जया एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : १२ फेब्रुवारी २०२१ moderator February 11, 2021 दिनविशेष माघ शुक्लपक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! आता तुला जया एकादशी व्रताचे माहात्म्य सांगतो ते चित्त देऊन ऐक. पूर्वी एकदा इंद्र पाताळातील नाग लोकींचे राज्य करीत होता. देव, गंधर्व, अप्सरादि त्याचा सर्व परिवार त्याच्या बरोबर होता. तेथे ते सर्व आनंदाने अमृत पिऊन वास्तव्य करीत होते. त्या ठिकाणी एक मनोहर नंदनवन होते वसंतत्तु आंला असताना एके दिवशी इंद्र त्या वनांतील सुंदर अशा जागी देवासंह जाऊन बसला त्यावेळी गंधर्व गायन करु लागले व अप्सराही नृत्य करु लागल्या. त्यात चित्रसेन गंधर्वाची पुष्पवती नांवाची एक तरुण मुलगी रुपाने अत्यंत सुंदर होती. प्रत्यक्ष कामदेव तिचे स्वरुप पाहून लाजत असे, ती नृत्य करीत असताना तिची नजर एकाएकी पुष्पदंताच्या माल्यवान नांवाच्या तरुण मुलावर गेली, तेव्हा तिला अत्यंत आनंद झाला. याच्याकडे ती एक सारखी टक लाऊन पाहू लागली स्मित हास्य करु लागली, माल्यवानाही तिच्याकडे आकर्षित झाला, पण त्याक्षेधांची नेत्रपल्लवी इंद्राच्या लक्षात आली. इंद्रदेव संतापला व आपल्या दरबारातील कार्यक्रम बिघडवला म्हणून त्याने दोघांसही शाप दिला. माझ्या दरबारात प्रेमालाप केल्याबद्दल तुम्हा दोघांनाही पिशाच्च योनी प्राप्त होईल व मृत्युलोकात भटकात फिराल असा शाप दिला. दोघांनाही इंद्राची क्षमा मागितली पण इंद्राने उःशाप दिला नाही. शापा प्रमाणे दोघेही पिशाच्च होऊन पृथ्वीवर अवतरली. दोघे ही फिरत फिरत हिमालय पर्वतावर आली तेथील अति थंडी प्रवसाचा शीण व मृत्युलोकात त्याना हरे असलेले अन्न न मिळाल्या मुळे ती थकून गेली. दोघे ही अश्वत्थ वृक्षाखाली विश्रांतीला थांबली. आता त्याना दरबाराची शिसा बिंघडवलाचा पश्चात्ताप ही होत होता. पण त्यांचे प्रेम अबाधित होते. पुण्यवती म्हणाली आपण आज स्थेच थांबू उपवास करु व सर्वदिवस भगवंताच्या चिंतनात घालवू. त्या प्रमाणे दोघेही तपाला बसली, तो दिवस होता जया एकादशी माघ शुक्ल एकादशी तप व उपास यामुळे दुसरे दिवशी दोघे पहातात तो त्यांचे पिशाच्य शरीर नष्ट होईन पूर्णीचे शरीर प्राप्त झालेले दिसले. दोघेही शुचिर्भूत होऊन फलाहार करून इंद्राच्या दरबाराच इतर झाली त्याना पाहताच इंद्रही आश्चर्य चकित झाला. तो म्हणाला,” माझ्या शापाने आपण पिशाच्च योनीला गेला होता पण तेथून आपली मुक्तता कोणत्या देवाने केली हे मला लवकर सांगा. इंद्राचा हा प्रश्न ऐकून तो म्हणाला की, “हे देवेद्रा ! माझ्याकडून जया एकादशी व्रताचे आचरण (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) घडले म्हणून माझी पिशाच्च योनीतून तत्काळ मुक्तता झाली व मी तुझ्याजवळ आलो.” त्यांचे हे भाषण ऐकून इंद्र आपल्या जागेवरुन उठला आणि त्याला भक्तिपूर्वक भेटला. व म्हणाला की, “हे माल्यवान ! तू खरोखर धन्य आहेस, कारण तुझ्याकडून एकादशीव्रताचे आचरण घडले. माघ शुक्लपक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. जया एकादशी माहात्म्य युधिष्ठिराने श्रीकृष्णाला माघ शुक्ल एकादशीचे माहात्म्य विचारले असता तो म्हणाला, “धर्मा ! या एकादशीला जया म्हणतात. ही मनुष्याचे ब्रह्महत्यादी तीव्र पातक नष्ट करणारी, त्याला निष्पाप व पवित्र करून इच्छिलेले देणारी, पिशाचत्वाचा नाश करणारी व मोक्ष देणारी आहे. हिचे व्रत करणाऱ्याचे उदंड कल्याण होते. आता हिचे माहात्म्य सांगणारी कथा निवेदन करतो. ती श्रवण-पठण केल्याने अग्निष्टोम यज्ञाचे फल मिळते. एकदा देवराज इंद्र स्वर्गातील नंदनवनात क्रीडा करण्यासाठी आला होता. त्याचे मनोरंजन करण्यासाठी गंधर्व गायन करीत आणि असंख्य अप्सरा उत्कृष्ट नृत्य सादर करीत होत्या. गंधवांमध्ये चित्रसेनाचा नातू माल्यवान व पुष्पवरती नावाची एक गंधर्वी उपस्थित होती. त्या दोघांची दृष्टिभेट झाली तेव्हा ते परस्परांवर इतके आकृष्ट झाले की एकमेकांकडे पाहतच राहिले. त्यांचे मन थाऱ्यावर राहिले नाही. आपण देवराजाच्या कार्यक्रमात गायन करीत आहोत याचेही भान राहिले नाही. त्यांच्याकडून गायनात सारख्या चुका होऊ लागल्या. सूर, ताल, लय व नृत्य सगळ्याचाच विरस झाला. त्यामुळे इंद्राला संताप आला. त्याने दोघांचा धिक्कार केला व शाप दिला- “तुम्ही मृत्युलोकात पिशाचदम्पती होऊन या दुष्कर्माचे फळ भोगाल!” त्यामुळे माल्यवान व पुष्पवती यांना पिशाचयोनी प्राप्त झाली. ते स्थानभ्रष्ट होऊन हिमालयात भ्रमण करू लागले. तेथील बर्फाळ थंडीमुळे त्यांना भीषण दुःख सहन करावे लागत होते. ती स्थिती त्यांच्यासाठी नरकासमानच होती. ते दोघे आपल्या प्रमादाला दोष देत प्रत्येक दिवस मोठ्या कष्टाने घालवीत होते. पुढे माघ शुक्ल एकादशी आली. त्या पावन तिथीस त्या दोघांनी कोणतीही हिंसा केली नाही व अन्नपाणीही घेतले. ते अगतिक होऊन एका पिंपळाखाली नुसते पडून राहिले. त्या रात्री त्यांना झोपही आली नाही. अशा प्रकारे त्यांच्याकडून अनायासे जया एकादशीचे व्रत घडले. भगवान विष्णूची त्यांच्यावर कृपा झाली. त्यांचे पिशाचत्व नाहीसे होऊन पुन्हा पूर्वीचे रूप लाभले. ते विमानातून स्वर्गलोकी गेले. त्यांनी इंद्राला भेटून सर्व वृत्तान्त सांगितला. त्यामुळे त्यालाही मोठे आश्चर्य वाटले. ‘तुम्ही विष्णुभक्त आम्हांला नित्य वंदनीय आहात. आता येथेच सुखाने राहा’- श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला भगवंता । जगत्स्वामिया आदिंदैवता । काय वर्णू तुझी श्रेष्ठता । तू अचिंत्य सर्वार्थे ।। १ ।। स्वेदज आणि अंडज । उद्भिज तैसेच जरायुज । अवघे भूतजात सहज । त्वा निर्मिले परमेशा ।।