भौम हे मंगळाचे मूळ नाव होय. भूमी म्हणजे पृथ्वी चा पुत्र म्हणून त्याला भौम असे नाव आहे. मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाला भौम प्रदोष अशी संज्ञा आहे . भौम प्रदोष हे व्रत अर्थ प्राप्ति व कर्जमुक्ती साठी केले जाते. तसेच भगवान शंकरास प्रसन्न करून घेण्यासाठीही हे व्रत केले जाते. मंगळवारी त्रयोदशी तिथी आली असता भौम प्रदोष होतो.
भौम प्रदोष व्रत करणाऱ्यांनी या लेखाच्या शेवटी दिलेल्या “दारिद्र्यदु:ख दहन” स्तोत्राचे १० – १८ – ३६ – १०८ अश्या संख्येत जमतील तेवढे पाठ शक्यतो प्रदोष काळात यथा शक्ती व श्रद्धा पूर्वक करावेत .
प्रदोष व्रताला वैदिक हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अत्यंत प्रशंसनीय व सर्वांना अधिकार असलेले हे व्रत आहे. आपल्या वर्तमान स्थितीला आपला पाप पुण्याचा संचय कारणीभूत असतो. अशी हिंदू वैदिक धर्माची पूर्ण श्रद्धा आहे.
“प्रकर्षेण दोषान हरति इति प्रदोष:” थोडक्यात जो प्रकर्षाने दोषांचा अर्थात सांची पापांचा नाश करतो त्याला प्रदोष अशी संज्ञा आहे.
— विविध प्रकारच्या आर्थिक समस्या
— पैसे शिल्लक न पडणे
— डोक्यावर कर्जाचा भार वाढत रहाणे
— कर्ज बराच काळ न फिटणे
आदी अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांवर भौम प्रदोष व्रत निश्चित फलदायी ठरते असा बहुतांश लोकांचा अनुभव आहे.
========================================================== ==========
प्रदोष व्रत :
“प्रदोष व्रत” म्हणजे प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला करावयाचे एक व्रत आहे. प्रदोष वेळेस हे व्रत आचरितात म्हणून यास प्रदोषव्रत असे म्हणतात. हे भगवान शंकराचे व्रत आहे. हे व्रत करणार्याने, त्या दिवशी सकाळपासून उपवास करावयाचा असून सायंकाळी सूर्यास्ताचे वेळी आंघोळ करावयाची असते. त्यानंतर, शिवाची षोडशोपचार पूजा करावयाची असते. किमान २१ महिने वा २१ वर्षे हे व्रत करावयाचे असते.
प्रदोष वेळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्तापासूनची पुढे ३ घटिकापर्यंतची (सुमारे १ तास १२ मिनिटे) वेळ होय.
प्रदोष व्रत महात्म्य :
शांडिल्य ऋषींनी एकदा एका दरिद्री मुलाच्या मातेस सांगितले भगवान शंकराची प्रदोषकाळी पूजा केली कि त्याचे चांगले फळ मिळते. जो कोणी प्रदोषकाळी शिव सेवा करेल तो या जन्मी धनवान होतो. तुझा मुलगा पूर्व जन्मी ब्राम्हण होता, त्याने आपले संपूर्ण जीवन दान धर्माशिवाय व्यतीत केले, आणि म्हणून तो या जन्मी दरिद्री आहे, आणि तो दोष घालवण्यासाठी आता त्यला भगवान शंकराला शरण जाऊन त्यांची सेवा करण्यास सांग. त्याची सेवा आणि स्तोत्र मी सांगतो ते त्याने केले तर त्याचे या जन्मातील दारिद्र्य नष्ट होऊन तो धनवान होईल.
