श्रीगुरु चरित्र पारायण कसे वाचावे
आणि नियम माहिती

लवकरच श्रीदत्त जयंती येत आहे
दिनांक ०३/१२/२०१७ रोजी रविवार मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा आहेत

आपण या वेळी दरवर्षी प्रमाणे सात किवा तीन दिवसाचे श्रीगुरु चे चरित्र पठण करणार असाल तर आपण श्रीगुरु चरित्र विषयावर माहिती पाहू आणि याच बरोबर श्रीदत्त अवतारी श्रीगुरु बद्दल पुढील लेखात माहिती घेऊ…

 

ssv2

 

श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीगुरूनृसिंहसरस्वती
स्वामी महाराज यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे गुरुचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्ध यांची असावी असा मूळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही. सध्या उपलब्ध असलेल्या गुरुचरित्राची मराठी भाषेतील काव्यरचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी. त्यावेळी ती रचना करण्यास मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार उपलब्ध असण्याची शक्यता असू शकते असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे. सरस्वती गंगाधर यांच्या ग्रंथात हा एकूणच दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे.

श्री सरस्वती गंगाधर हे श्रीनृसिंहसरस्वतींचे एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश होतो. सायंदेव -> नागनाथ ->देवराव -> गंगाधर -> सरस्वती गंगाधर अशी वंशावळ गुरुचरित्र देते. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. पुढे या मराठी पद्यरूपात असलेल्या श्रीगुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी संस्कृतमध्ये जवळजवळ समश्लोकी भाषांतर केले. हे संस्कृत गुरुचरित्र बहुशः अनुष्टुभ छंदात रचले आहे. गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.

गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.

मूळ गुरुचरित्र ५१ अध्यायांचे होते. आणि अवतरणिका हा अध्याय नंतर जोडला गेला असे काही अभ्यासकांचे मत आहे. गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. सरस्वती गंगाधर यांची मातृभाषा कानडी होती. त्यामुळे कानडी भाषेतील काही लकबी त्यात आढळतात. गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदान्त आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही. श्रीगुरूनृसिंहसरस्वती या गुरूपेक्षा गुरू या पदाला आणि गुरु-शिष्य या नात्याला गुरुचरित्रात महत्त्व दिलेले आढळते.

प्रस्तावना

इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा श्रीगुरुचरित्र ग्रंथ श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. आजही कित्येक घरोघरी याचे नित्य पारायण चालू आहे. श्रीगुरुचरित्राला पाचवा वेद असे म्हणतात.

श्रीदत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले त्यात श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीगुरू नृसिंह सरस्वती या दोन थोर अवतारी पुरुषांच्या कार्यामुळे दत्तोपासना सर्वत्र पोहोचली. त्यातील श्रीनृसिंह सरस्वतींचे कार्य फारच मोठे आहे. त्यांच्या वास्तव्यामुळे औदुंबर, गाणगापुर, नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) यांना तीर्ह्क्षेत्र माहात्म्य प्राप्त झाले आहे. श्रीगुरुचारीत्रात या दोन अवतारी पुरुषांचे जीवनकार्य, त्यांनी केलेले चमत्कार, त्यांनी केलेला अनेकांचा उद्धार, त्यांनी केलेला उपदेश इत्यादी अनेक कथामाध्यमातून आलेले आहेत. आजही अनेक दत्तोपासक या ग्रंथाचे नित्य पठण -श्रवण करतात. या ग्रंथाचे साप्ताह पारायण होत असले तरी अनेक वाचकांना ग्रंथाचे पूर्ण आकलन होत नाही. याचे पूर्णपणे आकलन होण्यासाठी आम्ही याचे हि अॅप्लिकेशन आणत आहोत. याचे वाचन केले असता मूळ ग्रंथ समजून घेणे सोपे जाईल.
श्रीगुरुचरित्र ही कामधेनू आहे. तो कल्पतरू आहे. याच्या श्रवण-पठणाने अनेक फायदे होतात. या ग्रंथाच्या श्रवण-पठणाने गुरुकृपा प्राप्त होते. सर्व संकटाचा परिहार होतो. संततीसौख्य लाभते. महापातकांचा नाश होतो .प्रयत्नांना यश येते. आरोग्यप्राप्ती होते. विद्याध्यायनात प्रगती होते. साधूसंतांचा सहवास लाभतो. घरातील वादआवड नाहीसे होतात. चारी पुरुश्र्थांची प्राप्ती होते. संकटकाळी धैर्य येते . मात्र त्यासाठी सदाचरण आणि श्रीगुरुंवर नितांत श्रद्धा आणि दृध्भक्ती आवश्यक आहे. या ग्रंथाचा सर्व साधकांना आध्यात्मिक आणि सर्वतोपरीने लाभ व्हावा हीच श्रीदत्तगुरू चरणी प्रार्थना.

