श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! आता तुला मोहिनी एकादशी व्रताचे माहात्म्य सांगतो ते चित्त देऊन ऐक. एकदा प्रभु रामचंद्रानी वशिष्ठाची प्रार्थना करुन विचारले की, “हे ऋषिवर्य ! मी अतिशय दुःखी झालो आहे तरी ज्याच्या योगाने माझ्या दुःखाचा परिहार होईल असे एखादे व्रत मला सांगा.” तेव्हा वशिष्ठ हणाले की, “हे रघुकुलतिलका ! तूं सकळ सुखांचे माहेर असताना तुला दुःख होणे शक्य तरी आहे काय? पण ज्या अर्थी तूं प्रश्न विचारला आहेस त्याअर्थी तो लोकहितास्तव असला पाहिजे असो. ज्याच्या योगाने दुःखाचा पूर्वेतिहासासह सांगतो. परिहार होईल असे एक सुलभ व्रत त्याच्या पूर्वी सरस्वतीनदीचे काठी भद्रावती नावाची प्रख्यात नगरी होती. तेथे द्युतिमान नावाचा राजा राज्य करीत होता. भद्रावती नगरीत धनपाळ नांवाचा व्यापारी रहात असे. तो अंत्यत धार्मिक होता. त्याने दानधर्म केला. जागोजागी देवालये, धर्मशाळा, विहिरी बांधल्या, अन्नछत्रे घातली, सडका उत्तम केल्या व नदीवर पूल बांधले. त्याला सुमन, दुजा, द्युतिमान, मेधावी आणि धुष्टबुद्धी अशी पांच मुले होती. पैकी पहिले चार आपल्या वडिलांप्रमाणे सदाचारी होते आणि पांचवा धृष्टबुद्धी राक्षसाप्रमाणे दुराचारी होता. जुगार खेळणे, दारु पिणे, वेश्यागमन करणे, शिवाय संतसज्जनांना अपशब्द बोलून दुःख देणे, धर्माची हेटाळणी करणें, देवादिकांना तुच्छ मानणे, कुलवान स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट करणे, वगैरे असली पापकर्मे तो नेहमी करीत असे. धृष्टबुद्धीच्या निंद्य वर्तनामुळे त्याच्या पित्याला धनपालाला अत्यंत दुःख होऊ लागले, व शेवटी त्रासून त्याने त्याला घराबाहेर हांकून दिले. नंतर तो धृष्टबुद्धी निराळे घर करून राहिला प्रथम कसाबसा तो आपल्या चरितार्थ चालवू लागला. पण पुढे खावयास काही न मिळाल्याकारणाने उपाशी राहू लागला. तेव्हा त्याने आपल्या अंगावरील दागदागिने विकले आणि त्याचे जे पैसे आले, त्यावर काही दिवस चारितार्थ नव्हे चैन चालविली. पैसे संपल्यानंतर चोऱ्या करु लागला. पुष्कळशा चोऱ्या राजदूतांनी धनपाळकडे पाहून दुर्लक्ष केल्यामुळे पचल्या गेल्या. पण जेव्हा त्याच्या, चौर्य कर्मामुळे लोकांना अत्यंत त्रास होऊन दुःख होऊ लागले तेव्हा राजदूतानी एक चौर्यकर्मात त्याला पकडून राजाकडे गेले राजाने सजन, धर्मात्मा, विष्णुभक्त अशा धनवाळाचा मुलगा म्हणून त्याला कोणतीही दु.खदायक शिक्षा न करता आपल्या राज्याच्या हुीवा दुः हाकून दिले. नंतर तो धृष्टवुद्धी योर व भयानक अशा एका अरण्यात राहू लागला. तेथे त्याला अत्यंत दुःख होऊ लागले. त्याची वरूप्रावरणे फाटली खाण्यापिष्याला काही मिळेनासे झाले, तेव्हा हरिणासारख्या गरीब प्राण्यांचे हिंसा करून उदरनिर्वाह लागला. त्याच्या या स्थितीत त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊ लागला. अशा प्रकारे तो दुःखद काळ कंठत असताना एके दिवशी भटकर भटकत कौंडिण्य ऋषीच्या आश्रमात आला. तेथील नयनमनोहर शोभा