वैशाख अमावास्या – शनी जयंती – गुरुवार – २५ मे २०१७ Mandar Sant May 25, 2017 दिनविशेष अमा सोमे तथा भौमे, गुरुवारे यंदा भवेत | ततीर्थं पुष्करं नाम, सूर्यपर्व शताधिकम || अमावस्या ही सोमवारी , मंगळवारी किंवा गुरुवारी आल्यास त्यादिवशी तीर्थस्नान केल्यास पुष्कर तीर्थात स्नान केल्याने फळ मिळते जे शंभर सुर्यग्रहणांच्या पर्वकाळात केलेल्या स्नानापेक्षाही जास्त आहे. आज दि २५ मे २०१७ रोजी येणारया या पुण्यदायक योगात जवळील तीर्थात अथवा संगमात स्नान करावे. किमान घरी आंघोळ करायची असल्यास उत्तम तीर्थांचे स्मरण करावे व स्नान करावे. हे स्नान सकाळी दुपारी अथवा सायंकाळी केलेत तरी चालेल. स्नान करताना खालील श्लोक म्हणून नद्यांचे स्मरण करावे , गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। भावार्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधु तथा कावेरी, आपण आपले (पुण्यकारक) जल या स्नानजलात संक्रमित करावे । गंगा सिंधु सरस्वति च यमुना गोदावरि नर्मदा । कावेरि शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।। क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी । पूर्णाः पूर्णजलैः समुद्रसहिताः कुर्वन्तु मे मंगलम् ।। भावार्थ : गंगा, सिंधु, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेन्द्रतनया, चंबल, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती (मालवाकी बेतवा नदी), प्रख्यात महासुरनदी, जया तथा गण्डकी नद्या, पवित्र परिपूर्ण होऊन समुद्रसहित माझे कल्याण करावे । =========================================== शनिपिडा परिहारार्थ आज सूर्यास्तानंतर खालील मंत्रांचा जप करून शनी महाराजांना उडीद वड्यांचा नैवेद्य दाखवावा. सूर्यपुत्रो दिर्घदेहो विषालाक्ष: शिवप्रिय:| मंदचार: प्रसंनात्मा पिडाम् हरतु मे शनी: || अपंग , वृद्ध अथवा कृष्णवर्णीय व्यक्तीस यथाशक्ती व इच्छेप्रमाणे भजन व दक्षिण द्यावी. यामुळे शनिपिडा निवारण होऊन अडकलेली कामे मार्गी लागतात. संदर्भ : सुर्यसिद्धांतिय देशपांडे पंचांग.पुणे. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website