AppsTip : कागद पेन विसरा !! सर्व नोंदी करायला Google Keep कसं वापराल ? : मंदार संत Mandar Sant December 8, 2017 गॅजेट्स और अँप्स 4 How to use Google Keep / Google Keep कस वापरायच ? नमस्कार मंडळी, आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे ब्लॉग, आणि पूर्वी वृत्तपत्रांमधले मथळे, स्तंभ, वाचत आला असाल. कोणी चित्रपटसृष्टी विषयक, कोणी राजकिय, सामाजिक, अर्थशास्त्र, खेळ विषयक माहिती गोळा करत असाल. इंटरनेट यायच्या आधी वृत्तपत्र, मासिकं हाच आधार होता आणि असायचा 1997–99 नंतर इंटरनेटच्या नेहमीच्या वापराला सुरुवात झाली आणि त्यानंतर अंदाजे 2014–15 नंतर आता आवश्यक बाब बनली, पण ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाच्या नोंदी, टिपण, माहिती गोळा करणं ह्या गोष्टी बदलत गेल्या. बऱ्याचदा असं होतं, कि अचानक एखादी गोष्ट मिळते / आठवते आणि जवळ कागद तरी नसतो किंवा पेन तरी ! किंवा एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या गोष्टीची solutions / संदर्भ आठवतात आणि कागद पेन जवळ असले तरी ज्या गोष्टीच्या टीप लिहिल्या त्या Classify करणे अवघड असते. तसेच नेमक्या वेळी या लिहून ठेवलेल्या गोष्टी-नोंदीचे कागद / चिटोरे हमखास कुठेतरी विसरतात आणि वेळेला उपयोगात येत नाहीत. एवढेच कश्याला , एखादा लेख, कडवे , फोटो हे PC वर आहे आणि समजा ते पटकन WhatsApp वर पाठवायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला ते आधी मेल वरून पाठवून , मोबाईल मध्ये मेल उघडून , download अथवा Copy+Paste करून WhatsApp ला पाठवावे लागते. या अश्या गोष्टींसाठी Google ने या App द्वारे हा फार सोप्पा shortcut उपलब्ध करून दिला आहे. आठवते का ? कॉलेजला असताना तुम्ही तुमच्या आवडीच्या नट नट्या किंवा तुमचे जे कोणी आदर्श असतील त्यांच्या संबंधित माहितीची नोंदी, टिपणं, ज्या वृत्तपत्र आणि मासिकात येत असत त्याची कात्रण काढून ठेवणं हे बहुतेक जणांनी केलेलं असेलच.. त्यावर काहीजणांना ओरडा सुध्दा खावा लागला असेल, विविध कारणांमुळे …. अनेकदा ही एखाद्या आवडत्या celebrity विषयी गोळा करत असू त्यांचे फोटो, मुलाखती, बातम्या, आणि अन्य बरंच काही.….. काहीजण त्यांचा कात्रणांचा वापर वैयक्तिक, किंवा संपादकीय, राजकीय, सामाजिक गोष्टींबद्दलचं कार्य त्याची माहिती साठवणूक ह्या करत असत. त्यासाठी तुम्ही स्टिकी नोट्सचा वापर केला असेलच… आपल्यापैकी सगळेच जण स्टिकी नोटस वापरत नसावेत पण काही जणांनी त्या वापरल्या सुद्धा नसतील, तर मग काय आहेत ह्या स्टिकी नोटस ? Google Keep आणि त्यात फरक तो काय ? Google Keep निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ह्यात विषय प्रभावीपणे मांडण्यासाठी ह्या कात्रणं पद्धतीचा अवलंब करावा लागत असे, मी कॉलेजमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धेसाठी ही पद्धत वापरली होती, अनेक प्रकारचे अहवाल, वृत्तपत्रातली, मासिकांमधली कात्रण फोटो असं अनेक पत्रावळी जमा केली होती… आणि हे सगळं साहित्य जपण्यासाठी अनेक अडथळे पार पाडावे लागले होते. ते हरवू नये म्हणून भिजू नये म्हणून …. . पण सद्यस्थितीमध्ये अशी माहिती गोळा करणारे कमी लोक असतील पण आता ह्या सगळ्याच डिजिटल रूपांतर बहुतेक वेळा