श्री विजयादशमी दिनांक ०२/१०/२०२५ रोजी गुरुवार आश्विन शुल्क पक्ष दशमी दसरा आहे ♦️ लाभदायक—- लाभ मुहूर्त– १०:५४ ते १२:२३ 💰💵 अमृत मुहूर्त– १२:२३ ते १३:५२ 💰💵 👉विजय मुहूर्त— १४:२१ ते १५:०९ आज विजयादशमी, दसरा, अश्वपूजा, शमीपूजन सीमोल्लंघन आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. मौल्यवान वस्तू खरेदीसाठी विजयादशमीचा आजचा दिवस शुभ मानला जातो. कोणत्याही शुभकामाचा प्रारंभ आज करायचा आहे.विजयादशमी या सणाची उत्पत्ती काही कथांद्वारे सांगितली जाते. महिषासूर राक्षस सर्व लोकांना त्रास देत होता. तेव्हा परमेश्वराने अष्टभुजा देवीच्या रुपात अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत महिषासूर राक्षसाशी तुंबळ युद्ध करून त्यास ठार मारून विजय मिळवला. त्यावेळी देवीने विजया नाव धारण केले होते. म्हणून अश्विन शुक्ल दशमीस ‘विजयादशमी’ हे नाव मिळाले. पांडव अज्ञातवासात राहण्यासाठी म्हणून विराटाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली सर्व शस्त्रे जंगलात शमीच्या झाडावर ठेवली होती. शेवटी अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी सर्व शस्त्रे शमीच्या झाडावरून काढून घेतली. शमीच्या झाडाची आणि शस्त्रांची पूजा केली. तो दिवस अश्विन शुक्ल दशमीचा होता. प्रभू रामचंद्रांचा पणजा रघुराजा सर्व दिशांच्या राजांना जिंकण्यासाठी याच दिवशी निघाले होते. श्री प्रभु रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तो हाच दिवस होता. दसरा साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास ‘दसरा’ सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात. सीमोल्लंघन अपराण्हकाली (तिसर्या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात शमीपूजन शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी । अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥ करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया । तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ॥ अर्थ : शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी श्रीरामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, श्रीरामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर. अपराजितापूजन ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात. हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला । अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।। अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात. शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन या दिवशी राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे आणि उपकरणे साफसूफ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे. राजविधान दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे. लौकिक प्रथा काही घराण्यांतले नवरात्र (देवी) नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते. कृषीविषयक लोकोत्सव ‘दसरा’ हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला. आपट्याची पाने देव-घेण करण्याची प्रथा विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला……. [ याबाबतचा सविस्तर ब्लॉग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा ] Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website