प्रदोष व्रत विधी :
यादिवशी सकाळी शुचिर्भूत होवून स्नान [ व करत असल्यास संध्या ] झाल्यावर पुढील संकल्प शंकर पार्वती यांना उद्देशून करावा
” मम आत्मन: श्रुती-स्मृती-पुराणोक्त फलप्राप्ती द्वारा समस्त ऋणपरिहारद्वारा प्रचूर धन्प्रप्त्यार्थम श्री भवानीशंकरमहारुद्रदेवताप्रीत्यर्थम भौमप्रदोष व्रतमहम करिष्ये “
या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून रात्री शिव उपासना झाल्यावर उपवास सोडवा .
शिव उपासना प्रदोष काळात करावी. म्हणजेच संध्याकाळ आणि रात्र या मधील काळात शिव उपासना करण्यास सांगितले गेले आहे.
या काळात स्नान करून पांढरे शुचिर्भूत वस्त्र परिधान करावे.ज्या ठिकाणी पूजा करणार असेल ती जमीन स्वच्छ करून त्यावर पांढरे वस्त्र ठेवावे ,नंतर भगवान शंकराची यथासांग पूजा करावी आणि
डोळे मिटून मनात अशी कल्पना करा कि
तुमच्या समोर एक सुंदर कमळाचे फुल आहे.
ते कमळ पूर्ण नव शक्तींनी परिपूर्ण आहे,
त्याच कमळामध्ये भगवान शंकराची प्रतिमा डोळ्यासमोर आणा.
कमळाची मधील पाकळी म्हणजे शंकराचा तिसरा डोळा ,
बाजूच्या वक्र पाकळ्या म्हणजे त्याचे दोन डोळे ….
मधील कळीच्या खालील देठा वर त्याचा नीलमणी आहे ….
मस्तकावर सुंदर चंद्रकोर आहे …
गळ्यातील नाग म्हणजे सुंदर फुलांच्या माळा आहेत
अशी प्रतिमा डोळ्यासमोर आणून भगवान शंकराचे ध्यान करा
तुम्हाला शंकराचा जो कोणता मंत्र येत असेल तो म्हणा..
पण शंकराची ध्यानात शंकराची अशीच प्रतिमा डोळ्यासमोर राहुदेत …तु
मचा मंत्र म्हणून झाला कि त्यांना भावपूर्णतेने शरण जा आणि प्रार्थना करा….!
प्रार्थना :
“हे देवाधीश महादेवा…तू सर्व देवतांचा देव आहेस , मी तुला शरण आलो आहे, साक्षात तूच माझा आत्मा असून, माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषयभोग म्हणजेच तुमची पूजा असून झोप हि समाधी होय. माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वाना तू क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा तुझा जय जय कर असो ! “
यानंतर श्री शिव शंकरांना दहीभाताचा नैवेद्य दाखवावा. आणि त्यानंतर उपवास सोडावा.
‘अर्कप्रदोष’ हे आयुरारोग्यवृद्धीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे. रविवारी त्रयोदशी तिथी आली असता अर्कप्रदोष होतो.
‘सोमप्रदोष’ हे आनंद, शांतिरक्षणासाठी व पारमार्थिक कल्याणासाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.सोमवारी त्रयोदशी तिथी आली असता सोमप्रदोष होतो.
भौमप्रदोष हे कर्जमुक्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे. मंगळवारी त्रयोदशी तिथी आली असता भौममप्रदोष होतो.
सौम्यप्रदोष सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होण्यासाठी करण्यात येणारे एक प्रकारचे व्रत आहे. बुधवारी त्रयोदशी तिथी आली असता सौम्यप्रदोष होतो.
बृहस्पतिप्रदोष अथवा गुरुप्रदोष व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो, अशी धार्मिक कल्पना आहे.. पुराणातल्या एका कथेनुसार गुरुप्रदोष व्रताच्या साहाय्याने इंद्राने वृत्रासुरावर विजय प्राप्त केला होता. गुरुवारी त्रयोदशी ही तिथी आली असता, तो दिवस बृहस्पतिप्रदोष होतो, आणि त्या दिवशी त्याच नावाचे व्रत करतात.