 

 

पारायण-पद्धती

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

“अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।”

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.

२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे. श्रीगुरु चरित्रचा प्रत्येक अध्याय वाचून झाल्यावर दोन
पळी पाणी तिर्थ सोडून हे तिर्थ घरात सर्वांना देऊन नंतर हे पुर्ण घरात शिंपडावे ही विनंती….

३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.

४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.

५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)

६. रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.

७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.

८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस होय.

९. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी
नियम

|| श्री गुरुदेव दत्त ||

FB_IMG_1492365420626

 

१. श्रीगुरुचरित्र साप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा
. साप्ताह सुरुवातीस , साप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी
श्रीगुरुचारीत्राची पूजा आणि श्रीगुरुची पंचपदी व आरती करावी .

२. श्री दत्ता जयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचारीत्राचा साप्ताह करायचा
असेल त्यांनी
समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता , जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे
पारायण करून पुष्पवृष्टी वगेरे करून आनंद करावा.

३.सप्ताहाच्या ७ दिवसाचा व्रतास्थ्पणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी करणे चांगले .

४. घरात जागा एकांत हवी तशी नसेल तर श्री दत्त मूर्ती असलेल्या मंदिरात साप्ताहकरावा .

५. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे .

६. शक्य नसल्यास घरी किंवा देवघरात साप्ताह सुरु करावा .

७. अखंड दीप असावा . साप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा .(वाचन चालू असे पर्यंत )

८. समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राम्हण भोजन द्यावे .

९. सात दिवसापर्यंत सोवळ्या ओव्ळ्याचे नियम पाळावेत .

(१) साप्ताह वाचण्यास बसल्यानंतर मध्येच आसन सोडून उठू नये.

(२) दुसऱ्याकडे बोलू नये.

(३) हविषान्न एक वेळ घ्यावे .संध्याकाळी फक्त दुध घ्यावे. हविषान्न म्हणजे दुध भात. खारट – तिखट – आंबट (दही,ताक,……. इत्यादी) खाऊ नये. साखरेचा वापर केल्यास चालेल गुळ वापरू नये.गव्हाची पोळी (चपाती) , तूप साखर घेता येते.

(४) ब्रम्हचर्य

(५) भूमिशय्या म्हणजेच पलंग किंवा खाटेवर निजू नये.गादी घेऊ नये.चटई किंवा पांढरे घोंगडे घ्यावे. सप्ताहाच्या ७ वे दिवशी समाराधना करण्यास हरकत नाही .त्या दिवशी महानैवेद्य झालाच पाहिजे.

*धर्मसिंधूंत सांगितलेले हविष्यान्नाचे पदर्थ*

साळीचे तांदूळ ,जव ,मूग ,तीळ ,राळे ,वाटणे ,ई .धान्ये ; पांढरा मुळा ,सुरण ,ई. कंद ; सैंधव व समुद्रोत्पन्न अशी लवणे; गायींची अशी दही,दुध आणि तूप ; फणस ,आंबा नारळ ,हरीतकी ,पिंपळी ,जिरे ,सुंठ ,चिंच ,केळे,रायआंवळे हि फळे व साखर हिं सर्व अतैलपक्व हविष्ये जाणावी (गायींचे ताक व म्हशीचे तूप हिं हविष्ये होत असेंही कोणी म्हणतात.) – धर्मसिंधु प्रथम परीचेद व्रतपरिभाषा .

