*नमः शिवाय* *निःशेषक्लेशप्रशमशालिने ।*
*त्रिगुणग्रन्थिदुर्भेदभवबन्धविभेदिने ॥*

*अर्थ : समस्त दुःखांचे निवारण करण्यास तत्पर अशा; सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या ग्रंथींमुळे दुर्भेद्य अशा संसाररूपी बंधनाचा भेद करणार्‍या भगवान शंकराला नमस्कारअसो.*

श्री कालभैरव जयंती माहिती

कार्तिक कृष्ण अष्टमी –
कालभैरव जयंती – ०७/१२/२०२०
यासंबंधी माहिती

श्रीकालभैरव हे दैवत, श्री शंकराचा अवतार समजले जाते. जेथे जेथे कालभैरवांची मंदिरे आहेत, तेथील पुराणकालीन रूपकथा ऐकल्यावर असे कळते की, मूळचा श्री शंकर, महादेव नेहमी शांत-भोळा आणि प्रसन्न असणारा, परंतु ज्या ज्या वेळी स्वर्गात वा पृथ्वीतलावर अघटित, विपरीत घडले किंवा असुर, राक्षस वरदानाने माजले, उन्मत्त झाले, पृथ्वीवरील तोल ढासळला अशावेळी वातावरण पहिल्यासारखे राखण्यास भगवान शंकरांनी कडक रूप धारण करून समतोल राखलेला आहे. हरिहरेश्वराचा कालभैरव अवतार शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी झाला, अशी भैरवाची वेगवेगळी रूपे शंकराने पाचव्या अवतारात घेतल्याचे सांगितले जाते. यात भैरव महाभैरव, कालभैरव, कल्पांत भैरव, बटुक भैरव, आनंद भैरव, मरतड भैरव, अभिरूप भैरव याशिवाय क्रोध भैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, रुरुभैरव, उन्मत्त भैरव, अहंकार भैरव, संहारक भैरव अशीही आहेत. तशीच कालभैरवाची मंदिरे महाराष्ट्रात विशेषत: कोकण भागात अनेक ठिकाणी आहेत. रायगडमधील श्रीवर्धन, दिवेआगर आणि हरेश्वर या ठिकाणी

कालभैरवाची शक्तिस्थाने स्वयंभू मंदिरे आजही मोठय़ा ख्यातकीर्तीसह नावारूपाला आलेली आहेत.

दिवेआगर येथील कालभैरव सिद्धनाथ भैरव आणि केदार अशी शक्तिस्थाने मंदिरे असून हरिहरेश्वर येथे कालभैरव तर श्रीवर्धन येथे सिद्ध भैरव असल्याचे सांगितले जाते. श्री कालभैरवला श्री शंकरांनी चौसष्ट कोटी गणांचा अधिपती आणि काशीचा रक्षक (कोतवाल) नेमला असल्याने अग्रपूजेचा अधिकारी कालभैरव वाराणसीत आहे. अशा कालभैरवाचे महत्त्व आणि शक्ती मोठी असून कालभैरवाचे दर्शन प्रथम घेतल्यावर त्या भाविकांची, भक्तांची काशीची यात्रा पूर्ण होते. तसेच हरिहरेश्वर येथेही कालभैरव मंदिरात प्रथम कालभैरवाचे दर्शन घेऊन हरिहरेश्वर मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया यांचे दर्शन घेऊन पुन्हा कालभैरवाचे दर्शन घेतल्यानेच हरिहरेश्वराची यात्रा पावन होते.