भार्गवप्रदोष हे व्रत धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्ति साठी केले जाते. तसेच भगवान शंकरास प्रसन्न करून घेण्यासाठीही हे व्रत केले जाते.शुक्रवारी त्रयोदशी तिथी आली असता शुक्रप्रदोष होतो.
शनिप्रदोष हे पुत्रसंततिप्राप्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे व्रत आहे. शनिवारी प्रदोष म्हणजे त्रयोदशी असतांना शनिप्रदोष होतो.
आणि खालील “स्कंद पुराणातील” स्तोत्र मोठ्या श्रद्धेने पठण करा.
असे केल्याने आपण दारिद्र्य मुक्त व्हाल ..
जय देव जगन्नाथ, जय शंकर शाश्वत।
जय सर्व-सुराध्यक्ष, जय सर्व-सुरार्चित ! ।।
जय सर्व-गुणातीत, जय सर्व-वर-प्रद !
जय नित्य-निराधार, जय विश्वम्भराव्यय ! ।।
जय विश्वैक-वेद्येश, जय नागेन्द्र-भूषण !
जय गौरी-पते शम्भो, जय चन्द्रार्ध-शेखर ! ।।
जय कोट्यर्क-संकाश, जयानन्त-गुणाश्रय !
जय रुद्र-विरुपाक्ष, जय चिन्त्य-निरञ्जन ! ।।
जय नाथ कृपा-सिन्धो, जय भक्तार्त्ति-भञ्जन !
जय दुस्तर-संसार-सागरोत्तारण-प्रभो ! ।।
प्रसीद मे महा-भाग, संसारार्त्तस्य खिद्यतः।
सर्व-पाप-भयं हृत्वा, रक्ष मां परमेश्वर ! ।।
महा-दारिद्रय-मग्नस्य, महा-पाप-हृतस्य च।
महा-शोक-विनष्टस्य, महा-रोगातुरस्य च।।
ऋणभार-परीत्तस्य, दह्यमानस्य कर्मभिः।
ग्रहैः प्रपीड्यमानस्य, प्रसीद मम शंकर ! ।।
————————————————————————-
पठणाकरिता दारिद्र्यदुःखदहन स्तोत्र ।।
======================
विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय
कर्णामृताय शशिशेखरधारणाय।
कर्पूरकांतिधवलाय जटाधराय
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय ॥1॥
गौरीप्रियाय रजनीशकलाधराय
कालान्तकाय भुजंगाधिपकङ्कणाय।
गङ्गाधराय गजराजविमर्दनाय ॥
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय . ॥2॥
भक्तिप्रियाय भवरोगभयापहाय
उग्राय दुर्गभवसागरतारणाय।
ज्योतिर्मयाय गुणनामसुनृत्यकाय ॥
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय॥3॥
चर्माम्बराय शवभस्मविलेपनाय
भालेक्षणाय मणिकुण्डलमण्डिताय।
मञ्जीरपादयुगलाय जटाधराय ॥
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय॥4॥
पञ्चाननाय फणिराजविभूषणाय
हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय।
आनंतभूमिवरदाय तमोमयाय ॥
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय ॥5॥
भानुप्रियाय भवसागरतारणाय
कालान्तकाय कमलासनपूजिताय।
नेत्रत्रयाय शुभलक्षणलक्षिताय ॥
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय ॥6॥
रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय
नागप्रियाय नरकार्णवतारणाय।
पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय॥
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय ॥7॥
मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय
गीतप्रियाय वृषभेश्वरवाहनाय।
मातङग्चर्मवसनाय महेश्वराय ॥
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय ॥8॥
वसिष्ठेन कृतं स्तोत्रं सर्वरोगनिवारणम्।
सर्वसम्पत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम्।
त्रिसंध्यं यः पठेन्नित्यं स हि स्वर्गमवाप्नुयात्
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय ॥9॥
खूप छान माहिती सांगितली आवण सर
धन्यवाद !! महेश जी
धन्यवाद !! किरण
खूप सुंदर माहिती संकलित केलेल आहे..
धन्यवाद.