पहात पहात त्या ऋषीच्या पूर्णकुटिकेपाशी येऊन उभा राहिला. इतक्यात ज्ञानाचे, सजनांचे मूर्तिमंत अवतार असे जे कौडिण्यंऋपी गंगेहून स्नान करन त्या पर्णकुटिंकपाशी आले व हातातील कमंडलू खाली ठेवला आणि गंगेमध्ये धुवून आणलेले वस्त्र वाळत टाकत घालण्याकरिता घडी करून झटकू लागले, झटकताना त्या वसापासून निघालेले तुषार धुष्टबुद्धीच्या अंगावर गेले, तो त्याची बुद्धी पालटली अंतःकरणाचा ओढा सद्विचाराकडे धावू लागला. त्याने हात जोडून त्यांची प्रार्थना केली की. “महाराज ! आजपर्यंत मी अनेक पातके केली आहेत. त्यांचा आपल्यापुढे उच्चार करण्याला सुद्धा मला लाज वाटते. माझ्या हातून घडलेल्या दुष्कर्मांमुळे पुढे मला दुःखद असा नरकवास भोगावा लागेल. करिता महाराज, मजवर दया करा आणि ज्या योगाने माझ्या पापाचा नाश होईल असे एखादे सुलभ प्रायश्चित सांगा.” धुष्टबुद्धीच्या हातून घडलेल्या दुष्कर्माचा पश्चाताप त्याला झालेला आहे अरे. पाहून कौंडिण्य ऋषीना त्याची दया आली. व ते म्हणाले की “ज्याच्या योगाने तुझ्या पापच नाश होईल असा एक सोपा उपाय तुला तुला सांगतो तो ऐक.
हे धुष्टबुद्धी! जर तू मोहिनी एकादशीचे व्रत (सामान्य एकादशी व प्रतात सांगितल्याप्रमाणे) यधाविधि करशील तर तुझ्या जन्मजन्मांतरीच्या पापांचा नाश होऊन पुण्यावान होशील. पुढे त्यांने मोहिनी एकादशीचे व्रत विधियुक्त केले तेव्हा त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो विष्णु लोकाला गेला.”
श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी हे मोहिनी एकादशीने व्रत करतील व माहात्म्य ऐकतील ते
पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील.” वैशाख शुक्लपक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात.
मोहिनी एकादशी माहात्म्य
श्रीगणेशाय नमः ॥ युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा । हे परम निधाना जनार्दना । ऐकुनी वरूथिनी महिम्ना। धन्य-धन्य झालो मी ।।१ । आता वैशाख शुक्ल पक्षात । जी एकादशी क्रमप्राप्त । तिच्याविषयीची समस्त । व्रतकथा ती सांगावी ।।२।। कळू दे मजला तिचे नाव । व्रतविधी पुण्यप्रभाव । कथानक फलप्राप्ती अपूर्व । सांग त्वरित सखया रे ।।३।। श्रीकृष्ण म्हणाला धर्माप्रत । तुझी उत्कटता पाहुनी येथ । आनंद वाटतो मज निश्चित । अससी उत्तम श्रोता तू ।।४।। पूर्वी रामाने वसिष्ठ क्रषीला । हाच होता प्रश्न केला । उत्तरादाखल त्या समयाला । केले निरूपण सद्भावे ।।९॥ तेव्हा त्याने दाशरथाला । जो कथाभाग सांगितला । तोच कथन करितो तुजला। श्रवण करी आदरे ।।६।। रामचंद्र म्हणाला वसिष्ठाप्रती। हे भगवन् । सर्वज्ञमूर्ती । कृपा करुनी मजवरती । आस एक ती पुरवावी ।।७।। जेणेयोगे पातके समस्त । जळुनी दुःख होईल नष्ट। असे एखादे उत्तम व्रत । सांगा मजला गुरुवर्या ।।८।। सीता विरहाने पोळलो। नाना दुःखांते पावलो । अति अगतिक त्रस्त झालो । व्याकुळलो कितिकदा ।।९।। जी दुःखे भयंकर । मी भोगली खरोखर । ती सामान्य जन इतर । कैसे सहन करतील ।।