नरकचतुर्दशी : यमतर्पणविधीसह : ०३ नोव्हेम्बर २०२१ Mandar Sant November 3, 2021 दिनविशेष नरकचतुर्दशीला चंद्रोदय हा पहाटे असतो. नुसते सुर्योदयाच्या आधी नव्हे तर चंद्रोदयाच्या वेळेला अभ्यंग स्नान करणे अपेक्षित आहे. यावर्षी चंद्रोदयाच्या वेळा खालील प्रमाणे आहेत. चंद्र हा पूर्वेकडून उगवतो. त्यामुळे आपले गाव कुठल्या शहरानंतर येते त्याप्रमाणे त्यावेळी स्नान करावे. पंचांगात व दिनदर्शिकेत चंद्रोदयाची वेळ।दिलेली असते. स्नानाच्या वेळेला आघाडा किंवा भोपळ्याची पाने नरकनाशनार्थ अंगावरून ओवाळून टाकावीत. त्यानंतर स्नान करावे.त्यानंतर यम तर्पणाचा महत्त्वाचा विधी खालील प्रमाणे आहे. अपमृत्यू , अपघात , शनी पीडा टाळणे , आजारपणं न यावीत यासाठी खालील यमतर्पण विधी नरक चतुर्दशीला करणे अतिशय फायद्याचे असते, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. प्रत्येक पुरुषाने आपल्या कुटुंबासाठी हा विधी अवश्य करावा. यमतर्पण विधी पुस्तिका डाउनलोड करा. यम तर्पण विधी नंतर…… (श्लोक) – यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः । भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतांत एतत् दशभिर्जपंति ।। हा श्लोक दक्षिणेकडे तोंड करून १० वेळा म्हणावा Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website