२।। तू सृष्टीचा जन्मदाता । तूच पालक क्षयकर्ता। हे श्रीकृष्णा सखया आता। अधिक आस पुरवावी ।।३।। षट्तिला एकादशी व्रत । कथन केले इतुक्यात । श्रवणइच्छा अजुनी मनात । जाणसी तू दयाघना ।।४।। तरी माघमासी शुक्ल पक्षात । जी एकादशी क्रमप्राप्त। तिचे माहात्म्यही मजप्रत । कृपा करुनी सांगावे ।।५।। सांगा मजसी नाव तियेचे । विधी कैसे करावयाचे । आणि या दिनी कोणत्या देवाचे । पूजन करावे भक्तीने ।।६।। तैं श्रीकृष्ण वदला धर्माप्रती। माघ शुक्ल एकादशी तिथी । अपार माहात्म्य म्हणुनी जगती। ‘जया’ नामे प्रख्यात ।।७।। पापानाशिनी मोक्षदायिनी । कामदा वरदा कल्याणी। पिशाचत्व विनाशिनी । ऐसी थोरवी तियेची ।।८।॥ या एकादशी समान । नसे अन्य तिथी पावन । ब्रह्महत्यादी पातकांपासून। मुक्त करते लवलाही ।।९।। हिच्या आचरणे मनुजाप्रत । नच अधोगती होय प्राप्त । म्हणुनी प्रयत्ने करावे व्रत । सद्भावे सद्भक्तीने ।।१०।। वैशिष्ट्यपूर्ण महिमान । त्याचे पद्मपुराणी विवेचन तेच पुनरपि आवर्जुन । तुजलागी सांगतो ।।११ ।। स्वर्गलोकी एके काळी। इंद्र अधिपती अतुर्बळी । तेणे समस्त देवमंडळी। सौख्य भोगती निरंतर ।।१२।। तयांसी नित्य अमृतपान । अप्सरा करिती मनोरंजन । सुशोभित नंदनवन । क्रीडास्थान ते सर्वांचे ।।१३।। एकदा शचीपती इंद्रही तेथ । क्रीडा कराया उपस्थित । सन्मुख अप्सरा असंख्यात । करीत होत्या नृत्यासी ।।१४।। पदलालित्य ठेका धरून । त्यात सुश्राव्य गंधर्व गायन । तेणे आसमंती मोद भरून । कार्यक्रम तो रंगला।। १५।। गंधवांत एक चित्रसेन ख्यात । पत्नी मालिनी त्यासमेत। पुत्र पुष्पवान, त्याचा सुत । माल्यवान तोही असे ।।१६।। नंदनवनी क्रीडा रंगली। तोच काय घटना घडली। गंधर्वी पुष्पवती मोहित झाली । माल्यवानाते पाहून ।।१७।। कामशराने विद्ध अतिशय । व्याकूळली ती नुरला उपाय । माल्यवानही करितो काय । नेत्रकटाक्षा पुढती त्या ।।१८।। हावभाव तियेचे पाहुनी। तोही सुखावला मनी । वश केला गंधर्वी अति घालून मोहिनी चतुर ती।। १९।। हे राजा, त्या पुष्पवरतीचे । वर्णितो रूप लावण्य साचे । तिचे हात जणू मदनाचे । कंठपाश वाटती ।।२०।। मुखरचंद्रमा मोहक छान । कमळासमान होते नयन । कानी कुंडले देदीप्यमान । ग्रीवा शोभे आभूषणे ।।२१ ।। स्तन उच्च ते पुष्ट अति । प्रती सुवर्ण कलश वाटती। उदर कृश तर कमर होती । डौलदार व नाजूक ।।