IMG-20201207-WA0014

श्री कालभैरवाची निर्मिती कशी झाली त्याबाबत अनेक रूपकथा आहेत. एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले, परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद’ यांच्याकडे गेले, तेथेही अशाच उत्तराने समाधान झाले नाही. म्हणून ओमकार स्वरूपिणी त्रिपदागायत्रीकडे गेले. या त्रिपदा गायत्रीने हेच उत्तर दिले. त्यानंतर श्री शंकरांनी त्यांचे स्वर्गात असलेले शिर आणि पाताळात असलेले पाय अनुक्रमे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना शोधण्यास पाठविले यासाठी दोन्ही देवतांनी अथक प्रयत्न केला. पाताळात पाय शोधीत असता श्रीविष्णूंना गणपती दिसले. पण ते ध्यानस्त बसले होते. त्यांना श्रीविष्णूंनी पायाबाबत विचारले असता गणपती म्हणाले, ‘आपण एवढी भ्रमंती केल्यावर तुम्हाला कुठे ब्रह्मांड दिसले; तरी अशी अनंत कोटी ब्रह्मांडे श्री शंकराचे चरणी असल्याने त्यांचे असे वेगळे अस्तित्व दिसणार नाही.’, असे सांगितले ते विष्णूंना पटले व मान्यही झाले. मात्र स्वर्गात ब्रह्मदेव शिर शोधण्यासाठी अथक प्रयत्न करताना सतत गुणगुणत होते मीच ब्रह्म आहे व मीच श्रेष्ठ आहे. दरम्यान, ब्रह्मदेवांना तिथे गाय आणि केतकी (केवडय़ाचे झाड) भेटले. त्यांना ब्रह्मदेवांनी आपल्याकडे वळवून शंकराचे शिर दिसले असे खोटे सांगण्यास प्रवृत्त केले. यानंतर मग स्वर्गात विष्णू, ब्रह्मदेव, गाय व केतकीसह आले. त्यानंतर विष्णूंनी सांगितले की, ‘मला पाताळात पाय दिसले नाहीत. मात्र ब्रह्मदेवांनी धारिष्टय़ दाखवून खोटेपणाने मला स्वर्गात शिर दिसले आणि यासाठी साक्षीदार म्हणून गाय आणि केतकी यांना आणल्याचे सांगितले.’ यानंतर शंकरांच्या साक्षी तपासणीत गाय व केतकी यांच्या साक्षी खोटय़ा ठरल्या, मग शंकर क्रोधायमान झाले त्यांनी खोटय़ा साक्षीबद्दल गायीला शाप दिला की, ‘तुझे मुख नेहमीच अशुद्ध आणि अपवित्र राहील, मात्र तुझे दर्शन पाठीमागून घेतील. तसेच केतकीला सुद्धा शाप दिला तुझ्या अंगावर पानोपानी काटे असतील तुझ्या केवडय़ाच्या कळीच्या पानांनी माझी पूजा केली जाणार नाही. तू मला म्हणजे शंकर, महादेव व भैरवनाथ यांना नेहमीच निषिद्ध राहशील.’ याप्रमाणे आजही गायीचे दर्शन मागून घेतात व केवडय़ाच्या कळीचे पान शंकरादी देवांना वाहिले जात नाही. यानंतर शंकराचे लक्ष्य ब्रह्मदेवाकडे गेल्यावर ते पुन्हा अतिक्रोधायमान झाले. त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या जटेमधून एक केस उपटला आणि सिद्ध भैरवनाथ प्रकट झाले. याच दरम्यान ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखातून शंकराची निंदानालस्ती सुरूच होती. याबद्दल ब्रह्मदेवाला शासन व्हावे म्हणून सिद्ध भैरवानी त्वरित तलवार उपसून ब्रह्मदेवाचे पाचवे शिर धडावेगळे केले. तेव्हापासून ब्रह्मदेवाला चार शिरे राहिली. ब्रह्महत्येचे कालभैरवाकडून पातक घडल्याने ते पापशासन व्हावे म्हणून तो काशीला निघाला. पाताळात मर्त्यलोकांत- वैकुंठ लोकांत तीर्थयात्रा करून सुद्धा पापक्षालन झाले नाही; परंतु ब्रह्मदेवाचे तुटलेले शिर कालभैरवाच्या हाताला चिकटलेले होते. मात्र पवित्र काशी गंगेत स्नान केल्यावर ते शिर खाली पडले आणि कालभैरवाची ब्रह्म हत्येच्या पातकामधून मुक्तता झाली आणि मग शंकरांनी त्यांना चौसष्ट गणांचा अधिपती आणि काशीचा रक्षक (कोतवाल) नेमले.