१०।। त्या दुःखांच्या भीतिपोटी। उपाय पुसतो तुम्हांप्रती। तुम्ही कृपाळू प्रेममूर्ती । सांगा काही त्याविषयी ।।११।। वसिष्ठ म्हणाले श्रीरामा रघुकुलभूषणा पुरुषोत्तमा। तब करुणेसी नाही उपमा । बरवा प्रश्न केलासी ।।१२।। असे नैष्ठिक तव मती। तन्नामे मानव उद्धरती। तरीही कल्याण हेतू चित्ती । उपाय पुसतो मजलागी ।।१ ३ ।। जाणतो तुझे हृद्त । म्हणुनी निश्चये पुरवीन हेत । सर्वपावक असे व्रत । सांगतो मी रघुराया ।।१४।। वैशाख शुक्ल एकादशी तिथी । ‘मोहिनी’ नामे प्रसिद्ध जगती। तुझ्यासम पुरुषांनी ती। अवश्य करावी श्रद्धेने ।।१५।। या व्रताचा प्रभाव श्रेष्ठ । भस्म होती पापपर्वत । दुःख मोहजाल समस्त । नष्ट ध्वस्त लवलाही ।। १६ ।। हे मम सत्य वचन । ध्यानी घ्यावे रघुनंदन । त्याविषयीची कथा पावन । तीही सांगतो तुजलागी ।।१७।। ही अत्यंत शुभंकरी । शीघ्रफलदायी उपकारी । एकाग्र श्रवणे सत्वरी । जळती महापातके |१८ ।। सरस्वती नदीच्या काठी। भद्रावती नगरी होती। सर्वदूर तिची ख्याती। रम्य समृद्ध विस्तीर्ण ।।१९|| राजा चंद्रवंशोत्पन्न । त्याचे नाव द्युतिमान । रणगाजी धैर्यवान । राज्य करीतसे न्यायाने ।।२० ।। याच उत्तम नगरीत । एक धनिकही होता राहत । धनपाल नामे तो प्रख्यात । व्यापार उदीम करीतसे ।।२१ ।। शांत सुस्वभावी वाणी। होता पुण्यवान सद्वर्तनी धनधान्य विपुलता त्याच्या सदनी । धर्मकृत्येही करीतसे ।।२२।। पाणपोया अन्नदान । देवालयांचे निर्माण । घाट शाळा सरोवरे छान । बांधियली कित्येक ।।२३।। विष्णुभक्तीत सदा रत। असा वैश्य तो सदगृहस्थ । प्रपंचही करी नीट । होते पाच पुत्र तया ।॥२४।। सर्वांत ज्येष्ठ तो सुमना । द्युतिमान मेधावी अन्य जाणा । सुकृती तो चतुर्थस्थाना । पाचवा धृष्टबुद्धी पां ।।२५।। यांतील पहिले चारही सुत। राहती सदा पितृआज्ञेत । परी धृष्टबुद्धी कनिष्ठ । महापातकी निपजला ।।२६।। तो जुगारादी व्यसनांत। होता आसक्त अत्यंत । जारपणात पटाईत । राही वेश्यागृही सदा ।।२७।। परस्त्रियांशी व्यभिचार । करी पातके भयंकर । देव अतिथी विप्र पितर । नच जुमानी कोणाते ।।२८।। मद्यपान अभक्ष्यभक्षण । कुसंगतीत रममाण। सदा अन्यायी त्याचे वर्तन । उधळी पितृद्रव्याते ।।२९।। हात घालुनी वेश्याकंठी । उभा राही तिठ्यावरती। आपुल्या आचरणे ती। सारी इभ्रत ‘घालविली।। ३० ।। त्याच्या रूपाने घराण्यावर । होते अरिष्ट खरोखर । जेव्हा साहवेना तो प्रकार । त्यागिले जन्मदात्यांनी ।। ३१ । बंधुगणांनी संबंध तोडले । आप्तांनीही नच पुसले । तरीही नच डोळे उघडले । ना सुधारले आचरण ।।३२।। दुर्व्यसनांची मगरमिठी । नच सुटली कदापि ती । धृष्टबुद्धीने पुढती। विकले अलंकारांते ।।३३।। जेव्हा जवळचे द्रव्य संपले। वेश्यांनी तया हाकलले । मित्रजनांनीही सोडले । केली निंदा सर्वांनी ।॥३४|॥। कालांतरे दशा भयंकर । वस्त्रही नुरले अंगावर । उदर भराया पोटभर। अन्नही ना मिळे तया ।।३५।। भूतकाळ मागे पडला। नच कोणाचे साह्य तयाला। काय करावे प्रश्न पडला। करणी भोवली पुरतीच ।।