इंटरनेटवर मिळून जात. पण समजा तुम्ही एखाद्या छानश्या व्याख्यानाला गेला असाल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या CEO ने छानसं भाषण दिलं असेल आणि त्यात एखादी ओळ, कविता, शेर, वाक्य तुम्हाला भावलं असेल तर ते आपण विसरून जाऊ नये ह्यासाठी तुम्ही कागद पेनावर ते नोंदवून ठेवत असाल, कोणीतरी अतिशय महत्वाचा फोन नंबर दिला असेल आणि एखाद्या चिटूरक्यावर तर तोसुद्धा काहीजणांना जपून ठेवला असेल आणि हरवलेलाही असेल जसा… फरहान अख्तरने रॉकऑन मध्ये “पिछले सात दिन में खोया” ह्या गाण्यात एका मुलीचा फोन नंबर हरवला , पण जरका त्याने Google Keep वापरलं असत तर असं गाणं म्हणायची वेळ त्याच्यावर आली नसती असो तर ह्या आजच्या लेखामध्ये आपण पाहुयात अत्यंत महत्वाच्या Google Keep ह्या अँप बद्दल Google Keep अर्थातच Digital sticky notes इंटरनेटवर अश्या अनेक Digital sticky notes असतील… तुम्ही वापरल्या किंवा वापरतही असाल. Google Keep असा अँप आहे जो तुम्ही डेस्कटॉप आणि अँप माध्यमातून वापरू शकाल ज्यात डेस्कटॉपवरील माहिती अँप मध्ये आणि अँप मधली डेस्कटॉप मध्ये पाहू शकाल तेही “Save” न करता तुम्ही समजा अत्यंत महत्वाच्या मीटिंग साठी वही पेन न घेतातच तसेच गेलात आणि तुम्हाला ठळक मुद्दे नमूद करून ठेवायचे असतील तर तुम्ही Google Keep वापराच !! खूपदा माहितीच एकत्रीकरण करायचं असत पण…… अर्धी माहिती word format मध्ये अर्धी माहिती व्हिडिओ रुपात, अजून कसलीतरी माहिती फोटो रुपात…. हे सगळ एकत्र करून त्याची जुळवाजुळव करण आता सोप्प आहे. तुम्हाला google keep हे कधीही ! कुठेही !! कोणत्याही !!! आणि कसल्याही !!! नोंदी ठेवायला मदत करतं …दैनदिन जीवनात खूप उपयुक्त असा अँप आहे. सदर अँप तुम्ही online/ offline पद्धतीने वापरू शकता, इंटरनेट नसेल तरीही हा आपलं दिलेलं काम करत राहणार. Google कश्यासाठी वापराल किराणा जिन्नस भाजी बाजारहाट ह्यांची यादी करायला तुमची task list बनवायला Google Map च्या नोंदी map photo सहित करायला फोन लिहायला (असा फोन नंबर जो तुम्हाला contact list मध्ये ठेवायचा नसेल… कारण काहीही असेल ) तुम्ही To do list बनवू शकता Reminder set करू शकता एखादा आवाज/ भाषण रेकॉर्ड करू शकता एखादं online magzine वरील लेख (article) तुम्ही जतन करू शकता फोटो जतन करू शकता आवडलेलं वाक्य (Quote) भाषण किंवा सभेतील (meetings) महत्वाचे मुद्दे तुमच्या डोक्यातल्या सृजनशील कल्पना (Creative ideas) एखादा Business plan / idea एखादी पाककृती Whats app/ facebook वर आलेली माहिती, फोटो सुविचार, माहिती, लेख, टिपण अशी माहिती ज्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑफिसमधल्या तुमच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तीसोबत share करू शकता तुम्ही तुमच्या ऑफिस प्रेसेंटशनसाठी मुद्दे एकत्र करु शकता आणि बरंच काही अत्यंत सोपा साधा सरळ अँप आहे ज्यात अनेक प्रकारची माहिती तुम्हाला साठवता येऊ शकते मग तुम्ही कोणीही असा नोकरी व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनिअर, गृहिणी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे वापरू शकता. एक google account आणि अनेक प्रकारची साधन जसे Mobile, laptop, tab