शिवाच्या तेजापासून निघालेली शक्ती ही योगेश्वरी (जोगेश्वरी) ही कालभैरवाची पत्नी मानली जाते. कुलदैवत, उपास्य दैवत, ग्रामदैवत असे तीन प्रकार कालभैरवाचे असून त्या त्या घराण्यात भैरी भवानी (भैरवनाथ, भवानीमाता) अशी असून त्यांची नित्यनेमाने पूजा-अर्चा होत असते. कालभैरव भूतपिशाच्च करणी इ.पासून तात्काळ मुक्ती देतो. कालभैरवाचे प्रथमदर्शनी विक्राळ रूप पाहिले असता भीतीदायक, भयावह, उग्र, क्रोधदायक वाटते. परंतु कालभैरवाची ख्यातकीर्ती फारच मोठी आहे.
श्रीवर्धन येथील कालभैरवाच्या मंदिरातील मूर्ती ही दक्षिणमुखी आहे, तर हरेश्वर येथील कालभैरव मंदिरातील मूर्ती उत्तरमुखी आहे. भूतपिशाच्च बाधेपासून मुक्ती देणारा म्हणून हरेश्वर कालभैरवाची ख्यातकीर्ती सर्वदूर पसरली आहे, शिवाय येथे भूतांना घालविणारा खांबही मंदिरात आहे. अशा या हरेश्वर कालभैरवाचे महत्त्व जाणून घ्यावे, आपल्या डोळ्यांनी पाहावे, त्याच्याशी नाते जोडावे याच मूळ उद्देशाने काशीचा कोतवाल म्हणजेच कालभैरव काशीहून इकडे येण्यासाठी निघाला हे वृत्त हरेश्वराच्या कालभैरवाला समजल्यावर काशीच्या कोतवालाचे आनंदाने स्वागत करावे म्हणून कालभैरव हरेश्वर उत्तरेकडे तोंड करून (श्रीवर्धन गावाकडे) उभा राहिला. याच दरम्यान कोतवाल कालभैरव श्रीवर्धन येथे पोहोचला होता. पहाट झाली कोंबडा आरवला. कालभैरव काशी श्रीवर्धन येथे स्थिरावले. आजही दोघांचे मुख दक्षिण-उत्तर आहे.
श्रीवर्धनमधील कालभैरवाच्या मूर्ती प्राचीन काळातील असून पाषाणाच्या आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात चार मूर्ती असून समोर दर्शनी डावीकडे असलेली मूर्ती ही सिद्धनाथ भैरवाची असून याच मूर्तीच्या डाव्या बाजूला असलेली मूर्ती योगेश्वरीची आहे. कालभैरवाच्या बाजूला भिंतीच्या कडेला मूर्ती आहे ती ‘वीर’ याची आहे. योगेश्वरीच्या बाजूला भिंतीच्या कडेला जी मूर्ती आहे ती ‘क्षेत्रपाळाची’ आहे. सिद्ध भैरवाला चार भुजा असून त्याच्या हातात ढाल, उजव्या हातात तलवार, बाजूला त्रिशूळ, कमरेला खंजीर अशी आयुधे आहेत. श्रीवर्धन येथील मंदिरात असलेला कालभैरव हा काशी या ठिकाणांचा रक्षक (कोतवाल) असून प्रत्यक्ष काशी या ठिकाणी केलेला नवस तिथे बोललेली अर्ज, विनंती श्रीवर्धन या ठिकाणच्या मंदिरात फेडली असता काशी येथील दैवताला पावन होते, अशी भाविक- भक्त यांची दृढ श्रद्धा आजही आहे.
वाहन: काळा श्वान
नेवैद्य : मदीराचा आहे
श्री काळभैरावानाथांना जे वंदन करतात. त्यांना यमदूत वंदन करतात. श्री काळभैरावानाथांचा महिमा जे वाचवतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य मिळते

=============================

*ॐ नमःशिवाय*

*ॐ हं षं नं गं कं सं खं महाकाल भैरवाय नम:*

*ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाचतु य कुरु कुरु बटुकाय ह्रीं ॐ॥*

*॥ॐ भैरवाय नम:॥*

*’बटुकाख्यस्य देवस्य भैरवस्य महात्मन:। ब्रह्मा विष्णु, महेशाधैर्वन्दित दयानिधे॥’*

*ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीं*

*॥ऊं भ्रं कालभैरवाय फ़ट॥*

*|| ॐ भयहरणं च भैरव: ||*

*श्री कालभैरवाष्टक*

*श्रीगणेशाय नम:*

देवराज सेव्यमानपावनांध्वि पंकजं ।।
व्याल यज्ञसूत्रमेंदुशेखरं कृपा करम् ।।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।