३६।। जेव्हा भुकेने अगतिक झाला । तेव्हा अन्य पर्याय नुरला। चौर्यकर्म करू लागला । नगरामाजी त्या समयी ।।३७।। पुढती धृष्टबुद्धीला। शिपायांनी पकडला। तरीही सोडून दिधले त्याला । पितृगौरवाकारणे ।॥३८।। असे बऱ्याचदा घडले । समज देउनी मुक्त केले । अंती चाबकाने फोडले । केले बंदिवान तया ।।३९|| अनेक वेळा शिक्षा केली। तरी नाही बुद्धी पालटली। अखेर राजाची आज्ञा झाली। हद्दपारीची त्यालागी ॥४०। राजदंडाची भीती मनी । प्राणभयास्तव गेला निघुनी । पुनरपि सीमा उल्लंघुनी । नच परतला नगरात ।।४१ || क्षुधातृषेने होऊन व्याकूळ । फिरत राहिला रानोमाळ । मनी म्हणे आला काळ । काय नशिबी नच कळे ।।४२।। प्रारंभी लहान प्राणी मारून । कशीबशी केली गुजराण । पुढती शरपाच घेऊन । करू लागला मृगयेते ।।४३ । उदरभरणास्तव भटकंती । निर्दयता वसली चित्ती । असंख्यात श्वापदे ती । मारिली दुष्टबुद्धीने ।।४४ । सिंह हरीण सूकर चित्तर । चकोर मयूर काक तित्तिर । प्रसंगी उंदीर अथवा जलचर । कित्येक जीव मारियले ।।४५।। पूर्वजन्मी पाप केले। या जन्मी ते असे उद्भवले । दुःखकर्दम नशिबी आले । असुनी कुलवंत तो ।।४६ ॥। व्यथा आणि शोकाकुलता। मनी नित्य भविष्य चिंता । आप्त स्वकीय नुरला त्राता । केवळ एकटा राहिला ।।४७।। पुढती एके दिनी भली । विशेष शुभ घटना घडली। काही पुण्याई होती उरली। आला कौंडिण्य-आश्रमी ।४८ । कृषिभेट घ्यावी म्हणुनी । प्रवेशला त्या स्थानी ।। समग्र व्यग्रता एकवटुनी। मुनीपाशी पातला ।।४९ ।। तधी वैशाख मासानिमित्त । स्नान करूनी भागीरथीत । कौंडिण्य तो मुनिश्रेष्ठ । आला होता नुकताच ।।५०।। तपोधनाते पाहून । धृष्टबुद्धीने केले वंदन । तोच तयाच्या आर्द्र वसनातून । जल पडले तयावरी ।।५१ ॥ स्पर्श होता गंगोदकाचा । झाडा झाला दुष्कृत्यांचा । काळ परम दुर्भाग्याचा । सरला अल्प संगतीने ।।५२ ।। आपोआप हात जुळले । नम्रतेने हृदय भरले। चित्त उपरती पावले। पश्चात्तापे तेधवा ।।५३ ।। तदनंतर कौंडिण्याते । विनविले धरुनी चरणांते । वदला प्रभो पातक मोठे । आजीवन केले मी ।५४ । पापभार तो अनिवार । साहवेना खरोखर । तरी कृपा करुनी मजवर । सांगा उपाय सुटकेचा ।॥५५।। हे विभो ! ब्राह्मणश्रेष्ठा । धन नाही मजपाशी आता। – तरी सुचवावे प्रायश्चित्ता । द्रव्यखर्चाशिवाय जे ।।५६।। तधी कनवाळू तो क्रषी। जाणुनी त्याच्या धारणेसी। म्हणाला पापक्षालनासी। व्रत सांगतो तुजलागी ।।५७ । वैशाख शुक्ल एकादशीव्रत। मोहिनी ऐसे म्हणतात । त्वा तिचे करावे व्रत । ठेवी श्रद्धा मम बचनी ।५८ | या पवित्र तिथीचा। महिमा अगाध आहे साचा । व्रतकत्त्याच्या पातकांचा । नाश करिते लवलाही ।।५९।| जन्मोजन्मी जी केली । ती पापे मेरु एवढाली। त्या सर्वांची करुनी होळी। करिते निष्पाप मानवा ।।६०।। कृषि वाक्य ऐकले । तेणे उद्विग्न चित्त शमले । उपदेशानुसार केले । व्रत विधिपूर्वक ते ।।६१ ।। वसिष्ठ वदले रामचंद्राप्रत । व्रतप्रभाव घे ध्यानात । मोहिनी कृपेने क्षणार्धात । झाला पापमुक्त तो ।।६२।। पुण्यप्रभावे त्या समयाला। त्याचा देहही दिव्य झाला । गरुड येता न्यावयाला। गेला आनंदे वैकुंठी । ।६३|॥ मोहिनी एकादशी व्रत । परम फलदायी सर्वश्रेष्ठ। या चराचर जगतात । नाही त्यासम अन्य ते ।।६४।। आचरणे सौभाग्य वृद्धिंगत । दुःख अज्ञान होय नष्ट । पुण्यफलाच्या तुलनेत । क्षीण यज्ञादी कर्मे ती।।६५।। मोहिनी एकादशी आख्यान । श्रवण अथवा करिता पठण । सहस्र गोदानाचे पावन । फल मिळते त्या नरा।।६६।।
