शरीराचे घड्याळ – ले डॉ हेमंत सहस्रबुद्धे Mandar Sant October 16, 2019 आरोग्य 4 नमस्कार मित्रांनो………दुसरे कुठले घड्याळ लक्षात ठेवण्यापेक्षा हे हे तुमच्या शरीराचे घड्याळ लक्षात ठेवा …. हा सोबत दिलेला तक्ता [चार्ट] बघा. त्या मधे दिल्या प्रमाणे आपल्या शरीरातील ऑर्गनस म्हणजे इंद्रिये काम करत असतात. या सर्व इंद्रियांच्या, अवयवांच्या जास्तीतजास्त शक्ती ओतून काम करण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. म्हणजे तुम्ही जेवल्यावर एका क्षणात अन्न पोटाच्या तळाशी जात नाही. त्यावर अक्षरश: हजारो क्रिया होतात. प्रचंड उलाढाल होते आपल्या शरीरात आणि आपल्याला पत्ता सुद्धा नसतो. पण आपले शरीर बिघडले की मग आपल्याला कफ होणे, पित्त होणे, वाताचा त्रास होणे …… [ हा वायू फार डेंजर बाबा ………… बाहेर पडताना दिशा कोणतीही असो वरची अथवा खालची जिथून बाहेर पडतो त्याला आनंद आणि दुसऱ्याला भयंकर त्रास देतो. आणि शिवाय अर्धांगवायू वायू वगैरे ८० प्रकारचे वाताचे रोग आहेत. असो.] मळमळणे, उलट्या, सुलट्या [ जुलाब हो जुलाब], किडनी म्हणजे मूत्रपिंड विकार, हृदय विकार असे एक ना दोन शेकडो-हजारो तक्रारी सुरु होतात. कारण कळत नाही. कफ झाला लाव विकस, पित्त झाले पी दुध किंवा काढ ओकाऱ्या असे सुरु होते. म्हणजे “आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी” असा प्रकार होऊन बसतो. पण मूळ कारणावर कोणीच लक्ष देत नाही. जर आपण दिवसातील [ आणि रात्रीची सुद्धा] सर्व कामे निहित वेळेत म्हणजे ठरलेल्या योग्य वेळी केली तर शक्यतो आजारपण येणार नाही किंवा येत नाही. भारत, चीन आणि जगभर या शरीरात चालणाऱ्या घडामोडींवर अभ्यास चालू आहे. निसर्गात प्रत्येक गोष्टीचे एक चक्र आहे. त्याला सिर्काडीयन सायकल असे म्हणतात. आपल्या शरीरात जे काही चालू असते ते सुधा खरे तर अतिशय शिस्तबद्ध असते. आपण त्याची वाट लावत असतो. चला तर आपण बघू या शरीराचे घड्याळ काम कसे करते ते …….. रात्री- १ ते ३ वाजेपर्यंत- लिव्हर म्हणजे यकृताची वेळ- यकृत आत्ता दिवसभर आलेल्या अन्नावर जोराने प्रक्रिया सुरु करते. आणि विषांचा निचरा करते. खूप खोल विश्रांतीचा हा काळ आहे. स्वप्ने जास्त पडतात. या वेळेला शरीराला ताण दिल्यास भयंकर राग येतो, वाढतो. लहान आतडे या वेळेत अतिशय कमी कार्यक्षम असल्याने आत्ता काहीही खाल्ले तर अतिशय त्रास होतो. रात्री ३ ते पहाटे ५ वाजेपर्यंत फुफ्फुसांची वेळ- फुफ्फुसे आणि श्वसनसंबंधित सारे अवयव, नाक्पुड्यान मधल्या पोकळ्या हे आत्ता उत्तम कार्य करते. साफ केले जाते. श्वसन उत्तम चालते. आणि पहाटे झोपेतून उठण्यासाठी शरीराची हळूहळू तयारी केली जाते. जडपणा आणि थोडे दु:खी वाटण्याचा हा कालवधी आहे. पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या आतड्याची वेळ- मोठे आतडे कार्यक्षम होऊन शरीरातील मल बाहेर टाकण्यासाठी या आतड्याची जोरदार हालचाल सुरु होते. अकार्यक्षम आणि अपराधीपणा वाटण्याचा हा कालावधी आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत स्टमक म्हणजे जठराची वेळ- पचनाची सर्वोत्तम वेळ. प्रोटीन्स वगैरे भरपूर असलेला आहार याचे वेळेत घ्यावा. निराश, उद्विग्न वाटण्याचा हा काळ आहे. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्प्लीन म्हणजे प्लीहेची वेळ- शरीरातील उर्जा प्रवाह कार्यान्वित होतात. अन्न रक्तात आणि उर्जेत वेगाने बदलले जाऊ लागते. या वेळेत Allergy चा त्रास जाणवू शकतो. पण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम प्लीहा करत असते. विचार करायला आणि काम करायला ही वेळ सर्वोत्तम होय. स्वत:चा अभिमान किंवा अहंकार, स्वाभिमान, भीती, असूया वाटण्याचा हाच कालावधी होय. