नवरात्रामध्ये मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर महासरस्वती मातेचे आवाहन केले जाते. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात बासर तसेच देशात अनेक ठिकाणी सरस्वती मातेची पुरातन मंदिरे आहेत. यावर्षी इ स २०१७ मधील नवरात्रात हा योग २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९:२६ वाजल्यापासून १६:०१ मिनिटापर्यंत आहे. मत सरस्वतीची स्तोत्रे म्हणून तसेच यथाशक्ती सप्तशती चे पाठ करून मत सरस्वतीची पूजा करावी. यावेळी आपण शिकत असलेल्या ग्रंथांची पूजा करणे अपेक्षित आहे.
साधारणत: चार दिवस हे पूजन करायचे असते व त्यावेळी अध्ययन व अध्यापन बंद ठेवतात. [ याचा अर्थ परीक्षा तोंडावर आली असताना अभ्यास करायचा नाही असे नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनीच अध्यापन व अध्ययन बंद ठेवून सरस्वतीमाते ची आराधना करावी. याच दिवशी मध्यरात्री देवी भद्रकाली चा जन्मोत्सव करावा. त्यानिमित्ताने भद्रकाली स्तोत्र पठाण करावे .
नवरात्रातील पशु बळी याच दिवशी दिला जातो आणि तो देवी च्या गणांसाठी दिला जातो. ज्यांच्याकडे मांसाहार वर्ज्य आहे त्यांच्याकडे कोहळ्याचा बळी दिला जातो. विशेषतः कोकणस्थ समाजामध्ये घागरी फुंकण्याचा कार्यक्रम व कुलाचार याच दिवशी केला जातो.
पूर्वाषाढा नक्षत्रावर सरस्वती पूजन केले जाते. यावर्षी इ स २०१७ मधील नवरात्रात हा योग २८ सप्टेंबर रोजी सकाळी १२:०२ वाजल्यापासून आहे. कोहळा बळी दुपारी १२:३२ नंतर द्यावा.
२९ तारखेला अष्टमीस पूजन व अर्चन यामध्ये च्या खिरी च्या उत्तम नैवेद्यासह सप्तशतीच्या मंत्रांनी होम करावा. यादिवशी ६ ते १० वर्षांच्या कुमारिकांचे पूजन करावे. खंडेनवमी व शत्स्त्रपूजन याच दिवशी करावे. शमीपूजन हि यादिवशीच करावयाचे आहे.
३० तारखेला विजया दशमी आहे. श्रवण नक्षत्राच्या प्रथम चरणावर सरस्वती विसर्जन करावे. पूजा केलेले ग्रंथ परत वापरात काढावेत. सायंकाळी ४:४७ ते रात्री ११:१५ या दरम्यान हा काळ येतो. शस्त्रे पूजन करून वापरात काढावयाची आहेत.
Leave a Reply