================
२० ऑक्टोबर सकाळी व दिवसभरसाडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहुर्त म्हणून हा महत्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्रथा आहे. विक्रम संवत यांचा नववर्षारंभ यांच दिवसापासून होतो.
बळीराजाचा हा स्मरणदिन आहे. बळी हा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेत त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णूला साकडे घातले.
बळी हा वास्तविक भगवान प्रह्लादाचा नातू . त्याचे सात्विक संस्कार त्याच्यावर होतेच . वर त्याचे घराणे विष्णूभक्त . बळीने विष्णू कडे सदेह वैकुंठ प्राप्ती चा वर मागितला . बळी चे गुरु शुक्राचार्य हे मोठे आचार्य . त्यांच्या कृपे मुळेच संजीवनी मंत्राच्या सामर्थ्याने बळी ने बळी राजा ने देवलोकावर विजय मिळविला होता. परंतु कच देवामुळे संजीवनी मंत्र षटकर्णी झाला व त्याचा उपयोग संपला .
अजिंक्य होण्यासाठी बळी राजा ने शुक्राचार्यांच्या मार्गदर्शना खाली मोठा यज्ञ आरंभिला . यात याचक जे मागेल ते दान केल्याने बळी त्रैलोक्याचा स्वामी झाला असता. बलीची सात्विक वृत्ती लोप पावून असुर वृत्ती आरंभ होणार हे बळीच्या अनुयायांनी यज्ञ संपता संपता सुरु केलेल्या उठावामुळे लक्षात आले. राजा बळी लाही भक्ती सोडून सुप्त अहंकार मनात घर करू लागला . त्यामुळे बळीराजाचे पुण्य कमी झाले . अहंकार हा मोठ्या प्रमाणात पुण्य खातो हे या कथेवरून शहाण्यांनी लक्षात घ्यावे.
बळीला कसे आवरायचे म्हणून देव विष्णूकडे गेले.
विष्णू आपल्या भक्तांचे रक्षण करतो त्यामुळे विष्णूने देवांना बळी ला
शरण जावे असे सांगितले .
परंतु बळी चा त्रैलोक्याचा राजा होण्याच्या नादात वाढलेला अहंकार
आटोक्यात आणणे पण आवश्यक होते .
आता दोन्ही भक्तांचे भले करावे या हेतूने विष्णूने वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला.
बोलला. “फक्त त्रिपादभूमी हवी मला” वामन उत्तरला.
शुक्राचार्यांना काय ते सर्व समजले. त्यांनी हे दान देवू नको आपण परत यज्ञ करू असे बळी ला सांगितले . यानंतर सर्व काय ते बळी उमजला.
आपल्या अहंकाराने आपला कसा घात केला ते बळी ला उमगले.
—————————————————————————————————————————
त्याने त्रिपादभूमी देण्याचे मान्य करण्यासाठी पाणी सोडायला झारी उचलली
शुक्राचार्यांनी यात विविध अडथळे आणले .
याच प्रयत्नात त्यांना एक डोळा गमवावा लागला .
.
.
.
.
.
.
परंतू शब्द दिला तो बळीने पाळला. ‘दिली भूमी’ म्हणून म्हणाला. वामनाने एका पावलात स्वर्ग, दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली.
तिसरे पाउल कुठे ठेऊ ?
असे विचारताच बळीने आपले मस्तक पुढे केले. यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले
भगवान विष्णूनी बळी ला दोन वर दिले.
१] बळी हा सप्त पाताळ लोकातील ‘सुतळ’ या भागाचा अभिषिक्त राजा झाला
२] बळी ला विष्णूने चिरंजीव केले
पण हे केल्याने सर्व पाप विष्णूला लागले . व ते फेडण्यासाठी भगवान विष्णू बळीच्या पाताळातील महालात द्वारपाल म्हणून गुप्तपणे राहू लागला.
असे चवदा सहस्त्र वर्ष झाल्यावर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बळी ने नेहेमीप्रमाणे लक्ष्मीपूजन केले . त्यावेळी लक्ष्मीदेवी ने प्रसन्न होवून बळी ला वर माग असे सांगितले . बळीने भगवान विष्णूंचे दर्शन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा लक्ष्मी देवी ने स्मित करून विष्णू भगवान तुझ्याच अंकित आहेत व दर्शन हवे असेल तर श्री विष्णूला मुक्त करण्याविषयी सुचविले.
.
बळी ला ते समजल्यावर धक्का बसला व त्याने जावून द्वारपालाच्या रूपातील श्री
विष्णूचे पाय धरले. पण विष्णूच तो ! तोही शब्दाला पक्का. अजून सोळा सहस्त्र वर्षे
झाल्या शिवाय हे पाप फिटणार नाही त्यामुळे त्याने द्वारपालाचे काम सोडण्यास
नकार दिला व गुप्तपणे दुसऱ्या रुपात बलीची सेवा करू असे सांगितले यावेळी
बळीच्या विनंती वरून विष्णू ने हे एका अटीवर पदमुक्त होण्यास मान्यता दिलॆ.
यावेळी तिसरा वर बळी ने मागून घेतला तो वर सर्व समाजाच्या हिताचा होता.
३] जो कोणी बळीप्रतिप्रदेला दीपदान करेल त्याला यमयातना होणार नाहीत.
विष्णूने असे सांगितले की हे दीप दान बळीच्या नावाने होईल व सर्व
विष्णूभक्त तसे करतील व विष्णूला बळीच्या ऋणातून मुक्त करतील .
लक्ष्मी ने असा वर दिला की जो हे करेल त्याच्या घरी लक्ष्मीचा वास सदा राहील.
लक्ष्मीला आपल्या पतीचे कौतुक वाटले म्हणून तीने पतीचे विष्णूचे ओक्षण केले त्याला ओवाळले. ओवाळणी म्हणून विष्णूने हिरे माणके इत्यादी अलंकार घातले. यामुळेच आजही बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळतात व पती पत्नीला भेटवस्तू देतात.
दुसर्या दिवशी द्वितीयेला यम व यमुनेच्या प्रथे प्रमाणे लक्ष्मीने बळी ला भाऊ म्हणून ओवाळले. बळी कडे राहुन भगवान विष्णू व आई लक्ष्मी वैकुंठ चतुर्दशी ला वैकुंठात परत आले.
श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन पूजेची सुरवात केली. निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची हि सुरवात होती त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका, गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा होई.
रावणाचा दसऱ्याला वध केल्यानंतर बिभीषणाला लंकेचे राज्य देवून श्रीराम सीतेसह अयोध्येला परतले. त्यादिवशी लोकांनी दीपोत्सव केला व त्याची आठवण म्हणून पाडव्याला दीपोत्सवाची परंपरा बळी व श्रीराम राज्यारोहण यांची आठवण म्हणून पाळली जाते.
या प्रथेपासून निघालेले किल्ले म्हणजे गड, सैनिक, शिवाजी महाराज यांचे
मोठ्या कल्पकतेने देखावे उभारण्याची प्रथा महराष्ट्रात रूढ झाली.
यातूनच मुलांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला वाव मिळू लागला.
चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्याने आपल्या नावाने
याच दिवशी शक चालू केला . बहुतांश व्यापारी हेच
वर्ष पाळतात . हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे.
Leave a Reply