भानुकोटिभास्वरं भवाब्धि तारकं परं ।।
नीलकंठमीप्तितार्थदायकं त्रिलोचनम् ।।
काल कालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।

शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं ।।
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।।
भीमविक्रमंप्रभुं विचित्र ताण्डवप्रियं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं ।।
भक्तवत्सलंस्थितं समस्त लोकविग्रहं ।।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिंकिणी लसत्कटिं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।

धर्मसेतूपालकं त्वधर्म मार्गनाशकं ।।
कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं ।।
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांग मण्डलं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं ।।
नित्यमद्वितीयभिष्टदैवतं निरंजनम्‌।।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।

अट्‍टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं ।।
दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनं ।।
अष्टसिद्धिदायकं कपालमालकन्धरं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।

भूतसंघनायकं विशालकीर्ति दायकं ।।
काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभूं ।।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।

काल भैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ।।
ज्ञानमुक्ति साधनं विचित्र पुण्यवर्धनं ।।
शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशनम् ।।
प्रयान्ति कालभैरवांध्रिंसन्निधिं नराध्रुवम् ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।

*श्रीमत् शंकराचार्य विरचित कालभैरवाष्टक संपूर्ण ।।*

*श्री कालभैरवाष्टक*

*श्री गणेशाय नमः*

*श्री कालभैरवाय नमः*

श्री शिवांशपूर्ण आदि मध्य अंत ज्या नसे,
बाह्य जया नसे उपाधि चार गर्जती असे ।
निर्गुणा निरंकुशा निरंजना निरंतरा,
श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ १ ॥

विश्र्वसुत्रचालका असंख्य लोक पालका,
ज्ञान दीपका अनादि धर्म मार्ग रक्षका ।
व्यापूनी स्थिराचरा अलिप्त जो सदा खरा,
श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ २ ॥

भूतनायका कृतांत कर्म दर्प नायका,
शूल दंड जो धरी करी पिनाककार्मुका ।
भीमविक्रमा प्रचंड शक्ती धारका परा,
श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ ३ ॥

यच्छिरी जटा गळ्यांत भक्तरुंडमालिका,
रत्नपादुकापदीं विचित्र वेषधारका ।
यत्प्रकाश दिपवी अनंतकोटी भास्करा,
श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ ४ ॥

इंदुमित्र वन्हिनेत्र तीन ज्या त्रिलोचना,
शामकाय निळकंठ मोहजाळ मोचना ।
घोरपापसंहार अशा शशांक शेखरा,
श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ ५ ॥

भ्राति भीती नाशना भुजंग भस्मभूषणा,
आदिकारणा भवाब्धितारणा सनातना ।
अक्षया निरामया दयाकरा दिगंबरा,
श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ ६ ॥

भक्तकार्य कल्पवृक्ष दक्ष भक्तरक्षणी,
नित्य साक्ष सोज्वलाक्ष शुद्ध शांत जो क्षणीं ।
भक्तवत्सला स्वभक्तभाव दृष्टिगोचरा,
श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ ७ ॥

शाश्र्वता अनादि दैवता त्रिताप हारका,
श्रांत वर्णिता फणीन्द्र चारही तशी सहा ।
नारदादि योगिवंद्द वंद्दही सुरासुरा,
श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ ८ ॥

वाचितां त्रिकाल नेम कालभैरवाष्टका,
प्राप्त होय भुक्ति मुक्ति सत्य नीत पाठका ।
इच्छितार्थ दे समर्थ साह्यहो पदोपदी,
दास मी मलीन लीन भैरवाचि या पदी ॥ ९ ॥

*इति कालभैरवाष्टक संपूर्ण*

*ॐ महाकाल भैरवाय नम:*

जलद् पटलनीलं दीप्यमानोग्रकेशं,
त्रिशिख डमरूहस्तं चन्द्रलेखावतंसं!

विमल वृष निरुढं चित्रशार्दूळवास:,
विजयमनिशमीडे विक्रमोद्दण्डचण्डम्!!

सबल बल विघातं क्षेपाळैक पालम्,
बिकट कटि कराळं ह्यट्टहासं विशाळम्


!

करगतकरबाळं नागयज्ञोपवीतं,
भज जन शिवरूपं भैरवं भूतनाथम्!!