*अग्निपुराणांत सांगितलेले हविष्यान्नाचे जिन्नस*

साळीचे तांदूळ ,साठ दिवसांनी पिकणाऱ्या भाताचे तांदूळ ,मूग ,वाटणे ,तिळ ,दूध सांवे तृणधान्य ,व गहूं ईत्यदिक हे व्रताविषयी हितकारक आहेत .कोहळा ,भोंपळा ,वांगे ,पोईशाक ,घोसाळे ही वर्ज्य करावी. हुतशेष भिक्षा मागून मिळालेले अन्न ,पीठ , कण्या, शाक ,दही तूप ,मधु ,सांवे ,साळीचे तांदूळ ,तृणधान्य ,यव ,मुळा ,तांदुळजा हे पदार्थ हविष्यव्रत , नक्त ईत्यदिकांविषयी व अग्निकार्य ईत्यदिकांविषयी हितकारक होत.

नोटः- कृपाया स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा श्री . प. पु. वासुदेवानंद सरस्वतीचा निष्कर्ष आहे .

काही विशिष्ट हेतूसाठी अध्याय नित्य वाचणारे लोक आहेत .

* आरोग्य साठी १३ वा अध्याय

* परमार्थिक गुरुकृपेसाठी २ रा अध्याय

* सद्गुरू प्राप्तीची तळमळ व्यक्त होण्यासाठी पहिला अध्याय

* संततीच्या आरोग्याबाबतची काळजी निवारणासाठी २० वा आणि २१ वा अध्याय .

* पुत्रप्राप्तीसाठी ३९ वा अध्याय

* आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ १४ वा अध्याय अशी त्या अध्यायाची खास वैशिष्टे आहेत

नोट:- रोज श्रीगुरु चरित्र पारायण वाचुन झाल्यावर संध्याकाळी श्रीगुरुला प्रियअसणारे गायन म्हणजे पंचपदी रोज करावी

ज्यांना सवड त्यानी ११ ओळ तरी श्री श्री गुरू चरित्र वाचावे
नसेल ते रोज अवतार्निका वाचतात……

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”

श्री गुरुदेव दत्त

नमो सदा श्रीगुरू नृसिंहसरस्वती दत्त महाराज

ज्योतिष राहुल नारायणराव पुराणिक
९४२२२१६१७९
ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक
९८२३३१६१७९
जालना

 

FB_IMG_1496291724971

 

 

 

 

 

 

5 Responses

  1. teju

    स्त्रीयांनी कोणते पारायण करावे.आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायणाचे नियम काय ?

    Reply
    • Mandar Sant

      नमस्कार ,

      श्री गुरुचरित्र हा अतिशय वैराग्यपूर्ण ग्रंथ असल्याने ते संसारी स्त्रियांनी वाचू नये असे माझे गुरु श्री के लिमये यांनी सांगितले होते. गुरुचरित्राचे ऐवजी स्त्रियांनी टेम्ब्ये स्वामी विरचित श्री दत्त माहात्म्य अथवा श्री कावडीबाबा विरचित दत्तप्रबोध हा ग्रंथ पारायणासाठी घ्यावा. तेही शीघ्र फलदायी आहेत व त्याचे सोवळ्या ओवळ्या चे नियम गुरुचरित्रा इतके कडक नाहीत.

      Reply
  2. Vikas

    Parayan udyapan kartana nevedya mahaprsada made kay karave krupya sangave

    Reply
  3. Vijay Mahamuni

    तीन दिवशीय पारायण कसे करावे

    Reply
  4. Vishvesh

    गुरुचरित्रात, चित्रकाचे घरी ,वीणा वाद्य असणाऱ्याचे घरी अन्न घेऊ नये असा
    उल्लेख आहे ,त्याचा अर्थ काय ?

    Reply

Leave a Reply to Vikas Cancel Reply

Your email address will not be published.