ह्या वरून फक्त लॉग इन करा तुम्हाला तुमच्या Google कीप मधील नोटस जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला इंटरनेट जिथे कुठे मिळेल तिथे सुद्धा तुम्हाला साथ देतील, google ने हीच तर खास सोय केली आहे. Google Keep ची वैशिष्ट्ये तुम्ही notes चे रंग बदलू शकता त्याची To List बनवू शकता त्याची नक्कल (copy) बनवू शकता ते तुम्ही email whastapp द्वारे कोणालाही share करू शकता त्या notes मध्ये mobile camera वापरून photo ठेवू शकता आवाज ध्वनिमुद्रण (Voice recording) करून ठेवू शकता Mobile photo gallery मधला फोटो, document upload करू शकता आणि चित्र काढू शकता शंकानिरसन: प्रश्न : ह्या App ची खात्री तुम्ही देता का ? उत्तर: अर्थात माझी गरज नाही खुद्द Google Inc. स्वतः देत आहे त्यासाठी त्यांच्या संकेतस्थळाला भेट द्या ( https://www.google.co.in/keep/) —————————————————————————————————– प्रश्न : ह्या अँप मधली आम्ही साठवून ठेवलेली माहिती पुसली/हरवली जाणार नाही का ? उत्तर : ह्या अँप मध्येच का google च्या कोणत्या अँप मध्ये तुम्ही जेव्हा काहीही लिहिता तेव्हाच ते auto save (स्वःताहोऊन माहिती साठवून ठेवतं) त्यामुळे माहिती हरवली जात नाही पण नजर चुकीने तुम्ही delete केलीत तर कायची ती माहिती पुसली जाऊ शकते. —————————————————————————————————– प्रश्न: सदर अँप वापरण्यासाठी google पैसे भरावे लागतील का ? उत्तर : अर्थातच नाही संपूर्णपणे मोफत आहे. तुमच्या अप्पल असो किंवा andriod हा अप दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे संदर्भ लिंक : खालील प्रमाणे Ref Link : https://www.google.co.in/keep/ Google Keep Chrome Extension Ref link here: Save what’s on your mind and remember anything you need wherever you are. With Google Keep, stay on top of your world by quickly accessing and organizing the information you want. Enter a note with your voice, add a photo, or just type a list. All your notes are instantly saved across your devices. आपल्याला वरील लेख आवडला असेल तर आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. त्यामुळे लोकोपयोगी पोस्ट लिहायचा हुरूप वाढतो. आपल्या ब्लॉग वरील भेटीबद्दल आभारी आहोत. 4 Responses Nagwekar December 8, 2017 Nice… I am into all this…and was just looking for digital way..Thanks for sharing… Reply Priesh P Pethe December 8, 2017 Very informative article. Thanks for sharing ? Reply सुहास शिवलकर December 9, 2017 मी वापरून पाहिलं आहे. मला त्यात पुष्कळच त्रुटी आढळल्या. त्यामुळे अनइंस्टॉल केलं. त्यापेक्षा Simple Notepad देखील सोयीस्कर आहे. Reply Mandar Sant January 3, 2018 ok. Reply Leave a Reply to Priesh P Pethe Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website
Nagwekar December 8, 2017 Nice… I am into all this…and was just looking for digital way..Thanks for sharing… Reply
सुहास शिवलकर December 9, 2017 मी वापरून पाहिलं आहे. मला त्यात पुष्कळच त्रुटी आढळल्या. त्यामुळे अनइंस्टॉल केलं. त्यापेक्षा Simple Notepad देखील सोयीस्कर आहे. Reply