दिवाळीचा फराळ आणि वाढते वजन ! : ले. वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.) Mandar Sant October 26, 2016 आरोग्य 5 लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे याकरता पाच सोप्या टिप्स. १. येता जाता सतत फराळाचे पदार्थ तोंडात कोंबू नका. हे पदार्थ पचायला जड असल्याने सकाळच्या वेळीच खाणे इष्ट. २. दिवाळीचा फराळ करताना अधून मधून कोमट पाणी प्या; जेणेकरून हे पदार्थ पचण्यास मदत होईल आणि वजनात भर पडणार नाही. ३. बाजारातील मिठाई आणि चॉकलेट यांच्यापासून दूर रहा. घरी बनवलेल्या फराळाच्या पदार्थांनी होणार नाही इतके नुकसान या पदार्थांमुळे होत असते. (दिवाळीत मधुमेहींनी तर विशेष काळजी घ्या.) ४. चण्याच्या डाळीच्या पिठाचा कमीत कमी वापर करा. शक्य तिथे मुगाची डाळ वापरा. लाडू करतानादेखील बेसनापेक्षा रवा, मिश्र डाळीचे पीठ असे तयार करा. ५. नियमिटपणे व्यायाम आणि भूक नसताना काही न खाता भूक लागेपर्यंत अधून-मधून गरम पाणी पिणे या दोन मार्गांचा अवलंब या काळात केलात तर वजन वाढण्याची भीती राहणार नाही. दीपावलीच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा!! © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.) आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली संपर्क: ०२५१-२८६३८३५ =========================================================================== वरील पोस्ट वैद्य परीक्षित शेवडे यांच्या परवानगीने त्यांच्या ” घरोघरी आयुर्वेद ” या ब्लॉग वरून घेतलेली आहे. मुल पोस्ट चा दुवा खालीलप्रमाणे आहे . https://gharoghariaayurvedblog.wordpress.com/category/%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/ 5 Responses RAMACHANDRA October 31, 2016 फार महत्वाची माहिती . तोंडावरचा ताबा सुटल्यास नंतर पस्तावण्याची वेळ येते Reply blog admin November 14, 2016 Thank You !! Sir … Reply Amy November 2, 2016 I couldn’t resist commenting. Very well written! Reply blog admin November 14, 2016 Thank You !! Ma’am … Reply blog admin November 14, 2016 mandar@mandarsant.com Reply Leave a Reply to Amy Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website
RAMACHANDRA October 31, 2016 फार महत्वाची माहिती . तोंडावरचा ताबा सुटल्यास नंतर पस्तावण्याची वेळ येते Reply