*भैरव स्तोत्र*

यं यं यं यक्ष रूपं दशदिशिवदनं भूमिकम्पायमानं।
सं सं सं संहारमूर्ती शुभ मुकुट जटाशेखरम् चन्द्रबिम्बम्।।
दं दं दं दीर्घकायं विकृतनख मुखं चौर्ध्वरोयं करालं।
पं पं पं पापनाशं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम्।।

रं रं रं रक्तवर्ण कटक कटितनुं तीक्ष्णदंष्ट्राविशालम्।
घं घं घं घोर घोष घ घ घ घ घर्घरा घोर नादम्।।
कं कं कं काल रूपं घगघग घगितं ज्वालितं कामदेहं।
दं दं दं दिव्यदेहं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम्।।

लं लं लं लम्बदंतं ल ल ल ल लुलितं दीर्घ जिह्वकरालं।
धूं धूं धूं धूम्र वर्ण स्फुट विकृत मुखं मासुरं भीमरूपम्।।
रूं रूं रूं रुण्डमालं रूधिरमय मुखं ताम्रनेत्रं विशालम्।
नं नं नं नग्नरूपं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम्।।

वं वं वं वायुवेगम प्रलय परिमितं ब्रह्मरूपं स्वरूपम्।
खं खं खं खड्ग हस्तं त्रिभुवननिलयं भास्करम् भीमरूपम्।।
चं चं चं चालयन्तं चलचल चलितं चालितं भूत चक्रम्।
मं मं मं मायाकायं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम्।।

खं खं खं खड्गभेदं विषममृतमयं काल कालांधकारम्।
क्षि क्षि क्षि क्षिप्रवेग दहदह दहन नेत्र संदिप्यमानम्।।
हूं हूं हूं हूंकार शब्दं प्रकटित गहनगर्जित भूमिकम्पं।
बं बं बं बाललील प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम्।।

ॐ तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांत दहन प्रभो!
भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञां दातु महर्षि!!

*अष्टभैरव ध्यानस्तोत्रम्*

भैरवः पूर्णरूपोहि शङ्करस्य परात्मनः ।
मूढास्तेवै न जानन्ति मोहिताः शिवमायया ॥

ॐ हं षं नं गं कं सं खं महाकालभैरवाय नमः ।

*नमस्कार मंत्रः*

ॐ श्रीभैरव्यै, ॐ मं महाभैरव्यै, ॐ सिं सिंहभैरव्यै,
ॐ धूं धूम्रभैरव्यै, ॐ भीं भीमभैरव्यै, ॐ उं उन्मत्तभैरव्यै,
ॐ वं वशीकरणभैरव्यै, ॐ मों मोहनभैरव्यै ।

*अष्टभैरव ध्यानम्*

असिताङ्गोरुरुश्चण्डः क्रोधश्चोन्मत्तभैरवः ।
कपालीभीषणश्चैव संहारश्चाष्टभैरवम् ॥

१) असिताङ्गभैरव ध्यानम् ।
रक्तज्वालजटाधरं शशियुतं रक्ताङ्ग तेजोमयं
अस्ते शूलकपालपाशडमरुं लोकस्य रक्षाकरम् ।
निर्वाणं शुनवाहनन्त्रिनयनमानन्दकोलाहलं
वन्दे भूतपिशाचनाथ वटुकं क्षेत्रस्य पालं शिवम् ॥ १॥

२) रूरुभैरव ध्यानम् ।
निर्वाणं निर्विकल्पं निरूपजमलं निर्विकारं क्षकारं
हुङ्कारं वज्रदंष्ट्रं हुतवहनयनं रौद्रमुन्मत्तभावम् ।
भट्कारं भक्तनागं भृकुटितमुखं भैरवं शूलपाणिं
वन्दे खड्गं कपालं डमरुकसहितं क्षेत्रपालन्नमामि ॥ २॥

३) चण्डभैरव ध्यानम् ।
बिभ्राणं शुभ्रवर्णं द्विगुणदशभुजं पञ्चवक्त्रन्त्रिनेत्रं
दानञ्छत्रेन्दुहस्तं रजतहिममृतं शङ्खभेषस्यचापम् ।
शूलं खड्गञ्च बाणं डमरुकसिकतावञ्चिमालोक्य मालां
सर्वाभीतिञ्च दोर्भीं भुजतगिरियुतं भैरवं सर्वसिद्धिम् ॥ ३॥

