श्रीकृष्ण जन्माष्टमी - १४ ऑगस्ट २०१७ Mandar Sant August 14, 2017 दिनविशेष जन्माष्टमी च्या उपवासाचे महत्त्व : जन्माष्टम्या दिने प्राप्ते, येन भुक्ते द्विजोत्तम 😐 त्रैलोक्यजनितं पापं भुक्तं तेन न संशय 😐 जन्माष्टमी या उपवासाचे अतिशय मोठे महत्त्व आहे. वरील वचनात जो आज उपवास करत नाही तो त्रैलोक्यातील पापाचेच भक्षण करतो असे म्हंटलेले आहे. या दिवशी उपवास केल्यास वर्षातील सर्व एकादश्यान उपवास केल्याचे पुण्य मिळते. ======================================================================== व्रत : ==== जन्माष्टमी चे उपवास बरोबर खूप ठिकाणी जन्माष्टमीचे व्रत करतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म बुधवारी रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री चंद्र वृषभ राशीला असताना झाला म्हणून उपासक आपल्या हितासाठी हे व्रत करतात. सून बाल, कुमार, तरुण, वृद्ध सर्व लोकांना, स्त्री-पुरुषांना करण्यास योग्य आहे. यामुळे पापनाश होऊन सुखाची वाढ होते. यासाठी अष्टमीचा उपवास व नवमीचे पारणे सोडल्यावर व्रत पूर्ण होते. व्रत करणार्याने उपवास करण्याच्या आदल्या दिवशी अंशमात्र जेवावे. रात्री व्रतस्थ असावे. उपवासादिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर सूर्य, सोम, यम, काल, संधी, भूत, पवन, दिक्पती, भूमी, आकाश, खेचर, अमर व ब्रह्म वगैरेंना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तराभिमुख बसावे, हातात पाणी, फुले, गंध, फळे घेऊन ‘ममाखिल पापपरशमनपुर्वक सर्वाभीष्टसिद्धये श्रीकृष्नजन्माष्टमीव्रतमहं करिश्ये’ असा संकल्प सोडावा. मध्याह् नीला स्नान करावे. घरात देवकीसाठी ‘सूतिकागृह’ ठरवावे. बाळंतपणासाठी जरूर त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून ठेवाव्यात. शक्य असेल तर गाण्याबजावण्याचा कार्यक्रम ठेवावा. त्यातीलच एक सुखरूप ठिकाणी चांगला मऊ बिछाना घालून त्यावर अक्षतांनी मंडळ करून कलश स्थापावा व त्यावर सोने, चांदी, तांबा, पितळ, लाकूड अथवा माती याची मूर्ती अगर चित्र ठेवावे. चित्र वा मूर्ती जन्मलेल्या कृष्णाला स्तनपान करीत आहे व लक्ष्मी त्याच्या पायाला स्पर्श करीत आहे, असे असावे. यानंतर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, असे मानून आपल्या संप्रदायपद्धतीने अथवा वेदोक्त, पुराणोक्त विधीने यथोपचार प्रेमाने पूजा करावी. पूजेमध्ये देवकी, वसुदेव, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा व लक्ष्मी या सर्वांचा नामनिर्देश करावा. शेवटी , ‘प्रणमे देवजननीं त्वया जातस्तु वामन: । वसुदेवात्तथा कृष्णो नमस्तुभ्यं नमो नम: ॥ सपुत्रार्घ्यं प्रदत्तं मे गृहाणेनं नमोऽस्तुते ।’ या मंत्राने माता देवकीला अर्घ्य द्यावेत. जात: कंसवधार्थाय भूभारोत्तारणाय च देवतानां हितार्थाय धर्मसंस्थापनायच | कौरवाणाम विनाशाय दैत्यानां धन्य च गृहाणार्घ्यं मया दत्तं देवक्यासहितोSSनघ || या मंत्राने प्रार्थना करावी. व त्यानंतर धर्माय य धर्मेश्वराय धर्मपतये धर्मसंभवाय गोविंदाय नमो नम: । या मंत्राने श्रीकृष्णाला पुष्पांजली अर्पण करावी. अथवा धर्माय नमो नम: स्वाहा । धर्मेश्वराय नमो नम: स्वाहा । धर्मपतये नमो नम: स्वाहा । धर्मसंभवाय नमो नम: स्वाहा । गोविंदाय नमो नम: स्वाहा । या नाममंत्रांना उच्चारून तीळ, तूप या हवनीय द्रव्यांनी हवन करावे. रात्रौ कथाकीर्तन, पुराण इ. कार्यक्रमांनी जागरण करतात. देवास फराळाचा नैवेद्य दाखवतात. आणि, नवमी दिवशी पंचोपचारे पूजा करून महानैवेद्य अर्पण करतात. मृत्तिकेच्या मूर्ती असल्यास त्या जलाशयात विसर्जन करतात. धातूच्या मूर्ती असल्यास देव्हार्यात ठेवतात किंवा ब्राह्मणास दान देतात. काही ठिकाणी दहीकाला होतो. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणत: क्लेश नाशाय गोविन्दाय नमो नम:|| ================================== श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय” || ================================== मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥ ================================== ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो विश्वस्वरूपाय विश्वस्थित्यन्तहेतवे। विश्वेश्वराय विश्वाय गोविन्दाय नमो नमः॥1॥ नमो विज्ञानरूपाय परमानन्दरूपिणे। कृष्णाय गोपीनाथाय गोविन्दाय नमो नमः॥2॥ नमः कमलनेत्राय नमः कमलमालिने। नमः कमलनाभाय कमलापतये नमः॥3॥ बर्हापीडाभिरामाय रामायाकुण्ठमेधसे। रमामानसहंसाय गोविन्दाय नमो नमः॥4॥ कंसवशविनाशाय केशिचाणूरघातिने। कालिन्दीकूललीलाय लोलकुण्डलधारिणे॥5॥ वृषभध्वज-वन्द्याय पार्थसारथये नमः। वेणुवादनशीलाय गोपालायाहिमर्दिने॥6॥ बल्लवीवदनाम्भोजमालिने नृत्यशालिने। नमः प्रणतपालाय श्रीकृष्णाय नमो नमः॥7॥ नमः पापप्रणाशाय गोवर्धनधराय च। पूतनाजीवितान्ताय तृणावर्तासुहारिणे॥8॥ निष्कलाय विमोहाय शुद्धायाशुद्धवैरिणे। अद्वितीयाय महते श्रीकृष्णाय नमो नमः॥9॥ प्रसीद परमानन्द प्रसीद परमेश्वर। आधि-व्याधि-भुजंगेन दष्ट मामुद्धर प्रभो॥10॥ श्रीकृष्ण रुक्मिणीकान्त गोपीजनमनोहर। संसारसागरे मग्नं मामुद्धर जगद्गुरो॥11॥ केशव क्लेशहरण नारायण जनार्दन। गोविन्द परमानन्द मां समुद्धर माधव॥12॥ ॥ इत्याथर्वणे गोपालतापिन्युपनिषदन्तर्गता गोपालस्तुति समाप्त ॥ फल – संतती, संपत्ती वैकुंठलोक यांची प्राप्ती. संदर्भ : khapre.org , सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग , internet Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website