ्वीसापेक्ष सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात. म्हणजेच त्यांच्यातील पूर्व-पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शून्य होते. पण भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्याचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते. ते ज्या वेळा सर्वात कमी किंवा शून्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.

सूर्य व पृथ्वी यांच्या, मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण घडते. हे आपण पूर्वी पाहिले आहे. सूर्य व चंद्र पृथ्वीसापेक्ष जरी पूर्वेलाच किंवा पश्चिमेलाच असेल तर चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडणारच नाही. म्हणजे सूर्यग्रहण होणार नाही. चंद्राची छाया पृथ्वीवर न पडता ती उत्तर किंवा दक्षिणेकडून जाईल. अशावेळी पृथ्वीवरून सूर्यग्रहण दिसणारच नाही. अशीच घटना पौर्णिमेला चंद्राबाबत घडते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तरच चंद्रग्रहण होईल. पण त्यासाठी त्यांचे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अंतर शून्य किंवा कमीत कमी व्हायला हवे.

 

 

 

 

2 Responses

  1. shyam joshi

    एक नियम दाखवून इतर नियमांकडे कानाडोळा करणारे काय कामाचे …
    धर्मशास्त्र हे सर्वसमावेशक व सर्व समाजाचा – उत्कर्षाचा विचार करणारे आहे व ते तसेच तारतम्याने वापरले पाहिजे .. उगीच एखाद्या नियमाने इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी ..

    Reply
    • Mandar Sant

      आपले म्हणणे नीटसे समजले नाही. तरीही आवर्जून अभिप्राय पाठवलात त्याबद्दल आभारी आहे.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published.