२२।। नितंबही खास विस्तीर्ण । पाय कदली स्तंभासमान। रक्तवर्ण मोहक चरण। शोभायमान वाटती ।।२३।। पाहुनी लावण्य देहाकृती। माल्यवानही मोहित चित्ती । मदनपीडित उभयता ती। झाली आतुर मिलना ।।२४।। देवराजासी तोषविण्याला । जमला होता सारा मेळा । अप्सरांसह त्या वेळेला । गायन करीत दोघेही ।।२५।। परी पुष्पवती माल्यवान । या दोघांसी नुरले भान । तेणे होईना शुद्ध गायन । सुरावट ती विसकटली।।२६।। तधी तयांचे पाहुनी वर्तन । इंद्राने जाणले मनोमन । की यांचे अंतःकरण । एकमेकांत गुंतले ।।२७।। सुर-ताल चुकले व्यत्यय आला । कार्यक्रमाचा रंग बिघडला। तेणे तयाचा पारा चढला। क्रुद्ध झाला अंतरी ।।२८।। तो अपमान समजून। जळफळला मनोमन । सर्वादेखत धिकार करून । शाप दिधला भयंकर ।।२९।। वदला पुष्पवती, माल्यवान । तुम्ही दोघांनी येथे येऊन । मम आ्ञेचा भंग करून । केला आहे मूर्खपणा ।।३०।। त्या अपराधा दंड निश्चित । म्हणुनी शिक्षा सांगतो येथ । तुम्ही पिशाच-दम्पती रूपात । भोगा आपले कर्मफल ।।३१ । देवेन्द्रशापे अतिदुःखित । पिशाचत्व झाले प्राप्त । होउनिया स्थानभ्रष्ट। हिमालयी पातले ।।३२।। अजाणता प्रमाद घडला। त्याचा भलताच ताप झाला। शापित उभयता त्या वेळेला। विलाप करिती क्षणोक्षण ।।३३।। नीचयोनी प्राप्त म्हणून । गेले रुचि-स्पशर्शादी ज्ञान। त्यातच सर्वांगी दाह उफाळून। होती त्रस्त यातने ।।३४।। मिळेल ते भक्षण करून । निर्वाह करिती दिनोदिन गुहा पर्वतरांगा हिंडून । आली वेळ घालविती ॥३५|| निजकर्माचे दुःख सतत । व्यथा रात्रंदिन त्याच चिंतेत । निद्रासुखही यत्किंचित । उभयताते मिळेना ।।३६।। त्या अति दुर्गम हिमप्रांतात । शीतपीडा अतोनात। कडकडा वाजुनी दात । काटा येई अंगासी ।३७॥ ते दुःख असह्य होऊन। पिशाचरूप माल्यवान । अति अगतिक होऊन । काय बोलला भार्येते ।।३८।। म्हणे पातक केले कोणते । म्हणुनी भोग हे नशिबाते । पिशाचत्व हे मज वाटते । नरक निंद्य भयंकर ।।३९।। याचकरिता आवर्जून । करू नये पापाचरण । अन्यथा ऐसे येते जाण । भीषण दुःख वाट्याला ।।४०।। येणे पिशाच पतिपत्नी ती। नित्य क्लेश व्यथा भोगती। उद्धार कैसा होईल मोठी। चिंता तयां लागली । ।४१॥ पुढती दैवगती सुलट फिरली। भाग्यवश ‘जया’ तिथी आली। अति प्रख्यात ती प्राप्त झाली। माघ शुद्ध एकादशी ।।४२।। योगायोगाने त्या दिनी । आहार नच केला दोघांनी। अथवा किंचितही पाणी । नाही मुखी घातले ।।४३।। नच कोणाची हिंसा केली । पर्ण फले नच तोडून खाल्ली । दुःखव्याकूळ होउनी त्या वेळी । अश्वत्थतळवटी पहुडले ।।४४।। दिवस सरला रात्र आली । तैसी अधिक थंडी पडली । उभयता निश्चेष्ट झाली । गारठ्याने जागीच ।।