भाऊबीज : यमतर्पण विधी (संकल्पासह) Mandar Sant October 28, 2019 दिनविशेष अपमृत्यू , अपघात, शनी पीडा टाळणे , आजारपणं न यावीत यासाठी खालील यमतर्पण विधी नरक चतुर्दशीला तसेच यमद्वितीयेला अर्थात भाऊबीजेला करणे अतिशय फायद्याचे असते, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. देवतीर्थावरून तर्पण करताना पितृतीर्थावरून पाणी देताना यासाठी आपली स्थिती वर दिलेल्या सारणी ( Table ) मध्ये दिलेल्याप्रमाणे असावी. व त्याच पद्धतीने तर्पण करावे. यासाठी दक्षिण दिशेकडे तोंड करून खालील संकल्प करावा करावा, *संकल्प* – अद्य श्री ब्रह्मणः द्वितीये परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे जंबुद्विपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्येदेशे वर्तमानव्यावहारिके विकरीनाम्नि संवत्सरे दक्षिणायने शरदऋतौ आश्विनमासे कृष्णपक्षे चतुर्दश्यां तिथौ भौमवासरे विशाखा नक्षत्रे आयुष्मान योगे बालवकरणे वृश्चिकराशीस्थिते श्री चंद्रे, स्वाती नक्षत्र स्थिते श्री सूर्ये वृश्चिकराशीस्थिते श्री देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु ‘अमुक’ गोत्रस्य ‘अमुक’ नाम्ना अहं, मम आत्मनः श्रुतिस्मृतीपुराणोक्त फलप्राप्तिद्वारा अपमृत्यु निवारणपूर्वक शनैश्चरादि ग्रहपीडा परिहारद्वारा श्री यमस्वरूपी परमेश्वर प्रीत्यर्थं चतुर्दश नाममंत्रैः यमतर्पणाख्यं कर्म करिष्ये ।। यानंतर यमदेवांसाठी खाली दिलेल्या १४ नावांनी तळहातावरून पाणी सोडावे. प्रत्येक पुरुषाने आपल्या कुटुंबासाठी हा विधी अवश्य करावा. यम तर्पण विधी नंतर….. खालील श्लोक दक्षिणेकडे तोंड करून यमदेवांचे स्मरण करून व नमस्कार करून दहा वेळा म्हणावा (श्लोक) – यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः । भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतांत एतत् दशभिर्जपंति ।। Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website