साप्ताहिक राशिभविष्य १२ ते १८ एप्रिल २०२१ - पंडित डॉ. गौरवशास्त्री देशपांडे Mandar Sant January 25, 2021 दिनविशेष, साप्ताहिक राशीभविष्य *वेध अचूक भविष्याचा, बारा राशिंचा !!* साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 एप्रिल 2021 2021 *©️देशपांडे पंचांगकर्ते डाँ.पं.गौरव देशपांडे(पुणे)* मेष- आपण व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या काळात फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. जे विद्यार्थी उच्चशिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे प्रयत्न या काळात यशस्वी होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या संबंधात कोठेही अहंकार आडवा येणार नाही ह्याची काळजी घेण्याचा विशेष सल्ला देण्यात येत आहे. व्यवसायात आपण नवीन विचारप्रणालीची अंमल बजावणी कराल. उपासना – “हीं दुर्गायै नमः” हा जप दररोज करावा. वृषभ-खाद्यपदार्थ व्यापाऱ्यांना आठवड्याच्या सुरुवातीस विशेष लाभ व यश प्राप्त होईल. व्यापार – व्यवसायात आजवर केलेल्या संघर्षामुळे आर्थिक लाभ होतील व त्याच बरोबर स्थावरामुळे आपल्या संपत्तीत व सुख समृद्धीत वृद्धी होईल. कुटुंबियांसमवेत बसून घरगुती बाबतीत आपण महत्वाची चर्चा – विचारणा कराल. ह्या दरम्यान भावंडांशी किंवा मित्रांशी आपला संपर्क कमी होऊ शकतो,त्याची काळजी घ्यावी. पूर्वार्ध नोकरी व किरकोळ कामे करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. उपासना – “विष्णवे नमः” हा जप दररोज करावा. मिथुन- योजना यशस्वी होतील आणि धन लाभ होईल. भाऊ-बहिणींचा सहयोग या वेळी तुम्हाला प्राप्त होईल. कुठल्या रोगाने पीडित असल्यास या वेळी त्या आजारातून मुक्ती मिळू शकते. सुरक्षित गुंतवणूक करण्यास हा आठवडा अनुकूल आहे. प्राप्तीचे स्रोत निर्माण करण्यावर आपण लक्ष केंद्रित करावे. उपासना – दररोज शंकराला दूधाचा अभिषेक करावा. कर्क- कुटुंबातील कुणी सदस्यांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. अश्या वेळेत तुम्हाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. समाजात आपली पत – प्रतिष्ठा वाढेल. कार्यालयात व व्यवसायात आपले वर्चस्व वाढेल. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः त्वचेचे रोग किंवा तत्सम आरोग्य विषयक त्रास होण्याची शक्यता आहे. उपासना – दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचा पाठ करावा. सिंह- तुमची व्यस्त दिनचर्या तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकते. यामुळे आपल्या जवळच्या लोकांना वेळ देण्यात तुम्हाला अडचणी निर्माण होतील. धन लाभ मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न मात्र या वेळी यशस्वी होऊ शकतात. नवीन कपडे किंवा घरातील सामान खरेदी करण्यावर तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. उपासना – दररोज “नमः शिवाय” हा जप सकाळ संध्याकाळ करावा. कन्या- तुमच्या कामनेची या वेळी पूर्ती होईल. वडील भावंडांचा सहयोग प्राप्त होईल. कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो. व्यापारीवर्गास व नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल. पदोन्नती संभवते. ह्या आठवड्यात आपणास स्फूर्ती जाणवेल. आठवड्याच्या मध्यास नेत्र विकार संभवतात. उपासना – सप्ताहात गणेशकवच स्तोत्र वाचावे. तुळ- जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर नफा होण्याची शक्यता अधिक आहे. कौटुंबिक जीवनात काही समस्या येऊ शकते व वडिलधाऱ्यांबरोबर तुमचे संबंध बिघडू शकतात. या सप्ताहात कुठलीही गोष्ट खूप विचारपूर्वक करावी लागेल कारण तुमच्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. नवीन घर, संपत्ती तसेच वाहन खरेदीसाठी हा आठवडा अनुकूल आहे. चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात असलात तर नवीन नोकरी लागण्याची शक्यता आहे. उपासना – दररोज “दुर्गायै नमः” हा जप करावा. वृश्चिक- या सप्ताहात तुमचे आरोग्य बिघडू शकते. वाहन खूप सावधानतेने चालवा. भाग्याची साथ तुम्हाला मिळेल परंतु, काही मोठा निर्णय घेण्यात तुम्हाला चिंता होईल. आठवड्याच्या मध्यास आपल्या दैनिक आर्थिक स्थितीत सुद्धा अडचणी जाणवतील. मात्र, उत्तरार्धात प्राप्तीची शक्यता वाढेल. कोणाशीही अनावश्यक वाद घालणे टाळून शांत राहण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उपासना – दररोज सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावे. धनु- कुटुंबात सुख समृद्धी कायम राहील. जर तुम्हाला आरोग्यासंबंधी तक्रार असेल तर या सप्ताहात त्यांना आराम मिळू शकतो. कारकिर्दीतील उत्कर्षासाठी आपण सक्रिय व्हाल व त्यामुळे कामाप्रती आपली समर्पण भावना वाढीस लागल्याचे दिसून येईल. व्यावसायिक कारणांसाठी आपणास प्रवास करावा लागण्याची शक्यता सुद्धा आहे. उपासना – दररोज गणपतीला लाल फुले अर्पण करावीत. मकर- या सप्ताहात तुम्ही थोडे द्विधा मनस्थिती मध्ये राहू शकता. नवीन वस्तू खरेदी करण्यावर तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. तुम्ही साहस आणि पराक्रमाच्या बळावर कार्य क्षेत्रात आपले वेगळे स्थान बनवू शकता. कोर्ट-कचेरीच्या कामात सावधानी ठेवा. विवाहा संबंधी निर्णय घ्यावयाचा असल्यास उत्तरार्धात तो घेऊ शकाल. तुम्हाला आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. उपासना – दररोज मारुती स्तोत्र पठण करावे. कुंभ- विवाहितांना आपल्या जोडीदाराशी संबंधित एखादी चिंता सतावेल. गूढ व आध्यात्मिक विषयांची गोडी असणाऱ्यांना ह्या आठवड्यात नवीन काहीतरी शिकावयास मिळेल. आर्थिक बाबतीत शेअरमार्केट व सट्टेबाजी पासून दूर राहावे अन्यथा कष्टाचे पैसे कसे हातून निसटतील हे समजू सुद्धा शकणार नाही. आपल्या कक्षेत आपल्या बौद्धिक कौशल्याच्या बळावर वेगळी जागा आपण बनवू शकता. उपासना – दररोज नारायण कवच वाचावे. मीन- विद्यार्थ्यांना या वेळी शिक्षणाच्या क्षेत्रात उपलब्धी मिळू शकते. जर तुम्ही भागीदारीत काही काम करत असाल तर या वेळी खूप सांभाळून रहाणे आवश्यक आहे. रक्त संबंधित विकार या वेळी तुम्हाला चिंतीत करू शकतात म्हणून सतर्क रहा. धैर्यपूर्ण प्रयत्नाने वर्तमान समस्यांचे संतोषजनक निराकरण करण्यात सहजपणा जाणवेल. उपासना – रोज ‘नमो नारायणाय’ हा जप करावा. *पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे* ।।यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग।। ।।सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग।। Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website