४) क्रोधभैरव ध्यानम् ।
उद्यद्भास्कररूपनिभन्त्रिनयनं रक्ताङ्ग रागाम्बुजं
भस्माद्यं वरदं कपालमभयं शूलन्दधानं करे ।
नीलग्रीवमुदारभूषणशतं शन्तेशु मूढोज्ज्वलं
बन्धूकारुण वास अस्तमभयं देवं सदा भावयेत् ॥ ४॥

५) उन्मत्तभैरव ध्यानम् ।
एकं खट्वाङ्गहस्तं पुनरपि भुजगं पाशमेकन्त्रिशूलं
कपालं खड्गहस्तं डमरुकसहितं वामहस्ते पिनाकम् ।
चन्द्रार्कं केतुमालां विकृतिसुकृतिनं सर्वयज्ञोपवीतं
कालं कालान्तकारं मम भयहरं क्षेत्रपालन्नमामि ॥ ५॥

६) कपालभैरव ध्यानम् ।
वन्दे बालं स्फटिकसदृशं कुम्भलोल्लासिवक्त्रं
दिव्याकल्पैफणिमणिमयैकिङ्किणीनूपुरञ्च ।
दिव्याकारं विशदवदनं सुप्रसन्नं द्विनेत्रं
हस्ताद्यां वा दधानान्त्रिशिवमनिभयं वक्रदण्डौ कपालम् ॥ ६॥

७) भीषणभैरव ध्यानम् ।
त्रिनेत्रं रक्तवर्णञ्च सर्वाभरणभूषितम् ।
कपालं शूलहस्तञ्च वरदाभयपाणिनम् ॥

सव्ये शूलधरं भीमं खट्वाङ्गं वामकेशवम् ।
रक्तवस्त्रपरिधानं रक्तमाल्यानुलेपनम् ।
नीलग्रीवञ्च सौम्यञ्च सर्वाभरणभूषितम् ॥

नीलमेख समाख्यातं कूर्चकेशन्त्रिनेत्रकम् ।
नागभूषञ्च रौद्रञ्च शिरोमालाविभूषितम् ॥

नूपुरस्वनपादञ्च सर्प यज्ञोपवीतिनम् ।
किङ्किणीमालिका भूष्यं भीमरूपं भयावहम् ॥ ७॥

८) संहारभैरव ध्यानम् ।
एकवक्त्रन्त्रिनेत्रञ्च हस्तयो द्वादशन्तथा ।
डमरुञ्चाङ्कुशं बाणं खड्गं शूलं भयान्वितम् ॥

धनुर्बाण कपालञ्च गदाग्निं वरदन्तथा ।
वामसव्ये तु पार्श्वेन आयुधानां विधन्तथा ॥

नीलमेखस्वरूपन्तु नीलवस्त्रोत्तरीयकम् ।
कस्तूर्यादि निलेपञ्च श्वेतगन्धाक्षतन्तथा ॥

श्वेतार्क पुष्पमालाञ्च त्रिकोट्यङ्गणसेविताम् ।
सर्वालङ्कार संयुक्तां संहारञ्च प्रकीर्तितम् ॥ ८॥

*इति श्रीभैरव स्तुति निरुद्र कुरुते*

*इति अष्टभैरव ध्यानस्तोत्रं सम्पूर्णम्*

*आरती काळभैरवाची*

आरती ओवाळू भावे, काळभैरवाला ।।
दीनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ।।
देवा, प्रसन्न हो मजला ।।धृ।।
धन्य तुझा अवतार जगीं या, रौद्ररूपधारी ।
उग्र भयंकर भव्य मूर्ती परि, भक्तासी तारी ।
काशीक्षेत्री नास तुझा तूं, तिथला अधिकारी ।
तुझिया नामस्मरणे पळती, पिशाच्चादि भारी ।।
पळती, पिशाच्चादि भारी ।।आरती…।।

उपासकां वरदायक होसी, ऐसी तव किर्ती ।
क्षुद्र जीवा मी अपराध्यांना, माझ्या नच गणती ।
क्षमा करावी कृपा असावी, सदैव मजवरती ।
मिलिंदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ।।
देवा, घडो तुझी भक्ती ।।आरती…।।

( लेख पंडित अजय जंगम यांच्या सौजन्याने )लL


 

Leave a Reply

Your email address will not be published.