।इति श्रीकूर्मपुराणे वैशाखशुक्लैकादश्याः मोहिनीनाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।।
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।। शुभं भवतु!
…म्हणून या एकदशीला मोहिनी एकादशी म्हटले जाते!
समुद्र मंथनाच्या शेवटी वैद्य धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. मात्र राक्षसांनी त्यांच्या हातातील अमृत कलश खेचून घेत तेथून पळ काढला. त्यानंतर ते आपापसात लढत राहिले. हा सर्व प्रसंग पाहत असलेल्या भगवान विष्णूने मोहिनी रुप धारण करुन राक्षसांकडून अमृत कलश काढून घेतला. तो दिवस होता वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा.
भगवान विष्णूंचा मोहिनी अवतार पाहुन राक्षस (दैत्य) मोहित झाले. त्यांनी आपापसातील भांडणं बंद केली आणि त्यांनी सर्वांच्या संमतीने देव-दैत्यांमध्ये अमृताचे समान वाटप करण्यासाठी कलश भगवान विष्णूंना दिला. त्यानंतर भगवान विष्णूंनी देव आणि दैत्यांना वेगवेगळ्या रांगेत बसायला सांगितले. मात्र मोहिनी रुपातील विष्णूवर भाळलेले दैत्य अमृताचा आस्वाद घेणे विसरुन गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी देवतांना अमृतपान करण्यास सांगितले.
त्या दरम्यान राहु नावाच्या राक्षसाने देवतांचे रुप धारण करुन अमृतपानाचा आस्वाद घेऊ लागला. तेव्हा त्याचे खरे रुप प्रकट झाले. मग भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचे डोके धडापासून वेगळे केले. अमृताचा आस्वाद घेतल्यामुळे त्याच्या धडाचे आणि डोक्याचे दोन ग्रह झाले- एक राहू आणि दुसरा केतू.
मोहिनी एकादशीचे महत्त्व
मोहिनी एकादशीला पारंपारीक महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, सीतेच्या वियोगातील दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीरामाने मोहिनी एकादशीचे व्रत केले होते. इतकंच नाही तर युद्धिष्ठिर ने देखील दुःखातून मुक्त होण्यासाठी विधीवत हे व्रत केले होते.
२) मोहिनी एकादशी ही वर्षभरात येणार्या सार्या एकादशींपैकी सर्वात पुण्यवान एकादशी समजली जाते. वैशाख शुक्ल एकादशी दिवशी मोहिनी एकादशी असते. यंदा ही एकादशी 15 मे दिवशी भारतभर साजरी केली जाणार आहे. विष्णू पुराणानुसार, मनुष्याला मोह मायेपासून सुटका मिळवण्यासाठी मोहिनी एकादशीचं व्रत फायदेशीर असतं. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची आराधना केली जाते. त्यामुळे आजचं हे मोहिनी एकादशीचं व्रत नेमकं कसं केलं जातं? हे नक्की जाणून घ्या.
मोहिनी एकादशी दिवशी काय कराल?
