साप्ताहिक राशीभविष्य १५ ते २१ मार्च २०२१

*ऊँ नम:शिवाय*

*मेष साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील पण खर्च देखील जास्त प्रमाणात होतील. नोकरी-व्यवसायात अपेक्षित फलप्राप्ती. या सप्ताहात शत्रू पीडा संपतील.विद्यार्थी वर्गाला नविन कार्यारंभास अनुकूल.महिलांना गुंतवणूकीस उत्तम काळ. उपासना – देवी कवच स्तोत्राचा पाठ करावा.

*वृषभ साप्ताहिक राशिभविष्य :  १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : नोकरी-व्यवसायात कामना पूर्तीचा आठवडा.कौटुंबिक जीवनात अपेक्षा बळावतील.युवकांना वैवाहिक योग संभवतात.महिला वर्गाला अपेक्षा पूर्तीचा काळ. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. उपासना – सूर्यमंडल स्तोत्र वाचावे.

*मिथुन साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश :आर्थिक स्थिती उत्तम राहील.सप्ताहात त्वचाविकार व पित्तविकार डोके वर काढतील.नोकरी-व्यवसायात अधिकारी वर्गाकडून मनस्ताप संभवतो.खर्चावर संयम आवश्यक.विद्यार्थी वर्गाला विद्याभ्यासात यशस्वी सप्ताह. उपासना -नारायण कवच पठण करावे .

*कर्क साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : प्रतिष्ठा मिळवून देणारा आठवडा. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील व मन प्रफुल्लित होईल. व्यावसायीक क्षेत्रातील व्यक्तिंचा उगवता काळ.विद्यार्थी वर्गाला समाधानकारक कालावधी. मात्र ,प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीची प्रचिती या आठवड्यात येईल. उपासना- विष्णु सहस्रनाम पठण करावे.

*सिंह साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : या सप्ताहात आरोग्याच्या समस्या भेडसावतील. संतती सौख्याचे क्षण देखील अनुभवाल.अपेक्षित कामे पूर्ण होतील.अधिकारी वर्गाला प्रवासाचे योग. महिलांना प्रगतीचा आठवडा.
उपासना – दुं दुर्गायै नमः हा जप करावा.

*कन्या साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : हा आठवडा प्रसन्नता देणारा आहे.मानसिक समाधान मिळेल.कामात उत्साह वाढेल.महिलांना कामात फायदेशीर कालावधी. पचनसंस्थेच्या किरकोळ तक्रारी संभवतात त्यामुळे खाण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी अनुकूल आठवडा.
उपासना- दररोज नमो नारायणाय मंत्राचा जप करावा .

*तुळ साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : हा आठवडा मनोबल वाढवणारा असेल परंतू शत्रुपीडा डोके वर काढतील . कारण नसताना मनस्ताप संभवतात. नोकरदार वर्गाला समाधानकारक आठवडा.विद्यार्थ्यांना सुयश मिळवून देणारा काळ. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील व समस्येवर योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्ती भेटतील.
उपासना- दररोज -हीं दुर्गायै नमः मंत्राचा जप करावा.

*वृश्चिक साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : जोडीदारासोबत वाद- विवादाचा आठवडा.महिला वर्गाला खर्चाचे योग संभवतात.काही प्रमाणात शासकिय कामात अडचणी.अनपेक्षित खर्चाचा काळ. आपले मन व वाणीवर या आठवड्यात संयम ठेवणे आवश्यक आहे. संततीसंबंधात चिंता भेडसावतील.
उपासना- दररोज नमः शिवाय मंत्राचा जप करावा. 
परिणाम सकारात्मक राहतील. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम राहील आणि जे विद्यार्थी उच्च शिक्षण करत आहे त्यांना उत्तम परिणाम मिळू शकतात. 

*धनु साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : राजकीय व्यक्तिंना प्रतिष्ठा वाढवणारा आठवडा.या आठवड्यात चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याने महत्वाचे निर्णय पुढे ढकलणे योग्य राहील.महिलांच्या तब्येतीच्या तक्रारी संपतील. वैचारिक समतोल ठेवल्यास काळ अनुकूल राहिल.
उपासना- व्यंकटेश स्तोत्र वाचावे.

*मकर साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : कौटुंबिक सुखाचा आठवडा.सकारात्मक मनस्थिती राहील. काहींना वैचारिक जीवनात परिवर्तनाचा काळ.विद्यार्थ्यांनी लक्ष पूर्वक अभ्यास करावा. नोकरदार व्यक्तींच्या कष्टाचे चीज होईल. नोकरीत बढती किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळवून देणारा काळ.
उपासना – शिव सहस्रनाम स्तोत्र वाचावे.

*कुंभ साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : अपेक्षित आर्थिक लाभाचे प्रमाण राहिल.प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटींची शक्यता.संतती बाबत सकारात्मक घटना घडेल.महिलांना धनप्राप्तीचे योग. जिद्द व महत्वाकांक्षा या आठवड्यात वाढीस लागेल. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे.
उपासना- सूर्य कवच वाचावे.

शनिमहात्यम वाचन आणि हनुमान चालीसा वाचन रोज चे करावे.

*मीन साप्ताहिक राशिभविष्य : १५-०३-२१ – २१-०३-२१*

सारांश : नोकरी-व्यवसायात कामे रेंगाळतील.काहींना किरकोळ अपघाताचे योग, प्रवासात विशेष काळजी घ्यावी.कौटुंबिक वातावरण प्रतिकूल राहिल. मनावर संयम ठेवावा. शेअरबाजारात आर्थिक गुंतवणूक करताना जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. एकंदर संमिश्र सप्ताह आहे.
उपासना- पंचमुखी हनुमान कवच स्तोत्र पठण करावे.

           *ऊँ नमःशिवाय*

       *डॉ. पं. गौरव देशपांडे*

Leave a Reply

Your email address will not be published.