४५।। ऊब प्राप्त व्हावी म्हणुनी। मिठी मारली त्या दोघांनी। एकमेकांते कवेत घेउनी। प्रयत्न केला बापुडा ।।४६।। परी थंडी अतिशय । होय निष्प्रभ तोही उपाय । रात्री जागरण, करतील काय । झाले व्यथित अत्यंत ।।४७ । हे धर्मराजा ! नृपश्रेष्ठा । ऐक पुढील नवल आता । ऐसे दुःख भोगता-भोगता । सरली रात्र भयंकर ।।४८।। दिवसभराचे उपोषण। रजनीसी जागरण। अशा प्रकारे दोघांकडून । घडले एकादशी व्रत ।।४९ ।। अन्य दिनी द्वादशी होती। तधी आली व्रतप्रचिती। श्रीविष्णूची कृपादृष्टी। वळली गेले हीनत्व ।।९० ।। माल्यवान पुष्पवती दोघांनाही। गंधर्व रूप प्राप्त लवलाही। चिंता क्लेश मिटुनी सर्वही । प्रेम प्रकटले पूर्वीचे ।।५१ ।। दिव्यालंकार विभूषित । अशी झाली पुनर्भेट । अप्सरांनी तेवढ्यात । विमान एक आणिले ।।५२।। मग उभयता त्यात बैसली। मनोरम स्वर्गलोकी गेली । गंधर्व तुंबरादी मंडळी । नित्य स्तविती त्या स्थला ।।५३ । तेथ देवेन्द्रासन्मुख जाऊन । त्या दोघांनी केले वंदन । तधी नवल ते पाहून । महाआश्चर्य मनी म्हणे ।।५४ ॥। उत्सुकतेने केली चौकशी ।। म्हणे पिशाचत्व तुम्हांसी। तरीही कैसे पूर्वदेहासी। प्राप्त झालात सांगावे ।।५५।। कवण पुण्यप्रभावे भली । घोर शापातून सुटका झाली । कोण दैवते धावुनी आली। सांगा सत्वर मजलागी।।५६।। उत्तरादाखल माल्यवान । म्हणाला प्रभो करितो कथन । वासुदेवाची कृपा म्हणून । गेले सकल दुर्दैव ।।५७।। जया एकादशीस भले। अजाणता व्रत घडले । त्या पुण्यप्रभावे सरले । पिशाचत्व ते दारुण ।।५८।। ते इतिवृत्त ऐकून। देवराज थक्क मनोमन । वदला तुम्ही आहात पावन । तेणे वंदनीय आम्हांसी।।५९।। कारण तुम्ही विष्णुभक्त । आचरिता एकादशी व्रत । येता तुमच्या सान्निध्यात । होती पवित्र अन्यही । ।६०।। जे-जे| कोणी हरिभक्त। जे-जे कोणी शिवभक्त । ते सर्वही आम्हांप्रत । पूज्य असती निःसंशय ।।६१ ।। आता ऐका मम विनंती। माल्यवान आणि पुष्पवती । यापुढे तुमची येथेच वस्ती । करा विहार स्वच्छंदे।।६२ ।। धर्मा ! जया एकादशी व्रत । याची प्रचिती थोर अत्यंत । ब्रह्महत्यादी दोष जातात। म्हणुनी करावे श्रद्धेने ।।६३। । ज्याने पावन व्रत हे केले । त्याचे अवघे दुरित निमाले । फल आपैसे प्राप्त सगळे । यज्ञ दान व तीर्थांचे ।।६४।। त्याते शतकोटी कल्पपर्यंत । वैकुंठगती सुनिश्चित । माहात्म्य श्रवण-पठणे मिळत। फल अग्निष्टोम यागाचे ।।६५।। ॥ इति श्रीभविष्योत्तरपुराणे माघशुक्लैकादश्याः जयानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।। ।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।॥। शुभं भवतु ! Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website