मोहिनी एकादशी दिवशी दिवसभर उपवास ठेवला जातो. या काळात फळं, दूध असा हलका आहार घेतला जातो. तसेच विष्णूसहस्त्र नामावलीचं पठण केलं जातं. मोहिनी एकादशीच्या व्रतामध्ये तीळ, तुळस आणि ऋतूमानाप्रमाणे उपलब्ध असणारे फळं याचा समावेश केला जातो. त्याचे दानही दिले जाते.
मोहिनी एकादशी दिवशी काय करू नये?
मोहिनी एकादशी दिवशी व्रत करणार असाल तर राग,मत्सर यासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर रहा. मन शांत आणि स्थिर ठेवून उपवास करा.मोहिनी एकादशीच्या उपवासा दरम्यान भात वर्ज्य करावा असं सांगितले जाते.
मित्रांनो एकादशीचा जन्म रात्रीचा आहे त्यामुळे एकादशीच्या रात्री भगवद्भक्ती चे कोणतेही साधन अंगीकारून भगवंतांच्या चिंतनात काल घालवणे अतिपुण्यदायक असते. एकादशीच्या व्रताचे पारणे द्वादशीस दिवसा करावे.
ब्रह्मज्ञानी श्री सुतमुनी ब्रह्मवृन्दांना संबोधित करताना सांगतात कि ,
१] चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहणातील स्नान
२] अन्नदान अथवा जलदान
३] सुवर्ण दान
४] भूमिदान
५] कन्यादान
६] अश्वमेध आदी महान यज्ञ
७] चारधाम सारख्या मोठ्या तीर्थयात्रा
या महान पुण्यकारक गोष्टींपेक्षाही मोठे पुण्य एकादशीच्या व्रताने मिळते.
२] एकादशी व्रताचे महत्त्व
================
अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे
पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.
अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।
एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।
[ पद्मपुराण ]
अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.
===
एकादशी केल्याने साधकाच्या साधनेतील बाधा नाश पावतात.
मनाचे पावित्र वाढते .बुध्दी सात्विक होते.
शरिरातील रक्त शुध्दी होते जे अपवित्र अन्न खाल्याने अशुध्द झालेले असते.
यश आल्याने धन प्राप्ती होते.
साधनेसाठी दृढ श्रध्दा व विश्वास निर्माण होतो.आपल्या सांगण्यावरुन कोणी एकादशी केली तर सांगणारा आर्धे फल प्राप्त होते.
एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते,नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते.
एकादशीला हरीवासार म्हटले आहे, हरिवासार म्हणजे श्रीहारींचा दिवस! आजचा दिवस श्रीहारींसाठी आहे. त्यामुळे खाणे-पिणे बंद, केवळ हरींचे भजन, हरींचेच स्मरण, हरिनामाचा जप, हरींसाठी रात्रीचे जागरण, हरिकथा श्रवण, केवळ हरीच संपूर्ण एकादशी व्रत आहेत.
समस्त वेद शास्त्रांचे सर आपल्या अभंगातून सांगताना संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात-
ज्यासी नावडे एकादशी। तो जिताची नरकवासी।।
ज्यासी नावडे हे व्रत। त्यासी नरक तोही भीत॥
ज्यासी घडे एकादशी। जाणे लागे विष्णुपाशी।।
तुका म्हणे पुण्यराशी। तोचि करी एकादशी।।
“ज्याला ही एकादशी आवडत नाही, तो जिवंतपणी नरकाचा रहिवासी आहे. ज्याला हे वर्त आवडत नाही, त्याला नरकसुद्धा घाबरतो. जो एकादशी व्रताचे पालन करतो, त्याला निश्चित वैकुंठाची प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने गतजन्मात पुण्यराशी गोळा केल्या आहेत, तोच एकादशी व्रताचे पालन करतो.”
प्रत्येक मासातून येणाऱ्या दोन्ही एकादशीना भोजन न करण्याचे उल्लेख शास्त्रांमध्ये आहेत. त्याचे सार श्री तुकाराम महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितले आहे-
एकादशीस अन्नपान। जे नर करती भोजन।।
श्वान विष्ठेसमान। अधम जन ते एक ॥
तया देही यमदूत। जाले तयाचे अंकित।।
तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया।।
“जे लोक एकादशीस अन्न भक्षण करतात, भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत. त्यांना अधम मानले जाते, कारण ते जे भोजन करतात ते कुत्र्याच्या विष्ठेसमान असते. जो हे व्रत करीत नाही, त्याच्यासाठी यमदूत आहेतच, तो त्यांचा अंकित होतो, म्हणजे तो नरकवासी होतो.”