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हार्ट म्हणजे हृदयाची वेळ- हृदयाची धडधड या काळात वाढते. आणि असे बघितले गेलेले आहे की हार्ट Attacks या वेळेतच जास्त प्रमाणात येतात. जास्त उन्हात जाऊ नये. किंवा जास्त जोराचा व्यायाम या काळात करू नये. खानपान, भेटणे, बोलणे यासाठी उत्तम काळ आहे हा. या काळात मन आनंदित रहाते तसेच दु:ख सुद्धा वाटू शकते. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्याची वेळ- या वेळेत लहान आतड्याचे काम जोरात चालते. याच वेळेत अपचन, पोटात दुखणे, उलटीची भावना हे त्रास जास्त जाणवतात. या काळत विश्लेषण आणि एखाद्या कामाचे नियोजन करणे ही कामे करावीत. या काळात आपल्याला थोडे असुरक्षित वाटू शकते. दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत Bladder म्हणजे मूत्राशयाची वेळ- ही वेळ आहे मूत्राशयाची. म्हणजे जिथे लाघवी गाळून आल्यावर साठते ती जागा किंवा पिशवी. या वेळेत त्वचा विकार, खाज, खरुज हे जास्त जाणवते. या वेळेत ग्लानी म्हणजे थकव्यामुळे थोडी झोप आल्या सारखे वाटते. एक वामकुक्षी घेतल्याने बरे वाटते. या वेळेत थोडे क्षारयुक्त पदार्थ खाल्ले तर फायदा होतो. संग्रह आणि साठवणुकीची कामे यासाठी उत्तम वेळ. पण भयंकर आळस हा या वेळेचा दोष आहे. संध्याकाळी ५ ते ७ किडनी म्हणजे मुत्रपिंडांची वेळ- जर Adrenal ग्रंथी नीट काम करत नसल्या तर हा मगाचा जो आळस आहे ना तो या काळात सुद्धा पुढे चालूच रहातो. या ग्रंथी चांगल्या असल्या तर पुन्हा एकदा कामाचा जोश येतो. कामाचे एकत्रीकरण आणि गाडी चालवणे यासाठी ही वेळ छान. याच वेळेत भीती वाटते, वाढते आणि गुन्हे सुद्धा घडतात. रात्री ७ ते ९ पेरी कार्डीयमची वेळ- लैंगिक ग्रंथी या वेळेत जास्त कार्यक्षम होतात. इच्छा वाढतात. या खराब, दबलेल्या असल्या तर या वेळेत पाठीत दुखणे जाणवते. प्रेम करणे, प्रणय, लोकांमध्ये मिसळणे यासाठी हा समय मस्त. पलीकडून प्रतिसाद येत नाही असे वाटणे किंवा स्वत:कडून दिला न जाणे, आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत असे वाटणे, आपण दुखावले गेलो आहोत असे वाटणे किंवा खूप खूप आनंद वाटते, खूप मज्जा मज्जा येणे हे असे सारे या वेळेत वाटू शकते. रात्री ९ ते ११ ट्रिपल वॉरमरची वेळ- शरीरातील सर्व आंतरस्त्रावी ग्रंथी या वेळेत उत्तमपणे कार्यान्वित झालेल्या असतात. तसेच रक्त वाहिन्या सुद्धा जोरोशोरोपे असतात. दमल्यासारखे वाटणे [स्वाभाविक आहे म्हणा], अशक्तपणा वाटणे, डोके दुखणे हे त्रास या वेळेत होतात. आराम करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. गोंधळल्यासारखे वाटणे, कशातच काही अर्थ नाही असे वाटणे हे भाव या वेळेस मनात येऊ शकतात. रात्री ११ ते १ गॉल Bladder म्हणजे पित्ताशयाची वेळ- झालेली झीज भरून काढण्याचा हा काळ आहे. या वेळेत जर त्रास होत असेल, झोप येत नसेल, झोप लागत नसेल, जाग येत असेल तर अशी शक्यता आहे की पित्ताशय आणि यकृतावर ताण येतो आहे. आणि पाचानातून निर्माण होणारी ही विषे नाकाम करायला यकृताला त्रास होतो आहे. त्यामुळे मेंदूच्या कामात अडथळे येत आहेत. एखाद्याच्या बद्दल कडवटपणा या काळात वाढतो, वाटतो. मला माहित आहे मित्रांनो की आजच्या या धकाधकीच्या जीवनात यातील एकही गोष्ट या सांगितलेल्या वेळेत होणार नाही. पण आपल्याला जे आणि जसे जमेल तसे आपण प्रयत्न करत रहायचे आहेत. पुन्हा भेटू नवीन माहितीसह ……….. आपला मित्र, Dr. हेमंत उर्फ कलादास ……………. 4 Responses mahesh October 18, 2019 अतिशय उपयुक्त अशी शास्त्रोक्त माहिती, सर्वांनी आवश्यक समजून घ्यावीच. Reply Mandar Sant November 26, 2019 महेश, , आपण आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !! Reply Anil October 18, 2019 Nice and very helpful information Reply Mandar Sant November 26, 2019 Anil, Thank you !! for your positive revert. Reply Leave a Reply to mahesh Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website