ऋण मुक्ति गणेश स्तोत्रम Mandar Sant March 21, 2020 स्तोत्र ।। श्रीराम समर्थ ।। कर्जापासून सुटकारा देणारे गणपतिचे हे विशेष स्तोत्र ऋण मुक्ति गणेश स्तोत्रम ऋणहर्ता गणपति स्तोत्र विनियोग अस्य श्रीऋणविमोचनमहागणपतिस्तोत्रमन्त्रस्य शुक्राचार्य ऋषि:, ऋणविमोचन महागणपतिर्देवता, अनुष्टुप छन्द:, ऋणविमोचनमहागणपतिप्रीत्यर्थे जपे विनियोग: । ऊँ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलम । षडक्षरं कृपासिन्धुं नमामि ऋणमुक्तये ।।1।। महागणपतिं वन्दे महासेतुं महाबलम । एकमेवाद्वितीयं तु नमामि ऋणमुक्तये ।।2।। एकाक्षरं त्वेकदन्तमेकं ब्रह्म सनातनम । महाविघ्नहरं देवं नमामि ऋणमुक्तये ।।3।। शुक्लाम्बरं शुक्लवर्णं शुक्लगंधानुलेपनम । सर्वशुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये ।।4।। रक्ताम्बरं रक्तवर्णं रक्तगंधानुलेपनम । रक्तपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।5।। कृष्णाम्बरं कृष्णवर्णं कृष्णगंधानुलेपनम । कृष्णयज्ञोपवीतं च नमामि ऋणमुक्तये ।।6।। पीताम्बरं पीतवर्णं पीतगंधानुलेपनम । पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।7। सर्वात्मकं सर्ववर्णं सर्वगन्धानुलेपनम । सर्वपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।8।। एतदृणहरं स्तोत्रं त्रिसन्ध्यं य: पठेन्नर: । षण्मासाभ्यन्तरे तस्य ऋणच्छेदो न संशय: ।।9।। सहस्त्रदशकं कृत्वा ऋणमुक्तो धनी भवेत ।।10।। ऋण मुक्ति गणेश स्तोत्राचे लाभ आपणावर ऋण, कर्ज खूप अधिक वाढलेले आणि कर्ज उतरण्याचे कोणतेही मार्ग मिळत नसतील तर बुधवार पासून गणेश ऋणहर्ता गणपति स्तोत्राचा नियमित 11 पाठ 45 दिवस करावा सर्व प्रकारचे कर्ज, ऋण व आर्थिक बाधा यापासून निश्चित मुक्ति मिळते ऋण मुक्ति गणेश स्तोत्राचा पाठ कसा करावा गणेश मूर्ती/फोटो समोर ऋण मुक्ति गणेश स्तोत्राचा पाठ करावा सर्व प्रथम संकल्प सोडून करणे अधिक हितकारी, जमल्यास अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करून गणपतीस वस्त्र, जानवे जोड, दुर्वा व पंचोपचार पूजन करून व प्रसाद म्हणून गूळ खोबरे, / बेसन लाडू/मोदक आपल्या इच्छे नुसार अर्पण करून हा पाठ करावा अत्यंत फलदायी ठरतो तसेच पिंपळाच्या झाडा खालील गणपती मंदिरात अथवा त्या झाडाखालील गणपती मूर्तीस 7, 11, 21, प्रदीक्षिणा करून आपल्या कर्जा विषयी दुःख गणपतीस सांगावे आणि ह्यातून बाहेर काढावे अशी प्रार्थना करणे, साधारण 7 ते 8 दिवसातच प्रचिती येण्यास सुरुवात होते , नवीन मार्ग, मदत मिळते मात्र श्रद्धेने करणे अतिशय उत्तम हा माझा स्वतःचा देखील अनुभव आहे , खास करून नाशिक मधील कोणी असल्यास रोकडोबा जवळील, खैरे ह्यांच्या कार्यालया समोरील गणपतीस अवश्य हा उपाय करावा तसेच जमल्यास चित्रघंटा येथील मंगळ मंदिर ह्या गणपती मंदिराच्या अगदी जवळ आहे ह्याचे दर्शन घेणे लाभदायक मनीष गोसावी 9921759415 Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website