पंधरा दिवसा एक एकादशी ।
कां रे न करिसी व्रतसार ।।1।।
काय तुझा जीव जाते एका दिसे ।
फराळाच्या मिसे धणी घेसी ।।2।।
स्वहित कारण मानवेल जन ।
हरिकथा पूजन वैष्णवांचे ।।3।।
थोडे तुज घरी होती ऊजगरे ।
देऊळासी कां रे मरसी जाता ।।4।।
तुका म्हणे कां रे सकुमार झालासी।
काय जाब देती यमदूता ।।5।।
एकादशी व्रत सोमवार न करिती ।
कोण त्यांची गती होईल नेणो ।।6।।
काय करुं बहू वाटे तळमळ ।
आंधळी सकळ बहिर्मुख ।।7।।
हरिहरासी नाही बोटभरी वाती।
कोण त्यांची गती होईल नेणो ।।8।।
तुका म्हणे नाही नारायणी प्रिती ।
कोण त्यांची गती होईल नेणो ।।9।।
एकादशीस अन्नपान। जे नरकरिती भोजन ।अधम ते जन एक।।
ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरिकिर्तन। ते समान विष्णुशी ।।
अशुध्द विटाळशीचे खळ। विडा भक्षिती तांबूल। सापडे सबळ काळाहाती ना सुटे ।।
शेज बाज विलास भोग ।
करिती कामिनीचा संग ।
तयाजोडे क्षय रोग ।
जन्मव्याधि बळवंत ।।
आपण न वजे हरिकिर्तना ।
आणिका वारी जाता कोणा ।
त्यांचे पापा जाणा ।
ठेंगणा तो महामेरु ।।
तया दंडी यमदूत ।
झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलिया ।।
करविता व्रत अर्ध पुण्य लाभे।
मोडविता दोघे नरका जाती ।
शब्दबुध्दी होय दोघा एक मान ।
चोरासवे कोण जीव राखे ।
आपुले देवूनि आपलाचि घात।
नकरावा थीत जाणोनिया ।
देवुनिया वेच धाडी वाराणसी
नेदावे चोरासी चंद्रबळ।
तुका म्हणे तप तिर्थ व्रत याग।
भक्ती हे मार्ग मोडू नये ।
छत्रपती श्री शिवरायांना उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतात-
आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखि॥
तुमचे येर वित्त धन। जे मज मृतिके समान॥
कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकदशी॥
म्हणावा हरिचे दास। तुका म्हणे मज हे आस॥
” अहो, शिवराय, आपण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे आम्ही सुखी होऊ. आपली धनसंपत्ती आम्हाला मातीमोल वाटते. गळ्यात तुळशी माल घालून ते भूषण म्हणून लोकात मिरवा आणि एकादशी व्रताचे पालन करा. स्वतःला हरींचे दास म्हणवून घ्या, हीच माझी एकमेव इच्छा आहे.”
—————————————————————————————————
३] शास्त्रानुसार एकादशी व्रत कसे करावे ?
========================
एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला फक्त एक वेळ जेवण करावे. एकादशीला उपवास करावा. संपूर्ण दिवस धार्मिक ग्रंथांचे वाचन, सज्जनांचा सहवास, भजन, कीर्तन अथवा नामस्मरण अशा चांगल्या कृत्यात घालवावा.
दूसर्या दिवशी म्हणजे द्वादशीला देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा म्हणजेच पारणे करावे. शक्य असल्यास उपवास सोडताना अतिथीलाही भोजन द्यावे.अन्नदान करावे.
द्वादशीलाही एकच वेळ जेवण करावे. या सर्वांमुळे वृत्ती शांत, समाधानी आणि आनंदी राहण्यास मदत होते.
शरीराचे आरोग्य आणि मनाची शुद्धी या दोन्हीसाठी एकादशीचे व्रत लाभदायक असते.
एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते, नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते.
Leave a Reply