महाशिवरात्र Mandar Sant March 1, 2022 दिनविशेष 3 माघ महिन्यातील अत्यंत महत्वाचा व पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र, ही माघ महिन्यात वद्य चतुर्दशीला येते. माघ कृष्ण चतुर्दशी ची पहाट ही तिथी महाशिवरात्र व्रताचा काळ म्हणून पाळली जाते. यावेळी निशिथ काळ असतो. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक व्रत आहे. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री म्हणजे काय ? ———————————- पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. ‘शिव’ रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत का करावे ? ————————————– शिव शंकर हे शिवतत्वाद्वारे या ब्रह्माण्डातील तमोगुण स्वीकारीत असतात व हे विश्व नित्य नूतनपणे शुद्ध ठेवीत असतात. शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे. व्रत आचरण्याची पद्धत व विधी ————————————– उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका शिवपिंडीवर वाहाव्यात. तसेच धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. शिवपूजेची वैशिष्ट्ये ———————— १) शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. [ आपण कश्याने अभिषेक करावा हे आपापल्या गुरुजींना विचारून मगच तसे करावे ] २.) शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. ३.) शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. ४.) शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात. ५.) शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व ———————————————————— महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. महाशिवरात्रीबाबत पुराणामध्ये एक कथा प्रचलीत आहे : —————————————————————– विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात एक शिकारी राहत होता तो शिकार करून आपल्या बायकोमुलांचे पालन पोषण करीत असे. एके दिवशी हरणांची शिकार करण्यासाठी व्याध एका झाडावर लपून बसला होता. झाडांच्या पानंमुळे काही दिसत नव्हते म्हणून तो एक एक पान तोडूनखाली टाकू लागला आणि योगायोग असा की त्या झाडाखाली शिवाचे मंदिर होते व ते झाड बेलाचे होते.रात्री एक हरिणी पाणी पिण्यासाठी तिथे आली व्याधाला तिची चाहूल लागली.व्याध बाण सोडणार तितक्यात त्या हरिणीचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेले व ती त्याला म्हणाली अरे व्याधा जरा थांब ! मला मारू नकोस कारण माझी पाडसे घरी वाट पाहत असतील त्यांची भेट घेऊन येते मग मार. त्या शिकाऱ्याने तिचे म्हणणे कबूल केले. व्याधाला दया आली त्याने तो विचार सोडून दिला. त्या दिवशी व्याधा कडून शिवाला बेलाच्या पानांचा अभिषेक झाला होता, शिकार न मिळाल्यामुळे उपवास घडला होता. यामुळेत्याने दाखविलेल्या दयेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व व्याधाला हरिणीलाबछड्यासह त्यांनी स्वर्गात स्थान दिले म्हणून हा दिवस महाशिवरात्र म्हणून मानण्यात येऊ लागला.आजही तो व्याध आणि कळपांच्या म्होरक्या(प्रमुख) मृग हे नक्षत्राच्या रूपाने आकाशात रात्री चमकताना दिसतात. शिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. ‘हर हर महादेव…’, अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविकचराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावरभाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे. ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला ‘कैलासनिवासी’ असे म्हटले जाते.’आशुतोष’ म्हणचे तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणार्या शिवाला ‘नीळकंठ’ असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा व चंद्र यांचेस्थान आहे. म्हणून त्यांना ‘त्र्यंबकेश्वर’ असेही म्हणतात. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रामध्ये सर्व प्रकारचेदु:ख नष्ट करण्याची शक्ती आहे.’शिव’ म्हणजे पापाचा नाश करणारे, त्या आधी असणारा ‘नमः’ हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे. ‘नम: शिवाय’ या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाचे कल्याणासाठीसार्थ ठरला आहे. शिवाला बेलपत्र प्रिय : एका कथेनुसार… —————————————– एकदा विष्णुची पत्नी लक्ष्मीने श्रावण मासात शिवलिंगावर प्रतिदिन 1001 पांढरे कमळाची फुले वाहण्याचे व्रत करण्याचे ठरविले. लक्ष्मीने परडीत मोजून कमळे ठेवली. मात्र मंदिरात पोहचल्यानंतर तीन कमळाची फुले कमी भरली. त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने फुलांवर पाणी शिंपडले आणि चमत्कार झाला. फुलांमधून एक रोपटे बाहेर आहे. त्याला त्रिदलासारखी पाने त्याला होती. ते बेलाचे रोपटे होते. त्यावरील बेलपत्र लक्ष्मीने तोडून शिवलिंगवर वाहिली. लक्ष्मीच्या भक्तिमधील सामर्थ्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले व तेव्हापासून शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे. ===================================================================== आज अवश्य पठण करावीत अशी श्री शिव शंकरांची स्तोत्रे ———————————————————– *शिव तांडव स्तोत्र * जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्। डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम ॥1॥ जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी । विलोलवी चिवल्लरी विराजमानमूर्धनि । धगद्धगद्ध गज्ज्वलल्ललाट पट्टपावके किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं ममं ॥2॥ धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधुवंधुर- स्फुरदृगंत संतति प्रमोद मानमानसे । कृपाकटा क्षधारणी निरुद्धदुर्धरापदि कवचिद्विगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि ॥3॥ जटा भुजं गपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा- कदंबकुंकुम द्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे । मदांध सिंधु रस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे मनो विनोदद्भुतं बिंभर्तु भूतभर्तरि ॥4॥ सहस्र लोचन प्रभृत्य शेषलेखशेखर- प्रसून धूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः । भुजंगराज मालया निबद्धजाटजूटकः श्रिये चिराय जायतां चकोर बंधुशेखरः ॥5॥ ललाट चत्वरज्वलद्धनंजयस्फुरिगभा- निपीतपंचसायकं निमन्निलिंपनायम् । सुधा मयुख लेखया विराजमानशेखरं महा कपालि संपदे शिरोजयालमस्तू नः ॥6॥ कराल भाल पट्टिकाधगद्धगद्धगज्ज्वल- द्धनंजया धरीकृतप्रचंडपंचसायके । धराधरेंद्र नंदिनी कुचाग्रचित्रपत्रक- प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचने मतिर्मम ॥7॥ नवीन मेघ मंडली निरुद्धदुर्धरस्फुर- त्कुहु निशीथिनीतमः प्रबंधबंधुकंधरः । निलिम्पनिर्झरि धरस्तनोतु कृत्ति सिंधुरः कलानिधानबंधुरः श्रियं जगंद्धुरंधरः ॥8॥ प्रफुल्ल नील पंकज प्रपंचकालिमच्छटा- विडंबि कंठकंध रारुचि प्रबंधकंधरम् स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे ॥9॥ अगर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी- रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम् । स्मरांतकं पुरातकं भावंतकं मखांतकं गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे ॥10॥ जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुर- द्धगद्धगद्वि निर्गमत्कराल भाल हव्यवाट्- धिमिद्धिमिद्धिमि नन्मृदंगतुंगमंगल- ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥11॥ दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकमस्रजो- र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः । तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥12॥ कदा निलिंपनिर्झरी निकुजकोटरे वसन् विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्। विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः शिवेति मंत्रमुच्चरन्कदा सुखी भवाम्यहम्॥13॥ निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका- निगुम्फनिर्भक्षरन्म धूष्णिकामनोहरः । तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं परिश्रय परं पदं तदंगजत्विषां चयः ॥14॥ प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना । विमुक्त वाम लोचनो विवाहकालिकध्वनिः शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम् ॥15॥ इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं पठन्स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम्। हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नांयथा गतिं विमोहनं हि देहना तु शंकरस्य चिंतनम ॥16॥ पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतं यः शम्भूपूजनमिदं पठति प्रदोषे । तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥17 ======================================= **दारिद्र्यदु:ख दहन स्तोत्र ** विश्वेश्वराय नरकार्णव तारणाय करूणामृताय शशिशेखरधारणाय। कर्पूरकान्तिधवलाय जटाधराय,दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥१॥ गौरीप्रियाय रजनीशकलाधराय कालान्तकाय भुजगाधिपकङ्कणाय। गंगाधराय गजराजविमर्दनाय,दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥२॥ भक्तिप्रियाय भवरोगभयापहाय,उग्राय दुर्गभवसागरतारणाय। ज्योतिर्मयाय गुणनामसुनृत्यकाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥३॥ चर्मम्बराय शवभस्मविलेपनाय भालेक्षणाय मणिकुण्डलमण्डिताय। मंझीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥४॥ पञ्चाननाय फणिराजविभूषणाय हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय। आनन्दभूमिवरदाय तमोमयाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥५॥ गौरिविलास भुवनाय महेश्वराय पन्चाननाय शरणागत कल्पकाय शर्वाय सर्वजगतामधिपाय तस्मै दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय|| ६|| भानुप्रियाय भवसागरतारणाय कालान्तकाय कमलासनपूजिताय। नेत्रत्रयाय शुभलक्षण लक्षिताय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥७॥ रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय नागप्रियाय नरकार्णवतारणाय। पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥८॥ मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीतप्रियाय वृषभेश्वरवाहनाय। मातङ्गचर्मवसनाय महेश्वराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥९॥ वसिष्ठेन कृतं स्तोत्रं सर्वदारिद्रनिवारणं। सर्वसंपत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम्। त्रिसंध्यं यः पठेन्नित्यं स हि स्वर्गमवाप्नुयात्॥ऊ॥ ================================================= 3 Responses Sameer March 4, 2019 ??? Reply डॉ. करंदीकर March 4, 2019 परिपूर्ण अप्रतिम माहिती. धन्यवाद Reply Raviebala Kakatkar March 4, 2019 Dear Mr nanda.v nicely written informative article.thanks Regards Raviebala Kakatkar Reply Leave a Reply to Sameer Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website
Raviebala Kakatkar March 4, 2019 Dear Mr nanda.v nicely written informative article.thanks Regards Raviebala Kakatkar Reply